Tuesday, August 13, 2019

किशोर कुमारने घेतला होता इंदिरा गांधींशी पंगा


आंदोलन ते शाब्बास या ७४ चित्रपटांमध्ये भूमिका करणारे नशीली, रसीली आणि फडकती गाणी गाणारे किशोर कुमार यांचा ४ ऑगस्टला जन्मदिन. किशोर कुमार यांनी सिनेइंडस्ट्रीमध्ये अभिनेते म्हणून एन्ट्री घेतली होती. किशोर कुमार यांचा पहिला चित्रपट 'शिकारी' १९४६ मध्ये रिलीज झाला होता. यात किशोर कुमार यांचे मोठे भाऊ अशोक कुमार मुख्य भूमिकेत होते. किशोर कुमार यांना पहिल्यांदा देव आनंद यांचा चित्रपट 'जिद्दी' (१९४८) मध्ये गाण्याची संधी मिळाली. मध्य प्रदेश-खंडवा शहरात जन्मलेले किशोर कुमार यांनी एकापेक्षा एक हिट गाणी दिली आहेत. परंतु, अशी एक वेळ आली की, ज्यावेळी त्यांच्या गाण्यांवर बंदी घालण्यात आली होती. 

Image result for kishore kumar
ज्यावेळी १९७५ मध्ये इंदिरा गांधी सरकारने आणीबाणी लागू केली होती, त्यावेळी किशोर कुमार यांची गाणी बॅन करण्यात आले होते. किशोर कुमार आपल्या नियमांचे काटेकोर पालन करत असत. आणीबाणीच्या वेळी काँग्रेसचं म्हणणं होतं की, सरकारी योजनांची माहिती किशोर कुमार आपल्या आवाजात गाऊन द्यावी. काँग्रेसने किशोर कुमारशी संपर्क केला. इंदिरा गांधी सरकारमध्ये तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री व्ही. सी. शुक्ला होते. त्यांनी किशोर कुमार यांना सांगितले की, त्यांनी इंदिरा गांधींसाठी गाणे गावे. परंतु, किशोर कुमार यांनी नकार दिला. त्यानंतर किशोर कुमार यांची गाणी ऑल इंडिया रेडिओ, दूरदर्शनवर बॅन करण्यात आली. 
Image result for kishore kumar
अभिनेतापेक्षा म्हणून प्रसिध्दीपेक्षा गायक म्हणूनच अधिक लोकप्रियता किशोरकुमार यांनी मिळवली. तरीही तेव्हाच्या आघाडींच्या अभिनेत्रींबरोबर त्यांनी चित्रपटात काम केले होते. यात रेहाना-छम छमा छम, बेबी शकुंतला-फरेब, मीनाकुमारी-नया अंदाज, मधुबाला-चलती का नाम गाडी, वैजयंतीमाला-लडकी, उषाकिरण-धोबी डॉक्टर, नूतन-दिल्ली का ठग, निम्मी-भाईभाई, माला सिन्हा-जालसाज, वहिदा रेहमान-गर्लफ्रेंड, बीना रॉय-मद भरे नैन, साधना-मनमौजी, तनुजा-दो दुनी चार, मुमताज-लडका लडकी यांचा समावेश आहे. 
किशोरकुमार आणि मधुबाला यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. 
Image result for kishore kumar
किशोरकुमार आणि मधुबाला
'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोककुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. आणि मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले. किशोरकुमार आणि मधुबाला यांनी लग्‍न केले होते. त्‍यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...