https://pudhari.news/national/812444/inauguration-of-new-campus-of-nalanda-university-by-pm-modi/arतर नालंदा' आज जगातील तक्षशिला विद्यापीठानंतर जगातील दुसरे सर्वात प्राचीन म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती होती. प्राचीन भारताचे वैभव इतके संपन्न होते की, आज जगातील महासत्तांकडे असणारे वैभव देखील त्यासमोर फिके पडले असते. उच्च शिक्षण देणार भारतातील हे विद्यापीठास महाविहार असेही म्हणत. महायान बौद्ध धर्माच्या या शैक्षणिक केंद्रात हीनयान बौद्ध धर्म आणि अन्य देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.
भारतातील बिहार राज्यातील पटना येथे नालंदाचे भग्नावशेष आजदेखील अफाट वैभवाची साक्ष देतात. त्याच बरोबर, अनेक पुराभिलेख आणि चीनी प्रवासी हेनसांग, इत्सिंग याच्या प्रवास वर्णनात नालंदा विषयी विस्तृत माहिती आली आहे. हे विद्यापीठ इतके मोठे होते की, इथे दोन हजारांहून अधिक शिक्षक अध्यापन करत होते. प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात येथे जीवनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. एक वर्ष एक विद्यार्थी म्हणून अभ्यास केला आणि पुढे जाऊन ते याच विद्यापीठात शिक्षक बनले.
पाचव्या शतकात कुमारगुप्त प्रथम याने नालंदा विद्यापीठाची निर्मिती केली. नालंदा विद्यापीठ स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमूना देखील होता. २४० मी. विद्यापीठाची लांबी आहे तर ५१० मी. क्षेत्रात हे विद्यापीठ सुंदर पसरलेले आहे.
नालंदा विद्यापीठाविषयी चीनचे प्रवासी हेनसांग आणि इत्सिंग यांनी विस्तृतपणे लिहिले होते. हे दोघे सातव्या शतकात भारतामध्ये आले होते. दोघे चीनला परतल्यानंतर नालंदा विषयी विस्तृतपणे लिहिले आणि जगातील सर्वात मोठे विद्यापीठ नालंदा असल्याचे सांगितले.
प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात नालंदाचा प्रवास केला होता. केवळ भ्रमंती नव्हे तर दीर्घकाळ राहण्यासाठी भाणि अध्ययनासाठी ते भारतात आले होते. यावरून नालंदाची प्रचिती येते की, त्यावेळी नालंदाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले होते. नालंदामधून चीनला परतताना त्यांनी ६५७ बौद्ध धर्मग्रंथ घेऊन गेले. या ग्रंथांपैकी चीनी भाषेत अनुवाद देखील केला. हेनसांग यांनी ज्या नालंदाचे जे वर्णन केले आहे, त्यात विशाल स्तूपाचा उल्लेख मिळतो. हे स्तूप भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्यांपैकी एकाच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बनवण्यात आले. भव्य संरचना असणारे त्याचे अवशेष आजदेखील अस्तित्वात आहेत. ३० मीटर उंच विशाल स्तूपाच्या चारी बाजूंनी भिंती असून अनेक छोटी मंदिरे आणि स्तूप आहेत. स्तूपापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
एकेकाळी साहित्य संपदेने समृद्ध अशा विद्यापीठात ३०० खोल्या, ७ मोठे हॉल आणि अभ्यासासाठी ९ मजली एक विशालकार्य ग्रंथालय होते. हे पहिले विद्यापीठ जे ७०० वर्षापर्यंत अस्तित्वात राहिलं होतं. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड मेरिटवर व्हायची म्हणजेच ही पद्धत हजारो वर्षापूर्वी या विद्यापीठात होती. निवासी विद्यापीठात कोणतीही फी न घेता शिक्षण दिले जायचे. सोबतच विद्यार्थ्यांचे राहणे आणि जेवणदेखील निःशुल्क असायचे. म्हणजेच हॉस्टेल ही संकल्पना त्यावेळीही अस्तित्वात होती, असे म्हणायला हरकत नाही. या विद्यापीठात १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. केवळ भारतच नाही तर कोरिया, जपान, चीन, लिबेट, इंडोनेशिया, इराण, ग्रीस, मंगोलिया यासारख्या देश-विदेशांतूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. ज्यावेळी गुप्त वंशाचे शासनकर्ते सम्राट कुमारगुप्त यांनी नालंदाची स्थापना केली. त्यावेळी सम्राट हर्षवर्धन आणि पाल शासनकर्त्यांचेही संरक्षण विद्यापीठाला मिळाले. ज्यावेळी नालंदामध्ये उत्खनन करण्यात आले, त्यावेळी अशा अनेक मुद्रा मिळाल्या, त्यानंतर या सर्व गोष्टींची पुष्टी झाली की, खरोखरचं नालंदा साहित्य संपदेने समृद्ध होते.
असेही म्हटले जाते की, गौतम बुद्धांनी याठिकाणी अनेकदा भेट दिली होती. नालंदा विद्यापीठात एक 'धर्म गुंज' नावाचे ग्रंथालय होते. हे हे ग्रंथालय ९ मजली होते. त्यात रत्नरंजक, रत्नसागर याणि रत्नोरधि असे तीन भाग होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांना सायकॉलॉजी, सायन्स, लिटरेचर, एस्ट्रोलॉजी, एस्ट्रोनॉमी, वॉरफेअर, मॅथ्स, लँग्वेज सायन्स, मेडिसीन, इकॉनॉमिक, आर्किटेक्चर, इतिहास असे अनेक विषय जात असत. अनेक महान विद्वान हर्षवर्धन, वसुबंधू, आर्यवेद, नागार्जुन, धर्मकीर्ती, धर्मपाल यांनी नालंदामधून विद्वत्ता मिळवलीय.
