#HappyBirthdayAamirKhan
मुंबई : पुढारी ऑनलाईन
'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खानचा आज ५३ वा वाढदिवस. आमिर खानचा जन्म १४ मार्च १९६५ रोजी मुंबईत झाला होता. आमिरचं पूर्ण नाव मोहम्मद आमिर हुसैन खान असं आहे. आमिर हरहुन्नरी अभिनेता असून आपल्या अभिनयाने त्याने बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्याविषयी जाणून घेऊया.
या चित्रपटांचा जगभरात डंका
अलिकडच्या काळात आमिर खानच्या काही चित्रपटांनी जगभर डंका वाजवला आहे. 'पीके', 'दंगल' आणि 'सीक्रेट सुपरस्टार' यासारख्या एकापेक्षा एक सरस चित्रपटांनी वर्ल्ड बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 'दंगल'- १,९०८, कोटी रुपये, 'सीक्रेट सुपरस्टार' - ८७४ कोटी रुपये आणि 'पीके' - ८३१ कोटी रु. कमाई केली आहे.

ट्विटरवर २२ मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स
आमिरला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणूनही ओळखले जाते. 'कयामत से कयामत तक' या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात करणार्या आमिरचे ट्विटरवर २२ मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.
आमिरला किस करण्यास जूहीने दिला होता नकार
आमिर खान आणि जूही चावला यांचा १९८८ मध्ये आलेला चित्रपट 'कयामत से कयामत तक' हा आमिरच्या करिअरमधील पहिला चित्रपट. या चित्रपटानंतर आमिर रातोरात स्टार बनला. आमिरचा हा पहिला सुपरहिट चित्रपट होता. ८०च्या दशकात कयामत से कयामत तकच्या शूटवेळी जूहीने आमिरला किस करण्यास नकार दिला होता. परंतु, स्क्रिप्टच्या मागणीमुळे जूहीला हा सीन करावा लागला. प्रेक्षकांच्याही पसंतीस हा सीन उतरला. त्यामुळे आमिर-जूहीची जोडी प्रेक्षकांना आवडली. त्यानंतर आमिर-जूहीने अनेक चित्रपट केले. 'कयामत से कयामत' हा आमिर खानचा दुसरा आणि जूही चावलाचा तिसरा चित्रपट होता.

कयामत से कयामत तक मध्ये जूहीने दिलेला किसींग सीन शूट करणे तिच्यासाठी खूपच कठीण होते. परंतु, स्क्रिप्टच्या मागणीनुसार, चित्रपटातील गाणे 'अकेले हैं तो क्या गम है'च्या शूटिंगवेळी जूही चावलाला आमिरला गाल आणि कपाळावर किस घ्यायचा होता. परंतु, जूहीने हा सीन करण्यासाठी नकार दिला होता.

जूहीच्या नकारानंतर चित्रपटाचे डायरेक्टर मन्सूर खान यांनी शूटिंग जवळपास १० मिनिटे थांबवले. थोड्या वेळानंतर जूहीला लक्षात आले की, ही स्क्रिप्टची डिमांड आहे. त्यावेळी जूहीने आमिरला किस करण्याच्या शूटसाठी होकार दिला. नंतर पुन्हा शूटिंग सुरू झाले. ही एक रोमँटिक चित्रपट होता. या चित्रपटातील गाणीही लोकप्रिय ठरले. चित्रपट रिलीज झाल्यानंतर आमिर आणि जूहीची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. या चित्रपटामध्ये जूही आणि आमिरचे रोमँटिक सीन्स होते.

या चित्रपटातील आणखी एक किस्सा सांगितला जातो की, ऐंशीच्या दशकात प्रचार करण्यासाठी मोजकेच माध्यम असत. त्यामुळे 'कयामत से कयामत तक'च्या रिलीजसाठी चित्रपटातील कलाकार आमिर खान आणि जूही चावलाने खुद्द आपल्या चित्रपटाचे पोस्टर रिक्षा चालकांना वाटले होते. आणि हे पोस्टर्स रिक्षाच्या मागे लावण्याची विनंती केली होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट यशस्वी ठरला.
No comments:
Post a Comment