Wednesday, March 11, 2020

राज कपूरची रंगपंचमी देव आनंदने कधीच खेळली नाही



रंगपंचमी आली म्‍हणजे आठवते ती राज कपूर यांच्या आरके स्‍टुडिओमध्‍ये खेळली जाणारी रंगपंचमीची. कारण, राज कपूर यांच्‍या घरी होणार्‍या रंगपंचमीसारखं सेलिब्रेशन आजपर्यंत कोणीही करू शकलं नाही. आरके स्‍टुडिओमध्‍ये रंगाने भरलेल्‍या पाण्‍याच्‍या टाकीत बुडवून ही होळी (रंगपंचमी) साजरी केली जायची. होळीला येणार्‍या सर्व पाहुण्‍यांना हा खास मान दिला जायचा, असे मिश्‍किलपणे म्‍हटलं जायचं. रंगपंचमीच्‍या निमित्तानं राज कपूर आपल्‍या फॅमिलीसोबत सेलिब्रेशनसाठी हजर असायचे. त्‍यांचे भाऊ शम्मी आणि शशी कपूर, तीन मुले-रणधीर कपूर, ऋषी कपूर आणि राजीव कपूर तसेच सुना आणि नातवंडे सर्वजण येथे असायची. चित्रपट सृष्‍टीतील कलाकारही या सेलिब्रेशनमध्‍ये सहभागी व्‍हायची.

आरके स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत रंगपंचमीचं सेलिब्रेशन झालं नाही. 
Image result for r k studio holi
आर. के. स्टुडिओ १९४८ मध्‍ये उभारण्‍यात आला होता. राजकपूर यांच्‍या नावाने हा स्‍टुडिओ उभारण्‍यात आला होता. शो मॅन नावाने प्रसिध्‍द असणारे अभिनेते राज कपूर यांनी अधिकतर चित्रपटांचे शूटिंग याच स्‍टुडिओत झाले होते. हा स्‍टुडिओ जवळपास २ एकर परिसरात होता. आता हा स्टुडिओ पाडण्यात आला असून ही जागा विकण्यात आली आहे.  
हिंदी चित्रपट 'आवारा,' 'श्री ४२०,' 'मेरा नाम जोकर' आणि 'बॉबी' यासारख्‍यां अनेक चित्रपटांचे शूटिंग येथे झाले होते. मुंबईच्‍या चेंबूरमध्‍ये असणारा हा स्‍टुडिओ ७० वर्षे जुना आहे. या स्‍टुडिओच्‍या एका भागात गेल्‍यावर्षी एका रिॲलिटी शोच्‍या शूटिंग दरम्‍यान आग लागली होती. रिपोर्ट्सनुसार, अभिनेत्रींचे पोशाख, ज्वेलरी, मेरा नाम जोकरचा क्लोन मास्क, जिस देश में गंगा बहती है मधील बंदूके तसेच आवारा, संगम आणि बॉबी चित्रपटातील ग्रँड पियानो देखील जळाले होते. 
रजा मुराद यांची आठवण 
पाचशेहून अधिक चित्रपटात काम करणारे अभिनेते रजा मुराद यांनी एका वेबसाईटशी बोलताना आपले आरके स्‍टुडिओशी निगडित अनुभव शेअर केले होते. त्‍यांनी बॉलिवूडकरांच्‍या रंगपंचमीविषयी आपले अनुभव सांगितले होते. त्‍यांनी सांगितले की, आर. के स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीचा उत्सव खूपच शानदार असायचा. 
Image result for r k studio holi
मुराद म्‍हणाले होते, आर. के. स्टुडिओमध्‍ये रंगपंचमीच्‍या उत्सवाचा अर्थ भांग आणि फूड फेस्टिव्‍हल असे होते. स्टुडिओमध्‍ये एक तात्‍पुरता विहिरीसारखे एक डबके बनवले जायचे. त्‍यामध्‍ये प्रत्‍येकाला उडी मारण्‍यास भाग पाडले जायचे. मला पहिल्‍यांदा स्टुडिओमध्‍ये ज्‍यावेळी रंगपंचमी उत्‍सवात सहभागी होण्‍याची संधी मिळाली, त्‍यावेळी मला खूप आनंद झाला होता. अनेक वर्षे हा उत्‍सव स्‍टुडिओत साजरा होत राहिला.
राज कपूर यांची रंगपंचमी बॉलिवूडच नाही तर हॉलिवूडपर्यंत प्रसिध्‍द होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत अनेक कलाकारदेखील आर के रंगपंचमीचा उत्‍सव साजरा करण्‍यास स्‍टुडिओत येत असत. 
देव आनंद कधीच सहभागी झाले नाहीत
दिलीप कुमार, मनोज कुमार, शम्मी कपूर, शशी कपूर, अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा, जितेंद्र, धर्मेंद्र, हेमा मालिनी यांच्‍यासारखे सेलिब्रिटीज आर के स्टुडिओच्‍या रंगपंचमी पार्टीत दिसत होते. परंतु, बॉलिवूडचे एक असे सुपरस्टार होते, जे या पार्टीत कधीच सहभागी झाले नाही. राज कपूर यांच्‍याआधी बॉलिवूडमध्‍ये याप्रकारे भव्य पध्‍दतीने रंगपंचमी सेलिब्रेट करण्‍याची परंपरा नव्‍हती. परंतु, राज कपूर यांनी स्‍टार्ससाठी रंगपंचमी पार्टी सुरू केली.
आर के स्टुडिओमध्‍ये राज कपूर यांच्‍या पार्टीमध्‍ये बॉलिवूडचे तमाम कलाकार सहभागी व्‍हायचे. परंतु, सदाबहार अभिनेते देव आनंद त्‍या पार्टीमध्‍ये कधीच सहभागी होत नसत. असे म्‍हटले जायचे की, देव आनंद आणि राज कपूर यांच्‍यामध्‍ये कोणताही वाद नव्‍हता. दोघे चांगले मित्र होते. परंतु, देव आनंद कधीच रंगपंचमीसाठी या स्‍टुडिओत गेले नाहीत. त्‍यांना रंगपंचमी साजरी करणे आवडत नसायचे. ते नेहमी सण-उत्‍सवापासून दूर असायचे. राज कपूर यांना देव आनंद यांची ही गोष्‍ट माहिती होती. त्‍यामुळे त्‍यांनी कधीही देव आनंद यांना आर के स्टुडिओच्‍या होळी पार्टीमध्‍ये आमंत्रण दिले नाही. 
Image result for r k studio holi
१९८८ पर्यंत आर. के. मध्‍ये रंगपंचमी साजरी व्‍हायची. परंतु, राज कपूर यांच्‍या निधनानंतर आर. के. स्टुडियोच्‍या रंगपंचमीचा सिलसिला कायमचा थांबला. 
आरके स्टुडिओमध्‍ये होळीची सुरुवात पृथ्वीराज कपूर यांनी केली होती. यानंतर ही परंपरा राज कपूर यांनी कायम ठेवली. ६०च्‍या दशकात त्‍यांनी आपल्‍या स्टुडिओत होळी आणि गणशोत्सव सुरू केले होते. मात्र, १९८८ मध्‍ये राजकपूर यांचे निधन झाल्‍यानंतर आरके स्‍टुडिओत होळीचं सेलिब्रेशन झालं नाही. 

