https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g737165-d6955918-Reviews-Shree_Mauli_Devi_Temple-Belgaum_Belgaum_District_Karnataka.html
Monday, May 20, 2024
https://www.tripadvisor.in/Attraction_Review-g737165-d6955918-Reviews-Shree_Mauli_Devi_Temple-Belgaum_Belgaum_District_Karnataka.html
Tuesday, May 14, 2024
पत्रकारिता शिकण्याची सुरूवात ग. गो जाधव अभ्यासकेंद्रातूनचं झाली. माझ्या पत्रकारितेला १० वर्षे पूर्ण होऊन गेली आहेत. या आव्हानात्मक मार्गावर ग. गो. जाधव अभ्यासकेंद्राच्या शिकवणीचा, अभ्यासाचा मोठा फायदा आयुष्यात झाला. या अभ्यासकेंद्रातील तज्ज्ञ आणि समजून घेणाऱ्या शिक्षकांच्या हाताखाली नंतर पत्रकार, उपसंपादक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी या संधीचं सोनं करून दाखवलं, असं म्हणायला हरकत नाही.
नालंदा
तर नालंदा' आज जगातील तक्षशिला विद्यापीठानंतर जगातील दुसरे सर्वात प्राचीन म्हणून नालंदा विद्यापीठाची ख्याती होती. प्राचीन भारताचे वैभव इतके संपन्न होते की, आज जगातील महासत्तांकडे असणारे वैभव देखील त्यासमोर फिके पडले असते. उच्च शिक्षण देणार भारतातील हे विद्यापीठास महाविहार असेही म्हणत. महायान बौद्ध धर्माच्या या शैक्षणिक केंद्रात हीनयान बौद्ध धर्म आणि अन्य देशातील अनेक विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत.
भारतातील बिहार राज्यातील पटना येथे नालंदाचे भग्नावशेष आजदेखील अफाट वैभवाची साक्ष देतात. त्याच बरोबर, अनेक पुराभिलेख आणि चीनी प्रवासी हेनसांग, इत्सिंग याच्या प्रवास वर्णनात नालंदा विषयी विस्तृत माहिती आली आहे. हे विद्यापीठ इतके मोठे होते की, इथे दोन हजारांहून अधिक शिक्षक अध्यापन करत होते. प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात येथे जीवनाचा एक महत्त्वपूर्ण टप्पा पार केला. एक वर्ष एक विद्यार्थी म्हणून अभ्यास केला आणि पुढे जाऊन ते याच विद्यापीठात शिक्षक बनले.पाचव्या शतकात कुमारगुप्त प्रथम याने नालंदा विद्यापीठाची निर्मिती केली. नालंदा विद्यापीठ स्थापत्य कलेचा एक अद्भूत नमूना देखील होता. २४० मी. विद्यापीठाची लांबी आहे तर ५१० मी. क्षेत्रात हे विद्यापीठ सुंदर पसरलेले आहे.
नालंदा विद्यापीठाविषयी चीनचे प्रवासी हेनसांग आणि इत्सिंग यांनी विस्तृतपणे लिहिले होते. हे दोघे सातव्या शतकात भारतामध्ये आले होते. दोघे चीनला परतल्यानंतर नालंदा विषयी विस्तृतपणे लिहिले आणि जगातील सर्वात मोठे विद्यापीठ नालंदा असल्याचे सांगितले.
प्रसिद्ध चीनी प्रवासी हेनसांगने सातव्या शतकात नालंदाचा प्रवास केला होता. केवळ भ्रमंती नव्हे तर दीर्घकाळ राहण्यासाठी भाणि अध्ययनासाठी ते भारतात आले होते. यावरून नालंदाची प्रचिती येते की, त्यावेळी नालंदाचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचले होते. नालंदामधून चीनला परतताना त्यांनी ६५७ बौद्ध धर्मग्रंथ घेऊन गेले. या ग्रंथांपैकी चीनी भाषेत अनुवाद देखील केला. हेनसांग यांनी ज्या नालंदाचे जे वर्णन केले आहे, त्यात विशाल स्तूपाचा उल्लेख मिळतो. हे स्तूप भगवान बुद्धांचे प्रमुख शिष्यांपैकी एकाच्या स्मृतीप्रित्यर्थ स्मारक बनवण्यात आले. भव्य संरचना असणारे त्याचे अवशेष आजदेखील अस्तित्वात आहेत. ३० मीटर उंच विशाल स्तूपाच्या चारी बाजूंनी भिंती असून अनेक छोटी मंदिरे आणि स्तूप आहेत. स्तूपापर्यंत जाण्यासाठी पायऱ्या आहेत.
