Thursday, August 16, 2018

नागराज मंजुळेंचा येतोय नवा चित्रपट? (Video)



 
मराठी सिनेसृष्‍टीत यशस्‍वी दिग्दर्शक म्‍हणून नागराज मंजुळे यांना ओळखले जाते. त्‍यांचे 'फँड्री,' 'सैराट' असे एकापेक्षा एक चित्रपट आले. या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसादही दिला. 'सैराट'च्‍या अफाट यशानंतर नागराज यांचा 'झुंड' हा चित्रपट चर्चेत होता. 'सैराट'नंतर त्‍यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, याबाबत नागराज यांच्‍याकडूनही अधिक माहिती मिळाली नव्‍हती. 

नागराज मंजुळे पुढचा चित्रपट कुठला आणणार, याची उत्‍सुकता नेहमीच त्‍यांच्‍या फॅन्‍सना लागून राहिलेली असते. दरम्‍यान, नागराज यांनी सोशल मीडियाच्‍या माध्‍यमातून एक व्‍हिडिओ पोस्‍ट केला आहे. हा व्‍हिडिओ आटपाट प्रोडक्‍शनच्‍या यू-ट्‍यूब चॅनलवरदेखील अपलोड करण्‍यात आला आहे. व्‍हिडिओत 'फँड्री', 'सैराट'चा उल्‍लेख आहे आणि शेवटी 'लवकरच...' असा उल्‍लेख करण्‍यात आला आहे. हा व्‍हिडिओ नागराज यांनी फेसबुक पेजवरही पोस्‍ट केला आहे. व्‍हिडिओने प्रेक्षकांची उत्‍कंठा वाढली आहे. कारण, नागराज या व्‍हिडिओतून नव्‍या चित्रपटाबद्‍दल सांगायचा प्रयत्‍न करताहेत. तसा इशारा त्‍यांनी या व्‍हिडिओच्‍या माध्‍यमातून दिला आहे. त्‍यामुळे नागराज नवं काही तरी घेऊन येणार, हे नक्‍की! 
 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...