बॉलिवूड अभिनेते विनोद मेहरा यांचा जन्म १३ फेब्रुवारी १९४५ रोजी पंजाब अमृतसरमध्ये झाला होता. विनोद मेहरा चित्रपटांपेक्षा आपल्या अफेअर्स आणि लग्नामुळे चर्चेत राहिले होते. विनोद मेहरा यांनी १९५० च्या दशकात चाईल्ड आर्टिस्ट करिअरची सुरूवात केली होती. त्यांनी 'गुरुदेव' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शनही केले होते. हा चित्रपट विनोद यांच्या निधनानंतर ३ वर्षांनी रिलीज झाला होता.
विनोद मेहरा हे सदाबहार अभिनेत्री रेखा यांच्यासोबत असलेल्या अफेअरमुळे चर्चेत राहिले होते. इतकेच नाही तर रेखा यांनी विनोद मेहरा यांच्याशी लग्न केल्याचे वृत्त देखील पसरले होते. परंतु, रेखा यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट खोटी असल्याचे म्हटले होते. विनोद मेहरा माझे शुभचिंतक होते, असे रेखा यांनी म्हटले होते.

चित्रपटांची सफर
विनोद मेहरा यांनी जवळपास १०० चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांनी १९५८ मध्ये 'रागिनी' चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. १९७१ मध्ये त्यांनी 'एक थी रीटा' या चित्रपटातून अभिनेता म्हणून काम केले. 'जानी दुश्मन', 'नागिन', 'घर', 'स्वर्ग नरक', 'कर्तव्य', 'साजन बिना सुहागन', 'एक ही रास्ता' आणि 'खुद्दार' यासारखे त्यांचे गाजलेले चित्रपट होय. 'अनुरोध', 'अमर दीप' आणि 'बेमिसाल'मध्ये देखील त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते.

रेखा यांच्यासोबत जोडलं गेलं नाव
'पर्दे के पिछे' या चित्रपटामुळे दिसायला देखणा असणारे विनोद मेहरा प्रकाशात आले होता. पाली हिलला ते 'निभाना' अपार्टमेंटमध्ये राहायचे. त्यावेळी 'रामपूर का लक्ष्मण'मुळे रेखा प्रसिध्दीच्या झोतात होत्या. विनोदबरोबर रेखा यांना 'ऐलान' चित्रपटात काम करायची संधी मिळाली. हा चित्रपटही चालला. त्यामुळे विनोद मेहरा आणि रेखा यांच्या रोमान्सचे किस्से पसरू लागले. असेही वृत्त आले होते की, रेखा आणि विनोद मेहरा यांनी गुपचुप लग्न केले होते. परंतु, एका टीव्ही शोमध्ये रेखा यांनी या वृत्ताला नकार देत विनोद आपले चांगले मित्र असल्याचे म्हटले होते. रेखा आणि विनोद यांच्यामध्ये दूरी निर्माण होण्यामागे विनोद यांची आई हे एक कारण होते. विनोद यांच्या आईला रेखा आवडायची नाही.

दुसरीकडे रेखा यांनी धर्मेंद्रसमवेत 'किमत' चित्रपट केला. त्यामध्ये त्यांनी बोल्ड दृश्ये दिली होती. ही गोष्ट विनोद यांना खटकायची.

तीन विवाहामुळे चर्चेत
विनोद मेहरा यांचे पहिले लग्न मीना ब्रॉकासोबत झाले होते. हे अरेंज्ड मॅरेज होते. नंतर त्यांनी अभिनेत्री बिंदिया गोस्वामीशी लग्न केले. त्यांचे हे नाते फार काळ टिकले नाही. बिंदिया गोस्वामी विनोद यांच्याशी वेगळी झाली आणि जे. पी. दत्ताशी लग्न केले. त्यानंतर विनोद मेहरा आणि रेखा यांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. १९८८ मध्ये विनोद यांनी किरणशी लग्न केले. १९९० मध्ये विनोद मेहरा यांचे निधन झाले. त्यांना एक मुलगा रोहन आणि मुलगी सोनिया ही मुले आहेत.
विनोद मेहरा आणि राजेश खन्ना
विनोद मेहरा १९६५ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑल इंडिया टॅलेंट कॉन्टेस्टचे फायनलिस्ट बनले होते. या स्पर्धेचे आयोजन युनायटेड प्रोड्युसर्स आणि फिल्मफेअरने केलं होतं. विशेष म्हणजे, राजेश खन्ना टॉपला पोहोचले. आणि विनाद मेहरा यांना रनर अप बनून समाधान मानावे लागले.

No comments:
Post a Comment