Wednesday, June 26, 2019

सर्वोत्तम अदाकारा मधुबाला






हिंदी सिनेमा जगतात पाऊल ठेवणार्‍या सुंदर मधुबालाने मुगल-ए-आजम, चलती का नाम गाडी, मिस्टर ॲण्‍ड मिसेज ५५ यासारख्‍या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांत काम केले. आपल्‍या अदाकारीने, सौंदर्याने, दमदार अभिनयाने हिंदी सिनेमा जगतावरच नाही तर लाखों-करोडो प्रेक्षकांवर राज केले. आज मधुबालाचा जन्‍मदिवस.

दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्‍टार होण्‍यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्‍टार होते. या सुपरस्‍टारबद्‍दल कुणालाही आकर्षण वाटावे असे अशोककुमार यांचे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. मधुबालाही त्‍याला अपवाद नव्‍हती. तिच्‍यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्‍या मादक अदानी आणि मदमस्‍त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. व्‍हॅलेंटाईन्‍स डे ला म्‍हणजेच १४ फेब्रुवारी, १९३३ चा तिचा जन्‍म.  
असे म्‍हटले जाते की, महलचा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने अशोककुमारला प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्‍यक्‍त केले होते. अशोककुमार हे नलिनी जयवंतच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्‍हणून त्‍यांनी सोडून दिले होते. 
Related image
अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्‍यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्‍टर एक्‍स' या चित्रपटांत एकत्र काम केले. परंतु, दोघेही खर्‍या खुर्‍या आयुष्‍यात प्रेमात होते. याआधीच अशोककुमार यांचे लग्‍न झाले होते. नलिनी-अशोककुमार दोघे लग्‍नही करणार होते. परंतु, त्‍यांचे लग्‍न होऊ शकले नाही. 
Related image
अशोकुमार आणि मधुबाला   
'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्‍यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्‍यानंतर तब्‍बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्‍यरच्‍या संगीताने धूम माजवली. 
Image result for madhubala
या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्‍क के इम्‍तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्‍या आयुष्‍यातील सर्वोत्तम नृत्‍य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्‍या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले. 
Related image
'महल' चित्रपटाच्‍यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्‍हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी बेबी मुमताज यांचे नाव मधुबाला असे केले होते. 
Related image
किशोरकुमार आणि मधुबाला
'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोककुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि हास्‍य अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्‍यावेळी बॉम्‍बे टॉकिजमध्‍ये खेळत असायची. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. आणि मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. 
Image result for madhubala
किशोरकुमार आणि मधुबाला यांनी लग्‍न केले होते. त्‍यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 
Image result for madhubala
अशोककुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्‍ये काम भूमिका केल्‍या. हिमांशू यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर 'बॉम्‍बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्‍था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्‍बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्‍हटले जाते की, त्‍यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्‍बे टॉकिजचे कर्ज अशोककुमार यांनी फेडले. 
Image result for madhubala
नलिनी जयवंत आणि अशोककुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्‍या युनियन पार्क कॉलनीमध्‍ये समोरासमोरच्‍या बंगल्‍यात राहत असे. मृत्‍यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.  

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...