Wednesday, October 16, 2019

एव्हरग्रीन रेखा आणि अमिताभ बच्चन

रेखाची सिनेसृष्टीतील सुरूवात ते अमिताभ बच्चन यांच्याशी अफेअर 



१० ऑक्टोबर - वाढदिवसानिमित्त  
सौंदर्यवती रेखाच्‍या रोमान्‍सचे अनेक किस्से चर्चिले गेले आहेत आणि आतासुद्धा चर्चिले जात आहेत. कधी जितेन्द्रसोबत तर कधी विनोद मेहरासोबत, कधी किरण कुमार तर कधी अमिताभ यांच्यासोबत. परंतु, रेखाचं सर्वांत अधिक नाव जोडलं गेलं ते बॉलिवूडचे अँग्री यंग मॅन अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबतच. खासगी आयुष्‍यात मात्र रेखाचं वैवाहिक आयुष्‍य यशस्‍वी झालं नाही.ती कायम एकटीच राहिली आहे. रेखा एकदम साधी. परंतु, तिच्‍या जीवनात अनेक चढ-उतार आले. एका ज्योतिषाने तर भविष्यवाणी केली होती की, रेखाच्‍या ग्रह स्‍थितीमुळे तिला कधी पती सुख मिळणार नाही. परंतु, तिचं ज्‍या-ज्‍या पुरूषांशी नाव जोडलं गेलं, ते साप्‍ताहिके, मासिकांमध्‍ये गॉसिप कॉलममध्‍ये येऊ लागलं. सुनील दत्त, यश कोहली आणि किशोरकुमार आणि अमिताभ बच्चन अशा अनेकांशी तिचं नाव जोडलं गेल्‍यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली. रेखाला कदाचित आयुष्यभराचं खरं प्रेम मिळालं नाही. 
भानूरेखा ते रेखा 
प्रसिध्‍द तमिळ अभिनेते जेमिनी गणेशन (मूळ नाव रामस्‍वामी गणेशन) आणि जेमिनी स्‍टुडिओचीच कंत्राटदार कलाकार पुष्‍पवल्‍ली यांची रेखा ही मुलगी. रेखाचं मूळ नाव भानूरेखा. रेखाने पुढच्‍या काळात आपल्‍या वडिलांचे नाव समोर कधीचं घेतले नाही. जेमिनी यांच्‍यामुळेच तिला वयाच्‍या १३ व्‍या वर्षी तेलगूपट मिळाला. तिला कन्‍नड चित्रपटही मिळाले. रेखा दक्षिणेतून मुंबईत आली. नैराबीतील उद्‍योजक कुलजीत पालने एकदा तमिळपटात काम करणार्‍या रेखाला पाहिलं होतं. त्‍यांनी तिला 'अंजाना सफर' या चित्रपटासाठी विश्‍वजितसोबत काम करण्‍याची ऑफर दिली. 'पैसा या प्‍यार'चं शूटिंग करत असताना विश्‍वजित रेखाला बघून थबकला होता. परंतु; रेखा हिंदी बोलू शकेल का? हा प्रश्‍न होता. १९६९ रोजी 'मेहमान', 'हसीनों का देवता' (संजय खान) आणि ३० ऑगस्‍ट १९६९ रोजी 'सावन भादो' (नवीन निश्‍चल) हे चित्रपट तिला मि‍ळाले. 
Image result for rekha hd
किसींग सीन दिल्याने खळबळ
'अंजाना सफर'  या चित्रपटासाठी रेखाला किसींग सीन करायचं होतं. त्‍याकाळी किसींग सीन म्‍हणजे भलतचं काहीतरी असं वाटायचं. त्‍यामुळे चांगलीच खळबळ उडाली. तिला पत्रकार परिषदेत आचरट प्रश्‍नही विचारण्‍यात आले होते. पुढे 'अंजाना सफर' हा चित्रपट 'दो शिकारी' नावाने रिलीज झाला तो १० वर्षांनी. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर सटकून आपटला होता. 
नवीन निश्‍चल
त्‍यानंतर तिला प्रख्‍यात दिग्‍दर्शक मोहन सैगल यांचा चित्रपट 'सावन भादो' मिळाला. त्‍यात अभिनेता नवीन निश्‍चल होता. त्‍याचा हा पहिलाच सिनेमा होता. पण, रेखाला बघून तो अचंबित झाला. मेकअप, वेशभूषा, फिगर याबद्‍दल तिला काहीच माहिती नव्‍हतं. ती दिसायला काळी आणि जाडी होती. लोक तिच्‍यावर हसायचे. नवीन एकदा पुण्‍याला गेला असताना जयश्री टी. शी बोलला. पण, रेखाशी बोलला नाही. पुढे प्रेक्षकांनी नवीन निश्‍चलला नाकारलं. मात्र, रेखाला कधीच मागे वळून पाहावे लागलं नाही. असं म्हटलं जातं की, नवीन निश्चल तिला आवडायचा. पण, हे एकतर्फी प्रेम होतं. जसं चित्रपटाचं शूटिंग संपलं, तिचं प्रेमही संपुष्‍टात आलं. 
Related image
अमिताभ बच्‍चन
अमिताभ असो की रेखा दोघांनीही आपल्यात प्रेमसंबंध आहेत की नाही याचा आजवर कधी खुलासा केलेला नाही.  त्यांच्या प्रेमाच्या गॉसिपला सत्य असल्याचा दर्जा देणारा ' सिलसिला ' चित्रपट आला. आणि प्रेक्षकांनीही त्यांचं 'अफेअर आहेच' असं शिक्कामोर्तब केलं. रुपेरी पडद्यावरील रेखा-अमिताभ यांची केमिस्ट्री अफलातूनच होती. 'मुकंदर का सिकंदर', 'सुहाग', 'सिलसिला' असे एकापेक्षा एक चित्रपट त्‍यांनी दिले. असं म्‍हटलं जातं की, रेखाचे ४ विवाह झाले. अमिताभचा विवाह जया भादुरीसोबत झाला आणि तो आजवर कायम आहे. पण, आजही रेखाचं स्टेटस सिंगलच आहे! 
Related image
त्‍याकाळी चित्रपट सृष्टीवर अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन यांची जादू होती. अमिताभशी भेटल्‍यानंतर रेखाच्‍या लुकमध्‍ये बदल झाला. रेखा आणि अमिताभनी अनेक चित्रपटांत एकत्र काम केलं. परंतु, त्‍यांची जुळलेली वेव्‍हलेन्‍थ आणि पडद्‍यावर झालेलं सादरीकरणं यावरून प्रेक्षकांना त्‍यांची केमिस्ट्री आवडली. पण, गॉसिपच्‍या चर्चेला उधाण आलं. असं म्‍हटलं जातं की, रेखाच्‍या मित्राच्‍या बंगल्‍यावर हे दोघे नेहमी भेटायचे. दरम्‍यान, अमिताभ यांचा 'कुली'च्‍या सेटपर अपघात झाला. जया बच्चनने रात्रंदिवस अमिताभ यांची सेवा केली. दुर्घटनेनंतर अमिताभचा पुर्नजन्मच झाला होता. त्‍यावेळी अमिताभ रेखापासून दूर झाले. 
जितेंद्र 
अल्‍प वयात पैसा, प्रसिध्‍दी, यश मिळाले की गाडी भरकटू लागते. तसचं रेखाचं झालं. लहानपणापासून जितेंद्र तिचा लाडका हिरो होता. जितेंद्रसोबत तिला हिराईन म्‍हणून एक बेचारासाठी घेण्‍यात आलं. रोमँटिक गाण्‍याचं शिमल्‍याला शूटिंग होतं. तेव्‍हा रेखा त्‍याच्‍यावर प्रेम करायची. पण, जितेंद्र शोभा कपूर (पत्‍नी) या एअर होस्‍टेसवर प्रेम करायचा. त्‍यामुळे रेखाचा हिरमोड झाला. त्‍यावेळी जितेंद्रचं नाव 'ड्रिम गर्ल' हेमामालिनी, राजश्री आणि मुमताजबरोबर जोडलं जातं होतं. रेखाने त्‍याच्‍याबरोबर अनोखी 'अदा,' 'एक ही भूल,' 'जुदाई' यांसारखे चित्रपट केले. 
Image result for rekha hd
विनोद मेहरा
'पर्दे के पिछे' या चित्रपटामुळे देखणा अभिनेता विनोद मेहरा प्रकाशात आला होता. पाली हिलला तो निभाना अपार्टमेंटमध्‍ये राहायचा. त्‍यावेळी 'रामपूर का लक्ष्‍मण'मुळे रेखा फार्मात होती. विनोदबरोबर तिला 'ऐलान' चित्रपटात काम करायची संधी मिळाली. हा चित्रपट चाललाही. विनोद मेहरा आणि रेखाच्‍या रोमान्‍सचे किस्‍से सर्वश्रृत आहेत. रेखा आणि विनोद मेहराने गुपचुप लग्‍न केलं होतं, असं म्‍हटलं जातं. परंतु, एका टीव्‍ही शोमध्‍ये रेखाने या वृत्ताला नकार देत विनोद आपला चांगला मित्र असल्‍याचे म्‍हटले होते. रेखा आणि विनोदमध्‍ये दूरी निर्माण होण्‍यामागे विनोदची आई हे एक कारण होतं. विनोदच्‍या आईला रेखा आवडायची नाही. 'प्राण जाये पर वचन न जाये' हा डाकूच्‍या जीवनावरचा चित्रपट. त्‍यात आणि धर्मेद्रसमवेतचा चित्रपट 'किमत'मध्‍ये तिने बोल्‍ड दृश्‍ये दिली होती. ही गोष्‍ट विनोदला खटकायची. विनोदचं आधी लग्‍न झालं होतं. 
किरण कुमार 
विनोद मेहराशी नातं संपल्‍यानंतर रेखा निराश होती. त्‍यावेळी तिची भेट किरण कुमारशी झाली. १९७२ ला प्रथम रेखा किरण कुमारला भेटली. किरण कुमार प्रसिध्‍द अभिनेता जीवन यांचा मुलगा. रेखाशी किरणची मैत्री जीवन यांना आवडायची नाही. परंतु, ही मैत्रीही फार काळ टिकली नाही. 
संजय खान
किरण कुमारशी मैत्री संपुष्‍टात आल्‍यानंतर रेखा पुन्‍हा एकटी पडली. निर्माते जी. एम. रोशन यांच्‍या 'दुनिया का मेला'मध्‍ये रेखा-अमिताभला घेण्‍यात आलं. तेव्‍हा अमिताभ यांचे नाव फारसे प्रसिध्दीत नसल्‍याने आयत्‍या वेळेला त्‍याच्‍याऐवजी अभिनेता संजय खानला घेण्‍यात आलं. रेखाच नाव संजय खानशी जोडलं गेलं.   
Image result for rekha hd
मुकेश अग्रवाल
रेखाने १९९० मध्‍ये नवी दिल्‍लीतील एका उद्‍योगपती मुकेश अग्रवालशी विवाह केला. लग्‍नाच्‍या काही दिवसांनंतर मुकेश अग्रवालने आत्महत्या केली. मुकेशने सुसाईड नोट लिहिली होती. त्‍यात लिहिलं होतं की, त्‍याच्‍या आत्महत्येमागे कोणालाही जबाबदार ठरवू नये. या घटनेनंतर रेखा यांचं नाव कुठल्‍याही व्‍यक्‍तीशी जोडलं गेलं नाही.
एकदा सीमी गरेवालच्या कार्यक्रमात रेखाने म्‍हटले होते, 'धीस ईज टूमारोज हेडलाईन...माझे मिस्‍टर बच्‍चन यांच्‍यासोबत कधीही, कसलेही वैयक्‍तिक संबंध नव्‍हते.' असे असले तरी रेखा आणि अमिताभ यांच्या मैत्रीचा खुलासा आजपर्यंत झालेला नाही. 
Image result for rekha hd

