Friday, August 24, 2018

'मोरूची मावशी'ची एक्‍झिट


दीर्घ काळ आजारी असलेले विजय चव्हाण यांचं मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात शुक्रवारी निधन झालं. आपल्‍या विनोदी अभिनयाने पोट धरून हसायला लावणार्‍या या मोरूशी मावशी अर्थातच अभिनेते विजय चव्‍हाण आपल्‍यासोबत या जगात नाहीत. 

आचार्य अत्रे यांनी लिहिलेल्‍या 'मोरुची मावशी' या नाटकातली विजय चव्‍हाण यांची भूमिका प्रचंड गाजली. या नाटकाचे तब्बल दोन हजारहून अधिक प्रयोग झाले होते. या नाटकातील विजय चव्‍हाण यांचं स्‍त्री पात्र रसिकांनी अक्षरश: डोक्‍यावर घेतलं. विजय चव्‍हाण याचा आवाज गाणे गाण्‍यासाठी फारसा चांगला नव्‍हता. परंतु, नाटकात एक गाणे म्‍हणताना विजय यांच्‍या आवाजातील लयबध्‍दता पाहून त्‍यांना गाणे गाण्‍यास सांगितले. यासंदर्भात एका वृत्तवाहिनीशी बोलताना संगीतकार अशोक पत्‍की म्‍हणाले, 'विजय चव्‍हाण यांच्‍या मोरूची मावशीला वन्‍स मोअर मिळत आहे, असा मॅसेज एका व्‍यक्‍तीकडून आला. त्‍यावेळी मला पटलचं नाही. वन्‍स मोअर आणि विजय चव्‍हाण या विचारात मी पडलो होतो.' 
विजय चव्हाण यांनी 'टूर टूर' या नाटकातर्फे व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश केला. त्‍यानंतर 'मोरूची मावशी' या नाटकाने त्‍यांना प्रेक्षकांच्‍या गळ्‍यातलं ताईत बनवलं. 'अशी ही फसवाफसवी,' 'तू तू मी मी' ही त्यांची नाटकंही गाजली. 
विजय यांनी अनेक एकांकिका, नाटकांतून काम केलं होतं. सहाय्‍यक कलाकार म्‍हणूनही तितकाच दर्जेदार अभिनय त्‍यांनी पडद्‍यावर साकारला. जवळपास चारशे चित्रपटांतून वेगवेगळ्‍या भूमिका केल्‍या. एक विनोदी अभिनेता म्‍हणून त्‍यांची ख्‍याती असली तरी संवेदनशील भूमिकाही त्‍यांनी तेवढ्‍या सहजतेने पार पाडल्‍या होत्‍या. 
Image result for vijay chavan
१९८५मध्ये 'वहिनीची माया' या चित्रपटातून त्‍यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. 'वहिनीची माया,' 'घोळात घोळ,' 'माहेरची साडी,' 'एक होता विदूषक,' 'छकुला,' 'झपाटलेला,' थरथराट,' 'शेम टू शेम,' 'चिकट नवरा,' 'सत्वपरीक्षा,' 'चिमणी पाखरं,' 'पछाडलेला,' 'जत्रा,' 'खबरदार,' 'शुभमंगल सावधान,' 'श्रीमंत दामोदर पंत,' 'नाना मामा,' 'झपाटलेला १ आणि २,' 'अगं बाई अरेच्चा,' 'जबरदस्त,' 'सांगतो ऐका,' 'जिगर,' 'नो प्रॉब्लेम,' 'बलिदान,' 'नाथा पुरे आता,' 'चल लवकर,' 'सावट,' 'मुंबईचा डबेवाला' अशा तीनशेहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
अशोक सराफ आणि लक्ष्‍मीकांत बेर्डे, प्रशांत दामले यांच्‍यासोबत विजय चव्‍हाण यांनी काम केलं होतं. अशोक सराफ आणि लक्ष्‍मीकांत बेर्डे यांच्‍या विनोदी भूमिकेबरोबरच विजय चव्‍हाण यांचेही नाव विनोदी सहकलाकार म्‍हणून घेतलं जातं.  
एप्रिल २०१८ मध्ये झालेल्या राज्य चित्रपट सोहळ्यात विजय चव्‍हाण यांचा चित्रपती व्ही. शांताराम जीवनगौरव पुरस्कारानं गौरव करण्यात आला होता.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...