Thursday, February 20, 2020

जिया खान:ग्लॅमर, फेम, सक्सेस आणि आत्महत्या





अभिनेत्री जिया खानचा आज ३२ वा जन्मदिवस आहे. एक अशी अभिनेत्री जिने आपल्या करिअरमध्ये सर्व काही मिळवलं; सक्सेस, फेम, ग्लॅमर मिळवलं. पण, कुणालाही वाटलं नव्हते की, ती इतक्या लवकर जग सोडून जाईल. तरीही असं काही तरी होतं की, जियाचं दु:ख जगापासून लपून राहिलं. त्या दु:खामुळे ३ जून, २०१३ रोजी स्वत:चे जीवन संपवले. अवघ्या २५ व्या वर्षी जियाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. २० फेब्रुवारीला तिचा जन्मदिवस. Image result for jiah khan hd
आपल्या छोट्याशा करिअरमध्ये जिया खानने कमी कालावधीच प्रसिध्दी मिळवली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत डेब्यू करणाऱ्या जिया खानचा जन्म २० फेब्रुवारी १९८८ रोजी न्यू-यॉर्कमध्ये झाला होता. न्यू-यॉर्कमध्ये न राहता जियाने आपली पावले सातासमुद्रापार भारतात बॉलिवूडकडे वळवली. तिने चित्रपट अभिनय आणि इंग्रजी साहित्याचे शिक्षण घेतले. 
जिया खानला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक २००७ मध्ये मिळाला होता. तिला राम गोपाल वर्माच्या 'निशब्द' चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली होती. यामध्ये ती महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती. या चित्रपटातील तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. फिल्मफेअरमध्ये बेस्ट डेब्यूसाठी ती नॉमिनेट झाली होती. 
Image result for jiah khan hd
अमिताभ बच्चन यांच्यानंतर तिला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली. २००८ चा ब्लॉकबस्टर चित्रपट गजनीमध्ये तिने आमिरसोबत काम केले. त्यानंतर जिया खानने कॉमेडी जॉनरमध्ये पाऊल ठेवलं. दिग्दर्शक साजिद खानचा चित्रपट हाउसफुलमध्ये तिने मुख्य भूमिका साकारली होती. यामध्ये ती अक्षय कुमारसोबत झळकली. अभिनयाशिवाय, जिया ट्रेन्ड सिंगर आणि डान्सरदेखील होती. जियाने बालपणापासून उर्मिलाची फॅन होती. 'दिल से' मध्ये जियाने बाल कलाकाराची भूमिका केली होती. 
जिया खानने वयाच्या २५ व्या वर्षी आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृत्‍यू आजदेखील न सुटलेले कोडे आहे. आत्‍महत्‍येपूर्वी जियाने चिठ्‍ठी लिहिली होती. त्‍यामध्‍ये तिने अनेक मोठे खुलासे केले होते. जिया खानने २०१३ मध्‍ये आत्‍महत्‍या केली होती. जियाचा मृतदेह तिच्‍या मुंबईतील जुहू स्थित घरात आढळला होता. 
Image result for jiah khan hd
३ जून, २०१३ रोजी रात्री ९ वाजून ३७ मिनिटांनी तिने आपल्‍या आईसोबत फोनवर बातचीत केली होती. जियाच्‍या आईने तिला म्‍हटले होते की, काहीतरी खा. खूप बारीक दिसत आहे. नंतर ११ वाजून २० मिनिटांनी तिची आई राबिया घरी पोहोचल्‍या. त्‍यावेळी जिया खानचा मृतदेह पंख्‍याला लटकलेला आढळला होता.
जिया खानच्‍या मृत्‍यूनंतर एका आठवड्‍यांनी तिची बहिण कविताला सहा पानी पत्र मिळाले होते. हे पत्र जियाने लिहिले होते. या पत्रात कुणाचे नाव लिहिले नव्‍हते. 
Image result for jiah khan hd
सूत्रांच्‍या माहितीनुसार, जियाने पत्रात लिहिले होते- 'तुझ्‍या आयुष्‍यात महिला आणि पार्टीज आहेत. मी हर्ट झाले. मी माझं बाळ गमावलं. तू माझं क्रिसमस खराब केलं आणि माझं बर्थडे डिनरदेखील. व्‍हॅलेंटाईन डेलादेखील तू माझ्‍यापासून दूर राहिलास. तू मला वचन दिलं होतं की, एका वर्षाच्‍या आत तू माझ्‍याशी लग्‍न करशील. मला माहिती नाही की, मी या सर्व गोष्‍टी तुला कशा सांगू. परंतु, आता माझ्‍याकडे काही उरलेलं नाही. मी माझं सर्व काही गमावलं. जर तू हे वाचत असशील तर, त्‍यावेळी मी या जगात नसेन. मी आतून तुटले. मी तुझ्यावर प्रेम केलं. तरीही तू मला रोज टॉर्चर केलंस. आता श्‍वास घेण्‍यासाठी माझ्‍याकडे कुठलेही कारण नाही. मला केवळ प्रेम हवं होतं. मी तुझ्‍यासाठी सर्वकाही केलं. मी आपल्‍या दोघांसाठी काम करत होते. माझं भविष्य उद्‍ध्‍वस्‍त झालं. माझा आनंद तू हिरावून घेतलास. तू कधी माझं प्रेम पाहिलचं नाहीस. माझं सेल्फ रिस्पेक्ट आणि कॉन्फिडेन्स उरलाच नाही. माझे जेदेखील टॅलेंट, महत्वाकांक्षा होत्‍या, त्‍या सर्व तू हिरावून घेतल्‍यास. माझं आयुष्‍य उद्‍ध्‍वस्‍त केलंस. 
Image result for jiah khan hd
जिया खानने जून २०१३ ला आत्‍महत्‍या केली होती. या प्रकरणी जियाचा तथाकथित बॉयफ्रेंड सूरज पंचोलीला अटक झाली होती. जिया आणि सूरज लिव्‍हइन रिलेशनमध्‍ये होते, असे म्‍हटले जाते. जुलै २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्‍यात आला होता. याप्रकरणी सीबीआयने दाखल केलेल्या आरोपपत्रात जियाला सूरजने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले गेले होते. सीबीआयने सूरजला ताब्‍यात घेऊन चौकशीही केली होती. सूरजने पॉलीग्राफी आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्‍यास नकार दिला होता. सूरजने जेलमधून बाहेर आल्यानंतर मीडियाला सांगितले होते की, जिया करिअरविषयी डिप्रेशनमध्ये होती. तिच्या मित्रांनी तिची साथ सोडली होती. ती प्रत्येक छोट्या गोष्टींवरून फोन करायची, खूपच पझेसिव्ह होती. जियाच्या आत्महत्या प्रकरणी सूरजने नेहमीच स्वत: निर्दोष असल्याचे म्हटले. 

