प्रसिध्द गायक मुकेश यांचा २२ जुलैला जन्मदिवस. त्यांच्या आवाजातील गोडवा मनाला भावणारा आणि समाधान देणारा. मुकेश यांची एक स्वत:ची सिंगिंग स्टाईल होती. मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी एकापेक्षा एक गाणी गायली.
अभिनेते राज कपूर यांच्या करिअरमध्ये मुकेश यांच्या आवाजाने जादू केली होती. मुकेश यांनी राज कपूर यांच्यासाठी खूप सारी गाणी गायली. त्यामुळे त्यांना राज कपूर यांचा आवाज असे म्हटले जावू लागले.
'जीना यहां मरना यहां', 'जीना इसी का नाम है' ते 'सजन रे झूठ मत बोलो' आणि 'दोस्त दोस्त ना रहा' यासारख्या खूप साऱ्या गाण्यांनी राज कपूर यांना एका नव्या उंचीवर नेले. राज कपूर यांचेच नव्हे तर मुकेश यांचेही करिअर ग्राफ उंचावले.

मुकेश यांनी गायकीबरोबरच अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. १९४१ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'निर्दोष'मधून मुकेश यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. 'निर्दोष'मध्ये अभिनेत्री नलिनी जयवंत मुख्य भूमिकेत होत्या. परंतु, मुकेश यांचे चित्रपट फारसे चालले नाहीत.
मुकेश यांचे निधन १९७६ मध्ये हार्टॲटॅकने झाले. मुकेश यांच्या निधनानंतर राज कपूर यांना मोठा धक्का बसला होता. असे म्हटले जाते की, त्यावेळी राज कपूर म्हणाले होते की, 'मुकेश यांच्या जाण्याने माझा आत्मा आणि आवाज दोन्ही गेला.'
मुकेश यांचा युएसमध्ये कार्यक्रम होता. सकाळी उठून ते तयारी करत होते आणि अचानक छातीत दुखू लागलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांना वाचवण्यात यश आले नाही. आज ते या जगात नाहीत. परंतु, त्यांची सुरेल गाणी आजदेखील लक्षात राहण्यासारखी आहेत.
No comments:
Post a Comment