Tuesday, November 27, 2018

ॲशने नाकारलेले 'हे' ९ चित्रपट झाले सुपरहिट

अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन आज आपला ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. १९९४ मध्‍ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणार्‍या ऐश्वर्याने 'ताल,' 'हम दिल दे चुके सनम,' 'धूम-२,' 'देवदास,' 'रोबोट' 'और 'गुरू' यासारखे दमदार चित्रपट करून इंडस्‍ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. परंतु, तुम्‍हाला माहिती आहे का? ऐश्वर्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट नाकारले होते. 

राजा हिंदुस्तानी
१९९६ मध्‍ये आलेला 'राजा हिंदुस्‍तानी' या चित्रपटात करिश्मा कपूरची भूमिका पहिल्‍यांदा ऐश्वर्या रायला मिळणार होती. ॲशला ऑफर देखील देण्‍यात आली होती. परंतु, तिने नकार दिला. त्‍यामुळे दिग्‍दर्शक धर्मेश दर्शन यांना आमिर खानसोबत करिश्मा कपूरला साईन करावं लागलं होतं. हा चित्रपट सुपरहिट झाला होता. 
Image result for film raja hindustani
कुछ कुछ होता है
१९९८ मध्‍ये 'कुछ कुछ होता है' रिलीज झाला. करण जोहरने टीनाच्‍या भूमिकेसाठी ऐश्वर्याला ऑफर दिली होती. परंतु, ॲशला त्‍यात इंटरेस्‍ट नव्‍हता. नंतर या भूमिकेसाठी राणी मुखर्जीला ऑफर देण्‍यात आली. 
Image result for film kuch kuch hota hai
मुन्नाभाई एमबीबीएस
आपल्‍या करिअरमध्‍ये ऐश्वर्या राज कुमार हिरानीसोबत काम करू शकली नाही. 'मुन्नाभाई एमबीबीएस'साठी ॲशला विचारण्‍यात आले होते. त्‍यावेळी शाहरुख खान 'मुन्नाभाई एमबीबीएस'मध्‍ये मुख्‍य भूमिका साकारणार होता. परंतु, नंतर शाहरुखेने नकार दिला. त्‍यामुळे संजय दत्तला साईन करावं लागलं आणि त्‍याच्‍यासोबत प्रमुख भूमिकेत ग्रेसी सिंहला घेण्‍यात आलं. 
Image result for film munna bhai mbbs sanjay dutt and gracy singh
वीर-जारा
यश चोप्राचा हिट चित्रपट 'वीर जारा'मध्‍ये आधी ऐश्वर्याला घेण्‍यात येणार होतं. परंतु, तिने या चित्रपटात काम करण्‍यास नाकर दिल्‍यानंतर प्रिती जिंटाला ऑफर देण्‍यात आली. या चित्रपटातील अभिनयासाठी प्रीतीचं भरभरून कौतुकही झालं होतं. 
Image result for veer zaara film
भूल भुलैया
मंजोलिकाच्‍या भूमिकेत दिसलेल्‍या विद्या बालनने 'भूल भुलैया' मध्‍ये दमदार अभिनय केला होता. हा चित्रपट आधी ॲशला मिळणार होता. परंतु, तिने स्‍वत:च नकार दिल्‍याने तिच्‍या हातातून हा चित्रपट गेला. 
Image result for bhul bhulaiya film
नमस्ते लंडन
विपुल शाहचा 'नमस्ते लंडन' चित्रपट हिट ठरला होता. त्‍यात कॅटरिना कैफ आणि अक्षय कुमारची प्रमुख भूमिका होती. ऐश्‍वर्याने चित्रपट सोडल्‍यामुळे कॅटला या चित्रपटात काम करण्‍याची संधी मिळाली. 
Related image
दोस्ताना
ऐश्वर्याला 'दोस्ताना' मध्‍येही मुख्‍य भूमिका मिळाली होती. ही भूमिका तिने नाकारल्‍याने प्रियांका चोप्राला घेण्‍यात आले. 'देसी गर्ल' प्रियांका चित्रपटामुळे फेमस झाली. 
Related image
चलते चलते
चित्रपटात राणी मुखर्जीच्‍या आधी ॲशला ऑफर देण्‍यात आली होती. याच चित्रपटाच्‍या सेटवर सलमान खानने गोंधळ घातल्‍यानंतर ॲशने हा चित्रपट सोडला होता.
Related image
क्रिश
ॲशला 'क्रिश'साठी विचारण्‍यात आल्‍यानंतर तिने नकार दिला. तिच्‍या जागी प्रियांका चोप्राला रिप्‍लेस करण्‍यात आले होते. 
Image result for film krrish

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...