एक महानायक-कमल हासन







प्रसिध्‍द अभिनेते कमल हसनचा जन्‍म ७ नोव्‍हेंबर १९५४ रोजी तामिळनाडूतील परमकुडी येथे झाला. त्‍यांचे वडील श्रीनिवास हे वकील होते. तर आई राजलक्ष्‍मी ही गृहिणी होती. भाऊ चारु हरान हाही अभिनेता होता. बहिण नलिनी शास्‍त्रीय नृत्‍यांगणा होती. अशा कलासक्‍त कुटुंबात त्‍यांचा जन्‍म झाला. 

बालपणापासूनचं कलेचे संस्‍कार 
कमल यांच्‍यावर बालपणापासूनच कलेचे संस्‍कार झाले. बालपणी शिक्षणातही हुशार असल्‍याने त्‍यांच्‍या मोठ्‍या भावाने कमल यांनी उच्‍च शिक्षण घेण्‍याचा आग्रह धरला. कमल यांनी मद्रास येथे उच्‍च शिक्षण घेतले. 
Image result for kamal haasan
अभिनयात स्‍वारस्‍य 
अभिनयात असलेली आवड पाहून कमल यांच्‍या वडिलांनी त्‍यांना चित्रपट आणि नाटकामध्‍ये काम करण्‍यास प्रोत्‍साहन दिले. पहिल्‍यांदा कमल यांनी काही चित्रपटांमध्‍ये दुय्‍यम भूमिका केल्‍या. तथापि, नंतरची ७ वर्षे ते चित्रपटापासून दूर राहिले. 
Image result for kamal haasan
पुन्‍हा चित्रपटसृष्‍टीत प्रवेश 
१९७० मध्‍ये कमल यांनी पुन्‍हा एकदा प्रवेश केला. 'मानवन' या चित्रपटात त्‍यांना पहिली महत्त्‍वाची भूमिका मिळाली. तथापि, ती भूमिका नृत्‍याशी संबंधित होती. १९७३ ते ७५ या काळात त्‍यांनी सहाय्‍यक भूमिका करण्‍यातचं समाधान मानले. 'अवलोरु थोडरकथाई' आणि 'नानअवनीलाई' या चित्रपटात त्‍यांना रजनीकांत यांच्‍याबरोबर भूमिका करण्‍याची संधी मिळाली. 
बहरलं अभिनय क्षेत्र
१९७५ नंतर त्‍यांचा अभिनय खर्‍या अर्थाने बहरला. त्‍यानंतरच्‍या १० वर्षांत त्‍यांनी १००हून अधिक चित्रपटात भूमिका केल्‍या. 'मनमधा लिलाई,' 'उधापू कानसिमितूगिरधू' यातील त्‍यांचा अभिनय चांगला गाजला. या भूमिकेसाठी त्‍यांना सलग दुसर्‍या वर्षी तामिळ फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. या काळात त्‍यांनी 'मुंद्रू मुदिचू' या नाटकातही भूमिका गाजवली. १९७८ मध्‍ये तेलगू चित्रपट सोमोकादिधी सोक्‍कादिधी या चित्रपटातील त्‍याची दुहेरी भूमिका संस्‍मरणीय ठरली. 
Image result for kamal haasan film
हिंदी चित्रपटसृष्‍टीत प्रवेश 
१९८० मध्‍ये त्‍यांचा हिंदी चित्रपसृष्‍टीत प्रवेश झाला. 'एक दुजे के लिये' या चित्रपटातल्‍या त्‍यांच्‍या अभिनयाने सिनेरसिकांना अक्षरश: वेड लावलं. हिंदीबरोबरच त्‍यांनी तेलगु आणि तमिळ चित्रपटही सुरूच ठेवले होते. १९८१ मध्‍ये 'राजा पारवई' या चित्रपटातून त्‍यांनी अभिनयाचे शतक साजरे केले. याच चित्रपटातून त्‍यांची निर्माता म्‍हणून ओळख निर्माण झाली. त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेता म्‍हणून सलग तीनदा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. १९८४ नंतर त्‍यांनी 'सागर,' 'विक्रग,' 'स्‍वाती मुथियम,' 'राजतिलक' आदी चित्रपटात प्रुमख भूमिका केल्‍या. आंध्र प्रदेशातही त्‍यांच्‍या चित्रपटांना लोकप्रियता मिळाली. नंतर त्‍यांच्‍या अनेक चित्रपटांचे तेलगू रिमेक करण्‍यात आले. 'पुनागायीमनन' या चार्ली चॅप्‍लीनच्‍या चित्रपटावर आधारित तामिळ चित्रपटातील त्‍यांचा डबल रोल चांगलाच गाजला. मणिरत्‍नम यांच्‍या 'नायकन' या (१९८७) चित्रपटातलीही भूमिका फार गाजली. या चित्रपटासाठी त्‍यांना दुसरा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. 'पुष्‍पक' या चित्रपटातील (१९८८) त्‍यांची मूक भूमिका आजही सिनेरसिकांच्‍या स्‍मरणार्थ आहे. एक विनोदी अभिनेता अशी ख्‍यातीही कमल हसन यांना याच कालावधीत मिळाली. 
महाग अभिनेता 
एका चित्रपटासाठी दीड कोटी रूपये मानधन मिळवणारा कमल हासन हे भारतातील त्यावेळचे अभिनेते ठरले होते. १९९४ च्या दरम्यानच्या चित्रपटासाठी त्यांनी इतके मानधन घेतले होते. यापूर्वी १९७० ते १९८७ या कालावधीत सर्वात अधिक मानधन घेणारे राजेश खन्ना होते. 
Image result for kamal haasan chachi 420
स्त्री भूमिका 
कमल हासन यांचा 'चाची ४२०' हा त्यांचा स्त्री भूमिका असलेला चित्रपट आपल्याला माहिती आहे. परंतु, विनोदी चित्रपट 'अव्वई शनमुगई'मध्येही त्यांनी स्त्री भूमिका साकारली होती. याच चित्रपटाचा हिंदी रिमेक म्हणजे-'चाची ४२०.' 
Image result for kamal haasan chachi 420
हे देखील वाचा -   
१९७५ मध्ये 'अपूर्वा रंगनागल' मध्ये मुख्य अभिनेता म्हणून कमल हासन यांना भूमिका मिळाली. या चित्रपटातून सिनेजगतात त्यांना ओळख मिळाली. १९७७ मध्ये '१६ भयानिथानिले' चित्रपट केला. हा चित्रपट  सुपरहिट ठरला. कमल हासन स्टार बनले.  चित्रपटामध्ये रजनीकांत आणि श्रीदेवी यांच्यासोबत त्यांनी काम केलं. १९८१ मध्ये हासन यांना पहिल्यांदा हिंदी चित्रपट 'एक दूजे के लिए'मध्ये काम करण्याची संधी मिळाली. चित्रपट  सुपरहिट झाला. आणि हासन हिंदी सिनेसृष्टीचा आणखी एक नवा लोकप्रिय चेहरा बनला. त्यांनी 'सदमा', 'सागर', 'गिरफ्तार' यासारखे हिंदी चित्रपट केले. 
Image result for kamal haasan
कमल हसन यांचे सात चित्रपट ऑस्करसाठी नॉमिनेट झाली होती. हे चित्रपट- सागर, स्वाति मुत्यम, नयागान, थेवर मगन, कुरूथीपुनाल, इंडियन आणि हे राम असे आहेत. 
Image result for kamal haasan hey ram
'हे राम' या चित्रपटाचे दिग्दर्शन कमल हासन यांनी केले होते. मध्यंतरीच्या काळात त्यांनी 'विरूमानदी' हा चित्रपट केला. त्याचबरोबर 'अनभेशिवम,' 'वसूल राजा एमबीबीएस' असे हिट चित्रपट दिले. 'वसूल राजा एमबीबीएस' हा 'मुन्नाभाई एमबीबीएस' या हिंदी चित्रपटाचा रिमेक होता. २०१० नंतर त्यांनी 'विश्वरूपम' हा चित्रपट केला होता. त्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता.

