Thursday, April 4, 2019

जेव्‍हा शशी कपूर यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले...



मुंबई : पुढारी ऑनलाईन 
बॉलिवूड अभिनेते शशी कपूर यांचा१८ मार्चला जन्‍मदिवस. १८ मार्च, १९३८ मध्‍ये जन्मलेले शशी, कपूर फॅमिलीतील असे पहिले व्‍यक्‍ती होते, ज्‍यांनी परदेशी तरुणीशी विवाह केला होता. शशी यांनी १९५८ मध्‍ये जेनिफर केंडलशी विवाह केला. त्‍यावेळी शशी २० वर्षांचे तर जेनिफर २५ वर्षांच्‍या होत्‍या. परंतु, शशी यांच्‍या जीवनात असे एक वळण आले की, त्‍यांना आर्थिक समस्‍येलाही सामोरे जावे लागले होते. परंतु, या अडचणीतही त्‍यांची पत्‍नी जेनिफरने शशी यांना साथ दिली. ६० च्‍या दशकात शशी कपूर यांचे चित्रपट हिट ठरत होते. परंतु, अचानक त्‍यांना काम मिळणे बंद झाले. या कारणामुळे शशी यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले. या गोष्‍टीचा खुलासा शशी यांचा मुलगा कुणाल कपूरने  एका मुलाखतीत केला होता. 

कुणालने म्‍हटले होते, वडील शशी कपूर यांनी ६० च्‍या दशकात काम मिळणे बंद झाले होते. त्‍यावेळी शशी यांनी आपली आवडती स्पोर्ट्स कार विकली होती. तसेच जेनिफर यांनाही पैशांकरिता घरातील साहित्‍य विकावे लागले होते. त्‍यावेळी टॉपची अभिनेत्रीही शशी यांच्‍यासोबत काम करण्‍यास नकार द्‍यायची. पुढे अभिनेत्री नंदाने शशी यांच्‍यासोबत 'फूल खिले' हा चित्रपट केला. सा चित्रपट सुपरहिट ठरला. 
शशी यांना विकावी लागली संपत्ती 
अबिनयासोबतच शशी कपूर यांनी चित्रपटांची निर्मितीही केली. अमिताभ बच्चन यांचा चित्रपट 'अजूबा'(१९९१)चे दिग्‍दर्शन आणि निर्मिती दोन्‍ही शशी यांनी केले होते. त्‍या काळात या चित्रपटाचे बजेट ८ कोटी होते. हा सर्वात महागडा चित्रपट होता. परंतु, अजूबा सुपरफ्लॉप ठरला आणि शशी यांना ३.५० कोटींचे नुकसान झाले. या नुकसानीमुळे त्‍यांची आर्थिक स्‍थिती ढासळली. अखेर, शशी यांना आपली संपत्ती विकून नुकसान भरपाई करावी लागली. आणखी एक चित्रपट 'उत्सव'मध्‍ये त्‍यांना जवळपास १.५ कोटींचे नुकसान झाले होते. 
७५ रुपयांचा पहिला पगार 
शशी कपूर यांनी १९४४ मध्‍ये थिएटर जॉईन केले. त्‍यांचा पहिला पगार ७५ रुपये होता. शशी यांनी हिंदीच नाही तर हॉलिवूड चित्रपटांतही काम केले होते. 'हीट ॲण्‍ड डस्ट' हा त्‍यांचा पहिला हॉलिवूड चित्रपट. कान्स चित्रपट महोत्‍सवात हा चित्रपट नॉमिनेट झाला होता. १९६३ ते १९९८ पर्यंत शशी कपूर यांनी जवळपास १० हून अधिक हॉलिवूड चित्रपटात काम केले. शशी कपूर यांनी इस्माइल मर्चेंट आणि जेम्स आयवरी यांच्‍यासोबत मिळून 'द हाउसहोल्डर', 'शेक्सपीयर वाला', 'बॉम्बे टाकी' यासारख्‍या चित्रपटात का मकेले. काही चित्रपटामध्‍ये त्‍यांच्‍यासोबत जेनिफरदेखील दिसल्‍या. 
पृथ्‍वी थिएटर
पृथ्‍वी थिएटरमध्‍ये प्रत्‍येक नाटकाचा शो पाहण्‍यासाठी शशी कपूर जेनिफर सोबत या थिएटरमध्‍ये जात होते. नेहमी तिकिट खरेदी करून शो पाहत होते. शशी यांनी 'फिल्मवालाज'ची स्थापना केली. त्‍यांनी 'जुनून', '३६ चौरंगी लेन', 'कलयुग', 'विजेता', 'उत्सव' आणि 'अजूबा' यांसारखे चित्रपट आणले. श्यान बेनेगल, अपर्णा सेन, गोविंद निहलानी यासारख्‍या चित्रपट निर्मात्‍यांना संधीही शशी यांनी दिली. यामागे जेनिफर यांचेही योगदान होते. परंतु, जेनिफर यांना कॅन्‍सर (१९८२) झाला. 
शशी यांनी मुंबई, लंडन येथील डॉक्टरांकडून जेनिफर यांच्‍यावर उपचार केला. ७ सप्‍टेंबर, १९८४ ला जेनिफर यांचे निधन झाले. शशी कपूर एकटे पडले. 'शशि कपूर- द हाउसहोल्डर, द स्टार'मध्‍ये असीम छाब्रा यांनी जेनिफर यांच्‍यानंतर शशी कपूर यांच्‍या जीवनावर एक चॅप्टर लिहिला. यामध्‍ये शशी यांचा मुलगा कुणाल कपूरच्‍या हवाल्‍याने सांगण्‍यात आले होते की, जेनिफर यांच्‍या मृत्‍यूनंतर पहिल्‍यांदा शशी तेव्‍हा रडले होते, जेव्‍हा ते गोव्‍याच्‍या समुद्री किनार्‍यावरून एक बोट घेऊन समुद्रात गेले होते. 
(Photo : shashikapoor.fc, tfk_dil_se_filmi, filmhistorypics insta)

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...