Tuesday, November 27, 2018

श्रीदेवी यांच्‍या आयुष्‍यात असे आले बोनी कपूर

बोनी कपूर यांना नेहमीच चित्रपट निर्माते बनण्‍याची इच्‍छा होती. बोनी यांनी काही बिग बजेट चित्रपट आणले. ते ब्लॉकबस्टरही झालेत. 'मिस्टर इंडिया' चित्रपट आणण्‍याची त्‍यांची मोठी योजना होती आणि त्‍यानुसार त्‍यांनी हा चित्रपट मोठ्‍या पडद्‍यावर आणला. याआधी त्‍यांनी काही चित्रपट बनवले होते. आज बोनी कपूर यांचा वाढदिवस. या औचित्‍याने त्‍यांच्‍या दिवंगत पत्‍नी, अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांच्‍या आयुष्‍याविषयी जाणून घेऊयात. 
dinsta
'मिस्टर इंडिया'साठी अभिनेत्रीचा शोध सुरू असताना त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री म्‍हणून श्रीदेवी यांचं नाव होतं. बोनी कपूर यांना या चित्रपटात श्रीदेवी यांनाच साईन करायचं होतं. 
dinsta
श्रीदेवी यांना या चित्रपटात आणणं इतकं सोप्‍पं नव्‍हतं. श्रीदेवी आधी विचार करूनच एखादा चित्रपट साईन करायच्‍या. बोनी चेन्नईमध्‍ये श्रीदेवी यांना साईन करण्‍यासाठी त्‍यांच्‍या घरी पोहोचले. त्‍यांना श्रीदेवी यांच्‍याकडून वेळ मिळाला नाही. बोनी यांनी खुद्‍द निवेदन दिल्‍यानंतर ७ दिवसांनी बोनी यांना वेळ दिला गेला. 
dinsta
बोनी यांना वाटलं की, टाळाटाळ केली जात आहे. त्‍यांनी चेन्नईमध्‍ये थांबण्‍याचा निर्णय घेतला. ते रोज श्रीदेवी यांच्‍या घरी जाऊन यायचे. एक दिवस, बोनी श्रीदेवी यांना भेटलेच आणि आपल्‍या चित्रपटात काम करावे, अशी विनंती केली. अखेर त्‍यांच्‍या विनंतीला मान देऊन श्रीदेवी चित्रपटात काम करायला तयार झाल्‍या. नंतर 'मिस्टर इंडिया' चित्रपट आला आणि चित्रपटाने ऐतिहासिक यश मिळवलं. 
dinsta
त्‍यानंतर बोनी यांनी आपला आणखी एक महत्वाकांक्षी चित्रपट 'रूप की रानी चोरों का राजा' श्रीदेवी यांना मुख्‍य भूमिकेत घेऊन बनवला. जो अयशस्‍वी ठरला. श्रीदेवी सहजतेने कुणावर विश्‍वास करायच्‍या नाहीत. परंतु, बोनी यांच्‍यावर श्रीदेवी यांचा विश्वास बसला. 
dinsta
बोनी हे त्‍यांचा भाऊ अनिल कपूर आणि श्रीदेवी स्‍टारर 'जुदाई' चित्रपट बनवत होते. त्‍याचदरम्‍यान, श्रीदेवी यांची आई राजेश्वरी यांची तब्‍येत बिघडली. त्‍यांना उपचाराकरिता अमेरिकेला घेऊन गेले. त्‍यावेळी श्रीदेवी या बोनी कपूर यांना सोबत घेऊन गेल्‍या. श्रीदेवी यांच्‍या आईच्‍या उपचारावेळी बोनी कपूर यांनी त्‍यांना पाठिंबा दिला. परंतु, श्रीदेवी यांच्‍या आईचे निधन झाले. बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्‍या आईवर चुकीच्‍या पध्‍दतीने उपचार झाल्‍याचा आरोप करत कोर्टात खटला दाखल केला आणि संघर्ष करून मोबदला वसूल केला. 
dinsta
श्रीदेवी यांनी पाहिलं की, बोनी नि:स्वार्थ भावनेने हे सर्व करत होते. बोनी विवाहित आहेत, हे माहिती असताना देखील श्रीदेवी यांना बोनी यांच्‍याशी प्रेम झालं. त्‍यानंतर बोनी यांनी श्रीदेवी यांच्‍याशी विवाह केला. त्‍यावेळी बोनी यांना आपल्‍या कुटुंबीयांकडून नाराजीचा समाना देखील करावा लागला. 
बोनी कपूर यांचं जीवन विस्‍कळीत बनलं होतं. त्‍यांच्‍यावर कर्जाचा डोंगर होता. त्‍यांचं स्‍वत:च्‍या आरोग्‍याकडं लक्ष नव्‍हतं. बोनी यांच्‍या आयुष्‍यात श्रीदेवी यांची एन्‍ट्री झाल्‍यानंतर त्‍यांना आयुष्‍य कसं जगायचं, हे शिकवलं. श्रीदेवी, बोनी, जान्‍हवी आणि खुशी यांचं एक छोटं कुटूंब शांतीने राहू लागलं. जान्‍हवीचा पहिला चित्रपट 'धडक' रिलीज होण्‍याच्‍या मार्गावर असताना श्रीदेवी यांनी जगाचा निरोप घेतला. 
dinsta

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...