Wednesday, June 26, 2019

खुबसुरत मधुबालाला चित्रपटात अशी मिळाली संधी






तिच्‍या नटखट अदा, सुंदर हास्‍याने भुरळ घालणारी ती मधुबाला. मधुबालाला चार बहिणी. मधुबाला तिसर्‍या क्रमांकाची. मोठी बहिण कनीज फातिमा, दुसरी बलसारा, तिसरी मधुबाला, धाकटी चंचल आणि पाचव्‍या क्रमांकाची शहिदा. 

मधुबालाचे वडील अताऊल्‍ला खाँ. ते जुन्‍या दिल्‍लीत राहायचे. तेव्‍हा ते इंम्‍पिरिअल टोबॅको कंपनीमध्‍ये नोकरीला होते. परंतु, तंबाखूच्‍या कारखान्‍यात काम केल्‍यामुळे त्‍यांना त्रास झला. त्‍यामुळे त्‍यांची नोकरी सुटली. मधुचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम-देहलवी. तिचं बालपणापासूनच आकर्षक व्‍यक्‍तिमत्त्‍व. तिचं हासणं म्‍हणजे सुमधूर, सूरमय. 
असे म्‍हटले जाते की, घरातल्‍या घरात बसून ती सोहराब मोदींच्‍या 'पुकार'मधले सीन करायची. हे तिच्‍या वडिलांनी पाहिलं आणि चित्रपटसृष्‍टीत तिचे नशीब आजमावण्‍यासाठी तिला मुंबईला घेऊन आले. ते मुंबईत स्‍टुडिओमध्‍ये मधुला काम मिळण्‍यासाठी चकरा मारायचे. 
अखेर मधुला एका चित्रपटात काम करायला मिळाले. बॉम्‍बे टॉकिजने १९४२ ला बसंत (मुमताज शांती, उल्‍हास) मध्‍ये बालतारका म्‍हणून काम मिळालं. महिन्‍याला शंभर रुपये पगारही मिळाला. 'बसंत' हा चित्रपट अमिया चक्रवर्ती यांनी दिग्‍दर्शित केला होता. त्‍यात 'मेरे छोटे से मन की छोटी सी दुनिया रे' हे गाणे मधुवर चित्रित करण्‍यात आलं होतं. 
'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणीला मधुचं काम आवडलं. संस्‍थेच्‍या ज्‍वारभाटासाठी त्‍यांनी मधुला बोलावले. त्‍याचबराबेर, राजकपूरसोबत 'नीलकमल'मध्‍ये मधुला मुख्‍य नायिका म्‍हणून काम द्‍यायचं असं त्‍यांनी ठरवलं होतं. 
'ज्‍वारभाटा'मध्‍ये दिलीपकुमार (त्‍यांचा पहिला सिनेमा) व मृदूला यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. तर बालकलाकार म्‍हणून मधु दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे देविका राणी यांनी मधुला घेतले नाही. मात्र, सेटवरच दिलीपकुमार यांची मधुशी ओळख झाली. केदार शर्मा यांच्‍या 'नीलकमल'मध्‍ये राजकपूर नायक म्‍हणून दिसणार होते. केदार यांच्‍या पत्‍नी कमला चॅटर्जी या नायिकेची भूमिका साकारणार होत्‍या. आणि त्‍यांच्‍या लहानपणीची भूमिका मधुबाला साकारणार होती. तिचे अकाली निधन झाले. त्‍यामुळे हा चित्रपट थांबला. परंतु, मधुच्‍या वडिलांनी केदार यांच्‍या मागे लागून हा चित्रपट करावरास लाला. आणि या चित्रपटात मधुला नायिका म्‍हणून घेण्‍याची विनंती केली. केदार यांनी ती मान्‍य केली. 
केदार यांचा 'नीलकमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील राज कपूर आणि मधु यांचा दमदार अभिनयाने दिग्‍दर्शक मोहन सिन्‍हांना मोहून टाकले. मोहन यांनी 'चितोड विजय' आणि 'दिल की रानी'मध्‍ये त्‍या दोघांनाही संधी दिली. केदार यांनी मधुला 'नेकी और बंदी' चित्रपटात पुन्‍हा संधी दिली. यामध्‍ये केदार स्‍वत: नायक बनले. परंतु, हा चित्रपट चालला नाही. 