...तरीही सिंदूर लावते रेखा



ज्या अभिनेत्रीनं पिढ्यानपिढ्या आपल्या सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अधिराज्य गाजवलं. साठी उलटूनही तिच्‍या सौंदर्याची जादू आजही कमी झालेली नाही. अशी अभिनेत्री रेखाचा १० ऑक्टोवरला वाढदिवस. सिनेसृष्टीत जिच्या काळातील अभिनेते-अभिनेत्रींची मुलं अभिनय क्षेत्रात आली तरीही तिचे रसिक तसूभरही कमी झाले नाहीत. आजदेखील टॉपच्‍या सुंदर अभिनेत्रींमध्‍ये सदाबहार रेखाचं नाव घेतलच जातं. प्रत्‍येकाला भावणारी, सुंदर, प्रतिभावान आणि आपल्‍या कमलनयनांनी खूप काही सांगणारी रेखा. तिच्‍या सौंदर्याचं कौतुक करावं तितकं थोडंच! अन्‌ ते पिढ्यान्‌पिढ्या सुरूच आहे. 

ही प्रतिभावान ६५ वर्षांची अभिनेत्री अदाकारी करीत ज्‍यावेळी पडद्‍यावर येते, त्या प्रत्येक वेळी तिचं सौंदर्य खुललेलं दिसतं. तिच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यातील चढ-उतारांप्रमाणेच तिच्‍या करिअरनेदेखील अनेक वळणे घेतली. तिच्या आयुष्यातही चढ-उतार आले. मात्र, ती डगमगली नाही, खचली नाही स्‍वाभिमानानं अन्‌ आपल्या सौंदर्यावर आणि मनमोहक अदांवर या मायावी वाटणार्‍या वास्‍तव दुनियेत निर्विवादपणे आपली हुकमत गाजवल राहिली. रेखाकडे नेमकं काय आहे, जे आजच्‍या अभिनेत्रींमध्‍ये नाही? 
Image result for rekha
तिच्या सौंदर्याची अदा भुरळ जसं बॉलिवूडला आहे तसेच हॉलिवूडलाही आहे. या अशा सौंदर्यवतीच्या सौंदर्याबद्‍दल वर्षानुवर्षे सांगितलं जातं आणि संपूर्ण जग वेडं आहे, ते तिच्या सौंदर्याच्या अदावर. अशा रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य काय आहे? हे सौंदर्य त्‍यांना लहानपणापासून मिळालं आहे? की काळानुरूप तिनं स्‍वत:लाच इतकं सुदंर बनवलं? तिच्या साड्या, साजशृंगार ते केसांच्या भांगेत अजुनही सिंदूर लावणं...या प्रश्‍नांची उत्तरं जाणून घ्यायचीच असतील तर तिच्या चित्रपटांचा चढता आलेखच पाहणं गरजेचं आहे. आजही रेखाला पाहिल्‍यानंतर तिचे वय लक्षात येणं अशक्‍यचं! 
... तरीही सिंदूर लावते रेखा
रेखाच्या आयुष्यातील उत्‍सुकता प्रत्येकालाच आहे. ती राहते कशी ते तिचं लग्न झालं आहे का?, झालं तर नवरा कोण? आणि वैवाहिक आयुष्य नेमकं आहे तरी कसं? अशा एक ना अनेक गोष्टी रेखाच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याबद्‍दल सांगितल्या जातात. परंतु, रेखाला त्‍याच्‍याशी काही देणंघेणं नाही. रेखाच्‍या पतीचे निधन झालं आहे, तरीही ती सिंदूर लावते. ती सिंदूर का लावते या गोष्‍टीवर अनेकदा चर्चाही झाल्‍या आहेत. कदाचित, रेखाचा हा अंदाज आहे, जो मायानगरीत केवळ टिकलाच नाही तर तिची एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. आयुष्‍यातील अगणित घडामोडी तिची बायोग्राफी ‘रेखा-ॲन अनटोल्ड स्टोरी’मध्‍ये पाहायला मिळू शकतात. यामध्ये तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टींचा उलगडा झालेला आहे.  
Image result for rekha jewellery
रेखाच्‍या सौंदर्याचं रहस्‍य जाणून घेण्‍यासाठी आजचा रसिक उत्‍सुक आहे. साठी पार केल्‍यानंतरही तिने स्‍वत:ला अगदी नवतारुण्य लाभलेल्या तरुणीला लाजवेल यापेक्षा फिट ठेवलं आहे. आजदेखील रेखा एखाद्‍या पार्टीला जाते, त्‍यावेळी रसिकांच्या नजरा तिच्‍यावरून हटता हटत नाहीत. मग तो कार्यक्रम असो वा ॲवॉर्ड फंक्‍शन असो नाही तर कुणाचा विवाह समारंभ असो...त्‍याठिकाणी रेखा आपल्‍या अदाकारीने सर्वांच लक्ष वेधून घेते, आणि तितक्‍याच नम्रपणे ती सामोरी जाते.  
डार्क लिपस्‍टिक आणि साजशृंगार 
रेखाचं नाव घेताच डोळ्‍यासमोर येतो तो मोहवणारा तिचा लूक. केसात गजरा, केसातल्‍या भांगामध्ये ठसठशीत भरलेला सिंदूर आणि ओठांवर गडद रंगांचे लिपस्‍टिक. हे सगळं असलं तरी तिचे बोलके डोळे कुणाच्या नजरेतून सुटत नाहीत. त्या बोलक्या नितळ डोळ्यात काळं गडद काजळ असतं तेव्‍हा ती राजकन्येपेक्षाही अधिक सौंदर्याची खाण वाटत असते. आताचा जमाना शॉर्ट, मिनी स्‍कर्टचा असला तरी रेखाची साडी मात्र वर्षानुवर्षे मोहून टाकणारी असते. रेखाचं कौतुक करताना अनेक शब्द सापडनेसे होतात. तेव्‍हा त्यांच्या तोंडून एकच शेर येतो तो म्‍हणजे 'रेखा तो बस रेखा ही हैं'.
Image result for rekha jewellery
अजूनही फिट आहे रेखा 
या इंडस्‍ट्रीजमध्ये अनेक अभिनेते-अभिनेत्री आल्या गेल्या मात्र काळावर अधिराज्य गाजवत राहिलं ते एकच नाव ते म्‍हणजे रेखा.  रेखाचं सांगायचं झालं तर तिने आपला फिटनेस कायम ठेवला आहे. फिटनेसबद्‍दल ती नेहमीच सजग असते. तिने 'माईंड ॲण्‍ड बॉडी टेम्‍पल' नावाने एक व्‍हिडिओ शेअर केला होता. ज्‍यात ती चिरतरुण राहण्‍याचं रहस्‍य होतं. क्‍लींजर, टोनिंग, माईस्‍चॉरायझिंग आणि मेकअप रिमूव्‍ह करण्‍याबराबरच रेखा ठेवण्‍यासाठी अरोमा थेरेपी आणि स्‍पा ट्रीटमेंट देखील घेते. त्‍यामुळेच तिचा चेहरा इतका ग्‍लो करतो. 
Image result for rekha jewellery
आहाराबाबतही रेखा खूप काळजी घेते. ती साडेसात वाजताच जेवते. ज्‍यामुळे तिला हलकं वाटतं आणि त्‍यानंतर ती फ्रेश ज्‍यूस पिते. त्‍याचबरोबर खूप पाणीदेखील पिते. रेखाने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, ती फक्‍त शाकाहारी जेवणच घेते. ताज्‍या भाज्‍या आणि दही, सॅलडचा नियमितपणे खाते. परंतु, रेखा भात खात नाही.  
उंची साड्‍या आणि गोल्‍डन शाईन 
रेखाच्‍या कांजीवरम साड्‍या फेव्‍हरेट आहेत. गोल्‍डन शाईन असलेल्‍या लाल, पांढर्‍या आणि इतर रंगांच्‍या साड्‍या नेसणं, तिला आवडतं. साडीसोबत ट्रॅडिशनल ज्वेलरी घालणे, बोल्ड लिप शेड्स लिपस्‍टिक लावणे हे नित्‍याचचं. 
Related image
लांबसडक काळेभोर केस 
रेखाचे काळेभोर केस तिच्‍या सौंदर्याला चारचाँद लावतात. ती केसांत दही, मध आणि अंड्‍यातील पांढरा भागाचा बनवलेला पॅक लावते. ती हेअर ड्रायरचा वापर कधीच करत नाही. किंवा केसांवर कुठलाही रासायनिक द्रव्‍यांचा वापर करीत नाही. आयुर्वेदाचा वापर ती नेहमी करते. म्‍हणून आजही तिच्या लांबसडक केसांचं रहस्‍य सर्वांना भुरळ घालणारं आहे. 
स्‍टाईल काय असते, हे रेखाकडून शिकावं. या वयातही ती आजच्‍या अभिनेत्रींना स्‍टायलिंग टिप्‍स देते. २०१७ मध्‍ये प्रसिध्‍द फोटोग्राफर डब्‍बू रतनानीच्‍या कॅलेंडर लॉन्‍चप्रसंगी रेखा पोहचली, त्‍यावेळी तिच्‍या स्‍टाईलने चाहता वर्ग घायाळ झाला होता. ब्‍लॅक ॲण्‍ड व्‍हाईट आऊटफिट, डार्क रेड लिपस्‍टिक, डोक्‍यावर बांधलेला वेगळ्‍या अंदाजातील स्‍कार्फ आणि काळा गॉगल घालून रेखा हॉट दिसत तर होतीच. पण, कार्यक्रमाचं मुख्य आकर्षणही रेखाच झाली होती. 
Image result for rekha

त्यानं अमिताभना एक ठोसा लगावला आणि...

