Thursday, August 16, 2018

भगतसिंग यांच्‍यावरील हे सिनेमे माहिती आहेत का?




भारतीय चित्रपटसृष्‍टीत देशक्‍तीवर आधारित अनेक चित्रपट आले. क्रांतिकारकांवर आलेल्‍या चित्रपटांपैकी सर्वांत जास्‍त चित्रपट भगतसिंग यांच्‍या आयुष्‍यावर आधारित होते. अवघ्‍या २३ व्‍या वर्षी देशासाठी आपल्‍या प्राणाची आहुती देणार्‍या भगतसिंग यांच्‍यावर बॉलिवूडमध्‍ये आलेले हे पुढील चित्रपट. 

शहीद भगतसिंग (१९६३)
खूप कमी लोकांना माहिती आहे की, अभिनेते शम्मी कपूर यांनीही भगतसिंग यांची भूमिका केली होती. १९६३ मध्‍ये आलेल्‍या या चित्रपटाचे दिग्‍दर्शन के.एन बन्‍सल यांनी केलं होतं. शम्मी कपूर यांच्‍यासोबत या चित्रपटात प्रेमनाथ, उल्हास आणि अचला सचदेव यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. 
Image result for bhagat singh ajay devgan
शहीद (१९६५)
एस राम शर्मा दिग्‍दर्शित या चित्रपटात मनोज कुमार यांनी सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. याशिवाय, या चित्रपटात कामनी कौशल, प्राण, प्रेम चोप्रा, निरुपा रॉय आणि मदन पुरी देखील होते. या चित्रपटातील गाणी स्वातंत्र्य सेनानी राम प्रसाद बिस्मिल यांनी लिहिले होते. १३ व्या फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार पटकावला होता. या चित्रपटानंतर त्यांनी 'उपकार', 'पूरब और पश्चिम', 'क्रांती' यासारखे चित्रपटही केले. 
Image result for manojkumar in film shahid poster
द लेजेंड ऑफ भगतसिंग (२००२)
२००२ मध्‍ये सरदार भगतसिंग यांच्‍या जीवनावर राजकुमार संतोषी यांनी बनवलेल्‍या चित्रपटात भगतसिंग यांची व्‍यक्‍तिरेखा अभिनेता अजय देवगनने साकारली होती. अजयच्‍या या भूमिकेचे कौतुकही झाले होते. याचशिवाय, चित्रपटातील गाणीही प्रसिध्‍द झाले होते. या चित्रपटात अजयसोबत सुशांत सिंह, अखिलेंद्र मिश्रा, राज बब्बर, फरीदा जलाल यांच्‍या भूमिका होत्‍या. पियूष मिश्रा यांनी चित्रपटाचे डायलॉग्‍ज लिहिले होते. या चित्रपटामध्ये इंग्रजांना लढा देण्यासाठी भगतसिंग यांनी लढलेला थरारक प्रवास याचं चित्रण करण्यात आलं होतं. या चित्रपटाला २ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तसेच चित्रपटाला बेस्ट फिचर फिल्म म्हणून फिल्मफेअर अॅवॉर्डही मिळाला आहे.
Image result for ajay devgan bhagat singh
शहीद-ए-आजम (२००२)
अभिनेता सोनू सूदने या चित्रपटात सरदार भगतसिंग यांची भूमिका केली होती. हा चित्रपटा वादातही सापडला होता. देशाच्‍या अनेक राज्‍यांत हा चित्रपट बॅन करण्‍याची मागणी करण्‍यात आली होती. 
India Tv - Bhagat Singh
२३ मार्च १९३१ शहीद (२००२) 
या चित्रपटाची निर्मिती सनी देओल, बॉबी देओल या दोघांनी केली होती. या चित्रपटामध्ये सनी देओल आणि बॉबी देओल आणि अमृता सिंग यांच्या प्रमुख भूमिका होत्या. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये भगतसिंग यांच्याबरोबर राजगुरु आणि सुखदेव यांच्या देश कार्याचा आढावा देखील घेण्यात आला होता. शहीद भगत सिंग यांची भूमिका बॉबी देओलने तर सनी देओलने चंद्रशेखर आझाद यांची भूमिका साकारली होती. अमृता सिंगने या चित्रपटातून कमबॅक केलं होतं. 
Related image
रंग दे बसंती (२००६)
आजच्या तरुणाईला भगतसिंग यांचं देशप्रेम आणि त्यांचं बलिदान समजावं यासाठी 'रंग दे बसंती' या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती. चित्रपटात अभिनेता आमिर खानची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाचे दिग्‍दर्शन राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी केलं होतं. चित्रपटात आमिर खान सोबत सिद्धार्थ नारायण, अतुल कुलकर्णी, कुणाल कपूर, वाहिदा रहमान, शरमन जोशी आणि आर माधवन यांच्‍याही भूमिका होत्‍या. 
Related image

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...