Sunday, November 24, 2019

...आणि ॲश-अभिषेकची लव्‍ह स्‍टोरी झाली सुरू



ऐश्वर्या राय बर्थडे 


अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे लग्‍न २००७ मध्‍ये झाले. मात्र त्यापूर्वीची अभिषेक आणि ऐश्वर्या रायची लव्‍ह स्टोरी खूपच खास आहे. ॲश आणि अभिषेक यांची लव्‍ह स्‍टोरी कशी आणि कधी सुरू झाली, हे पाहुयात. 

अनेक चित्रपटात एकत्र काम
Related image
अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघांनी सुरुवात 'ढाई अक्षर प्रेम के' आणि 'कुछ ना कहो' मध्ये काम केलं होतं. त्‍यावेळी दोघांची केवळ मैत्री होती. याआधीही अभिषेक-ॲश 'प्यार हो गया' (१९९७) चित्रपटाच्‍या सेटवर भेटले होते. या चित्रपटात अभिषेक बॉबी देओलसोबत काम करत होता. त्‍यादरम्‍यान, ॲश सलमानसोबत तर अभिषेक करिश्मा कपूरशी एंगेज्‍ड होता. अभिषेक बच्चनचं लग्‍न अभिनेत्री करिश्मा कपूरशी होणार होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. ऐश्वर्या राय पहिल्‍यांदा सलमान खान आणि नंतर विवेक ओबरायसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. 
ॲशला अभिषेकने असं प्रपोज केलं
Image result for ash and abhishek
त्‍यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी 'बंटी और बबली' चित्रपटातील गाणं 'कजरा रे'मध्‍ये एकत्र काम केलं. चित्रपटातील हे गाणं सुपरहिट झालं. त्‍यानंतर दोघांच्‍या अफेअरच्‍या चर्चा जोर धरू लागल्‍या. दोघांनी मणि रत्नम यांच्‍या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आणि चित्रपटाच्‍या प्रीमियरनंतर टोरांटोमध्‍ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्‍नासाठी प्रपोज केलं. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनचं प्रपोजल स्वीकारलं. 
Image result for ash and abhishek
एका मुलाखतीत अभिषेकने म्‍हटलं होतं, 'मी एकदा न्यू-यॉर्कमध्‍ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्‍यावेळी मी एका हॉटेलमधील रूमच्‍या बाल्‍कनीत उभा राहून विचार करत होतो, की जर मी ॲशशी लग्‍न केलं तर किती छान होईल. काही वर्षांनंतर गुरुच्‍या प्रीमियरनंतर आम्‍ही त्‍याच हॉटेलमध्‍ये गेलो आणि त्‍याच बाल्‍कनीत मी ॲशला लग्‍नासाठी प्रपोज केलं.' 
प्रपोज केल्‍यानंतर ॲश-अभिषेक मुंबईत परतले. १४ जानेवारी, २००७ मध्‍ये दोघांनी साखरपुडा केला. त्‍यानंतर ते एकत्र मूव्‍हीज पाहायला आणि नाईट क्लब जाऊ लागले. एका मुलाखतीत ॲशनेही म्‍हटलं होतं, 'अभिषेकने तिला गुरु चित्रपटाच्‍या सेटमध्‍ये असलेली नकली अंगठीसोबत प्रपोज केलं. ते मला खूपच रिअल वाटलं होतं.' 
Image result for ash and abhishek
लग्‍नात होती अडचण
लग्‍नाच्‍या आधी ॲश-अभिषेक यांच्‍या आयुष्‍यात चढ-उतार आले. पहिली अडचण म्‍हणजे, ॲशच्‍या कुंडलीमध्‍ये दोष होता. दोष दूर करण्‍यासाठी ॲशला एका झाडाशी लग्‍न करायचं होतं. दुसरी अडचण अशी की, 'धूम-२' चित्रपटातील ॲश आणि ऋतिक रोशनचे किसिंग सीन. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ॲशचे हे बोल्‍ड सीन देणे बच्चन कुटुंबीयांना आवडले नव्‍हते. 
Image result for ash and abhishek
बहुप्रतीक्षित लग्‍न
अभिषेक-ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्‍ये लग्‍न केलं. दोघांच्‍या लग्‍नाची चर्चा संपूर्ण मीडियात झाली होती. दोघांनी लग्‍नाच्‍या कपड्‍यांपासून लग्‍नात येणार्‍या पाहुण्‍यांच्‍या यादीपर्यंत ही चर्चा होती. परंतु, अभिषेक बच्चनच्‍या आजीची तब्‍येत बिघडल्‍याने हे लग्‍न घरगुतीच करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. 
एका मुलाखतीत ॲशने म्‍हटलं होतं की, अभिषेक माझ्‍यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. तो खूप सपोर्टिव आहे. ज्‍यावेळी मी गोंधळाच्‍या परिस्‍थितीत असते. तेव्‍हाअभिषेक माझी समस्‍या पटकन मिटवतो. 
Image result for ash and abhishek
मुलीचा जन्‍म
१६ नोव्‍हेंबर २०११ ला ॲशने मुलीला जन्‍म दिला. तिचं नाव आराध्‍या असं ठेवण्‍यात आलं. आराध्‍याच्‍या जन्‍मानंतर ॲशने चित्रपटात काम केलं नाही. आराध्‍या चार वर्षांची झाल्‍यानंतर 'जज्‍बा' चित्रपटातून ॲशने कमबॅक केलं. 