'कुली'च्‍या सेटवरील अपघात, जगभरातून चाहत्यांची प्रार्थना 





गोष्‍ट सन १९८३ ची. चित्रपट 'कुली'चे शूटिंग बंगळुरूमध्‍ये सुरू होते. (या चित्रपटात 'कुली' अमिताभजींचा बिल्‍ला नं. ७८६ होता.) २ वाजताची शिफ्‍ट होती. अमिताभ बच्चन यांनी ऋषी कपूर यांना फोन करून सांगितले की, 'माझ्‍यासोबत शूटिंगसाठी चल.' दोघे एका कारमधून शूटिंगच्‍या ठिकाणी पोहोचले. दुसर्‍यादिवशी एक सीन शूट करायचा होता. ऋषी कपूर यांनी उंचावरून गोगा कपूर यांच्‍यावर ॲटॅक करत उडी मारायची होती. अमिताभ बच्चन यांनी सेटची पाहणी केली. त्‍यांना वाटलं की, ऋषी कपूरसाठी हा सीन धोकादायक होऊ शकतो. पण, शूटिंगची सगळी तयारी झाली होती. अमिताभ यांनी वर पाहत ऋषी यांना विचारलं देखील. पण, ऋषी यांनी काहीच न बोलता स्‍क्रिप्‍टप्रमाणे उडी मारली. परंतु, उडी मारल्‍यानंतर त्‍यांच्‍या चेहर्‍याला दुखापत झाली. 
'१०२ नॉट आऊट' या चित्रपटाच्‍या प्रमोशनवेळी ऋषी कपूर म्‍हणाले होते की,  त्‍यावेळी अमितजी माझ्‍यावर रागावले होते. ते म्‍हणाले की, 'तुला स्‍टंट करण्‍याची एवढी हौस आहे तर तुला माहित असायला हवे की तू कोठून उडी मारणार आहेस? आणि तुला हा स्‍टंट आधीच शिकून घ्‍यायला हवा होता.' 
ऋषी यांनी एक मजेदार किस्‍सादेखील सांगितला होता. ते म्‍हणाले, 'कुली सिनेमाचं शूटिंग बंगळुरूमध्‍ये सुरू होते. तेथे खूपच उष्‍णता होती. त्‍यावेळी अमिताभ शूटिंगमध्‍ये शॉर्ट्स घालून येत असत. या शॉर्ट्‍समध्‍ये अमिताभ यांचा स्मार्ट लुक दिसायचा.'
... आणि ऑपरेशनच करावं लागलं
कुलीच्‍या शूटिंगची आठवण काढत एकदा अमिताभ म्‍हणाले की, 'आम्‍ही कुलीचे शूटिंग करत होतो. सकाळी ७-८ वाजल्‍यापासून रात्री १०-११ वाजेपर्यंत थांबत होतो. संपूर्ण यूनिट कंटाळत असे. कोणीतरी म्‍हटलं की, 'मनमोहनजी यांना सांगा की, संपूर्ण यूनिटला ब्रेक मिळालेला नाही. त्‍यावेळी अमितजी स्‍वत: हे ऐकून चिंतीत झाले आणि म्‍हणाले की, पाहुया काय करता येईल?'
या शूटिंगच्‍या काही दिवसानंतर अमिताभ बच्चन आणि पुनीत इस्सर यांच्‍यामध्‍ये आणखी एक ॲक्शन सीन शूट करायचा होता. त्‍यात पुनीत आणि अमिताभ बच्चन यांना एकमेकांना ठोसा मारायचा होता. यावर ऋषी कपूर म्‍हणाले होते, ' २४ जुलै, १९८२ रोजी बंगळुरूमध्‍ये 'कुली'चं शूटिंग सुरू होतं. सीनमध्‍ये अमिताभ बच्चन यांना पुनीतच्‍या ठोशामुळे पोटात गंभीर दुखापत झाली होती. अमितजींना सीन करताना पोटात खूप दुखू लागलं. पण, अमितजी काहीच बोलले नाहीत. सीन पूर्ण झाल्‍यानंतर ते बागेत जाऊन झोपले. कोणीतरी मला म्‍हणाले की, अमितजींना काय झालयं पाहा, ते बागेत झोपले आहेत? पण, मला वाटलं की, असेच झोपले असतील. परंतु, नंतर समजलं की, त्‍यांना दुखापत झालीय. 'कुली'च्‍या सेटवर अपघात झाल्‍यानंतर अमिताभ यांच्‍यावर ६१ दिवस हॉस्‍पिटलमध्‍ये उपचार सुरू होते. 
Related image
२५ जुलैला अमिताभ यांची तब्‍येत आणखी बिघडली. एक्स-रे काढण्‍यात आला. परंतु, डॉक्टर्सना काही समजेना. अमिताभ यांना झोपेची गोळी देण्‍यात आली. हे वृत्त समजताच अमिताभ यांची आई तेजी, पत्नी जया आणि त्‍यांचे भाऊ अजिताभ बेंगलोरला (आताचे बंगळुरू) पोहोचले. ते अमिताभ यांना मुंबईत घेऊन जाणार होते, परंतु, डॉक्टर्सनी परवानगी दिली नाही. 
तिसर्‍या दिवशी म्‍हणजेच २६ जुलैला अमिताभजींची स्थिती आणखी बिघडली. त्‍यावेळी वेलोरचे प्रसिध्‍द सर्जन एचएस भट्ट तेथे आले होते.  डॉक्‍टर्सनी आग्रह केल्‍यानंतर डॉ. भट्ट यांनी अमिताभ यांची तपासणी केली. रिपोर्ट्‍स पाहिल्‍यानंतर त्‍यांनी अमिताभ यांच्‍यावर ऑपरेशन करावे लागणार असल्‍याचे सांगितले. अमिताभजींची प्रकृतीत सुधारणा न झाल्‍याने २७ जुलै, १९८२ला डॉक्टर्सनी ऑपरेशन करण्‍याचा निर्णय घेतला. ऑपरेशनच्‍यावेळी लहान आतड्‍यांना दुखापत झाल्‍याचे दिसले. त्‍यावेळी अमिताभ यांची प्रकृती गंभीर होती. 
२८ जुलैला अमिताभ यांना न्‍यूमोनिया झाला होता. अमिताभ यांची प्रकृती बिघडली होती. त्‍यानंतर त्‍यांना मुंबईला उपचारासाठी पाठवण्‍याचा निर्णय डॉक्‍टरांनी घेतला. क्रेनच्‍या मदतीने एअरबसमधून अमिताभ यांना मुंबईला नेण्‍यात आले. रात्री ११ वाजता बेंगलोरहून निघालेली एअरबस ३१ जुलैला पहाटे ५ वाजता मुंबईत पोहोचली. त्‍यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलच्‍या दुसर्‍या मजल्‍यावर स्पेशल वॉर्डमध्‍ये ठेवण्‍यात आलं होतं.
Image result for film kuli
जगभरातून चाहत्‍यांची प्रार्थना
१ ऑगस्‍टच्‍या सकाळपर्यंत अमिताभ बच्‍चन यांच्‍या प्रकृतीत सुधारणा झाली होती. त्‍यांच्‍या प्रकृतीसाठी संपूर्ण जगभरातून प्रार्थना करण्‍यात आल्‍या होत्‍या. कुलीच्‍या सेटवर अमिताभ यांना झालेल्‍या अपघातानंतर ते अक्षरश: जिवावरच्‍या संकटातून बचावले होते. तब्‍येतीत सुधारणा झाल्‍यावर त्‍यांनी जुहूच्‍या त्‍यांच्‍या प्रतीक्षा बंगल्‍याच्‍या खिडकीतून चाहत्‍यांना रोज दर्शन देणे सुरू केले. अर्थात गेल्‍या काही वर्षांपासून हे दर्शन महिन्‍यातील एका रविवारपुरते मर्यादित झाले आहे. 
७८६ नंबरने माझा जीव वाचवला : अमिताभ
अमिताभनी एकदा ट्‍विट करत म्‍हटलं होतं की, 'आमचे मुस्लिम भाऊ आणि बहिणींसाठी खूप पवित्र असणार्‍या ७८६ या नंबरने चित्रपट कुलीमध्‍ये माझा जीव वाचवला होता.' 
मध्‍यंतरी, या प्रसंगाचा एक फोटो अमिताभजींचा मुलगा अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर शेअर केला होता. त्‍या फोटोत ते आपल्‍या भावासोबत दिसत होते.

सुगंध दरवळला 'निशिगंधा'चा!...