Friday, February 14, 2020

वहीदा रहमान यांच्या प्रेमात होते गुरु दत्त; आजपर्यंत समजलं नाही मृत्यूचं कारण




चौदहवीं का चांद हो, या आफताब हो
जो भी हो तुम खुदा कि कसम, लाजवाब हो। 

मोहम्मद रफी यांच्या सुरेल आवाजातील हे गाणे जेव्हा  कानावर पडते, तेव्हा डोळ्यासमोर उभी राहते ती सुंदर अदाकारा वहीदा रहमान यांची प्रतिमा. चौदहवीं का चांद हो, या आफताब हो...हे गाणे ऐकून खरचं असं वाटतं की, हे गाणे फक्त आणि फक्त वहीदा रहमान यांच्यासाठी लिहिण्यात आलं होतं. पन्नास आणि साठच्या दशकात वहीदा हे नाव प्रत्येक जणाच्या तोंडावर होतं. त्यांच्या सुंदर अदाकारीने वहीदा यांना बॉलिवूडची सर्वात सुंदर हिरोईन बनवलं. ३ फेब्रुवारीला वहीदा यांचा वाढदिवस आहे.  त्यानिमित्त जाणून घेऊया, त्यांच्या आयुष्यातील या खास गोष्टी.  
Image result for waheeda rehman hd
१९३८ रोजी तामिळनाडूमध्ये जन्मलेल्या वहीदा यांनी हिंदी, तमिळ, तेलुगु, बंगाली आणि मल्याळम भाषेतील अनेक चित्रपटांत काम केले. वहीदा त्यावेळी तेलुगु चित्रपटांमध्ये आपले नाव कमवत होत्या. एका चित्रपटामध्ये अभिनेते गुरु दत्त यांनी पाहिलं आणि त्यांना मुंबईमध्ये आणण्याचा निर्णय घेतला. आपल्या प्रोडक्शनचा चित्रपट 'सीआयडी'मध्ये गुरु दत्त यांनी वहीदा यांना पहिली संधी दिली. त्यानंतर १९५७ मध्ये चित्रपट 'प्यासा'मध्ये गुरु दत्त आणि वहीदा यांची जोडी दिसली. या चित्रपटाने हिंदी सिनेमामध्ये एक नवी क्रांती आणली. 
Image result for waheeda rehman hd
१९५३ मध्ये गुरु दत्त यांनी गीता दत्त यांच्याशी लग्न केले. परंतु, काही वर्षांनंतर त्यांच्या आयुष्यात वहीदा रहमान आल्या. 'प्यासा' चित्रपटादरम्यान गीता आणि गुरु दत्त यांच्यात दुरावा निर्माण झाला. वहीदा यांच्यामुळे गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्यात वाद निर्माण झाले होते, असे म्हटले जाते. १९५७ मध्ये गुरु दत्त आणि गीता दत्त यांच्या वैवाहिक जीवनात वादळ आले आणि दोघे वेगवेगळे राहू लागले. 
वहीदा यांना घेऊनच आपला चित्रपट करण्यासाठी गुरु दत्त आग्रही असायचे. या गोष्टीचा उल्लेख त्यांचे मित्र अबरार अल्बी यांनी '१० ईअर्स विथ गुरु दत्त' नावाच्या पुस्तकात केला आहे. गुरू दत्त आणि वहीदा यांच्या नात्यावर वहीदा यांच्या कुटुंबीयांनीही आक्षेप घेतला होता. वहीदा यांनी गुरू दत्त यांच्याशी विवाह करू नये, असे त्यांच्या कुटुंबीयांना वाटत होते. 
Image result for waheeda rehman hd
१९६३ मध्ये गुरू दत्त यांनी वहीदा यांची साथ सोडली. आपल्या पत्नी-मुलांपासून दूर राहणे आणि वहीदा यांच्यापासून दूर जाणे हे गुरु दत्त यांना सहन झाले नाही. असे म्हटले जाते की, आपल्या सहकाऱ्यांसमोर ते वारंवार जीव देण्याबद्दल बोलायचे. गुरू दत्त यांना आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला भेटायचे होते. परंतु, गीता यांनी नकार दिला होता. त्यावेळी त्यांनी आपल्या पत्नीला आपण जीव देण्याचीही धमकीही दिली होती.  
१० ऑक्टोबर, १९६४ रोजी दुपारी गुरु दत्त यांचे मित्र अबरार यांच्याकडे फोन आला की, गुरु दत्त यांची  तब्येत बिघडली आहे. अचानकपणे त्यांच्या निधनाची बातमी समोर आली. परंतु, अखेरपर्यंत गुरु दत्त यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झाले नाही. 
Image result for waheeda rehman hd
गुरु दत्त यांच्या मृत्यूने बसला होता धक्का
१० ऑक्टोबर, १९६४ रोजी गुरु दत्त यांनी आत्महत्या केल्याचे वृत्त येऊन धडकले. त्यावेळी वहीदा यांना मोठा धक्का बसला होता. पुढे त्यांनी १९६५ मध्ये 'गाइड' चित्रपट केला. असे म्हटले जाते की, गुरु दत्त यांनी अधिक दारू प्यायल्याने आणि खूप साऱ्या झोपेच्या गोळ्या घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी गुरू दत्त यांचं वय केवळ ३९ वर्षांचं होतं. 
वहीदा यांचा 'गाइड' हा चित्रपट सुपरहिट ठरला. यामध्ये 'चॉकलेट हिरो' देवानंद यांची मुख्य भूमिका होती. ही जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस इतकी उतरली की, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला लोक तुफान गर्दी करायचे. या चित्रपटासाठी वहीदा यांना बेस्ट ॲक्ट्रेसचा पुरस्कार मिळाला होता. 
Related image
१९६६ मध्ये 'तीसरी कसम' चित्रपटाने वहीदा यांचा फिल्मी ग्राफ बदलला. बॉक्स ऑफिसवर 'तीसरी कसम' हिट ठरला की आजदेखील हा चित्रपट मैलाचा दगड मानला जातो. या चित्रपटातून वहीदा आणि राजकपूर यांनी मोठ्या पडद्यावर प्रेमाची एका अनोखी व्याख्या सादर केली होती. 
Related image
'किशोर कुमार' पुरस्काराने सन्मानित केले जाणार 
मध्य प्रदेशच्या सांस्कृतिक मंत्री विजयलक्ष्मी साधौ ४ फेब्रुवारीला अभिनेत्री वहीदा रहमान यांना प्रतिष्ठित ‘किशोर कुमार सन्मान-२०१८’ न सन्मानित करणार आहेत. गायक किशोर कुमार यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार मध्य प्रदेश सरकारद्वारा दिला जातो. वहीदा रहमान यांना हा सन्मान मागील वर्षी १३ ऑक्टोबरला खंडवानमध्ये किशोर कुमार यांच्या ३२ व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रमात दिला जाणार होता. परंतु, प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकल्या नव्हत्या. 

