Tuesday, September 3, 2019

'या' अभिनेत्रीला शेवटी भाड्याच्या घरात राहावं लागलं  

बॉलिवूड अभिनेत्री साधना हिंदी सिनेमा जगतातील एक प्रसिध्द चेहरा आहे. 'मेरा साया', 'आरजू', 'एक फूल दो माली', 'लव इन शिमला', 'वक्त' आणि 'वो कौन थी' यासारख्या चित्रपटांसाठी साधना ओळखल्या जातात. वयाच्या १५ व्या वर्षांपासून साधना महाविद्यालयातील नाटक स्पर्धेत भाग घ्यायच्या. एकदा एका चित्रपट निर्मात्याची नजर साधना यांच्यावर पडली आणि साधनाला सिंधी चित्रपट अबानासाठी साईन केलं. 
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानचा साधना यांचा एक फोटो मॅगझीनमध्ये  छापण्यात आला होता. त्यावेळचे प्रसिध्द चित्रपट निर्माते शशिधर मुखर्जी यांची नजर साधना यांच्या फोटोकडे गेली. शशिधर मुखर्जी यांनी साधना यांना आपल्यासोबत  हिमालय ॲक्टिंग स्कूलमध्ये घेऊन गेले. त्यांनी साधना यांना आपल्या मुलासोबत लविंग शिमला चित्रपटात लॉन्च केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन आर. के. नय्यर यांनी केले होते. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर साधना यांना मागे वळून पाहावे लागले नाही. यानंतर साधना यांनी अनेक चित्रपट केले. 
Image result for actress sadhana
साधना पहिल्यांदा ज्यावेळी चित्रपट ४२० च्या एका गाण्यासाठी आला होती. त्यावेळी एका छोट्याशा गोष्टीवर राज कपूरसोबत वाद झाला होता. त्यानंतर, साधना ह्या राज कपूर यांचा द्वेष करू लागल्या.  
हेअरस्टाईलवर खास लक्ष 
साधना आपल्या हेअरस्टाईलवर खास लक्ष द्यायच्या. असं म्हटलं जातं की, सेटवर त्या आपल्या हेअरस्टाईलवर खास लक्ष द्यायच्या. ही गोष्ट राज कपूर यांना अजिबात आवडायची नाही. राज कपूर रागाच्या भरात साधना यांना म्हणाले होते की, अभिनय सोडून त्यांनी लग्न केले पाहिजे. यावर साधना यांना राग आला आणि त्या सेट सोडून तेथून निघून गेल्या. परंतु, काही काळानंतर मात्र दोघांनी दुल्हा-दुल्हनमध्ये एकत्र काम केले होते. 
Image result for actress sadhana
एकुलती एक मुलगी होती साधना
पाकिस्तानच्या कराचीमध्ये जन्मलेल्या साधना यांचे कुटुंबीय भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुंबईत आले होते. साधना एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेल्या साधना हिचे नाव तिच्या वडिलांनी आपली आवडती अभिनेत्री साधना बोसच्या नावावरून ठेवले होते. 
खूप कमी लोकांना माहिती आहे की, साधनाचे वडील आणि अभिनेत्री बबिताचे वडील हरि शिवदासानी सख्खे भाऊ होते.  (बबिताच्या दोन मुली म्हणजे करीना कपूर आणि करिश्मा कपूर होय.)
साधनाला अभिनेत्री बनायचं होतं. त्यामुळे ती कराचीतून मुंबईत आली. साधनाला चित्रपट ४२० मधील एका गाण्यासाठी  (इचक दाना इचक दाना) मध्ये काम मिळालं. साधना यांनी नंतर संघर्ष चित्रपट साईन केला.
Image result for actress sadhana
शेवटी भाड्याच्या घरात राहावं लागलं  
साधना लक्स साबणाच्या जाहिरातीची मॉडल होती. साधना तत्कालीन अभिनेत्रींमध्ये सर्वात अधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. साठच्या दशकात केवळ अभिनेत्री वैजयंती मालाला सर्वात अधिक मानधन दिले जायचे. तर दुसऱ्या क्रमांकावर अभिनेत्री नंदा होती. १९९५ मध्ये पतीच्या निधनानंतर साधना एकट्या राहू लागल्या. शेवटी त्या मुंबईच्या एका जुन्या बंगल्यात भाड्याच्या घरात राहू लागल्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता.  पुढे त्यांना थायरॉईडची समस्या उद्भवली होती. 
Image result for actress sadhana
साधना यांचे जवळचे कोणी नव्हते. प्रकृती अस्वास्थ्यानंतर त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीतील लोकांकडे मदत देखील मागितली. परंतु, कोणीही पुढे आले नाही. या गोष्टीचा खुलासा खुद्द साधना यांची खास मैत्रीण आणि अभिनेत्री तबस्सुम यांनी २०१५ मध्ये एका मुलाखतीत केला होता. अखेर, २५ डिसेंबर, २०१५ रोजी मुंबईमध्ये साधना यांचे निधन झाले. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...