एका उत्तरामुळे ऐश्‍वर्या 'मिस इंडिया' स्पर्धेत पडली होती मागे


वाढदिवसानिमित्त
 


मिस वर्ल्डचा मुकुट परिधान करून ऐश्वर्या रायने संपूर्ण जगात भारतीय सुंदरतेचे दर्शन घडवलं. परंतु, १९९४ मध्‍ये 'फेमिना मिस इंडिया'च्‍या स्‍पर्धेत सुष्मिता सेनने दिलेल्‍या एका उत्तरामुळे ऐश्‍वर्याला 'मिस इंडिया'चं मुकूट मिळवता आलं नाही. ऐश्‍वर्या केवळ २ गुणांनी हारली होती. 

फेमिना मिस इंडियामध्‍ये ९.३३ गुणांवर टाय 
Related image
गोव्‍यात झालेल्‍या स्‍पर्धेत ऐश्‍वर्या आणि सुष्‍मिता सेनला एकसारखे गुण मिळाले होते. दोघींच्‍यात ९.३३ गुणांवर टाय झाला होता. जजेसने टाय ब्रेक करण्‍यासाठी दोघींना एक-एक प्रश्‍न विचारला होता. ज्‍यामध्‍ये ऐश्वर्याला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तुला तुझ्‍या पतीमध्‍ये कोणते गुण आहेत, हे शोधायचं असेल तर तू काय करशील? समज, तुला द बोल्ड ॲण्‍ड ब्यूटीफुलचे रिज फॉरेस्टर आणि सांता बारबराच्‍या मेसन कॅपवेल यांच्‍यापैकी कुणाला निवडशील?' ऐश्वर्याने उत्तर दिलं...'मेसन.' ती म्‍हणाली, 'कारण आमच्‍या दोघांत अनेक सारख्‍या गोष्‍टी आहेत. मेसनचा स्‍वभाव खूप केअरिंग आहे आणि त्‍यांचा सेन्‍स ऑफ ह्यूमर देखील चांगलं आहे.' 
सुष्मिताने या प्रश्‍नाचं उत्तर देऊन जिंकलं मुकुट 
सुष्मिता सेनला विचारण्‍यात आलं होतं की, 'आपल्‍या देशातील टेक्सटाईल हेरिटेजबद्‍दल काय जाणतेस? हे किती जुनं आहे आणि तुला घालायला आवडेल?' सुष्‍मिता म्‍हणाली, 'मला वाटतं की, हे सर्व महात्मा गांधी यांच्‍या खादीपासून सुरू झालं होतं. तेव्‍हापासून याचा दीर्घकाळ प्रवास आहे. परंतु, टेक्साटाईल हेरिटेजच्‍या मूळ गोष्‍टी तेथूनच आहेत.' 
Related image
मिस इंडियाच्‍या फायनल राउंडमध्‍ये ऐश्वर्या-सुष्मिता या दोघींच्‍यामध्‍ये टक्कर पाहायला मिळाली होती. सुष्मिताला विचारण्‍यात आलं होतं की, 'जर तू एखाद्‍या ऐतिहासिक घटनेला बदलू शकली असतीस तर ती कुठली गोष्‍ट असती?' यावर सुष्मिताने म्‍हटलं होतं, 'इंदिरा गांधी यांचा मृत्यू'. 
या एका उत्तराने सुष्मिताचं भाग्‍य उजळलं आणि ती 'मिस इंडिया' बनली. 
टाय ब्रेकअपनंतर 'मिस इंडिया'चा मुकूट सुष्‍मिता सेनला परिधान करण्‍यात आला. (१९९४) ऐश्‍वर्याला केवळ २ गुणांनी ही स्‍पर्धा जिंकता आली नव्‍हती. स्‍पर्धेत होस्ट म्‍हणून दिलीप ताहिल उपस्‍थित होते. तर माजी मिस इंडिया स्‍पर्धक नम्रता शिरोडकर, पूजा बत्रा आणि तरविंदर कौर देखील उपस्‍थित होते. 
Related image
ऐश्वर्या रायचा जन्‍म १ नोव्‍हेंबर १९७३ रोजी मंगळुर, कर्नाटकात झाला. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज मरीन इंजिनिअर होते. तिच्‍या आईचे नाव वृंदा राय. त्‍या लेखिका आहेत.  ऐश्वर्याचा एक मोठा भाऊ देखील आहे. त्‍याचं नाव आदित्य  राय असं आहे. ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलु आहे. शिवाय, तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषा देखील येतात. ऐश्वर्या रायचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता ७वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्‍ये झालं. त्‍यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत आले. मुंबईत ॲशने सांताक्रूज येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर डी. जी. रुपारेल कॉलेज, माटूंगा येथे शिक्षण घेतलं. शिक्षणासोबत तिने मॉडलिंगकडे देखील लक्ष दिलं. 
Image result for aishwarya rai
ऐश्वर्याला मॉडलिंगचा पहिला प्रस्ताव कॅमलिन कंपनीकडून मिळाला होता. त्‍यावेळी ॲश नववीत शिकत होती. नंतर ती कोक आणि पेप्सीच्‍या जाहिरातीत दिसली. 