या विद्यापीठाची खासियत म्हणजे, येथे लोक तंत्र प्रणाली अस्तित्वात होती. कोणताही महत्वाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हायचा. म्हणजेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडता येत असत. ज्यावेळी इथे उत्खनन करण्यात आले तेव्हा येथे १.५ लाख फूट क्षेत्रात नालंदाचे अवशेष मिळाले. यावरून प्रचिती येते की, नालंदाचा विस्तार आणि वैभव किती असेल!
गुप्त वंशाच्या काळात उदार, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा विकसित झाल्या आणि नालंदा विद्यापीठात बहुविषयक शैक्षणिक अभासक्रमात उत्तरोत्तर प्रगती झाली. यामध्ये विभिन्न क्षेत्रांतील उच्च शिक्षणासोबत बौद्ध धर्माचे बौद्धिक ज्ञान मिश्रीत करण्यात आले. प्राचीन भारतीय चिकित्सा प्रणाली म्हणजेच आयुर्वेदा विषयी नालंदामध्ये खूप विविध शिक्षण दिले जात असे. नंतर याचा प्रचार विद्यार्थ्यांद्वारे जगभरात झाला.
बिहारचा मुघल शासक इलियारुददीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजीने द्वेषातून नालंदा विद्यापीठाला आग लावली. असे म्हटले जाते की, खिलजी एक दिवस खूप आजारी पडला. अनेक हकीमकडून औषधोपचार घेऊन देखील तो बरा झाला नाही. मग त्याला कृणीतरी सल्ला दिला की नालंदा विद्यापीठातील आचार्य राहुल जे नालंदा विद्यापीठात आयुर्वेद विभागाचे प्रमुख होते, त्यांच्याकडून औषधोपचार घ्यावे. आचार्यांच्या औषधोपचारानंतर तो बरा झाला. पण झाले उलटचं. कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्याने इतके अफाट ज्ञान या आचार्याकडे कसे, ज्यांच्यापुढे आमचे औषधोपचारदेखील मागे पडले, या द्वेषातून त्याने विद्यापीठाला आग लावल्य़ाचे म्हटले जाते. नालंदावर खिलजीने केलेले हे पहिले आक्रमण नव्हते. पाचव्या शतकात मिहिरकूलच्या नेतृत्वाखाली हुणांनी हल्ला केला होता. त्यानंतर आठव्या शतकात बंगालच्या गौड राजाने आक्रमण केले, त्यावेळीही विद्यापीठाचे खूप नुकसान झाले होते. हुण आक्रमकांनी संपत्ती लुटण्यासाठी आक्रमण केलं होत. पण दोन्ही आक्रमणांनंतर इमारतींची पुनर्निर्मिती करण्यात आली. पुढे गुप्त वंशाच्या शासकांकडून मिळालेल्या मदतीमुळे नालंदमध्ये सुविधा आणि विस्तार करण्यात आला. मात्र, जेव्हा बख्तियार खिलजीने नालंदावर आक्रमण केलं तेव्हा विद्यापीठाला संरक्षण देणाऱ्या बौद्ध पाल राजवंशाचे पतन होत होते. त्यामुळे तिसऱ्या आक्रमणानंतर नालंदाची पुनर्निर्मिती झाली नाही. या विद्यापीठात इतकी साहित्य संपदा होती की, आग लावल्यानंतर कित्येक आठवडे हे विद्यापीठ जळत राहिले.
999999999999999999999999999999999999999999999999999999999999
उत्कया, विशालकाय परिसराला ग१० च्या दशकान तुर्क - वफाणि सैन्यातील बस्तियार खिलजीच्या नेतृत्वात ३
आक्रमकांनी विद्यापीठ उद्धवस्त केलं. आजदेखील मठ आणि मंदिरांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. स्थावदन कल्पना येते की, याठिकाणी किती काही शिकायला मिळत असेल- मठांच्या खोल्या आणि मंडप, मंदिरांचे पूजा कक्ष, उंच-उंच भिंती, लाल रंगाच्या विटांचे अवशेष, आयताकृती व्यासपीठ, लेटर बॉक्सदेबील यांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी हे लेटर बॉक्स लाकाळी असायचे. आजजीलेटर बॉक्सची परछत आपण पाहतो आष - त्था कॉलेज आणि विदयापिणातून ती पद्धत पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. आज मुलाखती घेऊनच विद्यार्थ्यांना अनेक कॉलेज, विद्यापीठणत प्रवटा दिला जातो. पण प्राचीन भारतात खासकरून नालंदा विद्यापीठात इच्चुक मुख्य -रखे येत शिप्एका समोर तोंडी परीक्षा म्हणजेच पेच उत्तरखत दयावी असे. याठिकाणी धर्मपाल आणि शीतभद्र यासा प्रतिष्षित बौद्ध आचार्याच्या नेतृत्वाखाली हजारो शिक्षक आणि विद्यार्थी अध्यापन - अध्यायनि असत.
लागत ग्रंथालयामध्ये लाडपत्रींवर हस्तलिखित ९० ला205 पांडुलिपी, जगातील बौदूध ज्ञानाचे सर्वात समृद्ध वैभव होने. असे मानले जाते की, बौद्ध विद्वान तारानाथ यांनी 'बादलों में उड़ती हुई नऊ मजली इमारत असे वर्णन केले आहे. जेव्हा बख्तियार खिलजीने आग लावली त्यावेळ काही बौद्ध हस्तलिखीत पांडुलिप्त वाचवल्या. ही हस्तलिखिते अमेरिकेच्या लॉस एंजिल्स काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिब्बटच्या यारलुंग म्युझियममध्ये पाहिलं