Thursday, July 5, 2018

स्‍पेशल डे : 'बिकिनी' नावाची इंटरेस्‍टिंग स्‍टोरी

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 
एकेकाळी अपवादात्‍मक चित्रपटांमध्‍ये वापरण्‍यात येणारी बिकिनी आज सर्रास वापरली जाते. केवळ अभिनेत्रींच नाही तर उच्‍च-मध्‍यमवर्गीय महिलांमध्‍ये बिकिनी घालण्‍याची फॅशन रूजली आहे. अभिनेत्रींपासून मॉडल्सपर्यंत बिकिनीमध्‍ये हॉट फोटोशूट करणे ट्रेडिंग बनले आहे. तुम्‍हाला माहिती आहे का, बिकिनीची सुरुवात कधी आणि कशी झाली? बिकिनीचं डिझाईन कोणी केलं आणि त्‍याला बिकिनी नाव कसं देण्‍यात आलं, जाणून घेऊयात.
कुठलाही ड्रेस डिझाईन केल्‍यानंतर त्‍याला फॅशन डिझाईन असे म्‍हटले जाते. मात्र, बिकिनीचे डिझाईन ज्‍यांनी तयार केलं तो फॅशन डिझायनयर नव्‍हते. तर ते एक इंजिनिअर होते. ज्‍याचं नाव लुईस लेअर्द असं आहे. मूळचे फ्रान्‍सचे असणारे 'लुईस रियर्ड' यांनी ५ जुलै १९४६ ला पहिली बिकिनी तयार केली. तेव्‍हापासून 'बिकिनी डे' सेलिब्रेट केला जातो. 
बिकिनी नावाची इंटरेस्‍टिंग स्‍टोरी
बिकिनी हे नाव कसं पडलं? यामागे एक इंटरेस्‍टिंग कहाणी आहे. पहिल्‍यांदा ज्‍याठिकाणी बिकिनी तयार करण्‍यात आली त्‍या ठिकाणाचे नाव 'बिकिनी अटोल' होत. जे प्रशांत महासागरात आहे. त्‍याजागी अमेरिकेची अणू आणि शस्‍त्र चाचणीची परीक्षण करण्‍याचं ठिकाण होतं. 
Related image
बिकिनीची जाहिरात 
बिकिनी आल्‍यानंतर बराच काळ याची जाहिरात आली नव्‍हती. कुठलीही मॉडल बिकिनीमध्‍ये ॲड करायला तयार होत नसे. मग, काही काळानंतर १९ वर्षांची पॅरिसची एक डान्‍सर, मॉडल 'मिशेलिन बर्नरदिनी' ही बिकिनीमध्‍ये ॲड करायला तयार झाली. जशी ही बिकिनी ॲड समोर आली चाहत्‍यांकडून मिशेलाइनला ५० हजार पत्रे मिळाली होती, असे म्‍हटले जाते. 
स्पेन आणि इटलीत बॅन 
एक काळ असा होता की, ज्‍यावेळी स्‍पेन आणि इटलीत बॅन लावण्‍यात आलं होतं. परंतु, काही काळानंतर बॅन हटवण्‍यात आलं. १९५० पर्यंत मार्केटमध्‍ये बिकिनी आल्‍या. त्‍यानंतर अमेरिकेतही बिकिनीकडे कल वाढू लागला. १९६० मध्‍ये अमेरिकेने बिकिनीवरून बॅन हटवल्‍यानंतर लोकांचा बिकिनीकडील कल अधिक वाढलेला दिसून आला. लुईसच्‍या या अविष्‍काराचा ट्रेंड दुसर्‍या महायुध्‍दानंतर युरोपमध्‍ये वाढू लागला. 
Image result for swimsuit 1960
स्‍मॉल बाथिंग सूट
बिकिनीच्‍या आधी फॅशन डिझायनर हेम याने ॲटम नामक एक स्‍मॉल बाथिंग सूट तयार कलं होतं. परंतु, लुईसने ज्‍यावेळी बिकिनी लॉन्‍च केलं आणि हेमच्‍या ॲटम बाथिंग सूटपेक्षाही लहान ड्रेस असल्‍याचं सांगितलं, त्‍यावेळी हेमचा बाथिंग सूट मागे पडलं. 
Image result for katrina kaif swimsuit
काळाच्‍या ओघात बिकिनीची जादू लोकांवर झालेली पाहायला मिळाली. हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत बिकिनीचा वापर वाढला. आज चित्रपटांमध्‍ये बिकिनीचा वापर सर्रास झाला आहे. मॉडलिंगच्‍या दुनियेत बिकिनी शूट आणि फॅशन शो अधिक प्रसिध्‍द होऊ लागला आहे. समुद्र किनारी जाताना तरुणी बिकिनी घालण्‍यास प्राधान्‍य देतात. 
आज मिस वर्ल्ड, मिस युनिव्‍हर्स आणि मिस इंडिया यासारख्‍या स्‍पर्धांमध्‍ये बिकिनी कॉम्‍पिटिशन ठेवलं जातं. 

