Thursday, April 4, 2019

चित्रपटसृष्‍टीला मिळालेला 'अनुपम' कलावंत

रेल्‍वे स्‍टेशनवर झोपत होता 'हा' अभिनेता 











बॉलिवूड इंडस्‍ट्रीतील प्रसिध्‍द अभिनेते अनुपम खेर यांचा ७ मार्चला वाढदिवस. त्‍यांचा जन्‍म ७ मार्च १९५५ रोजी शिमला येथे झाला. अभिनेता बनण्‍याचे स्‍वप्‍न घेऊन ते मुंबईत आले. पण, त्‍यांना अभिनेता बनण्‍यासाठी इंडस्‍ट्रीमध्‍ये प्रचंड स्‍ट्रगल करावे लागले. स्‍ट्रगलिंग डेजमध्‍ये अनुपम खेर हे मुंबई रेल्‍वे स्‍टेशनवर झोपत होते. 
Image result for anupam kher old

रंगभूमी आणि हिंदी चित्रपटातील एक विविधरंगी कलाकार म्‍हणून अभिनेते अनुपम खेर यांची ओळख. चित्रपटात काम करणार्‍या अनुपम यांना रंगभूमीचाही प्रदीर्घ अनुभव आहे. अभिनयाचे विविध पैलू जोपासणार्‍या या कलाकाराला पाच वेळा सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी अभिनयाचा फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. रंगभूमी ते बॉलिवूड असा त्‍यांचा प्रवास कसा झाला, जाणून घेऊयात. 

