मिस वर्ल्डचा मुकुट परिधान करून ऐश्वर्या रायने संपूर्ण जगात भारतीय सुंदरतेचे दर्शन घडवलं. परंतु, १९९४ मध्ये 'फेमिना मिस इंडिया'च्या स्पर्धेत सुष्मिता सेनने दिलेल्या एका उत्तरामुळे ऐश्वर्याला 'मिस इंडिया'चं मुकूट मिळवता आलं नाही. ऐश्वर्या केवळ २ गुणांनी हारली होती.
फेमिना मिस इंडियामध्ये ९.३३ गुणांवर टाय
गोव्यात झालेल्या स्पर्धेत ऐश्वर्या आणि सुष्मिता सेनला एकसारखे गुण मिळाले होते. दोघींच्यात ९.३३ गुणांवर टाय झाला होता. जजेसने टाय ब्रेक करण्यासाठी दोघींना एक-एक प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये ऐश्वर्याला विचारण्यात आलं होतं की, 'जर तुला तुझ्या पतीमध्ये कोणते गुण आहेत, हे शोधायचं असेल तर तू काय करशील? समज, तुला द बोल्ड ॲण्ड ब्यूटीफुलचे रिज फॉरेस्टर आणि सांता बारबराच्या मेसन कॅपवेल यांच्यापैकी कुणाला निवडशील?' ऐश्वर्याने उत्तर दिलं...'मेसन.' ती म्हणाली, 'कारण आमच्या दोघांत अनेक सारख्या गोष्टी आहेत. मेसनचा स्वभाव खूप केअरिंग आहे आणि त्यांचा सेन्स ऑफ ह्यूमर देखील चांगलं आहे.'

सुष्मिताने या प्रश्नाचं उत्तर देऊन जिंकलं मुकुट
सुष्मिता सेनला विचारण्यात आलं होतं की, 'आपल्या देशातील टेक्सटाईल हेरिटेजबद्दल काय जाणतेस? हे किती जुनं आहे आणि तुला घालायला आवडेल?' सुष्मिता म्हणाली, 'मला वाटतं की, हे सर्व महात्मा गांधी यांच्या खादीपासून सुरू झालं होतं. तेव्हापासून याचा दीर्घकाळ प्रवास आहे. परंतु, टेक्साटाईल हेरिटेजच्या मूळ गोष्टी तेथूनच आहेत.'
मिस इंडियाच्या फायनल राउंडमध्ये ऐश्वर्या-सुष्मिता या दोघींच्यामध्ये टक्कर पाहायला मिळाली होती. सुष्मिताला विचारण्यात आलं होतं की, 'जर तू एखाद्या ऐतिहासिक घटनेला बदलू शकली असतीस तर ती कुठली गोष्ट असती?' यावर सुष्मिताने म्हटलं होतं, 'इंदिरा गांधी यांचा मृत्यू'.
या एका उत्तराने सुष्मिताचं भाग्य उजळलं आणि ती 'मिस इंडिया' बनली.
टाय ब्रेकअपनंतर 'मिस इंडिया'चा मुकूट सुष्मिता सेनला परिधान करण्यात आला. (१९९४) ऐश्वर्याला केवळ २ गुणांनी ही स्पर्धा जिंकता आली नव्हती.

स्पर्धेत होस्ट म्हणून हे उपस्थित
स्पर्धेत होस्ट म्हणून दिलीप ताहिल उपस्थित होते. तर माजी मिस इंडिया स्पर्धक नम्रता शिरोडकर, पूजा बत्रा आणि तरविंदर कौर देखील उपस्थित होते.
ऐश्वर्या रायचा जन्म १ नोव्हेंबर १९७३ रोजी मंगळुर, कर्नाटकात झाला. ऐश्वर्याचे वडील कृष्णराज मरीन इंजिनिअर होते. तिच्या आईचे नाव वृंदा राय. त्या लेखिका आहेत. ऐश्वर्याचा एक मोठा भाऊ देखील आहे. त्याचं नाव आदित्य राय असं आहे. ऐश्वर्या रायची मातृभाषा तुलु आहे. शिवाय, तिला कन्नड, हिंदी, मराठी, इंग्रजी आणि तमिळ भाषा देखील येतात. ऐश्वर्या रायचे प्राथमिक शिक्षण (इयत्ता ७वी पर्यंत) हैदराबाद, आंध्र प्रदेशमध्ये झालं. त्यानंतर तिचे कुटुंबीय मुंबईत आले. मुंबईत ॲशने सांताक्रूज येथील आर्य विद्या मंदिर आणि नंतर डी. जी. रुपारेल कॉलेज, माटूंगा येथे शिक्षण घेतलं. शिक्षणासोबत तिने मॉडलिंगकडे देखील लक्ष दिलं.
ऐश्वर्याला मॉडलिंगचा पहिला प्रस्ताव कॅमलिन कंपनीकडून मिळाला होता. त्यावेळी ॲश नववीत शिकत होती. नंतर ती कोक आणि पेप्सीच्या जाहिरातीत दिसली.
No comments:
Post a Comment