बर्थडे स्पेशल  
निशिगंधा वाडचं शिक्षण पीएच. डी. (बदलत असलेल्‍या स्‍त्रीच्‍या भूमिका -मराठी व ब्रिटीश रंगभूमी) दहावीला बोर्डात ४४ वी आणि १२ वी मध्‍ये बोर्डात तिसरी. लहानपणापासूनच निशिगंधाला अभिनयाची आवड होती. शाळेमध्‍ये तिने दुसरीत असताना अभिनयाला सुरुवात केली. शाळेतील नाटकांसाठी तिने बक्षीसही पटकावली. आंतरशालेय स्‍पर्धेसाठी तिने भाग घेतला होता. १९८२/१९९० या कालावधीसाठी तिला शासनाच्‍या सांस्‍कृतिक विभागाद्‍वारे राष्‍ट्रीय पातळीवर स्‍कॉलरशीप मिळाली होती. 
Image result for nishigandha wad
सुलभा देशपांडे यांच्‍या नाट्‍यशिबिरात निशिगंधाने भाग घेऊन ‘दुर्गा झाली गौरी’ या नाटकात काम केले. सुप्रसिध्‍द दिग्‍दर्शक-अभिनेता अमोल पालेकर यांच्‍या मार्गदर्शनामुळे तिला ‘मुखवटे’ हे नाटक करायला मिळाले. ‘प्रेमाच्‍या गावा जावे,’ ‘मोरूची मावशी’ आदी व्‍यावसायिक नाटकांमध्‍ये तिने रिप्‍लेसमेंट म्‍हणून काम केले. मात्र, ‘कुणीतरी आहे तिथं’ या नाटकात तिला पहिल्‍यांदा नायिकेची भूमिका मिळाली. ही तिची पहिलीच दूरदर्शन मालिका. या मालिकेमुळे निशिगंधाला अभिनेत्री म्‍हणून प्रसिध्‍दी मिळाली. ‘हद्‍दपार,’ ‘बंदिनी’ अशा २७ मराठी तर ‘दास्‍तान,’ ‘विराट’ आदी २१ हिंदी मालिका निशिगंधाने केल्‍या आहेत. एकापेक्षा एक हा निशिगंधाचा पहिला मराठी चित्रपट. या चित्रपटात नायक म्‍हणून अशोक सराफ यांनी काम केले होते. येता जाता नवर्‍याला वेगवेगळे पदार्थ खाऊ घालणारी निशिगंधाने झकास भूमिका साकारली होती. 
Image result for nishigandha wad
‘वाजवा रे वाजवा,’ ‘शेजारी शेजारी,’ ‘बाळा जो जो रे,’ ‘शिवरायांची सून ताराराणी,’ ‘सासर माहेर’ हे निशिगंधाचे काही महत्त्‍वाचे चित्रपट. तर ‘सलीम लंगडे पर मत मरो,’ ‘कर्मयोध्‍दा,’ ‘तुमको न भूल पाएंगे,’ ‘आप मुझे अच्‍छे लगने लगे’ या चित्रपटांतही निशिगंधा दिसली. 
अभिनयाव्‍यतिरिक्‍त लेखन क्षेत्रातही निशिगंधाने आपला ठसा उमटवला आहे. लेखनाचा वारसा निशिगंधाला तिची आई डॉ. विजया वाड यांच्‍याकडून लाभला आहे. निशिगंधाचा ‘इवलं इवलं’ हा बालगीतांचा संग्रह प्रकाशित झाला असून त्‍याला साहित्‍य निर्मितीचे सरकारचे पारितोषिक (१९८४) मिळाले आहे. ‘अनुश्‍का’ या निशिगंधाने लिहिलेल्‍या काव्‍यसंग्रहाला सरकारचा १९९३ सालचा सर्वोत्‍कृष्‍ट साहित्‍याचा सन्‍मान मिळाला आहे. आतापर्यंत तिची पाच पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत. निशिगंधाचे पती अभिनेता दीपक देऊळकर यांनी दिग्‍दर्शन, निर्मिती केलेल्‍या ‘अखंड सौभाग्‍यवती’ या चित्रपटात निशिगंधाची भूमिका केली होती.  
Related image
लोकप्रिय चित्रपट-
एकापेक्षा एक, प्रतिकार, गृहप्रवेश, शिवरायांची सून ताराराणी, बाळा जो जो रे, प्रेमांकूर, शेजारी शेजारी, वाट पाहते पुनवेची, वाजवा रे वाजवा, जन्‍मदाता, सासर माहेर, अखंड सौभाग्‍यवती.

