Tuesday, August 13, 2019

...आणि महमूदनी राजेश खन्‍नांना लगावली थोबाडीत







'पडोसन'मध्‍ये चमनगोटा करून मद्रासी सोंग काढून 'एक चतुर नार...' गाऊन प्रेक्षकांना पोटभर हसायला लावणारा,  'शाबास डॅडी'मध्‍ये मराठी बोलणारा, 'मुथ्‍थु कुडी...' आणि 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं' यासारख्या गाण्यांनी प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणारा महमूद यांचा २३ जुलैला स्मृतिदिन. 

बॉलिवूड चित्रपटांना नवी दिशा देणारे प्रसिध्‍द विनोदी अभिनेते महमूद यांनी 'भूत बंगला', 'पडोसन', 'बॉम्बे टू गोवा', 'गुमनाम', 'कुंवारा बाप' यासारख्या एकापेक्षा एक चित्रपटांत काम केलं. महमूद विनोदी अभिनेते असले तरी पडद्यामागे स्वभावाने थोडेसे रागीट होते. 
Image result for mehmood
महमूद यांच्या रागीट स्वभावाचा एक किस्सा सांगितला जातो. एक दिवस त्‍यांनी सुपरस्टार राजेश खन्ना यांना सर्वांसमोर कानशिलात लगावली होती. ते वर्ष होतं १९७९ चं. महमूद यांनी आपला चित्रपट 'जनता हवलदार'साठी राजेश खन्ना यांना साईन केलं होतं. राजेश खन्ना यांचं त्‍यावेळी एक वेगळचं स्टारडम होतं. महमूद आपल्या फार्महाऊसमध्‍ये चित्रपटाचे शूटिंग करत होते. 
एक दिवस शूटिंगवेळी महमूद यांच्‍या मुलाने राजेश खन्ना यांना पाहिलं. त्याने राजेश यांना केवळ 'हॅलो' म्‍हटलं आणि तेथून निघून गेला. या गोष्‍टीमुळे राजेश नाराज झाले. या घटनेनंतर राजेश नेहमी सेटवर उशीरा येऊ लागले. ज्‍यामुळे शूटिंग उशीरा होत होते. राजेश खन्ना यांच्‍यामुळे महमूद यांना तासनतास सेटवर प्रतीक्षा करावी लागत असे. महमूद त्‍या चित्रपटाचे दिग्‍दर्शन करत होते. त्‍याचबरोबर अभिनयदेखील करत होते. एक दिवस राजेश खन्ना आणि महमूद यांच्‍यामध्‍ये वाद झाला आणि त्‍यांनी सर्वांसमोर राजेश यांच्या कानशिलात लगावली. 
त्‍यावेळी महमूद राजेश यांना म्‍हणाले होते की, 'आपण सुपरस्टार असाल, तुमच्‍या घरात...मी तुम्‍हाला या चित्रपटासाठी पूर्ण पैसे दिले आहेत. त्‍यामुळे वेळेवर हा चित्रपट पूर्ण करायला हवा.' त्‍यानंतर राजेश खन्ना सेटवर वेळेत येऊ लागले आणि चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले. 
Image result for mehmood
विनोदी अभिनयाने प्रेक्षकांना पोटभर हसायला लावलं...
'छोटी बहन'मध्‍ये महमूद यांच्‍यातला विनोदी गुण सर्वांसमोर आला. जशी महमूद यांची लोकप्रियता वाढली, भलेभले नायक मागे पडले. 'दिल तेरा दिवाना'मध्‍ये हैदराबादी हेल काढले. 'पडोसन'मध्‍ये चमनगोटा करून मद्रासी सोंग काढून प्रेक्षकांना हसायला लावलं. 'शाबास डॅडी'मध्‍ये मराठी बोलले. 'पूर्णिमा'मध्‍ये त्‍यांनी खुद्‍द गायले. त्‍यांच्‍या 'मुथ्‍थु कुडी' हे गाणं आजही संगीतरसिकांच्‍या ओठांवर रुळलेलं आहे. 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं'ने प्रेक्षकांच्‍या मनावर अधिराज्‍य केलं. 'हम काले है तो क्‍या हुआ दिलवाले हैं' हे गाणं महम्‍मद रफी यांनी गायलं होतं आणि त्‍याहीपेक्षा जास्‍त सुरुवातीचं महमूद यांनी म्‍हटलेलं, 'खयालोंमें खयालोंमें' हे सिनेरसिकांच्‍या पसंतीस उतरलं होतं.

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...