अभिनेते दादा कोंडके अवलिया व्यक्तीमत्त्व होतं. मराठी सिनेसृष्टीत त्यांनी आपल्या विनोदाने इतरांना हसवण्याचा विडा उचलला. त्यांचा आज स्मृतीदिन. दादा कोंडके यांचा जन्म ८ ऑगस्ट १९२८ रोजी मुंबईत झाला होता. दादा कोंडके यांनी आपल्या अभिनयाने सिनेरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. त्यांच्या जन्माची कथा, मराठी चित्रपटसृष्टीतला त्यांचा प्रवास थोडक्यात जाणून घेऊयात.
नाव ठेवलं कृष्णा
त्यांचा जन्म लालबाग जवळच्या एका चाळीत राहणार्या कुटुंबात झाला. वडिल मिलमध्ये काम करायचे. कृष्णाष्टमी दिवशी जन्म झाल्याने दादा कोंडके यांचं नाव 'कृष्णा' असं ठेवण्यात आलं होतं. दादा कोंडके सारखे आजारी असायचे. त्यामुळे कुणीतरी नाव बदलण्याचा सल्ला दिला. त्यानंतर 'दादासाहेब' असे नाव ठेवण्यात आले.
मोठ्या भावाच्या जन्मानंतर २० वर्षांनी जन्म
दादा कोंडके आणि त्यांचे मोठे भाऊ यांच्यात २० वर्षांचं अंतर होतं. म्हणजे मोठ्या भावाच्या जन्मानंतर त्यांचा २० वर्षांनी जन्म झाला.
दादा कोंडके आणि त्यांचे मोठे भाऊ यांच्यात २० वर्षांचं अंतर होतं. म्हणजे मोठ्या भावाच्या जन्मानंतर त्यांचा २० वर्षांनी जन्म झाला.
नको असतानाही दादांचा झाला जन्म
दादांच्या जन्मापूर्वी चार-पाच अपत्ये होऊन त्याचा मृत्यू झाल्याने दादांच्या आईला मूल नको होते. तरीही दादांचा जन्म झाला.
दादांच्या जन्मापूर्वी चार-पाच अपत्ये होऊन त्याचा मृत्यू झाल्याने दादांच्या आईला मूल नको होते. तरीही दादांचा जन्म झाला.
ज्यावेळी दादा कोंडके यांचं मृत्यू झाल्याचं कळालं...
दादा रुग्णालयात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एका गैरसमजामुळे त्यांच्या वडिलांना कळालं होतं. त्यावेळी त्यांचे वडिल काम करत असलेली मिलचे कामही बंद ठेवण्यात आले होते.
दादा रुग्णालयात असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त एका गैरसमजामुळे त्यांच्या वडिलांना कळालं होतं. त्यावेळी त्यांचे वडिल काम करत असलेली मिलचे कामही बंद ठेवण्यात आले होते.

कॉमेडीकडे वळले
दादा कोंडके हे नाव मराठी चित्रपटसृष्टीमधील नावाजलेलं. 'सोंगाड्या' चित्रपटापासून त्यांचा सुरू झालेला सिनेसृष्टीतील प्रवास हा मराठी चित्रपटसृष्टीला कलाटणी देणारा ठरला, असे म्हणावयास हरकत नाही. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वसंत सबनीस लिखित वगनाट्यापासून त्यांचा सुरू झालेला प्रवास नंतर सिनेसृष्टीकडे वळला. विनोदी भूमिकेसाठी ते ओळखले जाऊ लागले.

सलग ९ रौप्य महोत्सवी मराठी चित्रपटांचा विक्रम
‘सोंगाड्या’ चित्रपट ही दादा कोंडके यांची पहिली निर्मिती. हा चित्रपट त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. दादांनी त्या काळामध्ये एकापेक्षा एक चित्रपट दिले. अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक म्हणून त्यांनी भूमिका पार पाडल्या. सलग नऊ रौप्यमहोत्सवी चित्रपट देऊन त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विक्रम घडवला.

भालजी पेंढारकरांच्या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
१९६९ साली भालजी पेंढारकरांच्या ‘तांबडी माती’ चित्रपटातून दादा कोंडके यांनी सिनेसृष्टीत पाऊल ठेवले.
गाजलेले चित्रपट
सोंगाड्या (१९७१)
आंधळा मारतो डोळा १९७३)
पांडू हवालदार (१९७५)
राम राम गंगाराम (१९७७)
बोट लावीन तिथे गुदगुल्या (१९७८)
१६ चित्रपटांची निर्मिती
दादांनी एकूण १६ चित्रपटांची निर्मिती केली. विशेष म्हणजे सर्व चित्रपट रौप्यमोहोत्सवी ठरले. या विक्रमामुळे त्यांचे नाव गिनीज बुकात नोंदले गेले. त्यांनी हिंदीत सुद्धा ४ चित्रपटांची निर्मिती केली.
दादा कोंडके यांच्या कामाक्षी प्रॉडक्शनने प्रदर्शित केलेले चित्रपट
एकटा जीव सदाशिव (१९७२)
आंधळा मारतो डोळा (१९७३)
पांडू हवालदार (१९७५)
तुमचं आमचं जमलं (१९७६)
राम राम गंगाराम (१९७७)
बोटं लावीन तेथे गुदगुल्या (१९७८)
ह्योच नवरा पाहिजे (१९८०) आली अंगावर (१९८७)
मुका घ्या मुका (१९८८)
पळवा पळवी (१९९०)
येऊ का घरात (१९९२)
सासरचे धोतर (१९९४)
No comments:
Post a Comment