Tuesday, August 13, 2019

फड सांभाळ तुऱ्याला गं आला...



मराठी सिनेसृष्टीमध्ये तीन वसंत नावाजलेले आहेत वसंत देसाई, वसंत प्रभू आणि वसंत पवार. यापैकी वसंत पवार यांचा आज स्मृतिदिन (६ऑगस्ट १९६५).
संगीतकार म्हणून त्यांनी खूप मराठी सिनेमांना संगीत दिले. मराठी सिनेसृष्टीचा तो सुवर्णकाळ होता एकाहून एक मात्तबर मंडळी गाण्याच्या क्षेत्रात काम करत होती. अजरामर शब्दरचना तयार होत होत्या. गोड गळ्याचे गायक गायिका आपला स्वरसाज त्यावर चढवत होते. त्यांना तेवढेच सुमधुर संगीत देऊन तयार झालेली ही अवीट गोडीची गाणी आजही ऐकताना अपार आनंद देतात.वसंत पवारांना आपल्यातून जाऊन ५० वर्षांहून अधिक काळ लोटला तरीही आपण त्यांची गाणी आवडीने ऐकतो यामध्येच त्यांचे मोठेपण आहे. त्यांच्या सगळ्या सिनेमांचा मागोवा घेणे तसे अशक्य, म्हणून त्यांनी संगीत दिलेल्या थोड्या मराठी सिनेमांची यादी व त्यापुढे त्यातली गाजलेली गाणी देत आहे इतर गाजलेली भावगीते पण आहेतच.
वरदक्षिणा - घन घन मला नाभी दाटल्या 
अवघाचि संसार-जे वेड मजला लागले 
तू सुखी राहा-दिवा लाविते दिवा 
सवाल माझा ऐका-सोळावा वारीस धोक्याचं 
रंगल्या रात्री अशा -मला हो म्हणत्यात लवंगी मिरची 
मानिनी - अरे खोप्या मधे खोपा
बाळा जो जो रे - बाळा जो जो जो रे (शीर्षक गीत)
मल्हारी मार्तंड - फड सांभाळ तुऱ्याला ग आला
आकाशवाणीवर पत्रोत्तराचा कार्यक्रम लागतो त्याची सुरूवात देखील वैजयंता सिनेमामधील - " सप्रेम नमस्कार विनंती विशेष" या वसंत पवार यांनी संगीत दिलेल्या गाण्याने होते.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...