Tuesday, August 13, 2019

राजेश खन्ना यांना असे मिळाले 'काका' नाव



आपल्या चतुरस्त्र अभिनयाने असंख्य चाहत्यांच्या अंत:करणावर अधिराज्य गाजवणारे आणि 'काका' या लाडक्या नावाने ओळखले जाणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना यांचा १८ जुलैला स्मृतिदिन. सत्तराव्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला.  राजेश खन्ना यांच्या निधनानंतर ७० च्या दशकातील एक सदाबहार मेलडी युग संपुष्टात आले. राजेश खन्ना यांनी १९६९ ते १९७२ या काळात लागोपाठ एकापेक्षा एक १५ सुपरहिट चित्रपट दिले. 
चित्रपटात एन्ट्री 
राजेश खन्ना यांनी चेतन आनंद यांच्या १९६५ मध्ये आलेल्या आखरी खत या चित्रपटापासून सिनेइंडस्ट्रीत एन्ट्री केली. त्यानंतर आनंद, आराधना, आन मिलो सजना, मर्यादा, दो रास्ते, अंदाज, बावर्ची, मेरे जीवन साथी, कटी पतंग, हम दोनो, अवतार, अमर प्रेम, स्वर्ग यासारखे अनेक हिट चित्रपट दिले. दो दिलों के खेल मे हा २०१० ला रिलीज झालेला चित्रपट अखेरचा ‍ठरला. तब्बल १०१ चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो हिरो म्हणून काम केले. 
Image result for rajesh khanna hd
१४ फिल्मफेअर नामांकन, ४ वेळा पुरस्कार 
राजेश खन्ना यांचे फिल्मफेअर पुरस्कारात नामांकन जाहीर झाले होते. आनंद (१९७२),  बावर्ची (१९७३),  नमक हराम (१९७४) आणि अमृत (१९८७) या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळके ॲवॉर्ड, आयफा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अप्सरा लाईफटाईम अचिव्हमेंट ॲवॉर्ड, अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते. 
Related image
राजेश खन्ना यांच्या यशामागे संगीतकार आर. डी. बर्मन आणि गायक किशोर कुमार यांचे मोलाचे योगदान आहे.  किशोर कुमार यांनी अनेक चित्रपटांमधून राजेश यांना आवाज दिलाय. तर  आर. डी. बर्मन यांनी संगीत दिले. मेरे सपनों की राणी कब आएगी तू म्हणत शर्मिला टागोर यांच्या रेल्वेमागे गाडीने पिच्छा करणारा, जिंदगी कैसी हे पहेली...कभी ये हसाए कभी ये रूलाए म्हणत आयुष्याची गणिते मांडणारा तर कधी एक अजनबी हसीना से यू मुलाकात हो गई म्हणत तिच्या सौंदर्याचे गुणगाण करणारा, गुनगुना रहे है भंवरे खिल रहे है...म्हणत प्रेमाचे गीत गाणारा तर कधी ये जो मोहब्बत है म्हणत नशेत बुडून आता प्रेम कधीच करणार नाही म्हणणारा रोमँटिक हिरो राजेश खन्नांची आठवणीतील गाणी अनेकांच्या तोंडावर गुणगुणताना दिसतात. 
Related image
राजकारणात उडी 
१९९२ मध्ये राजेश खन्ना यांनी राजकारणात उडी मारली. काँग्रेसच्या तिकिटावर ते खासदार म्हणूनही निवडून आले. परंतु, लवकरच सक्रीय राजकारणातून बाहेर पडणे, योग्य मानले.  
चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण 
त्यांनी ३ चित्रपटांची निर्मिती केली होती. यात त्यांना फारसे यश मिळाले नाही. 
डिंपल कपाडियाशी लग्न  
Related image
राजेश खन्ना यांनी १९७३ मध्ये अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले होते. १९८४ मध्ये त्यांचा घटस्फोटही झाला. त्यामुळे ते एकाकी पडले होते. 
असे मिळाले 'काका' नाव 
आयफा पुरस्कार सोहळ्यादरम्यान राजेश यांनी त्यांना काका नाव कसे मिळाले, याविषयी सांगितले होते. काका या शब्दाचा अर्थ पंजाबीमध्ये लहान गोंडस मुलगा असा होतो. मी जेव्हा सिनेजगतात पाऊल ठेवले, त्यावेळी मी तरूण होतो. त्यामुळे सर्वजण काका म्हणू लागले. अनेकवेळा पंजाबीमध्ये काके अशीही हाक मारण्यात येते. मलाही तशीच हाक मारली जायची. हळूहळू काका हेच नाव पुढे लोकप्रिय झाले. 


No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...