अनुपम खेर यांचे वडिल पुष्‍कर नाथ हे क्‍लार्क होते. अनुपम यांनी शिमलाच्‍या डी. ए.व्‍ही स्‍कूलमधून शिक्षण पूर्ण केले. तसेच दिल्लीच्‍या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे शिक्षण घेतले. अनुपम यांना अभिनेता व्‍हायचे होते. पण, ते त्‍यांच्‍या वडिलांना ते मान्‍य नव्‍हते. 
Image result for anupam kher old
करिअरची सुरूवात
अनुपम खेर यांनी १९७१ मध्‍ये 'टायगर सिक्‍स्‍टीन' आणि १९८२ मध्‍ये 'आगमन' या चित्रपटातून त्‍यांनी करिअरची सुरूवात केली. पण, त्‍यांचे भाग्‍य उजळले ते १९८४ मध्‍ये आलेला चित्रपट 'सारांश'ने. बॉलिवूडमध्‍ये अनुपम यांची प्रतिभा हेरली ती महेश भट्‍ट यांनी. सारांश या चित्रपटात अनुपम यांनी २९ व्‍या वयात एका रिटायर्ड वृध्‍दाची भूमिका केली होती. यानंतर त्‍यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्‍यांनी बहुतांशी चित्रपटात सहाय्‍यक अभिनेता म्‍हणून काम केलं. तरीदेखील, त्‍यांची बॉलिवूडमध्‍ये एक खास अशी ओळख निर्माण झाली. 
Image result for anupam kher old
पुढे त्‍यांनी सुभाष घई यांच्‍या 'कर्मा'मध्‍ये काम केले. या चित्रपटात त्‍यांनी डॉ. डँगची भूमिका साकारली होती. तर 'डॅडी' चित्रपटातील तलत अझीझ यांच्‍या 'आईना मुझसे मेरी पहलीसी नजर मांगे' ही आर्त गझल पडद्‍यावर गातानाही ते दिसले. पुढे महेश भट्‍ट यांच्‍यासोबत पुन्‍हा काम करण्‍याची संधी मिळाली. 
विजया मेहता यांच्‍या 'रावसाहेब'मध्‍ये विक्रम गोखलेंच्‍या विरोधातील भूमिका साकारली. तर तारुण्‍यात असताना 'संसार'मध्‍ये एव्‍हरग्रीन रेखा यांच्‍या सासर्‍याची भूमिका साकारली. 'जानू' नावाच्‍या एका चित्रपटात त्‍यांच्‍याच वयाच्या खूशबू या अभिनेत्रीच्‍या वडिलांची भूमिका साकारली होती. 'अर्जुन' चित्रपटात सभ्‍यतेचा बुरखा पांघरणारा राजकीय गुंडाची भूमिका साकारली.  
Related image
दिग्‍दर्शक आणि निर्माताही
अनुपम यांनी केवळ अभिनयच नव्‍हे तर दिग्‍दर्शक आणि निर्माताही आहेत. चित्रपट 'ओम जय जगदीश' त्‍यांनी दिग्‍दर्शित केलेला पहिला चित्रपट आहे. तर 'मैंने गांधी को नहीं मारा' हा चित्रपट त्‍यांनी प्रोड्‍युस केला. अनुपम यांना भारत सरकारने २००४ साली 'पद्मश्री' आणि २००६ साली 'पद्मभूषण' पुरस्‍कार देऊन सन्‍मानित केले. 
अनुपम यांचं खासगी जीवन 
Image result for anupam kher old
अनुपम यांनी मधुमालती यांच्‍याशी लग्‍न केले होते. मात्र, काही कारणास्‍तव हे लग्‍न टीकू शकले नाही. यानंतर १९८५ मध्‍ये त्‍यांनी अभिनेत्री किरण खेर यांच्‍याशी लग्‍न केले. किरण खेर यांचही हे दुसरं लग्‍न होते. 
परदेशी चित्रपटातही काम
बॉलिवूड शिवाय अनुपम खेर यांनी अमेरिकन, ब्रिटीश आणि चायनीज चित्रपटात काम केलं आहे.  
Image result for anupam kher old
पाच वेळा फिल्‍मफेअर पुरस्‍कार 
अनुपम यांना पाच वेळा सर्वोत्‍कृष्‍ट विनोदी अभिनयाचा फिल्‍मफेअर पुरस्‍कार मिळाला. अर्थात विनोदी कलाकार म्‍हणून त्‍यांची ओळख कधीच नव्‍हती. एकाच प्रकारच्‍या भूमिका लागोपाठ केल्‍याने त्‍यांची ओळख विनोदी भूमिका अशी झाली. सन २००० नंतर त्‍यांनी अनेक आशयघन चित्रपटात काम केले. 'मैंने गांधी को नहीं मारा,' 'खोसला का घोसला,' 'बेबी,' 'स्‍पेशल २६' यांसारख्‍या चित्रपटातील अनुपम खेर यांची वेगळी भूमिका पाहायला मिळाली.  
या चित्रपटाची चर्चा 
Related image
पत्रकार संजय बारू यांचे पुस्‍तक 'द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर : द मेकिंग ॲण्‍ड अनमेकिंग ऑफ मनमोहन सिंह'यावर आधारित चित्रपटात अनुपम खेर यांनी भूमिका साकारली होती. अनुपम खेर यांनी मनमोहन सिंह यांची भूमिका साकारली होती. 
चित्रपटसृष्‍टीत अनेक दशके काढल्‍यानंतर अभिनयाचे शास्‍त्रशुध्‍द शिक्षण देणारी संस्‍थाही सुरू करून अभिनयातील पुढची पिढी घडवण्‍याचे काम त्‍यांनी केले. अनेकदा वेगवेगळी विधाने करूनही ते चर्चेत राहिले होते. उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ यांची भाजपमधून हकालपट्‍टी करावी, अशी मागणी त्‍यांनी २०१६ मध्‍ये केली होती. एफटीआयमधील गोंधळ सावरून त्‍या संस्‍थेचे कामकाज पुन्‍हा सुरळीत करण्‍याचे आव्‍हान खेर यांच्‍यासमोर होते. 
अनुपम खेर यांची भूमिका असलेले हिंदी-इंग्रजी चित्रपट -
A Wednesday and Baby
एस एस धोनी : द अनटोल्‍ड स्‍टोरी
कम
कुछ कुछ होता है
खोसला का घोसला
जानेमन
डॅडी
दिल बोले हडिप्‍पा
दिलवाले दुल्‍हनिया ले जायेंगे
प्रेम रतन धन पायॊ
Bend It Like Beckham
The Big Sick
Bride and Prejudice
मैंने गाँधी को नहीं मारा
लम्‍हे
लागा चुनरी में दाग
विजय
वीर झारा
सलाखें
सारांश
स्‍पेशल २६
हम, वगैरे वगैरे.
अनुपम खेर यांनी लिहिलेली पुस्‍तके -
* Anupam Kher Presents Bharatvarsha Stories of Great Indians
* The Best Thing about You is You!
* आप खुदही बेस्‍ट है )हिंदी)

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...