एकेकाळी साहित्य संपदेने समृद्ध अशा विद्यापीठात ३०० खोल्या, ७ मोठे हॉल आणि अभ्यासासाठी ९ मजली एक विशालकार्य ग्रंथालय होते. हे पहिले विद्यापीठ जे ७०० वर्षापर्यंत अस्तित्वात राहिलं होतं. या विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांची निवड मेरिटवर व्हायची म्हणजेच ही पद्धत हजारो वर्षापूर्वी या विद्यापीठात होती. निवासी विद्यापीठात कोणतीही फी न घेता शिक्षण दिले जायचे. सोबतच विद्यार्थ्यांचे राहणे आणि जेवणदेखील निःशुल्क असायचे. म्हणजेच हॉस्टेल ही संकल्पना त्यावेळीही अस्तित्वात होती, असे म्हणायला हरकत नाही. या विद्यापीठात १० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घ्यायचे. केवळ भारतच नाही तर कोरिया, जपान, चीन, लिबेट, इंडोनेशिया, इराण, ग्रीस, मंगोलिया यासारख्या देश-विदेशांतूनही अनेक विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येत असत. ज्यावेळी गुप्त वंशाचे शासनकर्ते सम्राट कुमारगुप्त यांनी नालंदाची स्थापना केली. त्यावेळी सम्राट हर्षवर्धन आणि पाल शासनकर्त्यांचेही संरक्षण विद्यापीठाला मिळाले. ज्यावेळी नालंदामध्ये उत्खनन करण्यात आले, त्यावेळी अशा अनेक मुद्रा मिळाल्या, त्यानंतर या सर्व गोष्टींची पुष्टी झाली की, खरोखरचं नालंदा साहित्य संपदेने समृद्ध होते.
असेही म्हटले जाते की, गौतम बुद्धांनी याठिकाणी अनेकदा भेट दिली होती. नालंदा विद्यापीठात एक 'धर्म गुंज' नावाचे ग्रंथालय होते. हे हे ग्रंथालय ९ मजली होते. त्यात रत्नरंजक, रत्नसागर याणि रत्नोरधि असे तीन भाग होते. विद्यापीठात विद्यार्थ्यांना सायकॉलॉजी, सायन्स, लिटरेचर, एस्ट्रोलॉजी, एस्ट्रोनॉमी, वॉरफेअर, मॅथ्स, लँग्वेज सायन्स, मेडिसीन, इकॉनॉमिक, आर्किटेक्चर, इतिहास असे अनेक विषय जात असत. अनेक महान विद्वान हर्षवर्धन, वसुबंधू, आर्यवेद, नागार्जुन, धर्मकीर्ती, धर्मपाल यांनी नालंदामधून विद्वत्ता मिळवलीय.
या विद्यापीठाची खासियत म्हणजे, येथे लोक तंत्र प्रणाली अस्तित्वात होती. कोणताही महत्वाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने व्हायचा. म्हणजेच शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांनाही आपली मते मांडता येत असत. ज्यावेळी इथे उत्खनन करण्यात आले तेव्हा येथे १.५ लाख फूट क्षेत्रात नालंदाचे अवशेष मिळाले. यावरून प्रचिती येते की, नालंदाचा विस्तार आणि वैभव किती असेल!
गुप्त वंशाच्या काळात उदार, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा विकसित झाल्या आणि नालंदा विद्यापीठात बहुविषयक शैक्षणिक अभासक्रमात उत्तरोत्तर प्रगती झाली. यामध्ये विभिन्न क्षेत्रांतील उच्च शिक्षणासोबत बौद्ध धर्माचे बौद्धिक ज्ञान मिश्रीत करण्यात आले. प्राचीन भारतीय चिकित्सा प्रणाली म्हणजेच आयुर्वेदा विषयी नालंदामध्ये खूप विविध शिक्षण दिले जात असे. नंतर याचा प्रचार विद्यार्थ्यांद्वारे जगभरात झाला.
बिहारचा मुघल शासक इलियारुददीन मुहम्मद बिन बख्तियार खिलजीने द्वेषातून नालंदा विद्यापीठाला आग लावली. असे म्हटले जाते की, खिलजी एक दिवस खूप आजारी पडला. अनेक हकीमकडून औषधोपचार घेऊन देखील तो बरा झाला नाही. मग त्याला कृणीतरी सल्ला दिला की नालंदा विद्यापीठातील आचार्य राहुल जे नालंदा विद्यापीठात आयुर्वेद विभागाचे प्रमुख होते, त्यांच्याकडून औषधोपचार घ्यावे. आचार्यांच्या औषधोपचारानंतर तो बरा झाला. पण झाले उलटचं. कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्याने इतके अफाट ज्ञान या आचार्याकडे कसे, ज्यांच्यापुढे आमचे औषधोपचारदेखील मागे पडले, या द्वेषातून त्याने विद्यापीठाला आग लावल्य़ाचे म्हटले जाते. नालंदावर खिलजीने केलेले हे पहिले आक्रमण नव्हते. पाचव्या शतकात मिहिरकूलच्या नेतृत्वाखाली हुणांनी हल्ला केला होता. त्यानंतर आठव्या शतकात बंगालच्या गौड राजाने आक्रमण केले, त्यावेळीही विद्यापीठाचे खूप नुकसान झाले होते. हुण आक्रमकांनी संपत्ती लुटण्यासाठी आक्रमण केलं होत. पण दोन्ही आक्रमणांनंतर इमारतींची पुनर्निर्मिती करण्यात आली. पुढे गुप्त वंशाच्या शासकांकडून मिळालेल्या मदतीमुळे नालंदमध्ये सुविधा आणि विस्तार करण्यात आला. मात्र, जेव्हा बख्तियार खिलजीने नालंदावर आक्रमण केलं तेव्हा विद्यापीठाला संरक्षण देणाऱ्या बौद्ध पाल राजवंशाचे पतन होत होते. त्यामुळे तिसऱ्या आक्रमणानंतर नालंदाची पुनर्निर्मिती झाली नाही. या विद्यापीठात इतकी साहित्य संपदा होती की, आग लावल्यानंतर कित्येक आठवडे हे विद्यापीठ जळत राहिले.
