प्रेमळ हास्य आणि अदाकारीने सिनेरसिकांना घायाळ करणारी बॉलिवूड अभिनेत्री जूही चावलाचा १३ नोव्हेंबरला वाढदिवस. 'मिस इंडिया' (१९८४) म्हणून ख्याती मिळवलेल्या जूहीला सुरुवातीपासूनच ग्लॅमर वर्ल्डचं वेड होतं.
*जूही चावलाने पूजनाबमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईला शिफ्ट झाले होते.

*मिस इंडिया (१९८४) चा किताब जिंकल्यानंतर तिने 'मिस युनिव्हर्स' स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत तिला 'बेस्ट नॅशनल कॉस्ट्यूम्स' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. दरम्यान, काही जाहिरातींमध्ये तिला काम करण्याची संधी मिळाली. जूही चावलाने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात १९८६ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'सल्तनत' आणि 'जरीना'मधून केली होती. परंतु, दोन्ही चित्रपट फ्लॉप ठरले.

*जूहीचा हा डेब्यू चित्रपट 'सल्तनत' फ्लॉप झाल्यानंतर तिला हिंदी चित्रपटात काम मिळणे बंद झाले. त्यामुळे तिने दाक्षिणात्य चित्रपटांकडे मोर्चा वळवला. १९८७ मध्ये तिने 'रविचंद्रन' दिग्दर्शित कन्नड चित्रपट 'प्रेमालोक'मध्ये काम केलं. हा चित्रपट हिट ठरला. पुढील वर्षी नासिर हुसैन यांच्या बॅनर खाली रिलीज झालेला चित्रपट 'कयामत से कयामत तक'ने प्रचंड यश मिळवलं आणि जूहीची एक अभिनेत्री म्हणून इंडस्ट्रीत वेगळी ओळख निर्माण झाली. चित्रपटांमध्ये दमदार अभिनयासाठी तिला त्याचवर्षी नवोदित अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

आमिर खान आणि जूही चावला
*आमिर खानची पहिली किसिंग क्वीन जूही चावला होती. तसेच आमिरने 'हम हैं राही प्यार के' आणि 'इश्क' चित्रपटातही जूहीसोबत किसींग सीन दिले आहेत. या सीननंतर चित्रपटात किसींग सीन्सचा ट्रेंड आला.
*१९९२ मध्ये राजेश खन्ना आणि गोविंदासोबत तिने 'स्वर्ग' या चित्रपटात काम केलं.

*'चॉक ॲण्ड डस्टर' चित्रपटातल्या जूही चावलाच्या अभिनयाचे कौतुकही झाले. या चित्रपटात प्रमोशनवेळी मीडियाशी बोलताना जूही चावलाने एक किस्सा शेअर केला होता. तिने म्हटलं होतं, 'आमिर खान वरून साधा माणूस दिसतो. परंतु, तो तसा नाही. एका चित्रपटाच्या शूटिंगवेळी मला घाबरवण्यासाठी तो साप घेऊन माझ्या मागे लागला होता.

*जूही चावलाने आपल्या सिनेकरिअरमध्ये जवळपास ८० चित्रपटामध्ये काम केलं. त्यात पंजाबी चित्रपटांचाही समावेश होता.

'कयामत से कयामत तक', 'बोल राधा बोल', 'प्रतिबन्ध' (१९९०), 'राजू बन गया जेंटलमैन', 'हम हैं राही प्यार के', 'डर' यासारखे एकापेक्षा एक चित्रपट दिले. त्यानंतर जूहीने 'कयामत से कयामत तक'मध्ये काम केलं. हा चित्रपट सुपरहिट ठरला.

*तिने १९९५ मध्ये उद्योगपती जय मेहताशी लग्न केलं. तिला जान्हवी आणि अर्जुन अशी दोन मुले आहेत.

*जूहीने शाहरुख खानसोबत मिळून निर्मिती क्षेत्रात देखील पाऊल ठेवलं. 'फिर भी दिल है हिंदुस्तानी, अशोका आणि चलते चलते' या चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली.

*जूही चावला शाहरुख खानच्या आयपीएल टीमची देखील पार्टनर आहे.

*जूही चावलाने छोट्या पडद्यावर 'झलक दिखला जा'च्या सीजन-३ ला देखील जज केलं होतं.

No comments:
Post a Comment