मराठी रंगभूमीवरील 'ही' नाटके पाहिली का?



मराठी रंगभूमी दिन
महाराष्ट्रात रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला विष्णूदास भावे (Vishnudas Bhave) यांच्या जयंती निमित्त साजरा केला जातो. तर वैश्विक स्तरावर २७ मार्चला रंगभूमी दिन साजरा केला जातो. इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटने (ITI) १९६२ पासून २७ मार्च हा दिवस 'जागतिक रंगभूमी दिन' म्हणून साजरा करायचं ठरवलं. महाराष्ट्र ते आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विविध नाटकांचा आवाका खूपच मोठा आहे. महाराष्ट्रातही नाटकांचा पसारा मोठाच! आज महाराष्ट्रात रंगभूमी दिन साजरा केला जातोय. त्यानिमित्त तुम्ही ही पुढील नाटके एकदा पाहायला हरकत नाही. ही नाटके पाहिल्यानंतर तुम्हीही त्याच्या प्रेमात पडू शकता.  
कला म्हणजे समाजामध्ये संदेश पोहोचवण्याचे एक साधन आणि कलाकाराच्या अभिनयाचा कस जेथे लागतो, ते व्यासपीठ. नाटकाच्या या व्यासपीठावरच कलाकारांच्या अभिनयाची खरी कसोटी लागते. नाटकातील मंडळी पुढे चित्रपटात गेली तो भाग वेगळा. असो. 
आज कॉम्प्युटरचं युग. या जगात कॉम्प्युटरबरोबरचं मोबाईलसारख्या अनेक डिजीटल माध्यमांनी आपलं विश्व मांडलं आहे. सिनेमा, मालिका ते अगदी वेबसीरीजपर्यंत या माध्यमांमध्ये आपण गुंतलो आहे. तरीही नाटकप्रेमी आपली नाटके पाहायची विसरत नाहीत. मग, तुम्हीही थोडं कॉम्प्युटर, मोबाईलमधून डोकं बाहेर काढून ही नाटके पाहू शकता.  
डिजिटल मीडियातलं वलय कलाकारांना खुणवत असलं तरीही अनेक मातब्बर कलाकार स्वतःला रंगभूमीवर स्वतःला आजमावून पाहतात. महाराष्ट्रात संगीत नाटकांपासून अगदी बालनाटकांची परंपरा आहे. त्यामुळे आबालवृद्ध मराठी रसिक हमखास नाटकं पहायला जातो. मग रंगभूमीवर सुरू असलेली ही काही दर्जेदार मराठी नाटकं तुम्ही पहायला हवी.
मोरूची मावशी
आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्या ‘मोरूची मावशी’ या नाटकातली अभिनेते विजय चव्हाण यांची भूमिका प्रचंड गाजली. या नाटकाने प्रेक्षकांच्या गळ्यातले ते ताईत बनले. या नाटकाचे २ हजारहून अधिक प्रयोग झाले होते. ‘मोरूची मावशी’ हे त्यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक गाजलेले नाटक ठरले. स्त्री भूमिकेत ते फुगडी घालायचे, पिंगा घालायचे, त्यांच्या तोंडी असलेले टांग-टिंग..टिंगाक टांग-टिंग.. टांग-टिंगाक टूम.. हे गाणे तोंडपाठ झाले होते. त्यापाठोपाठ ‘अशी ही फसवाफसवी’, ‘तू तू-मी मी’ ही नाटकेही गाजली. रंगभूमीवर त्यांचा वावर अत्यंत सहजसुंदर असायचा. विनोदी भूमिका ते जितक्या सहजपणे साकारायचे, तेवढ्याच सहज खलनायक किंवा गंभीर भूमिकांनाही त्यांनी आपल्या कारकिर्दीत साजेसा असा न्याय दिला होता.