१९६० च्या दशकात आला ‘मुगल-ए-आझम.’ त्यातील सलीमच्या विविध छटा दिलीपकुमार यांनी सुंदर साकारल्या. ‘मोगल-ए-आझम’मध्ये एकही गीत नव्हतं. मात्र, चित्रपटाचा नायक हा राजकुमार असल्यामुळे सर्वसामान्य तरुणाप्रमाणे नायिकेसह प्रेमगीत किंवा तिच्यासाठी विरह गीत गाणार नाही, हे दिग्दर्शक के. असीफ यांनी पटवून दिल्यावर दिलीपकुमार यांनी गाण्याचा हट्ट बाजूला ठेवला होता. या चित्रपटामध्ये त्यांची नायिका होती त्यांची प्रेयसी मधुबाला. चित्रपट सुरू होताना नायिकेसाठी दिलीपकुमारनीच मधुबालाचं नाव के. असिफना सुचवलं होतं. 'प्‍यार किया तो डरना क्‍या' हे गाणे मधुबालाने भरसभेत 'मुघल-ए-आझम'मध्‍ये गायिलं.
पुढे १९५१ मध्‍ये मधु आणि दिलीपकुमार 'तराना'मध्‍ये एकत्र आले. मधुबालाला दिलीपकुमार आवडायचे. बी. आर. चोप्रा यांच्‍या 'नया दौर'मध्‍ये सुरुवातीला मधुबालाला घेणार होते. चित्रपटाचे एक शूटिंग सुरू होते. तेथे मधुला जाण्‍यास तिच्‍या वडिलांनी मज्‍जाव केला. त्‍यामुळे मधुने चोप्रा यांना आपला नकार कळवला आणि 'नया दौर'साठी वैजयंती मालाची निवड करण्‍यात आली. त्‍यावेळी 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ टिकट' या चित्रपटांमुळे मधु ही किशोरकुमार यांच्‍या सहवाहात आली होती. त्‍या सुमारास मधु लोकप्रिय बनली होती. मधुने १९६० मध्‍ये किशोरकुमार यांच्‍याशी लग्‍न केले. 
किशोरकुमार यांचा भाऊ अशोककुमार. अशोककुमार यांच्‍यासोबत मधुबालाने 'महल' आणि 'हावडा ब्रीज' हे चित्रपट केले. ते तुफान गाजले. 'पराई आग' या चित्रपटाच्‍या सेटवर पहिल्‍यांदा मधुबालाने कमाल अमरोहींना पाहिले. तेव्‍हा ते संगीतकार गुलाम मोहम्‍मदशी बोलत उभे होते. कमालजींची उर्दूमिश्रित काव्‍यभाषा ऐकून मधुबाला प्रभावीत झाली होती. ती आपल्‍याकडे बघत आहे, हे समजल्‍यावर आदाब अर्ज हे असे कमाल म्‍हणाले. महल हा चित्रपट कमाल यांनी दिग्‍दर्शित केला. मधुबालाच त्‍याची नायिका म्‍हणून त्‍यांना हवी होती. परंतु, काही जणांना ते मान्‍य नव्‍हते. त्‍यामुळे स्‍क्रिन टेस्‍ट घ्‍याचे ठरवले. आणि मधुने दिलेल्‍या शूटनंतर सुरैय्‍याऐवजी मधुला घेण्‍यात आले. सुरैय्‍या त्‍यावेळी ४ हजार रुपये घेत होती. परंतु, मदुला ७ हजार रुपये द्‍यावे लागले होते. 
संत, नीलकमल, दुलारी, बेकसूर, तरगना, अमर, मिस्‍टर ॲण्‍ड मिसेस ५५, चलती का नाम गाडी, हावडा ब्रीज, मुघल-ए-अआझम, असे एकापेक्षा एक चित्रपट मधुबालाने सिनेइंडस्‍ट्रीला दिले. तिला हॉलिवूडमधूनही ऑफर आली होती. परंतु, तिच्‍या वडिलांनी नकार दिल्‍याने तिला हॉलिवूडमध्‍ये जाता आले नाही.  
नियतीने मधुबालाला खरे प्रेम मिळवून दिले नाही. 'आयेगा आनेवाला' अशी साद घालत तिने जगाचा निरोप घेतला.  

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...