Tuesday, November 27, 2018

सारा अली खानचं नाही तर 'या' स्‍टारकिड्‍सचीही बॉलिवूडमध्‍ये एन्‍ट्री!


बॉलिवूड स्‍टार्सची मुले देखील आपल्‍या आई-वडिलांच्‍या पावलावर पाऊल ठेवून सिनेइंडस्‍ट्रीत येताना दिसताहेत. श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूर, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्‍टर या स्‍टारकिड्‍सनी इंडस्‍ट्रीत पाऊल ठेवलं आहे. तर जान्‍हवी कपूरची बहिण खुशी कपूर, अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतन, सुनील शेट्‍टीचा मुलगा अहान शेट्‍टी आणि अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्‍या पांडे हे बॉलिवूड इंडस्‍ट्रीत येण्‍यास सज्‍ज झाले आहेत. 

जान्‍हवी कपूर 
अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्‍हवी कपूरचा डेब्‍यू चित्रपट 'धडक' २० जुलै २०१८ रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. परंतु, या चित्रपटाला म्‍हणावे तसे यश मिळाले नाही. या चित्रपटात जान्‍हवीसोबत ईशान खट्‍टरची प्रमुख भूमिका होती. या चित्रपटात नेगेटिव्‍ह भूमिका साकारणारा अभिनेता आशुतोष राणाने जान्‍हवीबद्‍दल प्रतिक्रिया देताना म्‍हटले होते, 'गेल्‍या काही काळापासून जान्‍हवी इंडस्ट्रीत आहे. तिच्‍याजवळ श्रीदेवींसारखा चार्म नाही. आणि तशा प्रकारचा चार्म आणण्‍याचा प्रयत्‍नही तिने केला नाही. मी तिच्‍यासोबत काम करताना एन्‍जॉय केला. ती खूप प्रोफेशनल आहे. आणि लक्ष देऊन कामही करते. तिच्‍या कामावरून वाटतयं की ती बॉर्न ॲक्‍टर आहे.' 
Image result for janhvi kapoor
'धडक'नंतर जान्‍हवीच्‍या झोळीत आणखी एक चित्रपट पडला. तो म्‍हणजे करण जोहरचा 'तख्त'. हा चित्रपट २०२० मध्ये रिलीज होणार आहे. रणवीर सिंग, करीना कपूर खान, जान्हवी कपूर, अनिल कपूर आलिया भट्ट, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्‍या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. खुद्‍द करण जोहरने 'तख्त' चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.
त्‍यानंतर जान्‍हवीला आणखी एक चित्रपट मिळाला. मीडिया रिपोर्टनुसार, आगामी चित्रपटात जान्‍हवी वरुण धवनसोबत रोमान्‍स करताना दिसणार आहे. 'रणभूमी' असे चित्रपटाचे नाव आहे. हा चित्रपट शशांक खैतान बनवत आहेत. वरुण पहिल्‍यांदाच जान्‍हवीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली 'रणभूमी'ची निर्मिती होत आहे. 
सारा अली खान 
सैफ अली खान आणि अमृता सिंह यांची कन्या सारा अली खानचा 'केदारनाथ' हा चित्रपट रखडत का होईना, प्रदर्शनाच्‍या मार्गावर आहे. ‘केदारनाथ’बरोबरच ‘सिम्बा’ देखील प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यापैकी ‘सिम्बा’ हा २८ डिसेंबरमध्ये प्रदर्शित होईल. 
Image result for sara ali khan
कारकिर्दीच्या सुरुवातीलाच ‘हटके’ चित्रपट करण्यासाठी मोठे धाडस साराने दाखवले. पहिलाच चित्रपट ‘केदारनाथ’मुळे पदार्पण लांबणीवर पडलेल्या सारा अली खान अतिशय काळजीपूर्वक चित्रपटाची निवड करत आहे. 'केदारनाथ,' 'सिम्‍बा' असे चित्रपट सुरुवातीलाच मिळाल्‍यानंतर तिला ‘हिंदी मीडियम-२’साठी विचारण्‍यात आले होते. दिनेश विजान आपला हिट चित्रपट ‘हिंदी मीडियम’चा सिक्वेल बनवणार आहे. परंतु, या सिक्‍वेलसाठी साराने नकार दिला होता. 
Image result for sara ali khan kedarnath
ईशान खट्‍टर 