खलनायकांमधील 'प्राण'! हिरोच्या मानधनापेक्षा अधिक मानधन घेणारा खलनायक


अभिनेता प्राण

अभिनेता प्राण जन्मदिन विशेष
खलनायक प्राण यांचा आज १०० वा जन्मदिवस आहे. १९४० ते १९९० पर्यंत सिनेमा जगतात खलनायक म्हणून मिरवणारे प्राण आपल्या दमदार अभिनयासाठी आजदेखील ओळखले जातात. कृष्ण सिकंदर म्हणजेच प्राण यांनी त्याकाळी अनेक सुपरस्टार्ससोबत काम केले. परंतु, एक खलनायक म्हणून काही चित्रपटांमध्ये ते अभिनेत्याच्या भूमिकेपेक्षा चांगलेच गाजले. चित्रपटांमध्ये हिरोच्या मानधनापेक्षा त्यांना अधिक मानधन मिळत होते. प्राण यांचा जन्म १२ फेब्रुवारी, १९२० रोजी दिल्लीमध्ये झाला होता. त्यांच्याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल. तर मग वाचा ही पुढील माहिती... 
प्राण आधी लाहोरमध्ये अभिनय करायचे. त्यानंतर ते मुंबईमध्ये आले. प्रसिध्द उर्दू लेखक सादत हसन मंटो आणि अभिनेता श्याम यांच्यामुळे त्यांना देव आनंद अभिनित आणि बॉम्बे टॉकीज निर्मित चित्रपट 'जिद्दी'मध्ये संधी मिळाली. अभिनेते प्राण असे अभिनेते होते, ज्‍यांनी आपल्‍या करिअरमध्‍ये खलनायकाची भूमिका अधिक साकारली. ३५० हून अधिक चित्रपटांमध्‍ये त्यांनी काम केलं. 
अभिनेते प्राण यांच्‍याबद्‍दल जितकं सांगावं तितकं थोडचं. 'अदालत,' 'जंजीर,' 'उपकार' 'बेईमान,' 'पाकीजा', 'बॉबी', 'अमर अकबर ॲन्‍थोनी' यांसारख्‍या चित्रपटांतील त्‍यांच्‍या अभिनयामुळे हे चित्रपट गाजले. शिवाय, महानायक अमिताभ बच्‍चन यांना सिनेसृष्‍टीत आणणारा अभिनेता म्‍हणून प्राण यांच्‍याकडे पाहिले जाते. 
Image result for actor pran rare pics
आपल्‍या रूबाबदार व्‍यक्‍तिमत्त्‍वाने आणि आवाजाने त्‍यांनी सिनेसृष्‍टीत एक वेगळी ऊंची गाठली. १४ ऑगस्‍ट १९४७ रोजी ते आपली पत्‍नी आणि मुलासोबत लाहोरहून मुंबईला आले होते. प्राण यांना पान खाण्‍याची सवय होती आणि पानाच्‍या दुकानावरच त्‍यांना पहिल्‍याच चित्रपटात काम करण्‍यासाठी ऑफर मिळाली. आपल्याला चित्रपटात काम मिळाल्याची माहिती त्यांनी आपल्या वडिलांपासून लपवली होती. जेव्‍हा वर्तमानपत्रात प्राण यांची मुलाखत छापून आली, तेव्‍हा मुलाखत वाचून त्‍यांच्‍या वडिलांना खूपच आनंद झाला होता. 
प्राण यांना फोटोग्राफर व्‍हायचे होते, परंतु, ते अभिनेता  बनले. आपल्‍या करिअरच्‍या सुरूवातीला प्राण यांनी एक फोटोग्राफी कंपनीत काम केलं. नंतर १९४० मध्‍ये चित्रपट 'यमला जट'मध्‍ये त्‍यांना काम करायची संधी मिळाली. प्राण यांनी १९४० ते १९४७ पर्यंत अभिनेता म्‍हणून काम केलं. नंतर १९४२ ते १९९१ पर्यंत खलनायक म्‍हणून काम केलं. त्‍यांनी काही चित्रपटांमध्‍ये चरित्र अभिनेता म्‍हणूनही भूमिका केल्‍या.  
Image result for actor pran rare pics