999999999999999999999999999999
उत्कया, विशालकाय परिसराला ग१० च्या दशकान तुर्क - वफाणि सैन्यातील बस्तियार खिलजीच्या नेतृत्वात ३
आक्रमकांनी विद्यापीठ उद्धवस्त केलं. आजदेखील मठ आणि मंदिरांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. स्थावदन कल्पना येते की, याठिकाणी किती काही शिकायला मिळत असेल- मठांच्या खोल्या आणि मंडप, मंदिरांचे पूजा कक्ष, उंच-उंच भिंती, लाल रंगाच्या विटांचे अवशेष, आयताकृती व्यासपीठ, लेटर बॉक्सदेबील यांचे अवशेष इथे पाहायला मिळतात. म्हणजेच विद्यार्थ्यांसाठी हे लेटर बॉक्स लाकाळी असायचे. आजजीलेटर बॉक्सची परछत आपण पाहतो आष - त्था कॉलेज आणि विदयापिणातून ती पद्धत पूर्वापार काळापासून चालत आलेली आहे. आज मुलाखती घेऊनच विद्यार्थ्यांना अनेक कॉलेज, विद्यापीठणत प्रवटा दिला जातो. पण प्राचीन भारतात खासकरून नालंदा विद्यापीठात इच्चुक मुख्य -रखे येत शिप्एका समोर तोंडी परीक्षा म्हणजेच पेच उत्तरखत दयावी असे. याठिकाणी धर्मपाल आणि शीतभद्र यासा प्रतिष्षित बौद्ध आचार्याच्या नेतृत्वाखाली हजारो शिक्षक आणि विद्यार्थी अध्यापन - अध्यायनि असत.
लागत ग्रंथालयामध्ये लाडपत्रींवर हस्तलिखित ९० ला205 पांडुलिपी, जगातील बौदूध ज्ञानाचे सर्वात समृद्ध वैभव होने. असे मानले जाते की, बौद्ध विद्वान तारानाथ यांनी 'बादलों में उड़ती हुई नऊ मजली इमारत असे वर्णन केले आहे. जेव्हा बख्तियार खिलजीने आग लावली त्यावेळ काही बौद्ध हस्तलिखीत पांडुलिप्त वाचवल्या. ही हस्तलिखिते अमेरिकेच्या लॉस एंजिल्स काउंटी म्युझियम ऑफ आर्ट आणि तिब्बटच्या यारलुंग म्युझियममध्ये पाहिलं
https://www.facebook.com/
जयगड -हेदवी-वेळणेश्वर-गुहाघर-अंजनवे
आंजर्ले-वेळास-हरिहेश्वर-श्री
पद्मदुर्ग-मुरुड-जंजिरा
दापोली
------------------------------
https://www.google.com/maps/
ईमेल: women@chavancentre.org
----
संपर्क- पल्लवी वाघ- ७७९८९५३६३१
ईमेल: women@chavancentre.org
https://docs.google.com/forms/
| Mon, Mar 4, 4:45 PM | ![]() ![]() ![]() | ||
| ||||
https://www.youtube.com/watch?
https://www.youtube.com/watch?
https://www.youtube.com/watch?
सर्वोदय इको होमस्टे - https://www.booking.com/Share-
+91 94200 81501
सावंतवाडी म्हणलं की डोळ्यासमोर येतात रंगीबेरंगी लाकडी खेळणी, गंजिफाचे वेधक रंग, मोती तलाव आणि राजवाड्याचा शांत परिसर.
सावंतवाडी फिरताना या सगळ्या गोष्टींचा आनंद घेतलाच शिवाय मोती तलावापाठी असणाऱ्या हिरव्यागार नरेंद्र डोंगरावरही गेले. डोंगरावर जाऊन मस्त नेचर trail केली. पाऊण तासाची नागमोडी वाट. शिशिर ऋतूचा सोहळा अनुभवायला मिळाला तिथे. सकाळी हलकी हलकी थंडी होती. झाडं आपली पानं गाळून वृक्षकळा दाखवत होती. निसर्गशिल्प स्पष्ट दिसत होती. मचाणीवरून धुक्यात हरवलेली सावंतवाडी बघितली. खूप सुंदर अनुभव होता.
