Tuesday, November 27, 2018

ॲश ७५ लाखांची साडी नेसून येताच अभिषेक म्‍हणाला...

सुंदर बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन पुन्‍हा एकदा अभिषेक बच्चनसोबत मोठ्‍या पडद्‍यावर दिसणार आहे. हे दोन्‍ही स्‍टार आगामी चित्रपट 'गुलाब जामुन'मध्‍ये दिसणार आहे. १ नोव्‍हेंबरला ऐश्वर्या राय-बच्चन आपला ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. त्‍या औचित्‍याने ऐश्वर्याच्‍या आयुष्‍यातील काही खास गोष्‍टींबद्‍दल जाणून घेऊयात.

Related image
Image result for aishwarya and abhishek
Image result for aishwarya and abhishek
ऐश्वर्या-अभिषेकचं लग्‍न बॉलिवूडकरांसाठी आश्‍चर्यचकित करणारं होतं. कारण, लग्नात सर्वांत अधिक चर्चा झाली ती, ऐश्वर्या रायच्‍या महागड्‍या लेहंगा आणि साडीची. 
Related image
लग्‍नात ऐश्वर्याच्‍या साडीने सर्वांचं लक्ष आपल्‍याकडे वेधून घेतलं होतं. ॲशच्‍या लग्‍नात नीता लूलाने तिचा लेहंगा डिझाईन केला होता. ॲशने ७५ लाखांची साडी नेसली होती. अॅशचं लग्‍न आणि तिची साडी दीर्घकाळ 'टॉक ऑफ द टाउन' बनला होता. 
Image result for aishwarya and abhishek
Image result for aishwarya and abhishek
चित्रपट जगतात अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्‍या लग्‍नाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. एक वर्षे डेट केल्‍यानंतर दोघांनी २० एप्रिल, २००७ ला लग्‍न केलं होतं. त्‍यावेळी ऐश्वर्या ३३ वर्षे आणि अभिषेक ३१ वर्षांचा होता. वयावरून अभिषेक आणि ॲशची जोरदार चर्चा देखील झाली. अनेक प्रश्‍न देखील उपस्‍थित करण्‍यात आले होते. 
Image result for aishwarya and abhishek
Related image
ॲश आणि अभिषेकच्‍या लग्‍नात आणखी एक आकर्षण ठरले ते बिग बी अमिताभ बच्‍चन. ॲशला सून म्‍हणून करून आणण्‍यासाठी अमिताभ बच्चन एक्सायटेड होते.
Related image 
ऐश्वर्याने लग्‍नात गोल्डन कलरची कांजीवरम साडी नेसली होती. ती या साडीत खूपचं सुंदर दिसत होती. लग्‍नाला उपस्‍थित असणार्‍यांचा नजरा ॲशवर खिळल्‍या होत्‍या. ऐश्वर्याच्‍या लग्‍नाची साडी तब्‍बल ७५ लाख रुपये होती. इतकी महागडी साडी नेसून ॲश ज्‍यावेळी समोर आली, त्‍यावेळी तिच्‍या सुंदरतेकडे आणि लुककडे अभिषेक पाहत राहिला होता. 
Related image

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...