बॉलिवूडच्या शहेनशहाबद्दल 'या' गोष्टी एकदा वाचाच



अमिताभ बच्‍चन वाढदिवसानिमित्त
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्‍चन यांचा ११ ऑक्टोबरला वाढदिवस. अलाहाबाद येथे ११ ऑक्‍टोबर १९४२ रोजी अमिताभ बच्‍चन यांचा जन्‍म झाला. प्रख्‍यात कवी हरिवंशराय बच्‍चन हे त्‍यांचे वडील. अमिताभ यांचे खरं नाव श्रीवास्‍तव; पण वडिलांनी कवी म्‍हणून स्‍वीकारलेले बच्‍चन हेच नावे त्‍यांना मिळाले.  
भारतीय सिनेसृष्‍टीतील पारंपरिक अभिनेत्‍याची सगळी परिमाणे बदलून टाकत ७० मि.मी. पडदा अमिताभ बच्‍चन यांनी एकट्‍यांनी व्‍यापला. १९७३ साली रिलीज झालेला चित्रपट जंजीरमधील 'ये पुलिस स्‍टेशन है, तुम्‍हारे बाप का घर नही,' असे डोळ्‍यात डोळे भिडवून खलनायकाच्‍या खूर्चीला लाथ मारणार्‍या अमिताभ यांनी लाखो लोकांच्‍या मनाचा ताबा घेतला. छोट्‍या पडद्‍यावर 'देवी और सज्‍जनो आज हम खेलते है...कौन बनेगा करोडपती' असे म्‍हणत सन्‍मानपूर्वक स्‍पर्धकाला खुर्ची देतात, तेव्‍हाही त्‍याने घेतलला ताबा सुटलेला नाही. 
अमिताभ यांच्या वाढदिवसानिमित्त जा‍णू्न घेऊया त्‍यांच्‍या आयुष्‍यातील या वेचक नोंदी...
* के. ए. अब्‍बास दिग्‍दर्शित 'सात हिंदुस्‍तानी' (१९६९) हा अमिताभ बच्‍चन यांचा पहिला चित्रपट; पण, 'जंजीर' या चित्रपटाने त्‍यांना खरी ओळख मिळवून दिली. 
* सुरुवातीला त्‍यांचे चित्रपट फ्‍लॉप हात असताना निर्माता-दिग्‍दर्शक कुंदनकुमार यांनी चार रिळांच्‍या चित्रीकरणानंतर 'दुनिया का मेला'मधून त्‍यांना काढून अभिनेता संजय खानला घेतले. मजेशीर म्‍हणजे या चित्रपटात रेखा अभिनेत्री होती. 
* अमिताभ यांचे काही चित्रपट फ्‍लॉप ठरले. तर अनेक सुपरहिट ठरले. 'यार मेरी जिंदगी' हा त्‍यांचा चित्रपट तब्‍बल २१ वर्षांनी पूर्ण झाला. 'रुद्र,' 'शिनाख्‍त,' 'बंधुआ,' 'टायगर,' 'रिश्‍ता,' 'सरफरोश अमसे' चित्रपट चालले नाहीत. 
Related image
* मनमोहन देसाई दिग्‍दर्शित 'कुली'च्‍या सेटवर बेंगलोर येथे २६ जुलै, १९८२ रोजी मारहाण दृश्‍यात पुनीत इस्‍सारचा ठोसा चुकवण्‍याच्‍या प्रयत्‍नात अमिताभ यांच्‍या पोटात टेबलाचा लागलेला कोपरा जीवघेणा ठरला. ते बरे व्‍हावेत म्‍हणून देशभरातीलच नव्‍हे तर परदेशातीलही चाहत्‍यांनीही प्रार्थना केल्‍या. 
* १९८४ साली आपले मित्र राजीव गांधी यांना मदत करण्‍यासाठी अमिताभ यांनी राजकारणात टाकलेले पाऊल वादग्रस्‍त ठरले. अलाहाबाद लोकसभा मतदारसंघातून त्‍यांनी समाजवादी पक्षाचे मुरब्‍बी उमेदवार हेमवतीनंदन बहुगुणा यांचा पराभव करून खासदार म्‍हणून लोकसभेत प्रवेश केला. 
* 'खुदा गवाह' (१९९२) नंतर ते काही काळ चित्रपटापासून दूर राहिले. 
* अमिताभ यांना कारचे प्रचंड वेड आहे. त्‍यांच्‍या ताफ्‍यात लेक्‍स, रॉल्‍स रॉईस, बीएमडब्‍ल्‍यू, मर्सिडीज या कारचा समावेश आहे. पांढर्‍या रंगाची रॉल्‍स रॉईस फँटम ही गाडी निर्माते विधु विनोद चोप्रा यांनी अमिताभ यांना 'एकलव्‍य' चित्रपटातील शानदार कामासाठी गिफ्‍ट केली होती.
* अमिताभ बच्‍चन यांचे पहिले प्रेम जया बच्‍चन किंवा रेखा नाही, तर एका ब्रिटीश कंपनीत काम करणारी मराठी मुलगी होती. दोघे कोलकात्‍यात नोकरीला होते. त्‍यावेळी अमिताभ यांना १५०० रुपये, तर त्‍या मुलीला ४०० रुपये पगार होता. बिग बींना तिच्‍याशी विवाहदेखील करायचा होता, पण ते शक्‍य झालं नाही. त्‍यामुळे बिग बी नोकरी सोडून मुंबईला आले. 
Image result for amitabh bachchan
* हिंदीमध्‍ये अमिताभ यांच्‍या 'डॉन,' 'अग्‍निपथ,' 'जंजीर' या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. दक्षिणेत 'दीवार,' 'नसीब,' 'अमर अकबर अँथनी,' 'जंजीर,' 'कस्‍मे वादे' या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आले. या प्रत्‍येक चित्रपटात रजनीकांत यांनी अमिताभ यांची भूमिका साकारलेली होती. अमिताभ यांच्‍या २० चित्रपटांत त्‍यांचे नाव विजय असे आहे. अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. 
* 'डॉन,' 'दी ग्रेट गॅम्‍बलर,' 'आखरी रास्‍ता,' 'देशप्रेम,' 'अदालत,' 'सत्ते पे सत्ता,' 'कस्‍मे वादे' अशा चित्रपटांतूत त्‍यांनी दुहेरी भूमिका केल्‍या आहेत. महान चित्रपटांत तिहेरी भूमिका होती. 
* अमिताभ यांनी चित्रपटात गाणीही गायली आहेत. 'मि. नटवरलाल'मधील 'मेरे पास आवो मेरे दोस्‍तो,' 'लावारीस'मधील मेरे अंगने मे, 'सिलसिला'मधील 'निला आसमा सो गया' आणि 'रंग बरसे' ही काही उदाहरणे आहेत. 
* कारकिर्दीच्‍या उत्तरार्धात अमिताभ यांना अनेक चांगल्‍या भूमिका मिळाल्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी गेटअपही बदलला. 'पा' चित्रपटातील आजारग्रस्‍त लहान मुलाची भूमिका हे सर्वोत्तम उदाहरण. 
* उतारवयात अमिताभ यांच्‍या 'बागबान,' 'बाबू,' 'आँखे,' 'पीकू,' 'पिंक,' 'वजीर', 'शमिताभ', 'पा', '१०२ नॉट आऊट' या चित्रपटातही वेगळ्‍या भूमिका केल्‍या. 
Image result for amitabh bachchan
* त्‍यांनी अनेक चित्रपटात पोलिस अधिकार्‍याची भूमिका केली. त्‍यांना अँग्री यंग मॅन हा किताब मिळवून देणार्‍या 'जंजीर' या चित्रपटातही ते पोलिस अधिकारी होते. त्‍याशिवाय, 'दोस्‍ताना,' 'दी ग्रेट गॅम्‍बलर,' 'अकेला,' 'आखरी रास्‍ता' अशा अनेक चित्रपटात ते पोलिस अधिकारी होते. 
* राजेश खन्‍ना, संजीवकुमार अशा अनेक दिग्‍गजांसोबत अमिताभ यांनी काम केले. 'शक्‍ती' या चित्रपटातील दिलीपकुमार यांच्‍यासोबत त्‍यांची अभिनयाची जुगलबंदी रंगली. 
