Tuesday, February 25, 2025

सचिन पाटील यांचा ग्लास उद्योग महाराष्ट्रात भारी

             


टिंबर मार्केटमधील सचिन माधवराव पाटील हे एक कोल्हापूरचे मोठे उद्योजक आहेत. सम्राटनगरचे मिरर आणि ग्लासचे डील उद्योजक म्हणून त्यांची ख्याती आहे. फर्निचर ग्लास, ॲल्युमिनिअम विंडो ग्लास, टफन ग्लास, काचेवर जे डिकोरेटिव्ह-डिझाईन असतं ते इचिंग, डायमंड पॉलिश, बेंड ग्लास, बिव्हिलिंग सर्व प्रकारच्या काचा हव्या तशा डेकोरेटिव्ह करून देणे अशी डील केल्या जातात. विविध प्रक्रिया करून काचेला एखाद्या दागिन्यासारखा घडवणे, विविध कोरीव नक्षीकाम करणे, पेंटिंग करणे अशा अनेकविध किमया करण्याची कला सचिन यांच्याकडे आहे.

काच हाच उद्योग निवडण्यामागे हे होतं कारण त्याकाळी काच कारखाने अधिक नसल्यामुळे आपण काच उद्योग सुरु करावा, असे त्यांनी ठरवलं. स्पर्धा देखील त्यावेळी कमी होती.




भाड्याच्या दुकानात सुरु केला उद्योग

१५ बाय २० फुटाच्या दुकानात सचिन यांनी या ग्लास उद्योगाची सुरुवात केली होती. खिडक्यांचा उद्योग सुरुवातील उभा केला. त्यामध्ये ॲल्युमिनिअम खिडक्या, लाकडी खिडक्या, फर्निचरची काच, टेबल टॉप, टी-पॉय या वस्तूंचा समावेश होता. या उद्योगाला उत्तरोत्तर चांगला प्रतिसाद मिळत गेल्याने हाच व्यवसाय पुढे विस्तारला.



असा सुरु झाला काच कारखाना

१९९७ साली सुरु झालेला हा कारखाना सध्या टिंबर मार्केट, कोल्हापूर येथे आहे. वयाच्या २६ व्या वर्षी त्यांनी कोणतीही पार्श्वभूमी नसताना सचिन यांनी उद्योजक होण्याचं स्वप्न साकारलं. वडील वकील होते. सचिन यांनी एम कॉमचे शिक्षण घेतले आहे. भावोजी टाईल्स उद्योगात होते. त्यामुळे इच्छापूर्ती करण्यासाठी ते काच उद्योगात उतरले. एम कॉम २०१६ मध्ये पूर्ण केलं. कायमची नोकरी न करता उद्योजक व्हायचं, असा ठाम निर्णय सचिन यांनी घेतला होता.



इतक्या कमी भांडवलात सुरु केला उद्योग

सचिन यांनी सुरुवातीला २-३ महिने पुण्याला काच दुकानात (पुणा ग्लास डेपो) नोकरी केली. आणि त्याच अनुभवातून त्यांनी स्वत:चा छोटेखानी दुकान सुरु केलं. सचिन यांनी एक ते दीड लाखात या उद्योगात गुंतवणूक केली. खूप काळजीपूर्वक आणि मेहनतीचे काम असले तरी त्यांनी आपला उद्योग अविरतपणे सुरु ठेवला. ऑर्डर घेणे, बाहेरुन माल तयार करून आणून ग्राहकाला देणे, असे पहिली २-३ वर्ष सुरु होते.




ऑफिस कामासाठी लागणाऱ्या काचा, प्रायव्हसीसाठी लागणारी काच, इंटिरिअर डिझायनर्सच्या मागणीनुसार, तशी काच घडवून तयार केली जाते. काचेचा उद्योग आता इतका मोठा झाला आहे की, त्यामध्ये फिगर ग्लासेस, डिझायनच्या ग्लासेस, मॉलला लागणाऱे प्लेन ग्लास, ऑफिससाठी रिफ्लेक्टिव्ह ग्लास, साऊंड प्रुफ ग्लास, डीजेओ ग्लास (आतील आवाज बाहेर जात नाही आणि बाहेरचा आवाज आत येत नाही), केनोपिला ग्लास (कार पार्किंगसाठी वापरण्यात येणारी काच), अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून प्रतिबंध करण्यासाठीची काच तयार करून दिले जातात. इंपिरिअर ब्ल्यू, फॉरेस्ट जीन या काचांमुळे अल्ट्राव्हायोलेट किरणांपासून बचाव होतो. इमारतीला स्ट्रक्चर ग्लेझिंगसाठी या काचा वापरल्या जातात. इतकेच नाही तर या काचेपासून वीजबील अधिक येत नाही. शिवाय एसीदेखील कुलिंग पटकन होते.  