अजून एक सुंदर अनुभव मी तिथे घेतला. मी सावंतवाडीत ज्या होमस्टे मध्ये राहिले होते, त्या होमस्टेचे host natural farming करतात. दुपार त्यांच्या शेतावरच घालवली. संध्याकाळी पळसाचा चहा केला. सूर्यास्त बघत चहा पिला आणि उकडलेली कणगी खाल्ली. मनाला आराम मिळाला तिथे. हा सगळा अनुभव एपिसोड मधून शेअर केला आहे. नक्की बघा.
The music in this video is from Epidemic Sound
https://www.epidemicsound.com/
++
https://www.youtube.com/watch?
https://www.youtube.com/watch?
Tilari Bio-Natural Farms & Homestay - https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
https://www.google.com/maps/
| Fri, Apr 26, 6:29 PM | ![]() ![]() ![]() | ||
| ||||
https://www.makemytrip.com/
https://sangli.nic.in/tourist-
https://www.epfindia.gov.in/
******************************
Body Fit Gym& Fitness Studio
4.8
20 Ratings
Kognole Complex Gangavesh, Kolhapur
7947124387
******************************
Unique Fitness
Address: P67J+3X9, opp. Mahaveer college, Nagalapark, Kolhapur, Maharashtra 416003
Hours:
Open ⋅ Closes 9 pm
Phone: 0231 265 1221
------------------------------
R G Gym Health Club
4.6
94 Ratings
Main Road Rankala, Kolhapur 7947118600
------------------------------
Anu Zumba Fitness
4.8
60 Ratings
Nagala Park, Kolhapur 7947111379
------------------------------
Elpida Functional Fitness Studio
Gyms
Yoga Classes
5.0
26 Ratings
Claimed
Nagala Park, Kolhapur
7947145571
+++
https://www.google.com/search?
-----
पूर्णगड
पन्हाळगड - https://marathit2248544.
महाराष्ट्र दिन विशेष - विशाळगड - https://marathit2248544.
Blue Lagoon Cola Resort
Art Resort Goa
नूतन पशां गायधने - धाड्साने सुरू केले चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप
नूतन प्रशांत गायधने या नव उद्योजिका. मुळच्या अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील राह..ऱ्या ..हेत. सध्या त्या मुंबईमध्ये राहतात. वयाच्या २८ व्या वर्षी आपला संसार, नोकरी सांभाळत त्यांनी चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्ट अप सुरु केले. २ वर्षे या उद्योगात त्या असून नवनवीन प्रयोग करत हा व्यवसाय वाढवणे आणि त्याचा विस्तार करत स्टार्टअप यशस्वी करण्याचे ध्येय त्यांनी बाळगले आहे. कमी शिक्षण सतानाही त्यांनी धाड्साने चहा बिस्किट कप बनवण्याचे नवे स्टार्टअप सुरू केले.
अशी झाली सुरुवातत्या सुरेश इंदू लेझर मॅन्युफॅक्चर या कंपनीत मार्केटिंग विभागात सेल्स एक्झीक्यूटिव्ह काम करतात. नूतन यांनी बारावी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण घेऊ शकल्या नाहीत. बारावी नंतर नोकरी करायचं ठरवलं. संगणकाचे ज्ञान घेत टॅली, एमएससीआयटीचे कोर्सेस पूर्ण केलं. छोटी-मोठी नोकरी करत त्यांनी अनुभवाच्या जोरावर चांगली नोकरी मिळवली. तर त्यांचे पती प्रशांत गायधने ऍमेझॉनमध्ये डिलिवरी बॉय चे काम करायचे. पण पगार परवडत नसल्याने नूतन यांनी पतीला नोकरी सोडायला लावली. कोविड पर्यंत ही नोकरी सुरु होती. पण नंतर करायचं. काय ? असा प्रश्न समोर उभा होता. नूतन यांनी आपल्या संसारासोबतच नवीन स्टार्टअप करायचं ठरवलं. गायधने कुटुंब अंधेरीला शिफ्ट झाले. या परिसरात समुद्र आहे. मग ठरलं की. चहा आणि भेलपुरीचा व्यवसाय सुरू करायचा. त्याप्रमाणे प्रशांत यांनी समुद्रावर चहा आणि पुणेरी ओली भेळ विक्रीचा व्यवसाय केला. मात्र, इतक्यात संसाराचा गाडा चालवणं, फार कठीण होतं.
