'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा यशस्वी अभिनेत्री आहे. चित्रपट इंडस्ट्रीत तिने स्वत:ची एक प्रतिमा निर्माण केली. तिचा आज ३६ वा वाढदिवस. बॉलिवूडबराबेरच हॉलिवूडमध्येही तिने आपला ठसा उमटवला आहे. सुंदर प्रियांकाच्या आयुष्याविषयी थोडक्यात जाणून घेऊयात.


छोट्या गावातली मुलगी
प्रियांकाचा जन्म १८ जुलै, १९८२ ला झारखंडच्या जमशेदपुरमध्ये झाला. प्रियांकाने छोट्या गावातून मायानगरीत झेप घेतली. ती २००० मध्ये तिने मिस वर्ल्ड बनली. मॉडेल म्हणून प्रियांकानेही काम केलं होतं. खूप लोकांना माहिती आहे की, मिस वर्ल्ड होण्यापूर्वी प्रियांकाने एका राजकीय व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये काम केलं होतं. प्रियांकाला सर्वांत आधी एक चित्रपट मिळाला होता तो म्हणजे 'गुड नाईट प्रिंसेज'. हा चित्रपट एटली बरार यांनी दिग्दर्शित केला होता. २००० मध्ये प्रियांकाला हा चित्रपट मिळाला. आणि त्याचवर्षी तिला मिस वर्ल्डने सन्मानित करण्यात आलं. प्रियांकाने मिस वर्ल्ड स्पर्धेत जाण्याकरिता एका महिन्यात शूटिंग पूर्ण केलं होतं. हा चित्रपट प्रियंका गांधी यांच्या जीवनावर आधारित होता. प्रियंका गांधी त्यावेळी २८ वर्षांच्या होत्या. हा चित्रपट हिंदी आणि इंग्लिश दोन्ही भाषेत तयार होत होता. प्रियांका चोप्रासोबत चित्रपटात पूजा बत्रा आणि राहुल देव होते. परंतु, हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही.

१३ वर्षांची असताना प्रियांका तिच्या काकीसोबत अमेरिकेत राहत होती. तेथे तीन वर्षे राहिली. अमेरिकेतील शाळेत तिला वर्णभेदालाही सामोरे जावं लागलं होतं. नंतर ती भारतात परतली. तिने बरेलीच्या आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.

प्रियांकाचा पहिला चित्रपट २००२ मध्ये आलेला तमिळ चित्रपट 'तमिझन' आणि पहिला हिंदी चित्रपट २००३ मध्ये आलेला 'द हीरो : लव स्टोरी ऑफ अ स्पाय' होता. नंतर महिन्याभरातच प्रियांकाचा 'अंदाज' चित्रपट आला. प्रियांकाची अंदाजमधील भूमिका लक्षात राहण्यासारखी होती.

यानंतर तिने अनेक हिट चित्रपट दिले. 'तमिझन' (२००२), 'अंदाज' (२००३), 'द हीरो' (२००३), 'मिस इंडिया : द मिस्ट्री' (२००३), 'प्लॅन' (२००४), 'असंभव' (२००४), 'एतराज' (२००४), 'मुझसे शादी करोगी' (२००४), 'किस्मत' (२००४), 'ब्लफ मास्टर' (२००५), 'बरसात' (२००५), 'यकीन' (२००५), 'वक्त' (२००५), 'आप की खातिर' (२००६), 'डॉन' (२००६), 'क्रिश' (२००६), '३६ चायना टाऊन' (२००६), 'सलाम-ए-इश्क' (२००७), 'किस्मत टॉकीज' (२००७), 'बिग ब्रदर', (२००७), 'कुबार्नी' (२००७), 'लंडन ड्रिम्स' (२००७), 'गॉड तुस्सी ग्रेट हो' (२००८), 'फॅशन' (२००८), 'वॉट्स युअर राशी?' (२००८), 'सात खून माफ' (२०११), 'बर्फी' (२०१२), 'मेरी कोम' (२०१४), 'दिल धडडकने दो' (२०१५), 'बाजीराव मस्तानी' (२०१५) यासारख्या चित्रपटात प्रियांका चोप्राने काम केलं आहे.


हॉलिवूडमध्ये एन्ट्री
बॉलिवूडबरोबरच प्रियांकाने हॉलिवूडमध्येही वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रियांका आगामी ‘इजन्ट इट रोमँटिक’ या हॉलिवूडपटात या चित्रपटात हॉलिवूड स्टार लियाम हेम्सवर्थबरोबर झळकणार आहे. प्रियांकाचा तिसरा हॉलिवूडपट आहे. यापूर्वी तिने ‘बेवॉच’ आणि ‘अ किड लाईक जेक’ या चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. ‘क्वाँटिको’ ही टीव्ही मालिकेसाठी तिने काम केलयं. ती गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर होती. २०१६ मध्ये आलेल्या ‘जय गंगाजल’नंतर तिने हिंदी चित्रपट स्वीकारला नव्हता. आता मात्र ती ‘भारत’, ‘क्रिश-४’ आणि ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटांमध्ये झळकणार आहे. ‘द स्काय इज पिंक’चे शूटिंग ऑगस्टमध्ये सुरू होणार असून, यामध्ये तिच्यासमवेत फरहान अख्तर आणि झायरा वसिम हे कलाकार आहेत.

प्रियांकाचे नाव निक जोनसशी जोडलं गेलं
दरम्यान, प्रियांकाचे नाव अमेरिकन गायक निक जोनसबरोबर जोडलं गेलं होतं. निक प्रियांकासोबत भारतात आला होता. त्यानंतर तिने निकला आपल्या आईशी भेटवले. निक-प्रियांकाने आकाश अंबानी यांच्या एका इव्हेंटलाही हजेरी लावली. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाल्यामुळे त्यांच्या अफेअरची चर्चा चांगलीच रंगली होती.


No comments:
Post a Comment