* 'कौन बनेगा करोडपती'मधून अमिताभ यांनी २००० साली छोट्‍या पडद्‍यावर पदार्पण केले. यंदा या शोचे ११ वे सीझन सुरू आहे. 
* आवाज ही अमिताभ यांची आणखी एक खासीयत. उंचपुरा बांधा आणि दमदार आवाज ही पुढे या सुपरस्‍टारची वैशिष्‍ट्‍ये बनली. परंतु, सुरुवातीला यामुळेच त्‍यांची हेटाळणी झाली. 
Image result for amitabh bachchan
* अमिताभ बच्‍चन कार्पोरेशन या लिमिटेड संस्‍थेद्‍वारे आणि स्‍वतंत्रपणे त्‍यांनी चित्रपटांची निर्मिती केली. त्‍यात 'तेरे मेरे सपने,' 'मृत्‍युदंड,' 'उल्‍लासम,' 'सात रंग के सपने,' 'फॅमिली,' 'पा,' 'विहीर,' 'अंतरमहाल,' 'अक्‍स,' 'विरुध्‍द,' 'सप्‍तबदी,' 'बुढ्‍ढा होगा तेरा बाप,' 'मेजरसाब,' 'शमिताभ' या चित्रपटांची निर्मिती केली. 
* अमिताभ यांना स्‍वत:लाचड विनोदाची जबरदस्‍त जाण असल्‍याने आणि 'अमर अकबर ॲन्‍थनी'मध्‍ये आरशासमोर त्‍यांनी केलेल्‍या धमाल प्रसंगानंतर त्‍यांना वारंवार विनोदी प्रसंग दिले जाऊ लागले. शशी कपूर, विनोद खन्‍ना यांच्‍यासोबत त्‍यांची जमलेली जोडी व त्‍यांनी एकत्र केलेले चित्रपट हाही चर्चेचा विषय बनत असे. 
* अनेक चित्रपटांत त्‍यांचा आवाज वापरण्‍यात आला आहे. १९७७ रोजी सत्‍यजित राय यांनी शतरंज की कहानी चित्रपटात अमिताभ यांचा आवाज वापरण्‍यात आलाय.
* 'महाभारत मालिका,' 'जोधा अकबर,' 'लगान,' 'बालिका वधू,' 'तेरे मेरे सपने,' 'परिणीता,' 'कहानी,' 'क्रिश ३,' 'कोचड्‍यान,' 'द गाझी ॲटॅक' हे चित्रपट आणि मालिकांचे कथन किंवा निवेदन केले आहे. 
* अलाहाबादमधील क्रीडा संकुल,, इटावा येथील सरकारी शाळा यांना अमिताभ यांचे नाव देण्‍यात आले आहे. अलाहाबादमधील एक रस्‍ताही त्‍यांच्‍या नावाने आहे. 
* अमिताभ यांना आतापर्यंत चार राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाले असून, हा एक विक्रमच आहे. अग्‍निपथ (२०००), ब्‍लॅक (२००५), पा (२००९), पिकू (२०१५) या चित्रपटांसाठी त्‍यांना सर्वोत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला आहे. 
Image result for amitabh bachchan
* १९८४ साली पद्‍मश्री, २००१ साली पद्‍मभूषण तर २०१५ साली पद्‍मविभूषणने त्‍यांना सन्‍मानित करण्‍यात आलं आहे. २००७ साली फ्रान्‍स सरकारने त्‍यांना नाईट ऑफ दी लेजिओन हा सन्‍मान बहाल केला. आतापर्यंत २२० वेगवेगळे पुरस्‍कार, ७ वेगवेगळ्‍या विद्‍यापीठांनी डॉक्टरेट देऊन त्‍यांचा सन्‍मान केला आहे. अमिताभ बच्‍चन यांचे खास वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे ते दोन्‍ही हातांनी लिहू शकतात. 
* 'खुदा गवाह'च्‍या शूटिंगच्‍या वेळी अफगाणिस्‍तानच्‍या अध्‍यक्षांनी अमिताभ यांना वायुसेनेची खास सुरक्षा दिली होती. अफगाणमध्‍ये सर्वाधिक लोकप्रिय हिंदी चित्रपट म्‍हणून 'खुदा गवाह'ची नोंद आहे. 
* गाड्‍यांबरोबरच त्‍यांना घड्‍याळे जमा करण्‍याचा छंद आहे. लंडन आणि स्‍वित्‍झर्लंड ही त्‍यांची आवडती ठिकाणे आहेत. 
* अमिताभ यांनी पहिली कविता १९८२ मध्‍ये रुग्‍णालयात असताना लिहिली. 
* बॉलिवूडमधील मेड फॉर इच अदर जोड्‍यांमध्‍ये अमिताभ आणि जया बच्‍चन या जोडीचे नाव न चुकता घेतले जाते. पडद्‍यावर या जोडीने एकत्र काम केले. ३ जून १९९३ रोजी खर्‍या आयुष्‍यातही त्‍यांनी एकमेकांची साथ देण्‍याचा निर्णय घेतला. 
* घरातील बेडरूम ही त्‍यांची आवडती जागा. येथे शांतपणे बसून त्‍यांना वाचन करणे आवडते. ते कधीही चहा, कॉफी घेत नाहीत. मद्‍यपी व्‍यक्‍तीचा उत्तम अभिनय करणारे अमिताभ दारूला हातदेखील लावत नाहीत. 
Related image
 * ते फारसे चिडत नाहीत. रस्‍त्‍यावरची भुर्जी, भाजलेले कणीस त्‍यांना आवडते. हिंदीशिवाय ते मराठी, बंगाली, पंजाबी भाषा बोलू शकतात. जर्मन, फ्रेंच, रशियन आणि इटालियन या विदेशी भाषाही त्‍यांनी शिकल्‍या आहेत. 
* ६ फूट २ इंच असलेले अमिताभ बॉलिवूडमधले सर्वांत उंच अभिनेते आहेत. मुंबईत स्‍ट्रगल करताना राहण्‍यासाठी जागा नसल्‍याने त्‍यांनी अनेक रात्री मरीन ड्राईव्‍हवर काढल्‍या. 
* वृत्त निवेदक म्‍हणून त्‍यांनी आकाशवाणीत अर्ज केला, मात्र, आवाज चांगला नसल्‍याने त्‍यांना ही नोकरी मिळाली नाही. 
* लंडन येथे २०१२ मध्‍ये झालेल्‍या ऑलिम्‍पिकमध्‍ये मशाल धावकाचा मान त्‍यांना मिळाला होता.  
* बिग बींना बॉलिवूड हा शब्‍द आवडत नाही. ते नेहमी हिंदी फिल्‍म इंडस्‍ट्री या शब्‍दाचा वापर करतात. 
* त्‍यांच्‍या मते, वहिदा रहमानच ही हिंदी सिनेसृष्‍टीतील सर्वात सुदंर अभिनेत्री आहे. 
Image result for amitabh bachchan
* लंडनच्‍या मादाम तुसाद संग्रहालयात २००१ मध्‍ये मेणाचा पुतळा उभारण्‍यात आला आहे. 
* रेखा, परवीन बॉबी आणि झीनत अमान या नायिकांनी बिग बींसोबत काम केले आहे. सायरा बानो (हेराफेरी, १९७६), मुमताज (बंधे हाथ, १९७३), नूतन (सौदागर, १९७३), रती अग्‍निहोत्री (कुली, १९८३) यांनी फक्‍त एकाच चित्रपटात अमिताभसमवेत काम केले आहे. 
* 'सत्ते पे सत्ता' या चित्रपटामध्‍ये काम करताना त्‍यांनी लेन्‍सचा वापर केला होता. या लेन्‍स घालताना आणि काढताना त्‍यांना प्रचंड त्रास होत असे. 
* सुमारे १८ चित्रपटांत अमिताभ यांचा मृत्‍यू दाखवण्‍यात आला आहे. 
Image result for amitabh bachchan
* अमिताभ आणि आमीर खान 'ठग्‍ज ऑफ हिंदोस्‍तान'मधून पहिल्‍यांदाच एकत्र दिसले.  
* १९७८ साली एकाच महिन्‍यात अमिताभ यांचे 'त्रिशुल,' 'डॉन,' 'कस्‍मे वादे,' 'बेईमान' चित्रपट रिलीज झाले होते. 

