अभिनेत्री मल्लिका शेरावतचा आज ४२ वा वाढदिवस. तिचा जन्म २४ ऑक्टोबर १९७६ ला हिसारमधील मोथ येथे झाला.
मल्लिकाने 'जीना सिर्फ मेरे लिए'मधून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवलं. मल्लिकासोबत चित्रपटात करीना आणि तुषार कपूर मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर मल्लिकाने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. तिला ओळख मिळाली ती 'मर्डर' या चित्रपटातून. त्यामध्ये इम्रान हाशमीची प्रमुख भूमिका होती.
मल्लिका सध्या लाईमलाईटपासून दूदर असली तरी सोशल मीडियावर ती नेहमी ॲक्टिव्ह राहते. आपले बोल्ड आणि हॉट फोटोज ती शेअर करत असते.
मल्लिकाने चित्रपटांशिवाय, टीव्ही मालिकामध्येही काम केलं आहे. 'साराभाई vs साराबाई', 'द बॅचलैरेट इंडिया' या मालिकांचा समावेश आहे. 'साराभाई vs साराबाई' मधली तिची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
मल्लिकाने दुसर्या चित्रपटात १७ किसींग सीन दिले होते. अभिनेता इमरान हाशमीसोबत 'मर्डर' चित्रपटात बोल्ड सीन दिल्यानंतर तिने 'डर्टी पॉलिटिक्स' चित्रपटात देखील बोल्ड सीन दिले होते. विशेष म्हणजे तिने ६५ वर्षीय अभिनेते ओमपुरी यांच्यासोबत इंटिमेट सीन्स दिले होते. या चित्रपटात मल्लिकाने 'अनोखी देवी'ची भूमिका साकारली होती.
पारंपरिक जाट फॅमिलीतून असल्यामुळे मल्लिकाला चित्रपटात येण्यासाठी आपल्या फॅमिलीविरोधात जावं लागलं होतं. चित्रपटात येण्यापूर्वी मल्लिकाने अमिताभ बच्चन आणि शाहरूख खान सोबत जाहिरातीत काम केलं होतं. विावाहपूर्वीचे आडनाव शेरावत होते.
खूप कमी लोकांना माहितीये की, मल्लिकाने आयएएस व्हावं, असं तिचे वडिल मुकेश लाम्बा यांना वाटत होतं. एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं होतं की, 'मला मल्लिकाला आयएएस बनवायचं होतं. परंतु, तिला अभिनय क्षेत्रात जायचं होतं. चित्रपटात आली नसती तर ती एअरहोस्टेस झाली असती.'
No comments:
Post a Comment