दरम्यान, कोल्हापुरच्या दिग्विजय गायकवाड यांची जाहिरात टीव्हीला पाहिली. त्यांच्याकडून बिस्किट चहा कप मागवले. त्याचा खप वाढला. म्ह...न चहा बिस्किट बनवारी १२ कपांची चार लाख रुपयांची चायनीज मशीन दिल्लीहून मागवली. चायनीज मशीन सारखी बंद पडायची. संपकर् केला तरी त्या कंपनीचे इंजिनिअर्स प्रतिसाद देन नसत. यामध्ये अपयश मिळाले. पुढे कोल्हापूरचे दिग्विजय गायकवाड यांनी स्वतः तयार केलेली ४९ कपांची चहा बिस्किट कप मशीन नूतन यांनी साडे सात लाख रुपयांना खरेदी केली.
सुरुवातीला या कपांचे मार्केटिंग आणि डिस्टीब्युशन मुंबई - सोलापूर- कोल्हापूरमध्ये स्वतः गाडीवरून फिरून केले. पुढे आर्थिक गणित कोलमडले. पण त्यांनी हार न मानता हे काम पुढे सुरू ठेवायचे ठरवलं. रात्री ऑर्डर आली की पहाटे ३-४ वाजेपर्यंत ऑर्डर तयार करून दिली जाते.
असे तयार होतात चहा बिस्किट कप
आरे कॉलनीत एका इमारतीत १० बाय १५ च्या रुममध्ये ही मशीन बसवली. एकावेळी हे कप बनवण्यासाठी ९ मिनिटांचा कालावधी लागतो. प्रत्येक दिवसाला ३० किलो मटेरियलमध्ये १२००-१५०० कप यार होतात. इलायची, कॉफी, वेनिला, चॉकलेट अशा विविध फ्लेवरमध्ये हे कूप बनवले जातात. चॉकलेटमध्ये कपावर चॉकलेटचे कोटिंग करून दिले जाते. यात मागी...धिक आहे. चहा बिस्कीट कप तयार करताना कोणतेही केमिकल मिसळले जात नाही. हे लिक्विड स्वरुपात पलेवर असतात. कस्टमरची मागणी असेल तर हे चहा बिस्किट कप स्ट्रॉबेरी फ्लेवर, बटरस्कॉच फ्लेवरमध्ये तयार करून दिले जातात.
अडचणींवर अशी केली मात
दिग्विजय यांनी मशीनचे प्रशिक्षण दिले. जेव्हा प्रत्यक्षात गायधने जोडप्याने काम सुरु केलं तेव्हा ते कप व्यवस्थित बनत नसत. कप तयार करायला तुटायचे. त्यामुळे संपूर्ण साहित्य वाया जायचे. पण वारंवार प्रयत्न करून शिकून किती साहित्य लागतं, प्रत्येक साहित्याचे प्रमाण कसे ठेवायचे याचा अभ्यास करून त्यांना अखेर कप बनवण्यात यश मिळाले. १० किलो मटेरिअलमध्ये कप बनवायाला अडीच तास लागतात. च्यासाठी फ्लेवर, बाजरी, नाचणी, मैदा, पाणी, कॉर्नफ्लॉवर, साखर असे कच्चे साहित्य लागते. कोणतेही केमिकल नसल्यामुळे कपची गुणवत्तादेखील उत्तम राहते. तसेच मशीनमध्ये कप बनून जेव्हा बाहेर पडतात, तेव्हा शिल्लक राहिलेले पदार्थ वाया जात नाही. ते गाईला खायला दिलं जातं. त्यामुळे हे मटेरिअल वाया जात नाही.
राज्य आणि देशभरातून मागणी
हे कप फक्त चहासाठी नाही तर केकसाठी, कुल्हड पिझ्झा साठी, आईस्क्रिमसाठी वापरता. त्यामुळे स्थानिक पातळीवर आणि राज्य, देशभरातून या कपांना वाढती मागणी आहे. लुधियाना, झारखंड, बिहार, इंदौर, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान, उत््तर प्रदेश नागपूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, बीड, नाशिक, परभणी या ठिकाणी आॅर्डर पाठवली जाते. शिवाय लोकल मार्केट - अमृततुल्य चहासाठी, कोल्हापूर- श्रीमंत चहासाठी, मुंबईतील बारसाठी, मोठमोठे कॅफेमध्ये छोट्या-मोठ्या हे बिस्किट कपांची मागणी आहे. नूतन हे मार्केटिंग पाहतात आणि प्रोडक्शन प्रशांत गायधने पाहतात.
कस्टमरची पसंती
सध्या बाजारात पेपरकपमधून जो चहा दिला जातो, त्यात प्लास्टिकचे कण दिसतात. ते आरोग्यास हानिकारक आहेत. हे लक्षात आल्यानंतर नूतन यांनी चहा बिस्किट कप बनवले, ज्यामधून चहा घेता येईल शिवाय बिस्किट पण खाता येईल. हे बिस्किट खारी सारखी चवीला वाटते. त्यामुळे जे जे कस्टमर हे कप वापरतात त्यांनी या कपांना खूप पसंती दर्शवलीय. तसेच पोट देखील भरतं. या बिस्किट कपांची क्रेझ देखील सध्या बाजारात मध्ये आहे.
