Saturday, January 9, 2021

मराठी अभिनेत्रींनी बिकिनी घातली म्हणून कुठं बिघडलं?

 




आधी बिकिनी म्‍हटलं की, लोक तोंडात बोटे घालयचे. पण, कालांतराने विचार बदलले. काळाच्‍या ओघात बिकिनीवर चर्चा होऊ लागली. आणि त्‍याचा वापरही सर्रास होऊ लागला. आता बिकिनी ही फॅशन होऊन गेली आहे. विशेषत: सेलिब्रिटी कुठलाही संकोच न ठेवता बिनधास्‍तपणे सेक्‍सी बिकिनीत फोटोशूट करतात. काही वेळा या सेलेब्‍सना बिकिनीवरून ट्रोल केले जाते. परंतु, त्‍या सेलेब्‍सकडून त्या-त्यावेळी सडेतोड उत्तर दिले गेलं आहे. 

Unseen Pictures of Mithila Palkar In Bikini | IWMBuzz

काही दिवसांपूर्वी, अमृता देशमुख या मराठमोळ्या अभिनेत्रीने बिकिनीतील काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. परंतु. फोटोचा कमेंट बॉक्स मात्र हाईड केला होता. कदाचित फालतू कमेंट्सना सामोरं जावं लागू नये म्हणून तिने कमेंट्स बॉक्स बंद ठेवला असावा, असा तर्क नंतर काढला गेला. आज अभिनेत्री सोशल मीडियावर बिकिनी फोटोज शेअर केलेले दिसतात. त्‍याची चर्चाही होताना दिसतेय. 

sonalee kulkarni hot | Sonalee kulkarni, Bollywood actress bikini, Bikinis

असे काही सेलेब्‍स ज्‍यांनी बिकिनीतही फोटोशूट केले आहेत. किंबहुना ती गरजचं बनली आहे. आज वैयक्तिक हौसेखातीर, जाहिरातीसाठी, चित्रपटाची मागणी म्हणून तर काही वेळा स्पर्धेसाठी बिकिनीकडे गरज म्हणून पाहिले जाते.

Sonali Raut's latest bikini pictures take the internet by storm | PINKVILLA

बॉलिवूड, हॉलिवूड असो वा टॉलिवूड, एकेकाळी अपवादात्‍मक चित्रपटांमध्‍ये वापरण्‍यात येणारी बिकिनी आज सर्रास वापरली जाते. केवळ अभिनेत्रींच नाही तर उच्‍च-मध्‍यमवर्गीय महिलांमध्‍ये बिकिनी घालण्‍याची फॅशन रूजली आहे. मग मराठी अभिनेत्रींनी बिकिनी का घालू नये? लोक कय म्हणतील अथवा ट्रोलर्सना कसं सामोरं जायचं, हे लक्षात घेऊन अनेक जणी मात्र कमेंट बॉक्स खुले न ठेवता बंद ठेवतात. (अमृता देशमुखने बिकिनीतील फोटो अपलोड करून कमेंट बॉक्स बंद ठेवला होता) पण, आज सर्वाधिक फॅशन आहे ती बिकिनीची. एखाद्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर स्विमिंग पूल बिकिनी, बीच बिकिनी शेअर केला तर त्याची चर्चा होताना दिसतेच. 

हिंदी अभिनेत्रींबद्दल बोलायचं झालं तर मंदिरा बेदी 'क्योंकि सास भी बहू थी'मधून सिंपल इमेजमधून बाहेर पडली आणि तिने बिकिनीत फोटोशूट केलं. जेव्हा हे फोटोज व्‍हायरल झाले तेव्हा तिची जोरदार चर्चादेखील झाली होती. सोनम कपूर, आलिया भट्ट, ईशा देओलदेखील चित्रपटांतून बिकिनीत दिसल्या होत्या. तर नव्‍वदच्‍या दशकात काजोल फेमस झाली होती ते बिकिनीमुळेच. सुपरहिट चित्रपट 'बाजीगर'मध्‍ये काजोलचा बिकिनीतला एक सीन आहे. रिचा चड्ढा, तापसी पन्नू, राखी सावंत, तनुश्री दत्ता, इरा खान यासारख्या अभिनेत्री, सेलेब्स आपल्या बोल्ड अदा बिकिनीच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर दर्शवल्या होत्या. 