Related image
देवबाभळी
विठ्ठल भक्तीवर वाटणारं हे नाटक स्त्रियांच्या मानसिकतेवर प्रकाश टाकतो. अवली आणि रुक्मिणी या दोन भूमिका संबंध नाटकभर रसिकांना एका खिळवून ठेवणाऱ्या आहेत. 
Image result for देवबाभळी जुने नाटक
अलबत्त्या गलबत्त्या
‘अलबत्त्या गलबत्त्या’ च्या अभूतपूर्व यशानंतर अनेक नाटकं आली. परंतु, त्यातील एक लक्षात राहणारं नाटक म्हणजे  'अलबत्त्या गलबत्त्या'. पालकांनी आपल्या मुलांना हे नाटक दाखवायला हवे. तुम्ही मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये 'अलबत्त्या गलबत्त्या' नाटकं दाखवू शकता.
Image result for अलबत्त्या गलबत्त्या
एका लग्नाची पुढची गोष्ट
‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं’, या गाण्याने धुमाकूळ घातला होता. ‘एका लग्नाची गोष्ट’ या नाटकात अभिनेता प्रशांत दामलेने खळखळून हसवलं होतं. एका लग्नाची गोष्ट या नाटकात लग्नाच्या आधी आणि लग्नानंतरच्या गंमतीजमती मांडण्यात आल्या होत्या. प्रशांत दामले- कविता मेढेकर ही जोडी हिट ठरली होती.  ‘एका लग्नाची गोष्ट’ नाटकाचे लेखक श्रीरंग गोडबोले हे आहेत. 
Image result for एका लग्नाची पुढची गोष्ट
इडियट्स
श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित ‘इडियट्स’ हे नाटक तसं पाहता विनोदी. तरूण वर्ग लग्नाचा पर्याय न निवडता  ‘लिव्ह इन’चा पर्याय स्वीकारते. पण, का? या नाटकामध्ये ‘लिव्ह इन’च्या विषयाकडे विनोदाने पाहण्यात आले आहे. 
Image result for इडियट्स  श्रीरंग गोडबोले
ती फुलराणी
पु. ल. देशपांडे लिखित 'ती फुलराणी' गाजलेलं नाटक. George Bernard Shaw यांच्या "Pygmalion" या नाटकावर आधारित आहे. पु.लंच्याच शब्दांत ती फुलराणी म्हणजे स्वर आणि व्यंजन यांच्या ब्रम्हघोटाळ्यात सापडलेल्या माणसांची कथा आहे. या नाटकात हयात असेपर्यंत भक्ती बर्वे मुंजुळेची भूमिका करीत. भक्ती बर्वेनंतर प्रिया तेंडुलकर, सुकन्या कुलकर्णी आणि अमृता सुभाष या मंजुळाची भूमिका करत. या चौघींनीही लेखक पु.ल.देशपांडे यांच्या मनातली मंजुळा रंगमंचावर साकारली.  

