Friday, August 24, 2018

...म्‍हणून आई बनू शकल्‍या नाहीत सायरा बानो






बॉलिवूडची  दिग्गज अदाकारा सायरा बानो यांचा आज ७४ वा वाढदिवस. सायरा इंडस्ट्रीतील सुंदर अभिनेत्रींपैकी एक. ६०-७०च्‍या दशकात आपल्‍या अभिनयाने त्‍यांनी प्रेक्षकांवर अधिराज्‍य गाजवलं. सिनेरसिक त्‍यांच्‍या सौंदर्याचे वेडे होते. सायरा बानो यांच्‍या जन्‍मदिनी जाणून घेऊयात त्‍यांच्‍या आयुष्‍यातील खास गोष्‍टी.

२३ ऑगस्ट १९४४ मध्‍ये सायरा बानो यांचा जन्‍म झाला. सायरा हिंदी अभिनेत्री नसीम बानो यांची कन्‍या. सायरा यांचं बालपण लंडनमध्‍ये गेलं. पण, १९६० मध्‍ये त्‍या मुंबईत आल्‍या. त्‍यावेळी त्‍यांची भेट निर्माता-दिग्‍दर्शक शशधर मुखर्जी यांच्‍याशी झाली. येथून त्‍यांच्‍या करिअरला सुरूवात झाली. 
Related image
'जंगली'मधून डेब्‍यू
१९६१ मध्‍ये त्‍यांनी बॉलिवूडमध्‍ये चित्रपट 'जंगली'मधून डेब्यू केलं. त्‍यात शम्मी कपूर यांची मुख्य भूमिका होती. चित्रपटात सायरा एका काश्मीरी तरुणीच्‍या भूमिकेत दिसल्‍या. हा चित्रपट हिट ठरला होता. सायरा या चांगल्‍या अभिनेत्री म्‍हणून ओळख असली तरी त्‍या त्‍यांच्‍या लव्‍हस्‍टोरीमुळे ओळखल्‍या जातात. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा बानो १२ वर्षांच्‍या असताना त्‍यांना सुपरस्टार दिलीप कुमार आवडायचे. एक फॅन ते एक पत्नी होण्‍यापर्यंतचा त्‍यांचा प्रवास इंटरेस्‍टिंग आहे. सायरा बानो यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होते की, '१२ वर्षांची असल्‍यापासून ट्रेजडी किंग दिलीप कुमार मला आवडयचे.' 
Related image
सायरा यांनी पहिल्‍यांदा दिलीप कुमार यांना १९५२ मध्‍ये 'आन' चित्रपटात पाहिलं होतं. तेव्‍हाच त्‍यांना दिलीप कुमार यांच्‍याशी प्रेम झालं. १९६६ मध्‍ये सायरा यांनी अभिनेता दिलीप कुमार यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी सायरा २२ वर्षांच्‍या तर दिलीप कुमार ४४ वर्षांचे होते. लग्‍नानंतर दोघांच्‍याही जीवनात अनेक चढ-उतार आले. दिलीप कुमार यांनी दुसरं लग्‍न देखील केलं. दिलीप कुमार यांनी आसमा नावाच्‍या महिलेशी लग्‍न केलं होतं. सायरा बानो आई होऊ शकत नव्‍हत्‍या, म्‍हणून दिलीप यांनी हे लग्‍न केल्‍याचं म्हटलं जातं. परंतु, हे लग्‍न फार काळ टिकू शकलं नाही. दिलीप पुन्‍हा सायरा यांच्‍याकडे आले. 
Image result for saira banu and dilip kumar
सायरा का आई बनू शकल्‍या नाहीत; दिलीप यांचा खुलासा
अभिनेता दिलीप कुमार यांनी आपल्‍या पुस्‍तकात 'द सब्सटेंस ॲण्‍ड द शॅडो'मध्‍ये सायरा बानो यांच्‍याशी लग्‍न केल्‍याचं म्‍हटलं होतं. १९७२ मध्‍ये सायरा प्रेग्नेंट होत्‍या, हा खुलासाही खुद्‍द दिलीप यांनी केला होता. दिलीप कुमार यांनी पुस्‍तकात म्‍हटलं होतं की, 'प्रेग्नेंसीच्‍या आठव्‍या महिन्‍यात सायरा बानो यांना हाय ब्‍लड प्रेशरचा त्रास होता. त्‍याचदरम्‍यान, आम्‍ही आमचं बाळ गमावलं. नंतर आम्‍हाला कळालं की, मुलगा होता. आम्‍ही त्‍याला वाचवू शकलो नाही. त्‍यानंतर सायरा कधी आई बनू शकल्‍या नाहीत.'
असे असले तरी सायरा आणि दिलीप कुमार यांची जोडी कायम आहे. 
Related image
सायरा यांच्‍यासाठी १९६४ हे साल खुपच खास 
सायरा बानो १९६४ हे वर्ष खूपच खास ठरलं. यावर्षी त्‍यांचे 'दूर की आवाज', 'आओ प्यार करें', 'आई मिलन की बेला' आणि 'एप्रिल फूल' यसारखे चित्रपट आले. हे चित्रपट गाजले. 
Related image

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...