Monday, December 9, 2024

चाळीस प्रकारचे नॅपकिन बुके बनवणारे व्यावसायिक नंदकुमार दिवटे

mpatel@sarthaglobal.com 

Warm Regards,
Minal Jaysinh Patel
Associate Director - PR
Ph: 9920700448

Sartha Global Marketing LLP

6A, Second Floor, Vastu Central, JK Sawant Marg, Dadar (West), Mumbai- 400028 

Follow us:

Facebook Icon   Icon

Description automatically generated   Linkedin Icon

99999999999999999999999999999999999999999999999999999


aspirepr.lifestyle@gmail.com Sneha Thevar
Aspire Communications
 
m: 8369232106
e: aspirepr.lifestyle@gmail.com
 

https://khattamitha.blogspot.com/2008/03/2_22.html
https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g651646-d1310716-Reviews-Makara_Village-Gokarna_Uttara_Kannada_District_Karnataka.html
https://www.google.com/maps/place/Madikeri,+Karnataka+571201/@12.4244205,75.7381856,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipM0MiY37tXhw7nsld9PczRgaKalsPJBAH3_HVxs!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipM0MiY37tXhw7nsld9PczRgaKalsPJBAH3_HVxs%3Dw222-h100-k-no!7i4624!8i2080!4m7!3m6!1s0x3ba50075627a7fff:0xaf8a66ea4651c1a6!8m2!3d12.4244205!4d75.7381856!10e5!16zL20vMDF4OWJ4?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MTAxMy4wIKXMDSoASAFQAw%3D%3D
 kanadukathan
https://khattamitha.blogspot.com/2008/03/2_22.html
https://www.tripadvisor.in/Hotel_Review-g651646-d1310716-Reviews-Makara_Village-Gokarna_Uttara_Kannada_District_Karnataka.html
https://www.google.com/maps/place/Madikeri,+Karnataka+571201/@12.4244205,75.7381856,3a,75y,90t/data=!3m8!1e2!3m6!1sAF1QipM0MiY37tXhw7nsld9PczRgaKalsPJBAH3_HVxs!2e10!3e12!6shttps:%2F%2Flh5.googleusercontent.com%2Fp%2FAF1QipM0MiY37tXhw7nsld9PczRgaKalsPJBAH3_HVxs%3Dw222-h100-k-no!7i4624!8i2080!4m7!3m6!1s0x3ba50075627a7fff:0xaf8a66ea4651c1a6!8m2!3d12.4244205!4d75.7381856!10e5!16zL20vMDF4OWJ4?entry=ttu&g_ep=EgoyMDI0MTAxMy4wIKXMDSoASAFQAw%3D%3D

https://en.wikipedia.org/wiki/Makara#/media/File:Lintel_corner_with_makara_rider_1.jpg


https://www.google.com/maps/place/yelandur+chamarajanagar+karnataka/data=!4m2!3m1!1s0x3baf235e0fda8ef5:0x8121d2027f164d32?sa=X&ved=1t:242&ictx=111

https://en.wikipedia.org/wiki/Makara#/media/File:Lintel_corner_with_makara_rider_1.jpg


https://www.google.com/maps/place/yelandur+chamarajanagar+karnataka/data=!4m2!3m1!1s0x3baf235e0fda8ef5:0x8121d2027f164d32?sa=X&ved=1t:242&ictx=111

***************


नंदकुमार दिवटे हे कोल्हापूरचे नॅपकिन बुके व्यावसायिक. तब्बल ४० प्रकारचे बुके तयार करणारे व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांची पत्नी उल्का नंदकुमार दिवटे आणि उल्का यांची मैत्रीण ममता जोशी यांच्या साथीने कोरोना काळात सुरु केलेला व्यवसाय यशस्वी ठरला. आजपावेतो वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या ऑडर्स घेणे आणि हँडमेड नॅपकिन बुके तयार करणे इतकेच नाही तर कमी वेळात उत्तम दर्जाचे नॅपकिन बुके ग्राहकांपर्यंत योग्य वेळेत पोहोचवणे, यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. केवळ इतकेच नाही तर काळानुरुप या नॅपकिन बुकेच्या निर्मितीमध्ये कल्पकता आणून ग्राहकांना हवे तसे बुके तयार करून देण्यात हे दिवटे जोडपे माहिर आहे. यासाठी ममता जोशी यांचीही मोलाची मदत मिळत आहे.