१ रूपयांचे मानधन 
राज कपूर दिग्‍दर्शित 'बॉबी' चित्रपटात काम करण्‍यासाठी प्राण यांनी फक्‍त १ रू. मानधन घेतले होते. कारण राज कपूर यांचा 'मेरा नाम जोकर' हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला होता. त्‍यामुळे आर्थिकदृष्‍ट्‍या राज कपूर यांची स्‍थिती हलाखीची बनली होती. राज कपूर यांनी आपल्‍याकडील सर्व पैसे, संपत्ती 'मेरा नाम जोकर' या चित्रपटासाठी खर्च केली होती. 
हिरोपेक्षाही ज्‍यादा मानधन 
बहुतांशी चित्रपटात प्राण यांनी खलनायकाची भूमिका केली. पण, चित्रपटातील मुख्‍य अभिनेत्‍यापेक्षाही ते अधिक मानधन घेत होते. पुढे अभिनेते, दिग्‍दर्शक मनोज कुमार यांनी प्राण यांना १९६७ मध्‍ये 'उपकार' चित्रपटात अभिनेता म्‍हणून संधी दिली. याच चित्रपटातलं 'मेरे देश की धरती सोना उगले, उगले हीरे मोती' हे गाणं हिट ठरलं. तसेच 'कसमे वादे प्यार वफा सब, बाते हैं बातों का क्या' हे प्राण यांच्‍यावर चित्रीत करण्‍यात आलेलं गाणंही हिट झालं होतं.  
Image result for actor pran rare pics
अमिताभ बच्‍चन यांना बिग बी बनवण्‍यात योगदान 
महानायक अमिताभ बच्‍चन यांना बिग बी बनवण्‍यासाठी प्राण यांचं योगदान आहे. प्रकाश मेहरा यांच्‍या मदतीने बिग बी यांना 'जंजीर' चित्रपटात मुख्‍य अभिनेता म्‍हणून संधी देण्‍याची विनंती प्राण यांनी केली होती. 'जंजीर'मुळे बिग बींना चांगली प्रसिध्‍दी मिळाली. 
Image result for actor pran film amar akbar anthoni
३५० हून अधिक चित्रपटात अभिनय
प्राण यांनी तीनशे पन्‍नासहून अधिक चित्रपटात काम केलं. 'खानदान' (१९४२), 'पिलपिली साहेब' (१९५४), 'हलाकू' (१९५६) या चित्रपटात मुख्‍य अभिनेता म्‍हणून भूमिका केल्‍या. तर 'मधुमती' (१९५८), 'जिस देश में गंगा बहती है' (१९६०), 'उपकार' (१९६७), 'राम और श्याम' (१९६७), 'शहीद' (१९६५), 'आँसू बन गये फूल' (१९६९), 'जॉनी मेरा नाम' (१९७०), 'पूरब और पश्चिम' (१९७०) 'विक्टोरिया नम्बर' २०३ (१९७२), 'बेईमान' (१९७२), 'जंजीर' (१९७३), 'डॉन' (१९७८), 'शराबी' (१९८४) आणि 'दुनिया' (१९८४) या चित्रपटातील त्‍यांचा अभिनय उत्‍कृष्‍ट मानला जातो.
Image result for actor pran rare pics
१९७२ मध्‍ये 'बेईमान' चित्रपटासाठी त्‍यांना मिळालेला फिल्‍मफेअर पुरस्‍कार त्‍यांनी परत दिला होता. 'पाकिजा' या चित्रपटाला एकदेखील पुरस्‍कार न मिळाल्‍याने प्राण यांनी हा पुरस्‍कार परत दिला होता. प्राण यांना २०१३ मध्‍ये पद्मभूषण पुरस्‍काराने सम्मानित करण्‍यात आले तसेच दादासाहेब फाळके पुरस्कारानेही त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आले होते. 
या हरहुन्‍नरी अभिनेत्‍याने २०१३ मध्‍ये वयाच्‍या ९३ व्‍या वर्षी जगाचा निरोप घेतला.

