Tuesday, November 27, 2018

अशी सुरू झाली अॅश-अभिषेकची लव्‍ह स्‍टोरी

अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायचे लग्‍न २००७ मध्‍ये झाले होते. अभिषेक आणि ऐश्वर्या रायची लव्‍ह स्टोरी खूपच खास आहे. ॲश आणि अभिषेक यांची लव्‍ह स्‍टोरी कशी आणि कधी सुरू झाली, हे पाहुयात. 

Related image
अनेक चित्रपटात एकत्र काम
अभिषेक-ऐश्वर्याने एकत्र अनेक चित्रपटात काम केले आहे. दोघांनी सुरुवात 'ढाई अक्क्षर प्रेम के' आणि 'कुछ ना कहो' में काम केलं होतं. त्‍यावेळी दोघांची केवळ मैत्री होती. याआधीही अभिषेक-ॲश 'प्यार हो गया' (१९९७) चित्रपटाच्‍या सेटवर भेटले होते. या चित्रपटात अभिषेक बॉबी देओलसोबत काम करत होता. त्‍यादरम्‍यान, ॲश सलमानसोबत तर अभिषेक करिश्मा कपूरशी एंगेज्‍ड होता. अभिषेक बच्चनचं लग्‍न अभिनेत्री करिश्मा कपूरशी होणार होतं. दोघांचा साखरपुडा देखील झाला होता. ऐश्वर्या राय पहिल्‍यांदा सलमान खान आणि नंतर विवेक ओबरायसोबत रिलेशनशीपमध्‍ये होती. 
Image result for ash and abhishek hd pics
ॲशला अभिषेकने असं प्रपोज केलं
त्‍यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्या दोघांनी  'बंटी और बबली' चित्रपटातील गाणं 'कजरा रे'मध्‍ये एकत्र काम केलं. चित्रपटातील हे गाणं सुपरहिट झालं. त्‍यानंतर दोघांच्‍या अफेअरच्‍या चर्चा जोर धरू लागल्‍या. दोघांनी मणि रतनम यांच्‍या 'गुरु' चित्रपटाचे शूटिंग सुरू केलं. आणि चित्रपटाच्‍या प्रीमियरनंतर टोरांटोमध्‍ये अभिषेकने ऐश्वर्याला लग्‍नासाठी प्रपोज केलं. ऐश्वर्या रायने अभिषेक बच्चनचे प्रपोजल स्वीकारलं. 
Image result for ash and abhishek hd pics
एका मुलाखतीत अभिषेकने म्‍हटलं होतं, 'मी एकदा न्यू-यॉर्कमध्‍ये एका चित्रपटाचे शूटिंग करत होतो. त्‍यावेळी मी एका हॉटेलमधील रूमच्‍या बाल्‍कनीत उभा राहून विचार करत होतो. की जर मी ॲशशी लग्‍न केलं तर किती छान होईल. काही वर्षांनंतर गुरुच्‍या प्रीमियरनंतर आम्‍ही त्‍याच हॉटेलमध्‍ये गेलो आणि त्‍याच बाल्‍कनीत मी ॲशला लग्‍नासाठी प्रपोज केलं.' 
Image result for ash and abhishek hd pics
प्रपोज केल्‍यानंतर ॲश-अभिषेक मुंबईत परतले. १४ जानेवारी, २००७ मध्‍ये दोघांनी साखरपुडा केला. त्‍यानंतर ते एकत्र मूव्‍हीज पाहायला आणि नाईट क्लब जाऊ लागले. एका मुलाखतीत ॲशनेही म्‍हटलं होतं, 'अभिषेकने तिला गुरु चित्रपटाच्‍या सेटमध्‍ये असलेली नकली अंगठीसोबत प्रपोज केलं. ते मला खूपच रिअल वाटलं होतं.' 
Related image
लग्‍नात होती अडचण
लग्‍नाच्‍या आधी ॲश-अभिषेक यांच्‍या आयुष्‍यात चढ-उतार आले. पहिली अडचण म्‍हणजे, ॲशच्‍या कुंडलीमध्‍ये दोष होता. दोष दूर करण्‍यासाठी ॲशला एका झाडाशी लग्‍न करायचं होतं.  दुसरी अडचण अशी की, 'धूम-२' चित्रपटातील ॲश आणि ऋतिक रोशनचे किसिंग सीन. सूत्रांच्‍या माहितीनुसार, ॲशचे हे बोल्‍ड सीन देणे बच्चन कुटुंबीयांना आवडले नव्‍हते. 
Related image
बहुप्रतिक्षित लग्‍न
अभिषेक-ऐश्वर्याने २० एप्रिल २००७ मध्‍ये लग्‍न केलं. दोघांच्‍या लग्‍नाची चर्चा संपूर्ण मीडियात झाली होती. दोघांनी लग्‍नाच्‍या कपड्‍यांपासून लग्‍नात येणार्‍या पाहुण्‍यांच्‍या यादीपर्यंत ही चर्चा होती. परंतु, अभिषेक बच्चनच्‍या आजी तब्‍येत बिघडल्‍याने हे लग्‍न खासगी ठेवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. 
एका मुलाखतीत ॲशने म्‍हटलं होतं की, अभिषेक माझ्‍यासाठी एक प्रेरणा स्रोत आहे. तो खूप सपोर्टिव आहे. ज्‍यावेळी मी गोंधळाच्‍या परिस्‍थितीत असते. तेव्‍हाअभिषेक माझी समस्‍या पटकन मिटवतो. 
Image result for ash and abhishek hd pics
मुलीचा जन्‍म
१६ नोव्‍हेंबर २०११ ला ॲशने मुलीला जन्‍म दिला. तिचं नाव आराध्‍या असं ठेवण्‍यात आलं. आराध्‍याच्‍या जन्‍मानंतर ॲशने चित्रपटात काम केलं नाही. आराध्‍या चार वर्षांची झाल्‍यानंतर 'जज्‍बा' चित्रपटातून ॲशने कमबॅक केलं. 
Image result for ash and abhishek hd pics with aradhya

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...