ॲक्शनचा गुरू रोहित शेट्टी
'ॲक्शन मास्टर' अशी ओळख असलेल्या रोहित शेट्टीचा १४ मार्चला वाढदिवस. रोहित शेट्टी आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. रोहितने आपल्या जीवनात अनेक चढ-उतार पाहिले आहेत. त्यानंतर तो इंडस्ट्रीत यशस्वी झाला आहे. रोहितने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या 'सिंबा'ने धमाकेदार कमाई केली होती. या चित्रपटात रणवीर सिंह मुख्य भूमिकेत होता. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स तोडले. या चित्रपटांशिवाय, 'चेन्नई एक्सप्रेस,' 'गोलमाल,' 'गोलमाल' सीरीज यासारखे ब्लॉकबस्टर हिट चित्रपट रोहितने बॉलिवूडला दिले आहेत. रोहितने आपल्या करिअरची सुरुवात सन २००३ मध्ये 'जमीन' या चित्रपटापासून केली. त्याचा हा दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट होता. परंतु, हा चित्रपट सटकून आपटला.
रोहित शेट्टी अनेक रिॲलिटी शोचा जज होता. यामध्ये 'कॉमेडी सर्कस' आणि 'खतरों के खिलाडी'चा समावेश आहे. रोहित शेट्टीचा जन्म १४ मार्च, १९७३ ला मुंबईमध्ये झाला. रोहित शेट्टीचे वडील एम. बी. शेट्टी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये ॲक्शन कोरिओग्राफर, स्टंटमॅन आणि अभिनेते होते. तर आई मधु चित्रपटांमध्ये ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून काम करत होत्या. रोहित शेट्टी यांचे दोन भाऊ - उदय शेट्टी आणि ह्रदय शेट्टी आहेत. त्यांना चार बहिणी आहेत. रोहितने आपले शिक्षण मुंबईच्या सेंट मेरी स्कूलमधून पूर्ण केले.
रोहित शेट्टीने १४ वर्षांचे असताना ठरवले होते की, त्याला दिग्दर्शक बनायचे आहे. रोहितने अनेक सुपर-डुपर चित्रपट आणले. ॲक्शनचा गुरू रोहित शेट्टी यांनी आपल्या सुरुवातीच्या करिअरमध्ये खूप संघर्ष केला. सतरा वर्षांचा असताना रोहितने दिग्दर्शक कुकु कोहलीसोबत अजय देवगनच्या 'फूल और कांटे'मध्ये काम केले. या चित्रपटात त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. याचवेळी अजय आणि रोहितची चांगली मैत्री झाली. पुढे दोघांनी एकत्र जवळपास १० चित्रपटांमध्ये काम केले.
सूत्रांच्या माहितीनुसार, १९९५ मध्ये रोहितने तब्बूच्या 'हकीकत' चित्रपटातील एका सीनसाठी तिची साडी इस्त्री केली होती. रोहित शेट्टी अभिनेत्री काजोलची स्पॉटबॉयदेखील होता.
रोहित शेट्टीने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत असे सुपरहिट चित्रपट दिले आहेत, ज्यांनी १०० कोटींचा गल्ला जमवला आहे. यामध्ये शाहरुख खानचा 'चेन्नई एक्सप्रेस,' 'गोलमाल ३' आणि 'सिंबा' या चित्रपटांचा समावेश आहे.
आता रोहित अक्षय कुमारसोबत 'सूर्यवंशी' हा चित्रपट आणणार आहे.
रोहित शेट्टीची पत्नी लाईमलाईटपासून दूर
२००५ मध्ये माया नावाच्या एका तरुणीशी रोहितने विवाह केला. माया एक बँकर आहे. ती नेहमीच लाईमलाईटपासून दूर राहते. माया आणि रोहित यांचा एक मुलगा ईशान आहे.
No comments:
Post a Comment