बॉलिवूडची चांदणी, सुपरस्टार श्रीदेवी यांचे गेल्या वर्षी २४ फेब्रुवारीला निधन झाले. श्रीदेवी दुबईला आपला भाचा मोहित मारवाहच्या लग्नासाठी गेल्या होत्या. तेथील एका हॉटेलमध्ये बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. २८ फेब्रुवारीला त्यांचा मृतदेह भारतात आणला गेला. त्यांच्या निधनाने बॉलिवूडवरच नाही तर संपूर्ण देशात शोककळा पसरली. अनेक बॉलिवूड स्टार्सनी त्यांना सोशल मीडियावरून श्रध्दांजली वाहिली. अनेक स्टर्सनी श्रीदेवी यांच्यासोबतचे आपले फोटो शेअर केले.
श्रीदेवी यांनी हिंदी भाषेसोबतच अन्य भाषांमधील जवळपास ३०० चित्रपट केले. अनेक दिग्गज स्टार्ससोबत त्यांनी काम केले.

श्रीदेवी यांनी सलमान खानसोबतही चित्रपट केले ते म्हणजे-चंद्रमुखी (१९९३) आणि चांद का टुकडा (१९९४). चंद्रमुखी हा चित्रपट हिट ठरला.

या चित्रपटाच्या शूटिंगवेळी श्रीदेवी यांना दुखापत झाली होती. प्रसिध्द कोरिओग्राफर प्रभुदेवा यांनी एका पोर्टलशी ही घटना सांगितली होती. ते म्हणाले होते, श्रीदेवी यांनी हाय स्पीड शॉट मॅच एकदम परफेक्ट दिला होता. चित्रपटाच्या एका शॉटमध्ये त्यांना दुखापत झाली. परंतु, त्यांनी कधी तक्रार केली नाही. त्यांना दुखत असणार तरीही त्यांनी सीन मधून सोडला नाही. त्या शूट करतच राहिल्या.

मध्यंतरी, सलमान खान आणि श्रीदेवी यांचा जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या फोटोत सलमान आणि श्रीदेवी खुर्चीवर बसलेले दिसत आहेत. या फोटोत श्रीदेवींनी पाढऱ्या रंगाचा सूट घातला आहे आणि सलमान खान शर्ट आणि जीन्समध्ये दिसत आहे.
श्रीदेवी आणि सलमानचा हा फोटो Wembley Stadium च्या कार्यक्रमाच्यावेळी १६ सप्टेंबर १९९० रोजी घेण्यात आला होता. या दोघांबरोबर अभिनेत्री नीलम कोठारी ही या फोटोत दिसत आहे.
No comments:
Post a Comment