'या' अभिनेत्यावर प्रेम करायची तब्बू, आजपर्यंत केलं नाही लग्न



बर्थडे स्पेशल  



बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचा ४ नोव्हेंबरला ४८ वा वाढदिवस. बॉलिवूडची एक दमदार अभिनेत्री असलेल्या तब्बूच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सर्वांपासून लपलेल्या नाहीत. तब्बूने आपल्या करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले. ती आजदेखील चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. तब्बूने तमिळ, मल्याळम आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिच्या दमदार अभिनयासाठी तिला दोनवेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. तब्बूने वयाच्या १४ व्या वर्षी 'हम नौजवान' या चित्रपटातून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. या चित्रपटात तिने देवानंद यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. 
Image result for tabu hd
तब्बूने अद्याप लग्न केलेलं नाही. असं म्हटलं जातं की, तब्बूचे नाव साउथ स्टार नागार्जुनसोबत जोडलं गेलं होतं. तब्बूने नागार्जुनमुळे लग्न केलं नव्हतं. परंतु, दोघांचं नातं टिकू शकलं नाही.
Image result for nagarjuna and tabu
अनेक चित्रपटविषयक मासिकामध्ये प्रसिध्द झालेल्या वृत्तानुसार, तब्बू नागार्जुनशी खूप प्रेम करत होती. प्रेमासाठी ती मुंबई सोडून हैदराबादमध्ये सेटल झाली होती. नागार्जुन आणि तब्बूचं नातं १५ वर्षांपर्यंत चाललं. नागार्जुन विवाहित होता. 
Image result for nagarjuna and tabu
तब्‍बूचं पूर्ण नाव तब्बसुम हाशमी असं आहे. ४ नोव्हेंबर, १९७१ मध्ये हैदराबादमध्ये तिचा जन्म झाला. तब्बूचा पहिला तेलुगु चित्रपट 'कुली नंबर १' होता. बॉलिवूडमध्ये तब्बूने पहिला साईन केलेला चित्रपट होता-'प्रेम'. परंतु, बोनी कपूर यांचा हा चित्रपट बनण्यास ८ वर्षे लागली. म्हणून 'पहला पहला प्यार' हा तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट ठरला. 
तसं पाहिलं तर तब्बू आपल्या लग्नाबद्दल कधी कॉमेंट करत नाही. परंतु, एकदा तिने आपल्या लग्नाबद्दल एक खुलासा केला होता. तिने म्हटलं होतं की, 'जर माझ्या चुलत भावासोबत मिळून अजयने त्या सर्व मुलांना धडा शिकवला नसता तर कदाचित आज माझा संसार झाला असता. त्या मुलांनी मला प्रपोज केलं होतं.'
Image result for ajay devgan and tabu
तासनतास पिच्छा करायचा...
तब्बू म्हणाली होती की, 'अजय देवगन माझ्याबद्दल इतकं प्रोटेक्टिव्ह होता की, मी एखाद्या मुलाशी बोलले तरी त्याला वाटायचं की, तो मला छेडत आहे. तो माझ्या चुलत भावासोबत मिळून माझी हेरगिरी करत होता. दोघे तासनतास माझा पिच्छा करायचे. दोघांनी मिळून ही गोष्ट कधी पुढे जाऊ दिली नाही.' तब्बू पुढे म्हणाली होती की, लग्न न करण्याच्या निर्णयाने आपण खुश आहोत. 
Image result for tabu hd
शाहरुखशी चांगली मैत्री 
इंडस्ट्रीमध्ये अधिक लोकांशी मैत्री नाही, यावर तब्बू म्हणाली, असं नाही की, माझी मैत्री नाही. शाहरुख आणि अनेक लोकांशी माझी चांगली मैत्री आहे. अनेक जणांच्या पार्टी, कार्यक्रमात मी दिसत नाही. त्यामुळे लोकांना वाटतं की, माझे फ्रेंड्स नाहीत. 
Image result for tabu hd old
आगामी चित्रपटात झळकणार 
तब्बू 'जवानी जानेमन' आणि तेलगू चित्रपट 'अला वैंकुठापुरमला' या आगामी चित्रपटात झळकणार आहे.  
Related image

२५ वर्षे @अंदाज अपना अपना





कॉमेडी चित्रपट 'अंदाज अपना अपना' ४ ऑक्टोबर, १९९४ रोजी रिलीज झाला. या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली. हा एक कॉमेडी चित्रपट होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार संतोषी यांनी केले होते. चित्रपटामध्ये बॉलिवूडचे ६ दिग्गज स्टार मोठ्या पडद्यावर एकत्र दिसले होते. 

