
संजीव कुमार - स्मृतीदिन
बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते संजीव कुमार आज या जगात नाहीत. परंतु, त्यांच्या दमदार अभिनयामुळे ते नेहमी आपल्या प्रेक्षकांच्या मनात अमर राहतील. आजदेखील संजीव कुमार यांचे चित्रपट पाहावे असे आहेत. संजीव कुमार यांचा अभिनय असो वा डान्स किंवा इतर कोणतीही ॲक्टिव्हीटी, त्यांची हेअरस्टाईल नेहमी मेनटेन असायची. अनेक दमदार अॅक्शन सीन्स केल्यानंतर देखील संजीव कुमार यांचे केस हलायचे नाही. संजीव कुमार यांचा ६ नोव्हेंबरला स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांच्या आयुष्याचा आणि करिअरचा आढावा थोडक्यात जाणून घेऊया.
* ९ जुलै, १९३८ रोजी जन्मलेले अभिनेते संजीव कुमार यांचं खरं नाव हरीहर जेठालाल जरीवाला असं होतं.
* सूरतमध्ये त्यांचा जन्म झाला. सुरुवातीला ७ वर्षे तेथे राहिल्यानंतर त्यांचे कुटुंबीय मुंबईला आले.
*संजीव कुमार यांनी स्टेजवर अभिनय करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ते इंडियन नॅशनल थिएटरशी जोडले गेले.
*हम हिंदुस्तानी (१९६०) संजीव कुमार यांचा पहिला चित्रपट होता. त्यांनी अनेक चित्रपटात छोट्या-मोठ्या भूमिका केल्या. या भूमिकेतूनच त्यांना अभिनेता म्हणून ओळख मिळाली.
*१९६८ मध्ये रिलीज झालेला 'राजा और रंक' या चित्रपटाच्या यशानंतर संजीव कुमार बॉलिवूडमध्ये मागे वळून पाहावे लागले नाही.
*संघर्ष (१९६८) मध्ये ते दिलीप कुमार यांच्यासोबत एका छोट्या भूमिकेत दिसले. परंतु, या चित्रपटात त्यांनी आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्याबरोबरच दिलीप कुमार यांचंही मन जिंकलं.
* संजीव कुमार वृध्द व्यक्तीची भूमिका साकारण्यासाठी ओळखले जायचे. २२ वर्षांचे असताना त्यांनी एका नाटकात वृध्द व्यक्तीची भूमिका साकारली होती.
* १९७२ मध्ये गुलजार यांनी संजीव कुमार यांचा 'सुबह-ओ-शाम' हा चित्रपट पाहिला. गुलजार यांना संजीव यांचा अभिनय आवडला होता. त्यानंतर गुलजार आणि संजीव कुमार यांनी मिळून (१९७३), आंधी (१९७५), मौसम (१९७५), अंगूर (१९८०), नमकीन (१९८२) यासारखे चांगले चित्रपट केले.
*'नया दिन नई रात' (१९७४) मध्ये संजीव कुमार यांनी ९ भूमिका करून आपल्या अभिनयाची छाप सोडली. संजीव कुमार यांनी आपल्या करिअरमध्ये प्रत्येक प्रकारच्या भूमिका केल्या.

* संजीव कुमार यांच्या फॅमिलीत कुठलाही पुरुष ५० वर्षांपेक्षा अधिक आयुष्य जगू शकला नाही. संजीव यांनाही नेहमी वाटायचं की, आपणही अधिक वर्षे जगू शकणार नाही. त्यांचा लहान भाऊ नकुल यांचा मृत्यू संजीव यांच्याआधीच झाला होता. नंतर ६ महिन्यांनी त्यांचे मोठे भाऊ किशोर यांचे निधन झालं. संजीव कुमार यांचं देखील वयाच्या ४७ व्या वर्षी निधन झालं. ६ नोव्हेंबर १९८५ ला त्यांनी जगाचा निरोप घेतला.
* 'शोले' चित्रपटात संजीव कुमार यांनी ठाकूरची भूमिका केली होती. ही भूमिका धर्मेंद्र यांना करायची होती. दिग्दर्शक रमेश सिप्पी हे विचारात पडले. त्यावेळी धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्या प्रेमात होते. त्याचबरोबर संजीव कुमार देखील हेमा यांच्यावर प्रेम करत होते. रमेश सिप्पी धर्मेंद्र यांना म्हणाले, 'तुला वीरूची भूमिका करताना जास्तीत जास्त हेमासोबत रोमान्स करण्याची संधी मिळेल. जर तू ठाकूरची भूमिका केली तर मी संजीव कुमारला वीरूची भूमिका देईन.' त्यामुळे धर्मेंद्र यांनी ठाकूरची भूमिका सोडली. ठाकूरच्या भूमिकेमुळेच संजीव कुमार यांना आज देखील स्मरणात आहेत.

