Sunday, November 24, 2019

अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण





बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना बॉलिवूडमध्ये  ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. अँग्री यंग मॅन अशी ओळख बनवणाऱ्या अमिताभ बच्चनने १९६९ मध्ये सात हिंदुस्तानी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली होती. त्यांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल दाखवू शकला नाही. परंतु, अमिताभ बच्चन यांनी जंजीर, शोले आणि दीवार यासारखे एकापेक्षा एक चित्रपट देऊन सर्वांची मने जिंकली. 
Related image
बॉलिवूडमध्ये त्यांना ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या खास औचित्याने बॉलिवूड अभिनेते अभिषेक बच्चनने बिग बींसाठी एक ट्विट केलं आहे. 
अभिषेक बच्चनने सोशल मीडियावर अमिताभ बच्चन यांचा एक फोटो शेअर करून एक मेसेज लिहिला आहे. अभिषेक बच्चनने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे, "केवळ एक त्यांच्या मुलाच्या नात्यानेच नव्हे तर एक अभिनेता आणि फॅन होण्याच्या नात्याने, आम्ही सर्व आपली उदारता आणि महानतेमुळे धन्य आहोत. आपली प्रशंसा करण्यासाठी, आपल्याकडून शिकण्यासाठी आणि कौतुक करण्यासाठी खूप काही आहे. सिनेमा लव्हर्सच्या अनेक पिढ्या म्हणणार आहे की, आम्ही बच्चन यांच्या  जमान्यात राहत होतो." 
Image result for amitabh height pic
उंची अधिक असल्याने अडचण 
७ नोव्हेंबर, १९६९ रोजी आजपासून ५० वर्षांपूर्वी एक हिंदी चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाचे नाव होते-'सात हिंदुस्तानी.' दिग्गज लेखक-दिग्दर्शक ख्वाजा अहमद अब्बास यांचा हा चित्रपट होता. 
अमिताभ बच्चन यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होतं, "मी मॅगजीन फिल्मफेअर-माधुरी स्पर्धेसाठी एक फोटो पाठवला होता. त्यावेळी चित्रपटात आपले स्थान मिळवणाऱ्या चेहऱ्यांसाठी फिल्मफेअर एक चांगले व्यासपीठ  होतं. माझा फोटो रिजेक्ट करण्यात आला होता, काय ही आश्चर्याची गोष्ट आहे? 
Related image
परंतु, अमिताभ यांनी चित्रपटामध्ये नशीब आजमावण्याचा निर्णय घेतला होता. ते कोलकातामध्ये आपली चांगली नोकरी सोडून मुंबईला आले होते. 
त्यावेळी केए अब्बास गोव्याच्या स्वातंत्र्य संघर्षावर चित्रपट 'सात हिंदुस्तानी' बनवण्याची तयारी करत होते. त्यांना सात हिरो हवे होते, जे एकमेकांपेक्षा अगदी वेगळे असतील. यातील एका भूमिकेसाठी अब्बास यांनी टीनू आनंदला घेतले होते. टीनू आनंद अब्बास यांचे मित्र आणि प्रसिध्द लेखक इंदर राजचा मुलगा होता. टीनू आनंदची एक मैत्रीण होती नीना सिंह, जी मॉडेल होती. सात हिंदुस्तानीसाठी नीनाला चित्रपटात घेण्यात आले होते. अमिताभ बच्चन दूर दूरपर्यंत चित्रपटाचा भाग नव्हते.
Image result for saat hindustani amitabh
नीना सिंहने अब्बास  यांना अमिताभ बच्चन यांचं नाव सुचवलं होतं. या चित्रपटाची अभिनेत्री म्हणून नीना काम करणार होत्या. आणि टीनू आनंद अमिताभ यांच्यासाठी अब्बास यांच्याकडे गेले होते. आश्चर्याची बाब म्हणजे दोघेही चित्रपट करू शकले नाहीत. अमिताभ मात्र या चित्रपटातून पुढे गेले. अनेकदा उंचीमुळे नाकारण्यात आलेल्या अमिताभ बच्चन यांनी आपल्या करिअरचा पहिला चित्रपट सात हिंदुस्तानी साईन केला. ७ नोव्हेंबर, १९६९ रोजी ही चित्रपट रिलीज झाला.
आगामी चित्रपटात झळकणार 
अमिताभ बच्चन 'ब्रह्मास्त्र,' 'झुंड,' 'चेहरे' , 'गुलाबो-सिताबो' या आगामी चित्रपटात झळकणार आहेत. 

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...