आमिर खान, सलमान खान, रवीना टंडन, करिश्मा कपूर, परेश रावल आणि शक्ति कपूर या सहा कलाकारांनी धुमाकूळ घातला होता. या चित्रपटाला आज २५ वर्षे पूर्ण झाली. या चित्रपटाचे कलाकार आता असे दिसतात. 
आमिर खान- अमर मनोहर
आमिर खानने 'अंदाज अपना अपना'मध्ये अमर मनोहरची भूमिका साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. आमिर खानच्या लुकमध्ये आता बराच बदल झाला आहे. आमिर सध्या 'लाल सिंह चड्ढा' चित्रपटामध्ये बिझी आहे. आमिर खानचा बदललेला लूक -
सलमान खान- प्रेम भोपाली
सलमान खानने प्रेम भोपालीची भूमिका केली होती. सलमानच्या लूकमध्ये आता मोठा बदल झाला आहे. सलमान 'भारत' चित्रपटात दिसला होता. सध्या सलमान 'बिग बॉस' सीझन १३ ला होस्ट करत आहे. 
Image may contain: 2 people, people smiling, hat and close-up
रवीना टंडन- रवीना
या चित्रपटामध्ये रवीनाचे नाव रवीना असचं होतं. रवीना रिॲलिटी शो 'नच बलिए-९' मध्ये दिसली होती. २५ वर्षांमध्ये इतकी बदलली रवीना. 
Image may contain: 2 people, close-up
परेश रावल-तेजा आणि राम गोपाल बजाज 
या चित्रपटामध्ये परेश रावल दोन भूमिकेत दिसले. एक भूमिका सकारात्मक होती. तर दुसरी नकारात्मक भूमिका होती. 
Image may contain: 2 people, close-up
शक्ती कपूर- क्राईम मास्टर गोगो
शक्ती कपूर चित्रपटामध्ये क्राईम मास्टर गोगोच्या भूमिकेत होता.
Image may contain: 2 people, glasses and text

कमल हासन आणि श्रीदेवी





आज अभिनेते कमल हासन यांचा वाढदिवस. कमल हासन आणि श्रीदेवी यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडायची. परंतु, कमल हासन श्रीदेवी यांना आपली  बहिण मानायचे. कमल हासन यांच्‍या वाढदिवसानिमित्त जाणून घ्‍या या खास गोष्‍टी. 

Related image
दाक्षिणात्‍य चित्रपट सृष्‍टीचे सुपरस्टार कमल हासन ७ नोव्‍हेंबरला आपला ६५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. वयाच्‍या ६ व्या वर्षी कमल यांनी आपल्‍या करिअरची सुरुवात केली (१९५९).  
Image result for kamal haasan
मोठ्‍या पडद्‍यावरील कमल हासन आणि श्रीदेवी यांची जोडी प्रेक्षकांच्‍या पसंतीस उतरली होती. कमल हासन श्रीदेवी यांना बहिण मानायचे. श्रीदेवी यांच्‍या निधनानंतर  एका कार्यक्रमात कमल हसन यांनी म्‍हटलं होतं की, 'मी जेव्‍हा श्रीदेवीला भेटलो, तेव्‍हा ती १५-१६ वर्षांची होती. आम्‍हाला दोघांना कपल म्‍हणून कास्‍ट करण्‍यात आलं होतं. परंतु, रिअल लाईफमध्‍ये आम्‍ही भाऊ-बहिणीसारखे मोठे झालो. आम्‍हाला रोमँटिक चित्रपटात कास्‍ट करण्‍यात आल्‍यानंतर आम्‍ही पोट धरून हसलो. आम्‍ही एकाच कुटुंबातील सदस्‍य आहोत, असं आम्‍हाला वाटायचं.' 
Image result for kamal haasan and sridevi
श्रीदेवी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'एकदा मी कमल हासन यांच्‍या एका चित्रपटाची स्क्रीनिंग मिस केली होती. त्‍यामुळे तो चित्रपट थिएटरमध्‍ये पाहण्‍यासाठी मी बुरखा घातला होता. पब्लिकमध्‍ये जाताना हे करावं लागलं. मी खूप कमी वेळा चित्रपट पाहण्‍यासाठी थिएटरमध्‍ये जात होते. चित्रपटांचे स्पेशल स्क्रीनिंगचं मी पाहायला जात असे.' 
Image result for kamal haasan and sridevi
श्रीदेवी यांना प्रसिध्‍दी मिळाली ती डायरेक्टर भरतराजा यांच्‍या 'पथिनारू वयाधिनाइल' या चित्रपटामुळे. या चित्रपटात कमल हासन आणि रजनीकांत होते. कमल हासन आणि श्रीदेवी यांची जोडी 'कॉलीवुड'मध्‍ये हिट मानली जाते. दोघांनी जवळपास ४० चित्रपटात एकत्र काम केलं. 
Related image
‘सदमा’ हा चित्रपट कमल आणि श्रीदेवी यांच्‍या अभिनय कारकिर्दीतलं सर्वोच्च शिखर. हा चित्रपट ज्यांनी पाहिला त्यांना श्रीदेवीतली अभिनेत्री कळाली. सदमामध्‍ये कमल यांची प्रमुख भूमिका होती. कमल यांनी श्रीदेवी यांच्‍यासोबत सदमा, आखिरी संग्राम यासह अनेक तमिळ चित्रपटात काम केलं. बालू महेंद्र यांच्‍या दिग्‍दर्शनाखाली बनलेला 'सदमा' हा तमिळ चित्रपट 'मूंदरम पिरई'चा रिमेक होता. 
Image result for kamal haasan and sridevi
श्रीदेवी यांनी एकदा एका मुलाखतीत म्‍हटलं होतं, 'माझी मुलगी जान्‍हवीने सदमा चित्रपट पाहिल्‍यानंतर ती चिंतेत होती. ती केवळ ६ वर्षांची होती. त्‍यावेळी जान्‍हवी माझ्‍यासोबत ३ दिवस बोलली नव्‍हती. कारण मी, सदमा चित्रपटात कमल हसन यांना सोडून गेले होते. चित्रपट पाहिल्‍यानंतर जान्‍हवी मला म्‍हणाली होती, तू वाईट मम्मा आहेस. तुम्‍ही त्‍यांच्‍यासोबत वाईट वागलात.' 

