Tuesday, August 13, 2019

महमूद यांच्यामुळे घडलं अमिताभ यांचं करिअर






ड्रायव्‍हर ते ॲक्‍टर असा प्रवास करणारे कॉमेडियन अभिनेता, गायक, दिग्‍दर्शक, निर्माते महमूद यांनी ज्‍या भूमिका साकारल्‍या, त्‍या भूमिकांमध्‍ये जिवंतपणा आणला. महमूद यांचा २३ जुलैला स्मृतिदिन. महमूद यांच्या आयुष्‍याशी निगडित अशा काही गोष्‍टी आहेत, ज्या कदाचित खूप कमी लोकांना माहिती असतील. 

Related image
महमूद अली यांचा २९ सप्‍टेंबर, १९३२ रोजीचा जन्‍म. महमूद यांनी १९४५ मध्‍ये चित्रपट 'संन्यासी'मधून आपल्‍या करिअरला सुरूवात केली. त्‍यांनी 'किस्मत' चित्रपटात बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. महमूद यांनी मोठ्‍या पडद्‍यावर येण्‍यापूर्वी छोटी-मोठी कामे केली. एकेकाळी महमूद दिग्‍दर्शक राजकुमार संतोषीचे वडील पी. एल. संतोषी यांचे ड्रायव्‍हर होते. नंतर राजकुमार यांनी 'अंदाज अपना अपना' या चित्रपटात काम दिलं. त्‍याशिवाय, महमूद मीना कुमारी यांना टेबल टेनिसदेखील शिकवत होते. 
मेहमूद यांचे वडील मुमताज अली एक स्टेज ॲक्टर आणि उत्तम डान्‍सर होते. 
Related image
मेहमूद यांनी मीना कुमारी यांची मोठी बहिण मधु यांच्‍याशी विवाह केला. नंतर काही कारणांमुळे त्‍यांनी मधु यांच्‍याशी घटस्‍फोट घेतला. 
अमिताभ बच्‍चन यांना केली होती मदत
ज्‍यावेळी महानायक अमिताभ बच्‍चन स्ट्रगल करत होते. त्‍यावेळी महमूद यांनी मुंबईमध्‍ये आपल्‍या घरात त्‍यांना एक खोली राहायला दिली होती. परंतु, नंतर दोघांच्‍या नात्‍यात दुरावा आला. 
Image result for amitabh and mehmood
अमिताभ बच्चन महमूद यांना आपले वडिल मानत होते. परंतु, असा एक प्रसंग घडला की, महमूद यांना धक्का बसला. एका मुलाखतीत महमूद यांनी म्‍हटले होते की, 'आज माझ्‍या मुलाकडे चित्रपटांची लाईन लागली आहे. ज्‍या व्‍यक्‍तीकडे सक्सेस असतं, त्‍याचे दोन वडिल असतात. एक ज्‍याने जन्‍म दिला आणि दुसरा ज्‍याने यशाच्‍या पायरीपर्यंत पोहोचवलं. मी त्‍या व्‍यक्‍तीला मदत केली. अनेक चित्रपटांत काम दिलं. त्‍याला माझ्‍या घरात राहायला जागा दिली. खरंतरं अमित माझा खूप आदर करतो. परंतु, त्‍याच्‍या एका वर्तनामुळे मला धक्‍का बसला. त्‍याचे वडिल हरिवंशराय बच्चन पडले होते, त्‍यावेळी त्‍यांना पाहायला मी अमिताभ बच्चनच्‍या घरी गेलो. परंतु, माझी बायपास सर्जरी झाल्‍यानंतर अमिताभ आपल्‍या वडिलांसोबत ब्रीच कँडी हॉस्‍पिटलमध्‍ये आला. मात्र, तो मला भेटला नाही. अमिताभने सिध्‍द केलं की, खरे वडिल हे खरेच असतात. आणि नकली वडिल नकलीच.'
जुलै २००४ मध्‍ये मेहमूद यांच्‍या निधनानंतर अमिताभ यांनी लिहिलं होतं की, 'एक अभिनेता म्‍हणून ओळख बनवण्‍यासाठी त्‍यांनी माझी नेहमीच मदत केली. महमूद भाईंनी मला माझ्‍या करिअरच्‍या सुरूवातीला मदत केली. ते पहिले निर्माते होते, ज्‍यांनी मला मुख्‍य भूमिका दिली होती – ‘बॉम्बे टू गोवा’मध्‍ये. एकानंतर एक अनेक चित्रपट फ्लॉप झाल्‍यामुळे मी घरी परतण्‍याचा विचार केला होता. परंतु, महमूद साहेबचे भाऊ अनवर यांनी मला थांबवलं.'
Image result for amitabh and mehmood
'बॉम्बे टू गोवा' 
'बॉम्बे टू गोवा' चित्रपटातील एक मजेदार प्रसंग आहे. अमिताभ बच्चन आणि महमूद यांच्‍यावर 'देखा ना हाय रे सोचा ना' हे गाणं चित्रीत करण्‍यात आलं होतं. अमिताभ यांनी या गाण्‍यावर डान्‍स करावं, अशी महमूद यांची इच्‍छा होती. अमिताभ यांना डान्‍स करायला येत नव्‍हते. अमिताभ महमूद यांना म्‍हणाले, 'भाईजान मला डान्‍स करायला येत नाही.' पण, महमूद यांनी त्‍यांचं ऐकलं नाही. महमूद म्‍हणाले, 'जो चालू शकतो तो डान्‍सही करू शकतो.' अमिताभ यांनी विनंती करूनदेखील मेहमूद यांनी त्‍यांचं काहीही ऐकलं नाही. आणि अमिताभ यांच्‍याकडून डाक्‍स करवून घेतला. हे गाणं सुपरहिट झालं.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...