आपला उद्योग सर्वदूर पोहोचवण्यासाठी त्य़ांनी अविरतपणे काम सुरु ठेवले आहे. कस्टरमला जे प्रोडक्ट देणार ते उत्तम असले पाहिजे आणि कस्टमर आपल्या उद्योगाशी कायमचा जोडला गेला पाहिजे, असा प्रयत्न नूतन प्रशांत गायधने यांचा आहे.
Friday, December 1, 2023
Happy B'day Dhanush : साई पल्लवी ते राशी खन्नापर्यंत साऊथच्या अभिनेत्रींना धनुषची का आहे भूरळ?
साऊथ स्टार धनुषचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. (Happy B'day Dhanush) दक्षिणेत तर धनुषला प्रेक्षक चाहत्यांना अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं आहे. केवळ चाहतेच नाही तर त्याच्यासोबत अभिनय करणाऱ्या महिला सहकलाकार अभिनेत्रींनाहीदेखील त्याची भूरळ आहे. मग ती साई पल्लवी असो वा राशी खन्ना. धनुष किती मेहनती अभिनेता आहे, हे अभिनेत्री भरभरून सांगत असतात. तो सेटवर किती उत्साहाने, जोशपूर्ण काम करतो, आपल्या कामाबाबत किती गंभीर आणि दक्ष असतो, अनेक कौतुकाचे गोडवे अभिनेत्री गात असतात. (Happy B'day Dhanush)
असूर असो वा बॉलिवूडपट 'रांझना' मनाला भिडणारे चित्रपट देण्यात धनुषचा हातखंडा आहे. चित्रपटांतील भावस्पर्शी कथानकामुळे धनुषच्या अभिनयाला जोड मिळते. अनेकजण म्हणतात की, धनुष दिसायला खास नाही. म्हणून तो डल दिसणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत बसतो. पण, साऊथच्या प्रेक्षकाला दिसण्याशी काही संबंध नाही. कारण, धनुषकडे सुंदर दात आणि मनमोहक हास्य आहे. या द्वयींवर तो आपल्या व्यक्तीमत्त्वाचा सर्वांवर प्रभाव टाकतो.
एक प्रतिभावान, कष्टाळू अभिनेता जर प्रेक्षकांच्या समोर असेल तर त्यांना कशाचीच परवा नसते की, तो कसा दिसतो? काही चाहते तर म्हणतात की, त्याचे चित्रपट हिट होणार की नाही हे मला माहिती नसते, पण फक्त त्याच्यासाठी मी त्याचे सिनेमे पाहतो. कारण त्याचे कौशल्य आणि भव्य हास्यासमोर सर्व गोष्टी मागे पडतात. सुंदर तो आहे, जो सुंदर काम करतो. आणखी काही चाहते म्हणतात की, त्याचा चेहरा आकर्षक आहे, नाक, डोळे रेखीव आहेत. तो बॉलिवूडच्या नायकांच्या तुलनेत देखणा दिसतो. त्याच्या गडद कायामुळे तो आणखी उठावदार दिसतो.
वास्तवात, अभिनेत्याचे दिसणे तितकं महत्त्वाचे ठरत नाही. कारण, अगदीच सावळे आणि दिसायलाही फार सुंदर नसलेले अभिनेते प्रेक्षकांनी स्वीकारलेले आहेतच की! मुळात त्याच्याकडे अभिनय कौशल्य किती आहे, हे प्रेक्षक पाहतात. मग इतर गोष्टी गौण ठरतात.
धनुषने अन्य अभिनेत्यांप्रमाणे शरीरयष्टी बनवलेली नाही. तो मुळात जसा दिसतो, तसाच पडद्यावरही दिसतो. दक्षिणेत धनुष एक महान रोल मॉडल आहे. तो सुपरस्टार असूनही कोणत्याही महागड्या वस्तू वापरताना दिसत नाही. कपड्यांचेच उदाहरण घ्या. तो नेहमीच कॅज्युअल लूकमध्ये दिसतो.
असं म्हटलं जातं की, तो शाकाहारी आहे. त्याला फुटबॉल खेळणं खूप आवडतं. कमी वयात राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा धनुषच आहे. अभिनेता गायक, आणि चित्रपट निर्माता म्हणून त्याने चित्रपटसृष्टीत आपली छाप सोडलीय. 'व्हाय धीस कोलावेरी डी' या गाण्याला आवाज दिल्यानंतर धनुष प्रकाशझोतात आला होता.