अमिताभ-रेखा यांचा 'तो' लव्‍ह सीन जया यांनी पाहिला आणि...


अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस
सत्तरच्‍या दशकात सिनेमांसोबतच अमिताभ बच्चन आणि रेखा यांच्‍या जवळीकीबद्‍दल खूप चर्चा झाल्‍या. यामुळे अमिताभजींच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यात वादळ आल्‍याचेही सांगितले गेले. अभिनेत्री परवीन बाबीसोबतच्‍या अमिताभजींची मैत्रीची चर्चा अशीच रंगली होती. कालांतराने सगळे काही स्‍थिरसावर झाले तरी आजही रेखा आणि अमिताभ एखाद्‍या कार्यक्रमात एकत्र किंवा समोरासमोर आले तर चर्चा होतात. जया बच्‍चनच्‍या चेहर्‍यावरील भाव टिपले जातात. रेखाही अमिताभ बच्‍चन या विषयावर बोलण्‍याची संधी सोडत नाही. 
अमिताभ बच्चन आणि रेखा यांची जोडी सर्वांत अधिक चर्चिली गेली. दोघांनी यश चोप्रा यांचा रोमँटिक ड्रामा चित्रपट 'सिलसिला' या चित्रपटांत एकत्र काम केले होते. हा त्‍यांचा शेवटचा चित्रपट ठरला. रेखा-अमिताभजींनी 'दो अनजाने'मध्‍ये पहिल्‍यांदा एकत्र काम केलं होतं. अमिताभ बच्चन यांची साथ मिळताच रेखाचं चित्रपट करिअर बहरलं. असं म्‍हटलं जातं की, अमिताभ रेखा यांच्‍यासाठी भाग्‍याचं लॉटरी तिकिट घेऊन आले होते. 
Related image
निर्माते जी. एम. रोशन यांनी 'दुनिया का मेला' या आपल्‍या चित्रपटामध्‍ये रेखा-अमिताभला घेतले होते. तेव्‍हा अमिताभजींचे इतके नाव नसल्‍याने आयत्‍या वेळेला त्‍यांच्‍याऐवजी संजय खान यांना घेण्‍यात आलं. नंतर रेखा याचं नाव संजय खानशी जोडलं गेलं. हळूहळू अमिताभचं नाव होऊ लागलं होतं. त्‍यावेळी दिग्‍दर्शक दुलाल गुहांचा 'दुश्‍मन' (राजेश खन्‍ना-मुमताज)  गाजला होता. ते 'दोस्‍त' व 'प्रतिज्ञा' चित्रपट बनवत होते. त्‍याचवेळी 'दो अंजाने' या त्‍यांच्‍या नव्‍या चित्रपटात नायिकेची भूमिका खलनायकाच्‍या ढंगाच होती. १९२० मध्‍ये पश्‍चिम बंगालमध्‍ये एक घटना घडली. राज्‍याच्‍या राजकुमारास पत्‍नीने विष देऊन मारलं. फॅमिली डॉक्‍टर हा तिचा प्रियकर होता; परंतु, मृत्‍यूनंतर राजकुमार संन्‍याशाच्‍या रुपात येऊन आपला हक्‍क मागतो. लेखक निरंजन गुप्‍ता यांनी या घटनेच्‍या आधारे कथा लिहिली. परंतु, ही भूमिका करण्यास मुमताज आणि शर्मिलाने नकार दिल्‍यावर, ती भूमिका रेखाच्‍या वाट्‍याला आली. या चित्रपटाने रेखाची प्रतिमा बदलली. या चित्रपटाचे गुहा हे दिग्‍दर्शक होते. 'दो अंजाने' सस्‍पेन्‍स होता. रेखा पहिल्‍यांदाच या चित्रपटात सुंदर दिसली. 'सावन भादो'च्‍यावेळी अवघी सोळा वर्षांची असलेली काळीसावळी रेखाचा नंतर सुरवंटाचे फुलपाखरू व्‍हावे, तसा तिच्‍यामध्‍ये कायापालट झाला आणि हिंदी चित्रपटांना एक सौंदर्य आणि सुरेख अभिनय असलेली तारका मिळाली.    
Image result for amitabh bachchan rekha and jaya
रेखा आणि अमिताभ यांची भेट पहिल्‍यांदा 'दो अंजाने'च्‍या सेटवर झाली होती. अमिताभ सुपरस्टार बनले होते आणि जया यांच्‍याशी विवाहदेखील झाला होता. परंतु, रेखा यांना खास अशी ओळख मिळाली नव्‍हती. असं म्‍हटलं जायचं की, अमिताभजी रेखाच्‍या एका मित्राच्‍या बंगल्‍यावर भेटायचे. परंतु, त्‍यांचं प्रेम समोर आलं ते एका प्रसंगामुळे. ज्‍यावेळी 'गंगा की सौगंध' चित्रपटाच्‍या शूटिंगदरम्‍यान एका सहाय्‍यक अभिनेत्‍याने रेखाला अपमानास्‍पद वागणूक दिली होती. त्‍यावेळी अमिताभ संतापले होते. या प्रसंगावरून त्‍यांचं प्रेम उघडकीस आलं होतं. 
रेखाच्‍या आयुष्‍यावरील 'रेखा : द अनटोल्ड स्टोरी' या नव्‍या पुस्‍तकात अमिताभसोबतच्‍या नात्‍याबद्‍दल लिहिण्‍यात आलयं. यासिर उस्मान हे या पुस्‍तकाचे लेखक होत. पुस्‍तकात अनेक खुलासे करण्‍यात आले आहेत. 
Image result for amitabh bachchan rekha and jaya
हिंदी सिनेजगतात अनेक खासगी आयुष्‍यातील प्रेमकथा या मोठ्‍या पडद्‍यावर दाखवल्‍या जातात. असचं काहीतरी अमिताभ-रेखा यांच्‍याबद्‍दल झालं. रेखा-अमिताभ यांच्‍या प्रेमकहाणीशी साधर्म्य असलेली कथा 'सिलसिला'मध्‍ये दाखवल्‍याची चर्चा त्‍यावेळी होती. दोघांनी एकत्र अनेक सुपरहिट चित्रपट दिले. त्‍यात 'सुहाग,' 'मि. नटवरलाल,' 'गंगा की सौगंध,' 'नमक हराम,' 'खून पसीना,' 'राम- बलराम' आणि 'सिलसिला' अशा सिनेमांचा समावेश आहे. प्रसिध्‍द चित्रपट दिग्‍दर्शक प्रकाश मेहरा यांचा चित्रपट 'मुकद्दर का सिकंदर'मध्‍ये रेखा आणि अमिताभ या जोडीने पहिल्‍यांदा यशाची उंची गाठली. नंतर दोघांनीही एकापेक्षा एक चित्रपट देऊन हिंदी चित्रपटसृष्‍टीत आपलं नाव कमावलं. 
... आणि जया यांच्‍या डोळ्‍यांतून अश्रू वाहू लागले