लॉकडाऊन काळात उल्का दिवटे यांची ममता जोशी यांच्याशी खास ओळख झाली. पुढे व्यावसायिक संबंध निर्माण झाले. या दोघींच्या कल्पनेतून लॉकडाऊनच्या काळात नॅपकिन बुकेची संकल्पना समोर आली. मोठ्या प्रमाणावर फुलांचे बुके जे मार्केटमध्ये येतात, ते सर्व काही दिवसांनी नष्ट होतात. यामध्ये २ ते ५ हजार रुपयांपर्यंतचे ओरिजनल फुलांचे बुके वाया जातात. पण नॅपकिन बुके खरेदी केल्यानंतर त्यास जसेच्या तसे ठेवता येते. बुकेतील नॅपकिन वापरले नाही तरीही बुके इतरांना देता येऊ शकतो. काही वेळा ते शोपीस म्हणूनही ठेवता येते. हिच संकल्पना डोळ्यासमोर ठेऊन नॅपकिन बुकेचा व्यवसाय सुरु झाला.
*असं घेतलं प्रशिक्षण*
दिवटे हे प्रसारमाध्यमांत कार्यरत होते. हे काम करता करता त्यांनी ही कल्पना नव्याने सुचली. मुळात आपण काहीतरी   उद्योग करावा, अशी त्यांची इच्छा होती. त्यानुसार त्यांनी नॅपकिन बुके तयार करण्याचं प्रशिक्षण इचलकरंजीमधून एका कारागिराकडून घेतलं. या उद्योगासाठी सुरुवातीला साधारणपणे ५०  हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. आता मासिक उलाढाल साधारण दोन लाख रुपयांपर्यंत होते.
*४० प्रकारचे बुके*
जवळपास ४० प्रकारचे बुके तयार केले जातात. त्यापैकी ८ हे रनिंग बुके तयार असतात. (बर्थडे वगैरे गिफ्ट देण्यासाठी). आणि इतर बुके ऑर्डर आल्यानंतरच तयार केले जातात. नॅपकिन बुके हा एक आकर्षक आणि उपयुक्त गिफ्ट पर्याय आहे. तो नेहमीच्या फुलांच्या बुकेपेक्षा वेगळा आणि टिकाऊ असतो. टेबल डेकोरेशन किंवा शोपीस म्हणून केला जातो. सुंदरपणे सजवलेले नॅपकिन डिनर सेटअप मध्ये वापरण्यासाठी उपयुक्त ठरतात.
*विविध हेतूंसाठी बनवले जातात नॅपकिन बुके*
पर्सनलाईज्ड नॅपकिन बुके - वाढदिवस असेल तर तुमचे नाव टाकून नॅपकिन बुके तयार केला जातो. किंवा नॅपकिनवरदेखील विविध सुविचार, टॅगलाईन्स, रोझ इमेज किंवा इतर हव्या त्या इमेजची एम्ब्रॉयडरी करून बनवली जाते. तसेच कपल बाथ टॉवेल बास्केट बुके (पुरुषासाठी ३० बाय ६० तर महिलासाठी २५ बाय ५५ फुल लेन्थ बाथ टॉवेल) लग्नासाठी, ॲनिव्हर्सरीसाठी तयार केले जातात.
 प्रोफेशनल नॅपकिन बुके - कंपनी, इंटस्ट्रीज यांच्या कार्यक्रमांसाठी लागणारे बुके त्या-त्या कंपनी, इंटस्ट्रीचे नाव टाकून बनवले जाते. रिटर्न गिफ्ट साठी देखील तयार केले जातात.
 फंक्शनल नॅपकिन बुके - व्हेरिएशन्स आणि सुंदर लग्नासाठी भेट म्हणून लागणारे बुके, बाळंतविडा बुके, लहान मुलांसाठी कार्टुनचे नॅपकिन असणारे बुके बनवले जातात. डोहाळे जेवण किंवा बाळंतविडा बुके जो आहे, त्यामध्ये बाळासाठी लागणारे कपडे, सुरके-टोपडे तसेच लहान मुलांसाठी चॉकलेट गाडीचे डिझाईन करून बनवले जातात.