करिअरच्या सुरुवातीला धनुषला पाहून अनेकांनी त्यांची खिल्ली उडवली. सडपातळ, दिसायला गडद आणि त्याच्या चेहऱ्यावर काहींनी हसत टीका केली. पण त्याने काही व्यावसायिक चित्रपट केले. यामध्ये 'सुलान' चित्रपटाचे उदाहरण घेता येईल जे, २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्याला मिळालेल्या यशानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. 'पोलाधवन,' 'पदिकथवन,' 'राऊडी बेबी,' 'अदुकलाम,' 'वाडा चेन्नई,' 'असुरन,' 'थिरूविलेयादल आरंबम,' 'कॅप्टन मिलर,' 'काधाल कोंडेन' चित्रपटांनी त्याला मोठं केलं. राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर त्याची गणना सर्वोत्तम अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. ५८ व्या आणि ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्तम अभिनेता हा पुरस्कार मिळाला. धनुषने आनंद एल. राय दिग्दर्शित 'रांझना' चित्रपटाद्वारे हिंदी सृष्टीमध्ये पदार्पण केले. बॉलिवूडमध्ये त्याला फारसे यश मिळाले नसले तरी दाक्षिणात्य प्रेक्षकांसाठी मात्र तो 'सिनेमाचा सर्वस्वी हिरो'चं आहे.
Thursday, September 28, 2023
HBD महेश कोठारे : इन्स्पेक्टर महेश जाधव आजही मराठी मनात..!
कधी विनोदी भूमिका तर कधी गंभीर भूमिकांनी एकेकाळी मराठी चित्रपटसृष्टीचा पडदा गाजवणारे महेश कोठारे. आज त्यांचा वाढदिवस. त्यांना (२८ सप्टेंबर) वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! महेश कोठारे यांनी अनेकवेळा इन्स्पेक्टरची भूमिका साकारली. बहुतांशी चित्रपटात त्यांची इन्स्पेक्टर महेश जाधव ही व्यक्तीरेखा होती. पण, महेश जाधव हे पात्र कुठून आलं? आणि तो ‘डॅमिट’ हा त्यांचा गाजलेला संवाद आला कुठून? हे पाहूया.
बालपणापासून अभिनय
तुम्हाला माहितीये का? कोठारे यांनी बालकलाकार म्हणूनही काम केलंय. ‘छोटा जवान’ या चित्रपटापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात कली. त्यांची बालकलाकार अशी ओळख असतानादेखील नायक म्हणून चित्रपटात पदार्पण केलं. यामध्ये ते यशस्वीदेखील ठरले.
अभिनयाबरोबरचं दिग्दर्शन
दिग्दर्शनाकडे वळायची महेश यांची पहिल्यापासून इच्छा होती. धुमधडाका हा पहिला दिग्दर्शित चित्रपट होता. हा चित्रपट प्यार किया जा…या हिंदी सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. अशोक सराफ, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांची अफलातून केमिस्ट्री या चित्रपटात दिसली.
नायक आणि खलनायकाची भूमिकाही त्यांनी मोठ्या पडद्यावर गाजवल्या. महेश यांनी बीएससीदेखील केलं आहे. तसेच एलएलबी ही कायद्यातील पदवीदेखील मिळवलीय. काही वर्षे त्यांनी वकिलीदेखील केली.
धुमधडाका रिलीज दरम्यान, त्यांनी प्रॅक्टिस आणि सिनेमा असं दोन्ही सुरू ठेवलं होतं.
धुमधडाका रिलीज झाल्यानंतर त्यांनी प्रॅक्टिस सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय क्षेत्रात उतरायचं ठरवलं.
महेश धुमधडाक्याला लक्ष्या कसा सापडला, याविषयी आठवण सांगतात की, झोपी गेलेला जागा झाला हे नाटक होतं. त्यात बबन प्रभूच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्यासाठी शोध सुरू होता. त्यावेळी त्यांच्या वडिलांनी सुचवंल की नवीन मुलगा आहे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणून. बेर्डे चांगला अभिनय करतो. त्याचा अभिनय बघायला जा. दुसऱ्या दिवशी महेश हे लक्ष्याला बघायला गेले आणि धुमधडाक्यासाठी त्याला थेट कास्ट केलं.
पुढे महेश-लक्ष्याने अनेक चित्रपट केले. त्यांच्यात इतकी मैत्री झाली होती की, महेश-लक्ष्या ही जाेडी पडद्यावर सूपरहिट ठरली.
वकील ते यशस्वी अभिनेता-दिग्दर्शक, खलनायक
मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेबरोबरच खलनायकीचे पात्रदेखील त्यांनी साकारले. त्यांचे घरचा भेदी, लेक चालली सासरला अशी खलनायकी भूमिका असलेले चित्रपट लोकप्रिय ठरले. गुपचुप गुपचुप, थोरली जाऊ अशा चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकाही त्यांनी साकारल्या आहेत.
झपाटलेला चित्रपटाचा असाही किस्सा
ज्या ज्या चित्रपटांमध्ये महेश जाधव हे पात्र साकारलं, त्या -त्या चित्रपटांमध्ये ते कर्तव्यदक्ष भूमिकेत दिसले. चित्रपटात इन्स्पेक्टर महेश जाधव हे नाव असायचं. झपाटलेला हा मोठा प्रयोग होता. या चित्रपटात महेश यांची इन्स्पेक्टर महेश जाधव ही भूमिका होती.
