सहाशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेले शक्ती कपूर हिंदी सिनेमा जगतातील प्रसिद्ध व्हिलन आहेत. शक्ती कपूरने आपल्या फिल्मी करिअरमध्ये जवळपास ८० हून अधिक चित्रपटांमध्ये रेप सीन केले आहेत.
'आऊ...' हे प्रसिद्ध शब्द म्हणत हिंदी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणाऱ्या शक्तीला 'कुर्बानी' चित्रपटातून ओळख मिळाली. शक्तीचा जन्म ३ सप्टेंबचा. शक्ती ६६ वाढदिवस साजरा करत आहे. जन्मदिनाच्या औचित्याने त्यांच्याविषयी या खास गोष्टी जाणून घेऊया. अनेक चित्रपटांमध्ये शक्ती कपूरने रेप सीन्स केले आणि व्हिलन म्हणून ते हिट झाले.

गुमसुम
दयानंद दिग्दर्शित १९८२ मध्ये रिलीज झालेला चित्रपट गुमसुममध्ये शक्ती कपूरचा रेप सीन वादग्रस्त ठरला. शक्तीने 'मेरे आगोश में'मध्ये सर्वात अधिक कॉन्ट्रोवर्शियल सीन दिले होते. शक्तीने टॉपलेस ॲक्ट्रेससोबत कॉन्ट्रोवर्शियल सीन दिले होते. सेन्सॉर बोर्डाने अनेक महिने या चित्रपटाला मंजूरी दिली नव्हती.

गुंडा
१९९८ मध्ये गुंडा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटामुळे माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेला एक नवा दृष्टीकोण मिळाला. मुख्य अभिनेता होता 'मिथुन चक्रवर्ती'. चित्रपटात एकापेक्षा एक कलाकार होते. त्यापैकी एक होता शक्ती कपूर. या चित्रपटामध्येही रेप सीन चित्रीत करण्यात आले होते.
अंगारे
'अंगारे' १९८६ मध्ये रिलीज झाला होता. शमिता पाटीलचा रेप करण्याचा प्रयत्न करतानाचा यामध्ये सीन होता. या सीनमुळे शक्ती कपूरची खूप चर्चा झाली होती. यामध्ये शमिता पाटीलसोबत राज बब्बरची मुख्य भूमिका होती.

मेरा फैसला
मेरा फैसला चित्रपट १९८४ मध्ये रिलीज झाला होता. जया प्रदा सोबत संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. चित्रपटाच्या एका सीनमध्ये जया प्रदासोबत शक्ती कपूरने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला होता, असा सीन होता.

No comments:
Post a Comment