कंगना राणावतचा २३ मार्चला वाढदिवस. आपल्या टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये सर्वात यशस्वी अभिनेत्रींच्या यादीमध्ये कंगनाचे नाव समाविष्ट झाले आहे. इतकेच नाही तर एका चित्रपटासाठी सर्वात अधिक मानधन घेणार्या अभिनेत्रींमध्ये कंगनाचे नाव जोडले गेले आहे. पण, अशी एक वेळ होती की, कंगना चित्रपटाच्या शोधात पोर्न इंडस्ट्रीपर्यंत पोहोचली होती. कंगना बॉलिवूडची क्वीन अशीच नाही बनलेली नाही. १७ वर्षांची असताना तिने आपले करिअर सुरू केले. कंगनाने आतापर्यंत एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका साकारल्या आहेत.
एका टीव्ही शोला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने म्हटले की, कशाप्रकारे ती हिंदी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये सेटल झाली. इंडस्ट्रीत येण्यापूर्वी ती तिने एक अडल्ट चित्रपट साईन केला होता. कंगनाने सांगितले की, 'मला चित्रपटासाठी फोटोशूट करायचा होता. परंतु, ज्यावेळी मी तेथे पोहोचले, त्यावेळी मला काही ठीक वाटलं नाही.'
कंगना त्यावेळी कुमारवयीन होती, ज्यावेळी तिला ही भूमिका ऑफर झाली होती. कंगना म्हणते की, 'मला माहित होते की, हे चुकीचे आहे. परंतु, मी ठरवले की, ठीक आहे. हे मी करेन. परंतु, नंतर तो फोटोशूट मला अश्लील चित्रपटासारखा वाटत होता. आणि मला वाटले की, हे योग्य नाही. तो चित्रपट खरंच चांगला नव्हता. अनुराग बसुने जर गँगस्टर चित्रपटात संधी दिली नसती तर कदाचित आज मी वेगळीकडे असते. गँगस्टरसाठी मी अनेकदा ऑडिशन्स दिले. अनेक महिने प्रतीक्षा केली. परंतु, हा चित्रपट मला मिळाल्यानंतर माझ्या करिअरला एक नवी दिशा मिळाली आणि मी या गोष्टींपासून दूर गेले. हा चित्रपट मिळाल्यानंतर मी अभिनयासाठी प्रचंड मेहनत घेतली. आणि एकापेक्षा एक आव्हानात्मक भूमिका स्वीकारल्या.'
कंगनाला २०१६ मध्ये तिचा चित्रपट 'तनु वेड्स मनु'साठी तिसरा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. याआधी चित्रपट 'क्वीन'साठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि 'फॅशन' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. ‘गँगस्टर’ ते ‘सिमरन’पर्यंतचा तिचा प्रवास संघर्षमय राहिला आहे. अनेक अडचणींना सामोरे जात कंगना बॉलिवूडची क्वीन बनली.

No comments:
Post a Comment