एक महानायक-कमल हासन


कमल हासन बर्थडे स्पेशल
 


प्रसिध्‍द अभिनेते कमल हसनचा जन्‍म ७ नोव्‍हेंबर १९५४ रोजी तामिळनाडूतील परमकुडी येथे झाला. त्‍यांचे वडील श्रीनिवास हे वकील होते. तर आई राजलक्ष्‍मी ही गृहिणी होती. भाऊ चारु हरान हाही अभिनेता होता. बहिण नलिनी शास्‍त्रीय नृत्‍यांगणा होती. अशा कलासक्‍त कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. 

बालपणापासूनचं कलेचे संस्‍कार 
कमल यांच्‍यावर बालपणापासूनच कलेचे संस्‍कार झाले. बालपणी शिक्षणातही हुशार असल्‍याने त्‍यांच्‍या मोठ्‍या भावाने कमल यांनी उच्‍च शिक्षण घेण्‍याचा आग्रह धरला. कमल यांनी मद्रास येथे उच्‍च शिक्षण घेतले. 
Image result for kamal haasan
अभिनयात स्‍वारस्‍य 
अभिनयात असलेली आवड पाहून कमल यांच्‍या वडिलांनी त्‍यांना चित्रपट आणि नाटकामध्‍ये काम करण्‍यास प्रोत्‍साहन दिले. पहिल्‍यांदा कमल यांनी काही चित्रपटांमध्‍ये दुय्‍यम भूमिका केल्‍या. तथापि, नंतरची ७ वर्षे ते चित्रपटापासून दूर राहिले. 
Image result for kamal haasan
पुन्‍हा चित्रपटसृष्‍टीत प्रवेश 
१९७० मध्‍ये कमल यांनी पुन्‍हा एकदा प्रवेश केला. 'मानवन' या चित्रपटात त्‍यांना पहिली महत्त्‍वाची भूमिका मिळाली. तथापि, ती भूमिका नृत्‍याशी संबंधित होती. १९७३ ते ७५ या काळात त्‍यांनी सहाय्‍यक भूमिका करण्‍यातचं समाधान मानले. 'अवलोरु थोडरकथाई' आणि 'नानअवनीलाई' या चित्रपटात त्‍यांना रजनीकांत यांच्‍याबरोबर भूमिका करण्‍याची संधी मिळाली. 
बहरलं अभिनय क्षेत्र
१९७५ नंतर त्‍यांचा अभिनय खर्‍या अर्थाने बहरला. त्‍यानंतरच्‍या १० वर्षांत त्‍यांनी १००हून अधिक चित्रपटात भूमिका केल्‍या. 'मनमधा लिलाई,' 'उधापू कानसिमितूगिरधू' यातील त्‍यांचा अभिनय चांगला गाजला. या भूमिकेसाठी त्‍यांना सलग दुसर्‍या वर्षी तामिळ फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. या काळात त्‍यांनी 'मुंद्रू मुदिचू' या नाटकातही भूमिका गाजवली. १९७८ मध्‍ये तेलगू चित्रपट सोमोकादिधी सोक्‍कादिधी या चित्रपटातील त्‍याची दुहेरी भूमिका संस्‍मरणीय ठरली. 
Image result for kamal haasan film
हिंदी चित्रपटसृष्‍टीत प्रवेश 
१९८० मध्‍ये त्‍यांचा हिंदी चित्रपसृष्‍टीत प्रवेश झाला. 'एक दुजे के लिये' या चित्रपटातल्‍या त्‍यांच्‍या अभिनयाने सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं. हिंदीबरोबरच त्‍यांनी तेलगु आणि तमिळ चित्रपटही सुरूच ठेवले होते. १९८१ मध्‍ये 'राजा पारवई' या चित्रपटातून त्‍यांनी अभिनयाचे शतक साजरे केले. याच चित्रपटातून त्‍यांची निर्माता म्‍हणून ओळख निर्माण झाली. त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता म्‍हणून सलग तीनदा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. १९८४ नंतर त्‍यांनी 'सागर,' 'विक्रग,' 'स्‍वाती मुथियम,' 'राजतिलक' आदी चित्रपटात प्रुमख भूमिका केल्‍या. आंध्र प्रदेशातही त्‍यांच्‍या चित्रपटांना लोकप्रियता मिळाली. नंतर त्‍यांच्‍या अनेक चित्रपटांचे तेलगू रिमेक करण्‍यात आले. 