विविध राज्यांतून मागवली जाते काच

फिगर ग्लास, प्लेन काच, रिफ्लेक्टिव्ह काच, टफन ग्लास चेन्नई, पेरुमल्लूर, भरुच गुजरात या ठिकाणांहून या काचा मागवल्या जातात.





*कच्ची उत्पादने अन्‌  लाखोंच्या मशीन्सवर काम*

स्टिकर्स, प्रोटरवर्क, कॉम्प्युटर प्रिंट, रंग, गम असे कच्ची उत्पादने लागतात. ही उत्पादने मुंबई आणि अहमदाबादवरून होलसेल मागवली जातात. स्टेटलाईन डायमंड पॉलिश मशीन, बिव्हिलींग मशीन, कॉम्प्रेसर, कटिंग टेबल यासारख्या लाखोंच्या मशीनवर काम केले जाते. मिरर, बाहेरून येणाऱ्या काचेवर प्रक्रिया करून विविध उद्देशांसाठी काच बनवली जाते. चमचा, तलवार, काचेच्या ब्रिक्स, फ्लोअर आणि संपूर्ण बंगला (ग्लास हाऊस) देखील काचेपासून बनवता येतो. सर्व वस्तू काचेपासून बनवता येतात. शोपीस, तुमच्या फोटोची छबी देखील काचेच्या लूकमध्ये मॉडिफाय करून दिले जाते. काच कापण्यासाठी हिरकणीचा वापर केला जातो. (हिऱ्याचे अशुद्ध रुप असलेला धातू हिरकणीमध्ये वापरला जातो) यासाठी बेळगावहून ग्राहक कोल्हापुरात येतात.

खास प्रशिक्षित कामगार

सध्या २२ कामगार असून सर्वजण प्रसिक्षित आहे. सिंगल आणि डबल शिफ्टमध्ये साडे नऊ ते रात्री ८ पर्यंत काम चालते. कोरीव काम करण्यासाठी खास प्रशिक्षण घेतलेले कामगार आहेत. ग्लास कलर वापरून पेंटिंग्जदेखील तयार केले जातात.  



या काचांना सर्वाधिक मागणी

सगळ्यात जास्त मागणी प्लेन काचेची (साडे एमएम पासून १९ एमएमएम) आहे. त्यामध्ये ४ बाय ८, ६ बाय ८, ७ बाय १२ अशा साईज असतात. एवढी रेंज मेंटेन करणे कोल्हापुरात कुणालाही जमू शकलेले नाही. खिडक्यांना ४ एमएमचं काच बसवावी लागते. रेलिंगला १२ एमएम काच बसवली जाते. याची सर्वाधिक मागणी आहे. २ एमएमच्या नाजूक काच ते १९ एमएमपर्यंत जाडीची काच बनवता येते. टेबल टॉप, मोठ्या फिश टँक (फरशी, म्युझियम, स्काय वॉक) साठी १९ एमएमची काच बसवली जाते. कोणत्याही प्रकारची नक्षी फोटो प्रतिमा दिली तर ती हुबेहूब काचेवर डिझाईन तयार करून दिली जाते. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक, विविध देवदेवतांच्या प्रतिमा, पादुका, निसर्ग चित्रे देखील काचेवर रेखाटता येतात.         


ग्राहकांचा असा जिंकला विश्वास.                         

माऊथ पब्लिसिटी आणि विश्वास या आधारावर व्यवसायाला चालना मिळत गेली. आता संपूर्ण महाराष्ट्रासह कोकण, गोवा, बेळगाव, निपाणी, कर्नाटक या ठिकाणी त्यांचे ग्राहक अधिक आहेत. सुरुवातीला एक लाख रुपयांचं कर्ज आणि वडिलांनी दिलेले 50 ते 60 हजार रुपये घेऊन सचिन यांनी व्यवसाय सुरू केला होता. आता सचिन ग्लासची वार्षिक आर्थिक उलाढाल अडीच ते तीन कोटी रुपये आहे वारणा बँक, तळवळकर जिम, रॉयल फ्रीस्टेज, स्टेट बँक, कॉसमॉस बँक, एचडीएफसी एटीएम, सायबर कॉलेजचे प्रोजेक्टसाठी त्यांनी काचेचा पुरवठा केला आहे. मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर होलसेल आणि रिटेलमध्ये सचिन यांचा ग्लास उद्योग भरारी घेत आहे.                                    

 *उद्योजक सचिन पाटील.                       
मोबाईल - 9822061455*

No comments:

Post a Comment

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...