टिंबर मार्केटचे फर्निचर व्यापारी अनिल वसंतराव काशीकर. कोल्हापुरातील प्रसिद्ध टिंबर मार्केट मधील व्यावसायिक उद्योजक हे प्रसिद्ध लाकडांचे व्यावसायिक म्हणून प्रसिद्ध आहेत. विविध प्रकारच्या लाकडांपासून वस्तू बनवणे आणि त्याचा पुरवठा करणे, असा त्यांचा उद्योग आहे. टिंबर मार्केटमध्ये विविध कलाकृती बनवण्याचा कारखाना आहे. आणि तयार झालेल्या वस्तूंसाठी स्वतंत्र अशी आर्ट गॅलरी देखील आहे. काशीकर यांनी बनवलेल्या लाकडी वस्तूंसारख्या कलाकृती कोल्हापुरात इतरत्र कुठेही मिळणार नाही. अनिल वसंतराव काशीकर हे लाकडी उत्पादनांचे व्यावसायिक आहेत. शिवाय अनेक चित्रपट, लघुपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले आहे. चित्रपट व्यवसाय सुरु असतानाच त्यांनी लाकडी वस्तूंचे उत्पादन बनवण्याचा छंद जोपासला. हा छंद पुढे दुय्यम व्यवसाय म्हणून नावारुपास आला तो आज त्यांचा मुख्य व्यवसाय म्हणून अविरतपणे सुरु आहे.
'धमाल बाळाची' आर्ट गॅलरी
'धमाल बाळाची' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला चित्रपट आहे जो पडद्यावर अद्याप आलेला नाही. यावरूनच त्यांनी धमाल बाळाची आर्ट गॅलरी असे नाव ठेवले. चित्रपट व्यवसायाला १९८४ पासून सुरुवात केली. विविध कलाकृती तयार करण्याची आवड तर होतीच. नंतर १९८६ मध्ये दुय्यम व्यवसाय म्हणून लाकडाचा उद्योग सुरू केला. छोटे-मोठे व्यवसाय करताना लाकूड संबंधित कामे ते करू लागले. त्यावेळी १२ सुतार हाताखाली घेऊन कामाची सुरुवात केली. अमित वॉल पोस्टर्स नावाचे दुकाने थाटले. लाकडांपासून बनवलेल्या विविध वस्तू, कलात्मक कृती या दुकानात विक्रीसाठी ठेवले जायचे. पुढे जाऊन हे नाव बदलून 'धमाल बाळ्याची' असे नाव ठेवले. आता काशीकर संपूर्णपणे लाकूड उद्योगात उतरले आहेत.
बहुतांशी वस्तू हँडमेड
आर्ट गॅलरीमध्ये कलात्मक वस्तू व कॅनवास पेंटिंग उपलब्ध होतात. काशीकर हे स्वतःच्या कारखान्यात या वस्तूंचे उत्पादन करतात. कॅनव्हास पेंटिंग्ज, कार्विंग, सागवानी फ्रेममधील कलाकृती येथे तयार केल्या जातात. यासाठी सुरुवातीला लाकूड उद्योगधंद्याचा अभ्यास केला. या उद्योगाचा फारसा अनुभव नसताना स्वहिमतीवर हा उद्योग त्यांनी उभारला. चित्रपट व्यवसायातून जे काही पैसे मिळत होते, ते या लाकूड उद्योगात गुंतवले. हळूहळू उद्योग वाढीस लागला आणि होलसेल मालाचा पुरवठा ते करू लागले. सुरुवातीला पाट, पोळपाट, रवी, विळती अशा घरगुती लागणाऱ्या वस्तू तयार केल्या जात होत्या. यासाठी मुंबईहून 'ड्राय लाकूड' (मशीनद्वारे लाकडातील सर्व पाण्याचा अंश काढून टाकला जातो) आणले जात असे. वस्तू बनवण्यासाठी पाईन लाकूड वापरले जात होते.
हँडमेड वस्तूंची खासियत
आता पाट, पोळपाट, लाटणे, मंदिरे, चौरंग, कॅनव्हासच्या फ्रेम्स, कॅनव्हास पेंटिंग्ज, खेळणी, कोरीव काम केलेल्या वस्तू बनवल्या जातात. या कलात्मक वस्तूंसाठी सागवान लाकडाचा वापर केला जातो. लायटिंगचे देव्हारे, देवदेवतांचे फोटो असणारे कार्व्हींग्ज देखील त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. लायटिंगमध्ये देव्हारे दीड हजार ते ४ हजार पर्यंत किंमती आहेत.कच्च्या मालामध्ये लाकूड, यंत्र, ड्रिल्स, आणि गाईडर्स अशी मशीन्स लागतात. या वस्तू हँडमेड असतात. क्वचितच काही गरज भासल्यास मशीनचा वापर केला जातो .लाकूड घेतल्यानंतर मशीनवर कार्विंग किंवा डिझाईन केलं जातं. सागवान लाकूड टिकाऊ असल्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये किंवा कोणत्याही काळात उत्तम टिकते. शिवाय पॉलिश केल्यामुळे या वस्तूंना त्यांची चमक टिकून राहते. पॉलिशमध्ये केमिकल, लाख, चंद्रस असतो. त्यामुळे टिकाऊपणा वाढतो. शिवणसारखी हलक्या लाकडांना वाळवी लागते. पण दर्जेदार लाकूड वापरल्याने वाळवी लागत नाही. वर्षानुवर्षे वस्तू जशी आहे, तशी टिकून राहते.
उत्तम दर्जाचे लाकूड

No comments:
Post a Comment