* संजीव कुमार यांना हेमा मालिनी आवडायच्या. परंतु, हेमा यांच्या आयुष्यात धर्मेंद्र आले. दरम्यान, संजीव यांचं नाव सुलक्षणा पंडितशी जोडलं गेलं. त्यांच्या अफेअरची चर्चा होऊ लागली.
* एक अभिनेता म्हणून संजीव कुमार यांचा धाक होता. त्यांच्यासोबत काम करणार्या अनेक कलाकारांचं म्हणणं होतं की, त्यांच्यासोबत काम करणं कठीण आहे. असं म्हटलं जातं की, 'विधाता' चित्रपटात दिलीप कुमार हे संजीव कुमार यांच्यासोबत शॉट देण्यासाठी लवकर तयार व्हायचे नाहीत.
* शत्रुघ्न सिन्हा, सचिन आणि अमिताभ बच्चन यांच्याशी संजीव कुमार यांची चांगली मैत्री होती.

* संजीव कुमार यांना दोन वेळा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 'दस्तक' (१९७१) आणि 'कोशिश' (१९७३) या चित्रपटासाठी हे पुरस्कार मिळाले होते. १४ वेळा फिल्मफेअर पुरस्कारासाठी ते नॉमिनेट झाले होते. दोन वेळा उत्कृष्ट अभिनेता (आंधी-१९७६ आणि अर्जुन पंडित-१९७७) आणि एक वेळ उत्कृष्ट सहाय्यक अभिनेता (शिकार-१९६९) चा ॲवॉर्ड जिंकला होता.
*एकदा अभिनेत्री नूतन यांनी संजीव कुमार यांच्या श्रीमुखात लावली होती. त्यावेळी नूतन आणि संजीव यांच्याबद्दल अफेअरचे वृत्त पसरले होते. त्यामुळे नूतन यांच्या वैवाहिक आयुष्यात वादळ आलं होतं. नूतन यांना वाटलं की, या सर्व गोष्टी संजीव पसरवत आहेत. ते आमने-सामने आल्यानंतर नूतन यांनी संजीव यांच्या श्रीमुखात लगावली.

*सूरतमध्ये एक रस्त्याचे नाव आणि एका शाळेचे नाव संजीव कुमार यांच्या नावाने ठेवण्यात आलं होतं. २०१३ मध्ये एक टपाल तिकिट देखील संजीव कुमार यांच्या स्मरणार्थ काढण्यात आले होते.
*संजीव कुमार हे आपला दमदार अभिनय आणि त्यातील विविधतेसाठी ओळखले जात होत. त्यांनी आपल्या करिअरमध्ये आव्हानात्मक भूमिका केल्या. रोमँटिक, हास्य आणि गंभीर भूमिका त्यांची खासियत होती.
*संजीव कुमार यांच्या निधनानंतर १० पेक्षा अधिक त्यांचे चित्रपट रिलीज झाले. काही चित्रपटांचे शूटिंग अपूर्ण राहिले. नंतर कथेत फेरबदल करून ते चित्रपट प्रदर्शित करण्यात आले. १९९३ मध्ये संजीव कुमार यांचा शेवटचा चित्रपट 'प्रोफेसर की पडोसन' प्रदर्शित झाला होता.
No comments:
Post a Comment