#kissDay एक लव्हेबल किस पार्टनरसाठी!


''इश्क पर जोर नहीं है ये वो आतिश 'ग़ालिब' 
कि लगाए न लगे और बुझाए न बने''
''इश्कने 'गालिब' निकम्मा कर दिया 
वर्ना हम भी आदमी थे काम के'' 
मिर्जा गालिब यांची शायरी एव्हरग्रीन आहे. अणि प्रेमवीरांमध्ये लोकप्रियदेखील आहे. प्रेम म्हटलं की, अनेकांच्या मनात प्रेमाच्या तारा छेडल्या जातात. मग त्यांना आठवते ती पार्टनरची पहिली भेट, पहिली मिठी आणि पहिलं किस. व्हॅलेंटाईन डे (१४ फेब्रुवारी) पूर्वी येतो तो किस डे. आपल्‍या पार्टनरच्‍या प्रति आपल्‍या भावना पोहोचवण्‍यासाठी एक 'किस' पुरेसं आहे. असं नाही की हे फक्‍त तुमच्‍या प्रेमाला दर्शवतं. तर किस एकमेकांशी जुळलेल्‍या भावनादेखील दर्शवतं. काही वेळा मैत्रीत रुसवे-फुगवे होतात. अशा वेळी मनधरणी करण्‍यासाठी एक किस पुरेसं आहे. आज १३ फेब्रुवारीला किस डे (चुंबन दिवस) आहे. पार्टनरच्‍या प्रती असलेलं प्रेम, भावना, व्‍यक्‍त करण्‍यासाठी आजचा हा दिवस अगदी खास आहे. 