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टर बॉलिवूडमध्‍ये माजिद मजीदी यांच्‍या 'बियॉन्‍ड द क्‍लाऊड्‍स' या चित्रपटातून डेब्यू केला होता. त्‍यात ईशानसोबत मालविका मनमोहन हिने  भूमिका साकारली होती. ए. आर. रहमान यांनी संगीत दिले होते. त्‍यानंतर त्‍याला 'सैराट' या मराठी चित्रपटाचा रिमेक असलेला चित्रपट 'धडक' मिळाला. जान्‍हवी कपूर आणि ईशानची त्‍यात मुख्‍य भूमिका होती. ईशान हा त्‍याच्‍या डान्‍समुळे ओळखला जातो. कारण, ईशानचे डान्‍सचे अनेक व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल झाले आहेत. 
मीडिया रिपोर्टनुसार, ईशानला आणखी एक चित्रपट मिळाला होता. परंतु, त्‍याच्‍या एक्‍स गर्लफ्रेंडमुळे त्‍याला हा चित्रपट गमवावा लागला. टायगर श्रॉफसोबत 'स्टुडंट ऑफ द ईअर-२' ईशान मुख्‍य भूमिकेत दिसणार होता. परंतु, अभिनेत्री तारा सुतारियामुळे त्‍याला हा चित्रपट मिळू शकला नाही. आधी तारा आणि ईशान एकमेकांना डेट करत होते. त्‍यामुळे हे एक्स लव्‍हबर्ड्स चित्रपटात यायला नको, असे करण जोहरला वाटले होते. त्‍यामुळेच ईशानला हा चित्रपट मिळाला नाही.  
प्रनूतन
सलमान खान बॉलिवूडमध्‍ये अनेकांचा गॉडफादर आहे. सलमान लेजेंडरी अभिनेत्री नूतन यांची नात आणि मोहनीश बहल यांची मुलगी प्रनूतचा गॉडफादर बनला आहे. सलमान प्रनूतनला बॉलिवूडमध्‍ये लॉन्च करणार आहे. प्रनूतन बहल आपल्‍या डेब्यू चित्रपटात न्यूकमर जहीर इकबालसोबत दिसणार आहे. चित्रपटाला सलमान खान फिल्मस, मुराद खेतानी, अश्विन वर्देच्‍या बॅनर खाली प्रोड्यूस केलं जाणार आहे. हा चित्रपट नितीन कक्कड डायरेक्ट करणार आहे.  
अहान शेट्‍टी 
अभिनेता सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टी पुढच्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दिग्दर्शक साजिद नाडियादवाला अहानला लॉन्‍च करणार आहेत. या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘RX 100’ या तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपटाच्या रिमेकमध्ये अहान मुख्य भूमिका साकारणार आहे. साजिद यांनी या चित्रपटाचे अधिकार विकत घेतले आहेत. २०१९च्या मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे साजिद यांनीच सुनील शेट्टीला बॉलिवूडमध्ये लॉन्‍च केले होते. ‘वक्त हमारा है’ या चित्रपटातून सुनील शेट्टीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.
Related image
अनन्‍या पांडे 
'स्टुडंट ऑफ द ईअर-२'मध्‍ये टायगर आणि तारासोबत अभिनेते चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे दिसणार आहे. अनन्‍या या चित्रपटातून डेब्यू करत आहे. हा चित्रपट पुनीत मल्होत्रा दिग्‍दर्शित करत असून करण जोहरच्‍या धर्मा प्रोड्क्शन बॅनरखाली तयार केला जात आहे. अनन्‍या स्‍टारर 'स्‍टुडंट ऑफ द ईअर-२' हा चित्रपट करण जोहरचा २०१२ मध्‍ये आलेला 'स्टुडंट ऑफ द ईअर'चा सीक्वेल आहे. 
अनन्या ही शाहरूखची कन्या सुहाना आणि संजय कपूरच्या कन्येची खास मैत्रीण आहे. या तिघींचे फोटो नेहमीच सोशल मीडियात झळकत असतात. त्यावेळेपासूनच अनन्या चित्रपटसृष्टीत हिरोईन होण्यासारखीच आहे, असे म्हटले जात होते. जुन्या जमान्यातील अभिनेत्री नलिनी जयवंत यांची आठवण करून देणारा तिचा चेहरा आहे. फराह खानने तर ‘चंकीची कन्या आणि इतकी सुंदर?’ असे गंमतीने म्हटले होते!  
Image result for chunky pandey daughter ananya pandey
स्टारकिड्सचं बॉलिवूडमध्ये पदार्पण ही गोष्ट आता काही नवीन राहिलेली नाही. गेल्या वर्षभरात बऱ्याच स्टारकिड्सनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. तर शाहरूख खानची मुलगी सुहाना खान, आर्यन खान, आहाना पांडे यांसारखे स्टारकिड्स येत्या एक-दोन वर्षात मोठ्‍या पडद्‍यावर झळकतील, असे म्‍हटले जात आहे. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...