इन्स्पेक्टर महेश जाधव हे पात्र आलं कुठून?
महेश हे क्रिमिनल वकील होते. त्यामुळे त्यांचा पोलिसांशी फार जवळचा संबंध आला. मला पोलिसांविषयी आकर्षण होतं. म्हणून मी स्वत: इन्स्पेटक्टर महेश जाधव झालो, असे महेश सांगतात. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, एकदा ते रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांच्या शोला गेले होते. त्यावेळी त्यांनी विचार केला की, जर हा बाहुला जिवंत झाला, तर लक्ष्या काय करेल. तेव्हा तात्या विंचूचा झपाटलेला केला. अर्थातंच लक्ष्या मुख्य भूमिकेत होता.
ते ‘डॅमिट’ नेमकं आलं कुठून?
महेश यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की, कॉलेजपासून डॅमिट म्हणायची सवय होती. जी एम हार्डलीची पुस्तक वाचली होती. त्यातील कॅरेकटर डॅमिट डॅमिट करायचा. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डॅमिट म्हणत सुटायचो.
धुमधडाका चित्रपटाचा किस्सा
धुमधडाका या नावाऐवजी तुमचा जावई होऊनचं दाखवतो, लेकी पळाल्या सासरला असत्या असे चित्रपटाचे टायटल समोर आले होते. पण, महेश यांना धुमधडाका हेचं नाव योग्य वाटलं. नावाप्रमाणेच या चित्रपटाने मोठ्या पडद्यावर धुमधडाका केला. धुमधडाका चित्रपटामध्ये अशोक, महेश आणि लक्ष्याची अफलातून जोडी जमली.
धुमधडाका चित्रपटामध्ये निवेदिता, सुरेखा आणि प्रेमाकिरण त्याचबरोबर शरद तळवलकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. महेश आणि अशोक यांची घट्ट मैत्री यामध्ये दाखवण्यात आली आहे. अशोक आपला प्रिय मित्र महेशसाठी त्याचा श्रीमंत उद्योजक बाप बनून शरद तळवलकरांच्याकडे जातो.
तेथे महेशची प्रेयसी अर्थातच निवेदिता जोशी आणि अप्रत्यक्षपणे त्याला त्याची प्रेयसी सुरेखा भेटते.
महेशच्या वृध्द बापाची भूमिका अशोक सराफ यांनी साकारली होती. अशोक यांचा ‘वख्या विखी वूखू’ हा डायलॉग प्रचंड गाजला.
धुमधडाका या चित्रपटाची आणखी एक खासियत अशी की, या चित्रपटासाठी लक्ष्याने केवळ १ रुपया मानधन घेतला होता. महेश कोठारे आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शन करत होते.
चित्रपटासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी धुमधडाका चित्रपटातील पात्रासाठी लक्ष्याशी बोलल्यानंतर खिशातून एक रुपया काढून लक्ष्याला दिला. लक्ष्याला भूमिका मिळाली आणि कोठारेंना लक्ष्या मिळाला होता.
खलनायकही विचित्र
महेश यांच्या चित्रपटातील खलनायकही नावाने आणि दिसायलाही विचित्र असायचे. धडाकेबाजमधील कवट्या महाकाळ, तात्या विंचू, माझा छकुलामधील टकलू हैवान, कुबड्या खवीस कसली कसली नावे होती. पण, या नावांनीचं चित्रपटाला दुसऱ्या बाजूने नावलौकीक मिळवून दिला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.
धडाकेबाज, झपाटलेला, थरथराट, माझा छकुला, खरतनाक, दे दणादण, देवता, जबरदस्त, शूभ मंगल यासारखे असंख्य चित्रपट महेश यांनी केले आहेत.
प्रेक्षकांची नाडी ही महेश यांच्या चित्रपटांशी जोडली गेलीय. त्यामुळे आजही हे चित्रपट टीव्हीवर लागले की, ती पाहण्याची संधी चाहते चुकवत नाही.
मराठी माणसाच्या मनात आजही महेश कोठारे नावाने घर केलं आहे.!
https://pudhari.news/soneri/44602/mahesh-kothare-2/ar
https://pudhari.news/soneri/646086/mahesh-kothare-role-inspector-mahesh-jadhav-interesting-story/ar
R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...
Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...
-
बॉलिवूडमध्ये समलैंगिकतेवर आधारीत 'हे' १२ चित्रपट भारतात आधी समलैंगिक संबध हा गुन्हा मानला जात ...
-
बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनचा आज ४३ वा वाढदिवस. सुष्मिताच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्याविषयी जाणून घेऊयात. त्याचबरोबर अशा काही ...
-
चॉकलेट हिरो देव आनंद यांच्या जन्मदिनानिमित्त बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार देव आनंद यांनी आपल्या चित्रपटाच्य...