Image result for kiss day
अधिकतर कपल किस करून आपलं प्रेम दर्शवतात. किस विश्‍वास, आपुलकी आणि प्रेम दर्शवण्‍यासाठी या खास दिवसापेक्षा आणखी दुसरं काय हवयं? एका किसच्‍या माध्‍यमातून तुम्‍ही तुमच्‍या पार्टनरला खूप स्‍पेशल फिल देऊ शकता. तुम्हीही तुमच्या पार्टनरला कधी किस केलाय काय? 
Image result for kiss day
शब्दांविना प्रेम व्यक्त करायचं असेल तर एक लव्हेबल किस पुरेसं असतं. किस डे (Kiss Day) ची कपल्सना उत्सुकता लागून राहिलेली असते. हा खास दिवस स्पेशल बनवण्यासाठी कपल्स खूप सारी तयारी करतात. किस डेच्या दिवशी प्रेम  करणारे प्रियकर आणि प्रेयसी एकमेकांना किस करून आपलं अतुट प्रेम व्यक्त करतात. प्रेम व्यक्त करण्यासाठी किस सर्वात उत्तम माध्यम आहे. तेव्हा नातं खास होत जातं. जवळीकता वाढते आणि नातं विश्वासाच्या जोरावर पुढं जाऊ लागते. हेच कारण आहे की, या नात्यांमध्ये अधिक गोडवा भरण्यासाठी कपल्स व्हॅलेंटाईन वीकच्या सहाव्या दिवशी किस डे साजरा करतात. 
Image result for kiss lipstics
तुम्ही किसिंग डे ला आपली पत्‍नी वा गर्लफ्रेंडला एखादी भेटवस्‍तू देऊनही तिला खुश करू शकता. तर पती किंवा बॉयफ्रेंडला खास मॅसेज पाठवूनदेखील स्‍पेशल फिलिंग देऊ शकता. 
Image result for valentines day
'प्‍यार नहीं  तो क्‍या, जिंदगी मे तनहा रहकर क्‍या करोगे' 
किसिंग डे हे नाव ऐकताच प्रेम करणाऱ्यांचे हार्टबीट्‍स नक्‍कीच वाढतात. 'दिल मे कुछ कुछ होता है....' हे लव्‍ह एक्‍सप्रेशन असतं. तुमच्‍या भावना, प्रेम पोहोचवण्‍यासाठी आपल्या पार्टनरला तुम्ही एक किस देऊ शकता. पहिल्‍यांदा किस करताना आपला पार्टनर काय म्‍हणेल, त्‍यासाठी तयार होईल की नाही? असे ढिगभर विचार मनात असतात. काही वेळा सुरुवातीला संकोच होतं. तर ना-नको! चा सामनाही करावा लागतो. पहिल्‍यांदा किस करण खरचं आव्‍हानात्‍मक असतं. कारण, पार्टनरची रिॲक्‍शन कशी येईल, याबाबत अनभिज्ञ असतो किंवा त्याबद्दल काहीच माहिती नसतं.
Image result for rose
हे महत्त्‍वाचं नाही की, तुम्‍ही पहिल्‍यांदाच किस करत आहात किंवा अनेकवेळा केलं आहे. महत्त्‍वाचं हे आहे की, तुम्‍ही लव्‍ह बाईट किस करू शकता की नाही? पहिलं किस आपल्‍या पार्टनरला दिवस-रात्र आपल्‍याबद्‍दल विचार करण्‍यास भाग पाडतं. कारण, हे कायम स्‍मरणात राहणार असतं. तर मग, आपल्या खास अंदाजात किसींग डे साजरा करा... 
'किसी भी मिस को तब तक किस न करो जब तक मिस आपको किस न करे, 
अगर मिस आपको किस करे, तो उसे इतनी किस करो कि वो किसी और को मिस न करें'

Tuesday, December 10, 2019

तपस्विनी सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी

Image result for subbulakshmi

'त्यांची' सुंदर बोटे तानपूऱ्यासोबत तारांवर थिरकायची. डोळे बंद करून त्या तानपुऱ्याच्या झंकारित तारांसोबत गायकीच्या विश्वात रमायच्या. त्यानंतर, त्या आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे तानपुऱ्याचा स्वर सोपवायच्या आणि आपलं गायन सुरू करायच्या. दुपारच्या कडक ऊनातदेखील गायकीचा रियाज त्या करायच्या. त्यांनी रियाज केला नाही, असा एकदेखील दिवस गेला नाही. संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या महान व्यक्ती म्हणजे सुब्बुलक्ष्मी. ११ डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन. सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया. 

केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं.

किशोरी अमोनकर त्यांना 'आठवा सुर' आणि लता मंगेशकर त्यांना 'तपस्विनी' म्हणायच्या. बडे गुलाम अली खान त्यांना 'सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी' म्हणत होते. सरोजिनी नायडू त्यांना 'भारताची स्‍वरकोकिळा' म्हणायच्या. १९४७ मध्ये आलेला चित्रपट 'मीरा'मधून त्या राष्‍ट्रीय पातळीवर चमकल्या. एकदा नेहरू सुब्बुलक्ष्मी यांच्याविषयी म्हणाले होते, 'सुरांची मलिकासमोर मी कोण आहे, केवळ एक पंतप्रधान.'



देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले.

वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की, साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहीर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी अनेक संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातील महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती.

अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये.



महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)

इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराजींच्‍या हातातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते.

असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या. लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीत देखील त्‍यांनी गायले आहे.



अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती. 

दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली. 

'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.


सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -

चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).


पुरस्कार -

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.

११ डिसेंबर २००४ रोजी त्‍यांचं चेन्नई येथे निधन झालं. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...