Pin on MARATHI ACTRESS BOLD N BEAUTIFUL

अनेकदा बिकीनी फोटोज किंवा शॉर्ट कपड्यांवरून अभिनेत्रींना फालतू कमेंट्सना सामोरं जावं लागतयं. परंतु, चमचमत्या दुनियेत स्पर्धेचं आव्हान बनलं आहे. सिनेविश्वात टिकून राहण्यासाठी आणि प्रकाशझोतात येण्यासाठी विविध पध्दती, कल्पना वापरल्या जातात. मध्यंतरी, दीपिका पादुकोणने इंटरनॅशनल एल मॅगझीनसाठी फोटोशूट केला होता. रॅम्‍पवर उतरणार्‍या मॉडल्‍स आपल्‍या फॅशनबरोबरच सौंदर्य आणि टॅलेंट मांडतात. काही मॉडल्‍स लक्ष वेधण्‍यासाठी चक्क बिकिनी घालून रॅम्पवर उतरतात. डायमंड बिकिनीमध्‍ये वॉक केलेली मॉडल एल्सा होस्कचे याचे उत्तम उदाहरण सांगता येईल. तिच्या बिकिनीमध्‍ये २ हजार १०० हून अधिक डायमंड आणि किंमती स्टोन लावलेले होते. १० लाख डॉलर म्‍हणजेच जवळपास ७ कोटी १९ लाख रुपयांची बिकिनी घालून तिने रॅम्पवॉक केला होता. चमचमणारे डायमंड आणि एल्‍साचे सौंदय पाहून सर्वजण अवाक राहिले होते. 

Pin by Bharat on Neha Pendse | Bollywood actress hot, Bollywood actress hot  photos, Beautiful bollywood actress

मराठमोळ्या अभिनेत्रींचं सांगायचं झालं तर अनेक मराठी अभिनेत्रींनी खूप आधी बिकीनीमधील फोटो शेअर केले आहेत. यात सई ताम्हणकर, नेहा पेंडसे, रसिका सुनील अशा अनेक अभिनेत्रींचा समावेश आहे. 

याआधीही अनेक मराठी अभिनेत्रींनी बिकीनीमधील फोटो शेअर केलेत. यात सई ताम्हणकर, नेहा पेंडसे, रसिका सुनिल अशा अनेकींचा समावेश आहे. स्मिता गोंदकर , अमृता खानविलकर, मिथिला पालकर, हिना पांचाळ, श्वेता साळवे, सोनाली राऊत, श्रुती मराठे, नेहा जोशी, मानसी नाईक या दिग्गज अभिनेत्रीदेखील मागे नाहीत. बिकिनीमध्ये बिनधास्त पोझ देणाऱ्या या अभिनेत्रींची 'बात कुछ औरही' आहे. 

Smita gondkar actress hot look marathi bigg boss pappi de parula song bikini  photoshoot 'पप्पी दे पारूला' अभिनेत्री स्मिता गोंदकरचा हॉट लूक

बिकिनीचं डिझाईन कोणी तयार केलं? 

बिकिनीचं डिझाईन कोणी व कसं तयार केलं, माहिती आहे का? बिकिनीचे डिझाईन ज्‍यांनी तयार केलं तो फॅशन डिझायनर नव्‍हता. तर तो एक इंजिनिअर होता. त्याचं नाव लुईस लेअर्द (मूळचा फ्रान्‍सचा) होतं. बिकिनी आल्‍यानंतर बराच काळ याची जाहिरात आली नव्‍हती. कुठलीही मॉडल बिकिनीमध्‍ये जाहिरात करायला तयार होत नसे. मग, काही काळानंतर १९ वर्षांची पॅरिसची एक डान्‍सर, मॉडल 'मिशेलिन बर्नरदिनी' ही बिकिनीमध्‍ये जाहिरात करायला तयार झाली. असं म्‍हटलं जातं की, जशी ही बिकिनी जाहिरात समोर आली चाहत्‍यांकडून मिशेलाइनला ५० हजार पत्रे मिळाली होती.

Neha Joshi did a photoshoot in bikini - मराठीshoots

काळाच्‍या ओघात बिकिनीची जादू लोकांवर झालेली पाहायला मिळाली. आज चित्रपटांमध्‍ये बिकिनीचा वापर सर्रास झाला आहे. मॉडलिंगच्‍या दुनियेत बिकिनी शूट आणि फॅशन शो अधिक प्रसिध्‍द होऊ लागला आहे. आज मिस वर्ल्ड, मिस युनिव्‍हर्स आणि मिस इंडिया यांसारख्‍या स्‍पर्धांमध्‍येदेखील बिकिनी कॉम्‍पिटिशन ठेवलं जातं.

Shruti Marathe ups the heat with her bikini look; See pictures - Times of  India

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...