'पुनागायीमनन' या चार्ली चॅप्‍लीनच्‍या चित्रपटावर आधारित तामिळ चित्रपटातील त्‍यांचा डबल रोल चांगलाच गाजला. मणिरत्‍नम यांच्‍या 'नायकन' या (१९८७) चित्रपटातलीही भूमिका फार गाजली. या चित्रपटासाठी त्‍यांना दुसरा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. 'पुष्‍पक' या चित्रपटातील (१९८८) त्‍यांची मूक भूमिका आजही सिनेरसिकांच्‍या स्‍मरणार्थ आहे. एक विनोदी अभिनेता अशी ख्‍यातीही कमल हसन यांना याच कालावधीत मिळाली. 
महाग अभिनेता 
एका चित्रपटासाठी दीड कोटी रूपये मानधन मिळवणारा कमल हासन हे भारतातील त्यावेळचे अभिनेते ठरले होते. १९९४ च्या दरम्यानच्या चित्रपटासाठी त्यांनी इतके मानधन घेतले होते. यापूर्वी १९७० ते १९८७ या कालावधीत सर्वात अधिक मानधन घेणारे राजेश खन्ना होते. 
Image result for kamal haasan chachi 420
स्त्री भूमिका 
कमल हासन यांचा 'चाची ४२०' हा त्यांचा स्त्री भूमिका असलेला चित्रपट आपल्याला माहिती आहे. परंतु, विनोदी चित्रपट 'अव्वई शनमुगई'मध्येही त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे-'चाची ४२०.' 
Image result for kamal haasan chachi 420
हे देखील वाचा -   
१९७५ मध्ये 'अपूर्वा रंगनागल' मध्ये मुख्य अभिनेता म्हणून कमल हासन यांना भूमिका मिळाली. या चित्रपटातून सिनेजगतात त्यांना ओळख मिळाली. १९७७ मध्ये '१६ भयानिथानिले' चित्रपट केला. हा चित्रपट  सुपरहिट ठरला. कमल हासन स्टार बनले.  चित्रपटामध्ये रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यासोबत त्यांनी काम केलं. १९८१ मध्ये हासन यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपट 'एक दूजे के लिए'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट  सुपरहिट झाला. आणि हासन हिंदी सिनेसृष्टीचा आणखी एक नवा लोकप्रिय चेहरा बनला. त्यांनी 'सदमा', 'सागर', 'गिरफ्तार' यासारखे हिंदी चित्रपट केले. 
Image result for kamal haasan
कमल हसन यांचे सात चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाली होती. हे चित्रपट- सागर, स्वाति मुत्यम, नयागान, थेवर मगन, कुरूथीपुनाल, इंडियन आणि हे राम असे आहेत. 
Image result for kamal haasan hey ram
'हे राम' या चित्रपटाचे दिग्दर्शन कमल हासन यांनी केले होते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी 'विरूमानदी' हा चित्रपट केला. त्याचबरोबर 'अनभेशिवम,' 'वसूल राजा एमबीबीएस' असे हिट चित्रपट दिले. 'वसूल राजा एमबीबीएस' हा 'मुन्नाभाई एमबीबीएस' या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. २०१० नंतर त्यांनी 'विश्वरूपम' हा चित्रपट केला होता. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...