 क्रिडाई, एलआयसी, गोशिमा, मेडिकल असोसिएशन, डेंटल असोसिएशन असे अनेक त्यांचे ग्राहक आहेत. शिवाय, सरकारी अधिकारी, निवृत्त व्यक्तीसाठी, राजकीय कामांसाठी, वृद्धाश्रमातील कार्यक्रमासाठी ऑर्डर घेतल्या जातात. लातूर, नांदेड, पुणे, रत्नागिरी, कोकण, गारगोटी, गडहिंग्लज  याठिकाणी बुके निर्यात केले जातात. नांदेड मधील प्रसिद्ध विश्व बाजार साठी नॅपकिन बुके पाठवली जातात.
*उपलब्ध जागेत तयार करता येतात बुके*
ऑर्डर प्रमाणे दिवसा कमीत कमी ७५ ते जास्तीत जास्त १०० करता येतात. बुके तयार करण्यासाठी खास अशा जागेची गरज नसते. आपल्या घरात, मोकळ्या जागेत अथवा दुकानात थोडी फार जागा असेल तरीही तिथे बुके तयार करता येतात. राजकीय क्षेत्रातील वाढदिवस, लग्नसराई, साखरपुडा, सेवानिवृत्ती, बक्षीस समारंभ अशा विविध कार्यक्रमांसाठी नॅपकिन बुकेंची मागणी अधिक असते.
*सोलापूरमधून मागवले जातात नॅपकिन्स*
सर्व बुकेसाठी लागणारे नॅपकिन सोलापूरमधून मागवली जातात. रॅपर (कापड) प्रिंट करून घेतले जातात. या रॅपरवर मागणीनुसार नावे, लोगो, जाहिरात प्रिंट करून दिली जाते. नॅपकिन रोल करून पिनअप करून त्याला फुलासारखा आकार दिला जातो. यामध्ये ४० रुपयांपासून १००० रुपयांपर्यंत आणि एक सिंगल नॅपकिनपासून ८ नॅपकिनपर्यंत बुके तयार केले जातात. नॅपकिन हे टर्किश प्रकारातील असतात
*विविध साईजमध्ये तयार केले जातात बुके*
बुकेमध्ये नॅपकिनचे विविध साईजमध्ये उपलब्ध होतात. त्यानुसार, १ फूट बाय २ फूट, २ फूट बाय अडीच फूट, दीड फूट बाय अडीच फूट, २ बाय ३ फूट अशा नॅपकिन साईजमध्ये ते बनवले जातात. कुणाची मागणी असेल तर ३ फुटाचे नॅपकिन वापरूनदेखील बुके तयार केला जातो. त्या साईजप्रमाणे बुकेचे दर ठरतात. सर्वोत्तम नॅपकिन बुकेची विक्री ७०० ते ८०० रुपयांना होते.
 ममता जोशी यांचेही अमूल्य सहकार्य
उल्का दिवटे यांच्या मैत्रीण ममता जोशी यांचेही या व्यवसायासाठी अमूल्य सहकार्य मिळते. मोठी ऑर्डर असेल किंवा काही अडचण आल्यास ममता जोशी स्वत: नॅपकिन बुके तयार करतात.
महिलांना प्रशिक्षण
तीन महिलांना यासाठी खास प्रशिक्षण देण्यात आले आहे. बुकेंची अधिक मागणी वाढल्यास या महिला बुके बनवून देण्यासाठी हातभार लावतात.
आता हळूहळू नॅपकिन बुके तयार करून विकण्याची स्पर्धा वाढत आहे. पर्यावरणपूरक असल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण यातून होत नाही. शिवाय ताज्या फुलांपेक्षा नॅपकिन बुके अधिक टिकाऊ आणि पर्यावरणास अनुकूल आहे. तो डिस्पोजेबल नसल्यामुळे प्लास्टिक वेस्ट कमी होतो. कमी वेळेत आणि अधिक नफा मिळवून देणारा शिवाय कलात्मक असल्याने आणि वेळखाऊ नसल्याने हा नॅपकिन बुके सध्याच्या काळात एक नवीन आणि लोकप्रिय ट्रेंड बनला आहे.
नॅपकिन बुके व्यावसायिक नंदकुमार दिवटे, कोल्हापूर. मोबाईल क्र. - ९८२२८७२६८८

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...