पुस्‍तकात दिलेल्‍या माहितीनुसार, जया यांच्‍यामुळे अमिताभ बच्चन यांनी रेखासोबत कधीही काम न करण्‍याचा निर्णय घेतला होता. त्‍यात रेखाने म्‍हटलयं की, 'एकदा मुकद्दर का सिकंदर चित्रपटाच्‍या ट्रायलवेळी मी प्रोजेक्शन रूममधून संपूर्ण बच्चन फॅमिलीला पाहत होते. जया समोरच्‍या सीटवर बसल्‍या होत्‍या आणि त्‍यांचे आई-वडील मागे बसले होते. या चित्रपटात मी  अमिताभसोबत एक लव्‍ह सीन शूट करत होते. त्‍यावेळी मी जया यांच्‍या डोळ्‍यांतून अश्रु येताना पाहिलं. त्‍यानंतर एका आठवड्‍याने मला इंडस्ट्रीत लोक म्‍हणून लागले की, त्‍याने (अमिताभ) आपल्‍या निर्मात्‍याला सांगितलं आहे की, तो आता माझ्‍यासोबत काम करणार नाही.' 
Image result for neetu singh marriage rekha pic
रेखाच्‍या मंगळसुत्राने खळबळ
अमिताभ आणि रेखा यांच्‍या अफेअरचे वृत्त जया बच्चन यांच्‍यापर्यंत पोहोचले होते. त्‍या चिंतेत राहू लागल्‍या. दरम्‍यान, जया यांना ऋषी कपूर आणि नीतू सिंह यांच्‍या लग्‍नाचं आमंत्रण आलं. ऋषी कपूर अमिताभ यांचे चांगले मित्र आहेत. त्‍यावेळी इंडस्‍ट्रीतील दिग्‍गज व्‍यक्‍ती लग्‍न सोहळ्‍याला उपस्‍थित होते. रेखाने लग्‍नात एन्‍ट्री घेतली आणि लोक पाहतच राहिले. तिने आपल्‍या केसाच्‍या भांगेत 'सिंदूर' लावलं होतं आणि गळ्‍यात चमचमतं मंगळसूत्र घातलं होतं. त्‍यावेळी सगळ्‍यांना वाटलं होतं की, (रेखा आणि अमिताभ यांनी गुपचूप लग्‍न केलं आहे.) त्‍यावेळी रेखा थेट अमिताभ यांच्‍याजवळ गेली आणि त्‍यांच्‍याशी बोलू लागली. असं म्‍हटलं जात होतं की, बोलण्‍याच्‍या नादात अमिताभ जया यांच्‍यावर लक्ष देत नव्‍हते.
Image result for neetu singh marriage rekha pic
…आणि ‘सिलसिला’चा शेवट झाला
अमिताभ आणि रेखा यांच्‍यामधील वाढती जवळीक पाहून जया बच्चन नेहमी चिंतेत असायच्‍या. एकदा त्‍यांनी अमिताभ यांच्‍याकडे नाराजी व्‍यक्‍त केली. रेखासोबत कुठलाही चित्रपट न करण्‍याबद्‍दल जया यांनी अमिताभना सांगितले होते. नंतर अमिताभ आणि रेखा यांचं भेटणं बंद झालं. त्‍यांनी रेखासोबत चित्रपट केले नाहीत. त्‍यांच्‍यातील नातं हळूहळू संपुष्‍टात आलं. शेवटी त्‍यांचा 'सिलसिला' संपला.
Related image
अमिताभ यांच्‍या सहवासात रेखा यांच्‍यामधील सुप्‍तगुणांना अधिकच उजाळा मिळाला, म्‍हणून अमिताभ यांना त्‍या एखाद्‍या अभिनयाच्‍या विद्‍यापीठासारखं मानतात. दोघांनी अनेक चित्रपट केल्‍यामुळे या दोघांमध्‍ये प्रेमसंबंधही आहेत, अशी अफवा पसरली आणि ती अद्‍यापही कायम आहे. 
Related image

म्हणून किशोर कुमारांच्या गाण्यांवर घालण्यात आली होती बंदी!

आणीबाणीच्या काळात किशोर कुमार यांची गाणी प्रसारीत करण्यास प्रतिबंध 




'आंदोलन' ते 'शाब्बास' अशा ७४ चित्रपटांमध्ये भूमिका करणारे नशीली, रसीली आणि फडकती गाणी गाणारे किशोर कुमार यांचा १३ ऑक्टोबरला स्मृतीदिन. किशोर कुमार यांचे भाऊ अशोक कुमार यांचा आज जन्मदिवसही आहे.  

किशोर कुमार यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये अभिनेते म्हणून एन्ट्री घेतली होती. किशोर कुमार यांचा पहिला चित्रपट 'शिकारी' १९४६ मध्ये रिलीज झाला होता. यात किशोर कुमार यांचे मोठे भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते. किशोर कुमार यांना पहिल्यांदा देव आनंद यांचा चित्रपट 'जिद्दी' (१९४८) मध्ये गाण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेश-खंडवा शहरात जन्मलेले किशोर कुमार यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. परंतु, अशी एक वेळ आली की, ज्यावेळी त्यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. 
ज्यावेळी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी किशोर कुमार यांची गाणी बॅन करण्यात आले होते. किशोर कुमार आपल्या नियमांचे काटेकोर पालन करत असत. आणीबाणीच्या वेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, सरकारी योजनांची माहिती किशोर कुमार आपल्या आवाजात गाऊन द्यावी. काँग्रेसने किशोर कुमारशी संपर्क केला. इंदिरा गांधी सरकारमध्ये तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला होते. त्यांनी किशोर कुमार यांना सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधींसाठी गाणे गावे. परंतु, किशोर कुमार यांनी नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांची गाणी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर बॅन करण्यात आली. 
अभिनेतापेक्षा म्हणून प्रसिध्दीपेक्षा गायक म्हणूनच अधिक लोकप्रियता किशोरकुमार यांनी मिळवली. तरीही तेव्हाच्या आघाडींच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी चित्रपटात काम केले होते. यात रेहाना-छम छमा छम, बेबी शकुंतला-फरेब, मीनाकुमारी-नया अंदाज, मधुबाला-चलती का नाम गाडी, वैजयंतीमाला-लडकी, उषाकिरण-धोबी डॉक्टर, नूतन-दिल्ली का ठग, निम्मी-भाईभाई, माला सिन्हा-जालसाज, वहिदा रेहमान-गर्लफ्रेंड, बीना रॉय-मद भरे नैन, साधना-मनमौजी, तनुजा-दो दुनी चार, मुमताज-लडका लडकी यांचा समावेश आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...