'अ ब क' या चित्रपटाची कथा मुलींच्या शिक्षणाभोवती फिरते. ‘सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’सारख्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची आज गरज आहे. मुलामुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे,’ अशी भावना रामकुमार यांनी व्यक्त केली.
चिमुकल्या पावलांनी शिक्षणाची हरवलेली वाट शोधणारा 'अ ब क' चिंतन करायला लावणारा आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या विषयाला अनुसरून शिक्षणावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हा विषय धरून समाजातील जी काही परिस्थिती आहे, त्याचं वास्तव चित्र मांडण्याचा प्रयत्न यात केला गेला आहे.
बड्या कलाकारांची एन्ट्री
सुनील शेट्टी, तमन्ना ही मराठी माणसे आहेत. तमन्नाचा जन्म मुंबईत झाला आहे. त्यामुळे तिला बर्यापैकी मराठी बोलता येतं. शिवाय, तमन्ना आणि सुनील शेट्टीला मराठी सिनेमात काम करायचं होतं आणि 'अ ब क' या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांची ही आकांक्षा पूर्ण झाली. तमन्नाला स्क्रिप्ट दाखवल्यानंतर तिने आपणास हा सिनेमा करण्यास आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली. आणि तिने या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. मराठी सिनेमा असला तरी तमन्नाची या सिनेमात हिंदी भूमिका आहे. तर प्रत्येकाच्या न्यायासाठी, मदतीसाठी धावून येणार्या आप्पा नावाच्या व्यक्तीची भूमिका सुनिलने साकारली आहे. (सुनिल शेट्टीला चित्रपटसृष्टीत प्रेमाने आप्पा म्हणतात ) चित्रपटातील एका गाण्यात भोजपुरी सुपरस्टार रविकिशन आहे. त्याचबरोबर सनी पवार, तन्वी सिन्हा हे दिग्गज कलावंतांच्याही भूमिका आहेत.
रामकुमार शेडगे दिग्दर्शित 'अ ब क' हा चित्रपट आज ८ जून रोजी रिलीज होतोय. मराठी चित्रपटाला ग्लोबल करण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला आहे. मराठी चित्रपटात अभिनेता सुनील शेट्टी, 'बाहुबली' फेम तमन्ना भाटिया आणि इतर बड्या कलाकारांना घेऊन हा चित्रपट रिलीज होत आहे. मराठी सिनेमातही ग्लॅमर आहे, हे या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तमन्ना भाटियाचा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत डेब्यू करत आहे. अ ब क सिनेमा काय आहे? हा चित्रपट कसा साकारला? याबद्दल 'अ ब क' या चित्रपटाचे दिग्दर्शक रामकुमार शेडगे यांच्याशी 'पुढारी ऑनलाईन'ने खास संवाद साधला.
आधी सिनेमाचं नाव ठेवलं होतं...
आधी या सिनेमाचं नाव 'क ख ग' असं ठेवलं होतं. शिक्षणाची सुरूवात 'अ ब क' पासून सुरू होते. म्हणून या सिनेमाचं नाव 'अ ब क' असं फायनल करण्यात आलं. कल्पना चावला, प्रतिभाताई पाटील हे दिग्गज महिला शिकल्या म्हणून त्या मोठ्या ठरल्या. आयुष्यात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. विशेषत: मुलींच्या शिक्षणाचा विषय महत्त्वाचा आहे.

या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी पार्श्वगायन केले आहे. स्त्री वर्गाला प्रेरणा देणारं हे गाणं आहे. हे गाणं अश्विनी शेंडे यांनी लिहिले आहे.
चित्रपटाची कथा दोन चिमुकल्या भावा-बहिणींची आहे. शून्यातून विश्व निर्माण करणारा, चिमुकल्या बहिणीला शाळा शिकवणारा, १० वर्षांचा मुलगा बहिणीच्या शिक्षणासाठी कष्टातून आयुष्य कसा उभा करतो? याचं चित्रण चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
...आणि चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतला
मराठी चित्रपटांचे विषय दर्जेदार असूनही असे चित्रपट मागे पडले आहेत. या गोष्टीचा आज विचार करण्याची गरज आहे. आबा गायकवाड यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. स्क्रिप्ट वाचल्यानंतर मी भारावून गेलो. त्यानंतर हा चित्रपट दिग्दर्शित करण्याचा निर्णय घेतल्याचे रामकुमार म्हणाले.

प्रत्येक पालकाने हा सिनेमा पाहावा
हा सिनेमा प्रत्येक आई-वडिलांनी आपल्या मुलांबरोबर पाहावा. १० वर्षांचा मुलगा हा सहा वर्षांच्या मुलीला असं शिक्षण शिकवतो. आयुष्य कसं उभं करतो, हे चित्रपटातून दाखवण्यात आलं आहे. अ ब क हा सिनेमा समाजातील मुलींच्या शिक्षणातील वास्तव मांडणारे आहे, असे रामकुमार म्हणाले.

चित्रपटाचे वैशिष्ट्य
चित्रपटाचे वैशिष्ट्य पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांचाही आवाज या चित्रपटाला लाभला आहे. चित्रपटातील हिरो नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' ऐकून कसा प्रेरित होतो, हे त्यात दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटाचे वैशिष्ट्य पंतप्रधान म्हणजे नरेंद्र मोदी यांचाही आवाज या चित्रपटाला लाभला आहे. चित्रपटातील हिरो नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' ऐकून कसा प्रेरित होतो, हे त्यात दाखवण्यात आलं आहे.
चित्रपटाचे शूटिंग येथे झाले...
सातार्यामध्ये चित्रपटाचे काही शूटिंग झालं. याशिवाय, पुणे आणि मुंबईतही शूटिंग झालं.
सातार्यामध्ये चित्रपटाचे काही शूटिंग झालं. याशिवाय, पुणे आणि मुंबईतही शूटिंग झालं.
सुनीलला आवडतो कोल्हापुरी 'तांबडा-पांढरा रस्सा'
सुनील शेट्टीला महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. खासकरून कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा आवडतो. त्याचबरोबर मिसळपाव, दिवाळीतील कारंज्या, लाडू हे फराळदेखील आवडतात, असे रामकुमार शेडगे म्हणाले.
सुनील शेट्टीला महाराष्ट्रीयन पदार्थ आवडतात. खासकरून कोल्हापुरचा तांबडा-पांढरा रस्सा आवडतो. त्याचबरोबर मिसळपाव, दिवाळीतील कारंज्या, लाडू हे फराळदेखील आवडतात, असे रामकुमार शेडगे म्हणाले.

No comments:
Post a Comment