'या' सेलेब्‍सचं सेक्‍सी बिकिनी फोटोशूट ...

मुंबई : पुढारी ऑनलाईन 
आधी बिकिनी म्‍हटलं की, लोक तोंडात बोटे घालयची. पण, कालांतराने विचार बदलले. काळाच्‍या ओघात बिकिनीवर चर्चा होऊ लागली. आणि त्‍याचा वापरही सर्रास होऊ लागला. आता बिकिनी ही फॅशन होऊन गेली आहे. विशेषत: सेलिब्रिटी कुठलाही संकोच न ठेवता बिनधास्‍तपणे सेक्‍सी बिकिनीत फोटोशूट करतात. काही वेळा या सेलेब्‍सना बिकिनीवरून ट्रोल केले जाते. परंतु, त्‍या सेलेब्‍सकडून सडेतोड उत्तर दिले गेले आहे. 
सध्‍या पाहता, सोशल मीडियावर बिकिनी फोटोज अपलोड केलेले किंवा शेअर केलेले दिसतात. इन्‍स्‍टाग्रामवर तर सेलेब्‍सचे  बिकिनी फोटोज दिसतात. त्‍याची चर्चाही होताना दिसतेय. असे काही सेलेब्‍स ज्‍यांनी बिकिनीत हॉट तसेच बोल्‍ड फोटोशूट केले आहेत. 
मंदिरा बेदी 
'क्योंकि सास भी बहू थी'मधून सिंपल इमेजमधून मंदिरा बाहेर पडली. आणि तिने बिकिनीत फोटोशूट केलं. हा फोटोज चांगलाच व्‍हायरल झाला होता. 
dinsta
सोनम कपूर
नुकताच रिलीज झालेल्‍या 'वीरे दी वेडिंग' चित्रपटात सोनम कपूर बिकिनीत दिसली. 
Related image
आलिया भट्ट 
आलिया देखील एका चित्रपटात बिकिनीत दिसली होती. 
काजोल 
नव्‍वदच्‍या दशकात काजोल फेमस झाली ती म्‍हणजे बिकिनीमुळे. सुपरहिट चित्रपट 'बाजीगर'मध्‍ये काजोलचा बिकिनीतला एक सीन आहे. 
ईशा देओल 
सुपरहिट चित्रपट 'धूम'मध्‍ये ईशा पहिल्‍यांदा बिकिनीत दिसली होती. 
Related image
रिचा चड्ढा
'फुकरे' चित्रपटात दिसलेली रिचा चड्ढा तिच्‍या बोल्‍ड अंदाजामुळे ओळखली जाते. रिचाचेही बिकिनीतले फोटो व्‍हायरल झाले होते. 
तापसी पन्नू 
चित्रपट 'जुडवा', 'नाम शबाना' यासारख्‍या चित्रपटांमुळे आपली वेगळी ओळख निर्माण केलेली अभिनेत्री तापसी पन्नू स्टायलिस्ट अभिनेत्री आहे. तापसीचेही बिकिनीतले फोटो समोर आले होते. 
Related image
राखी सावंत 
बोल्‍डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहिलेली राखी सावंत देखील बिकिनीत दिसली होती. 
तनुश्री दत्ता 
'आशिक बनाया आपने' चित्रपटातून फेमस झालेली तनुश्री दत्ताने आपल्‍या हॉट आणि बोल्‍ड अंदाजामुळे धुमाकूळ घातला. तनुश्रीच्‍या बिकिनी सीनची देखील चांगलीच चर्चा रंगली होती. 
tanushree dutta
सारा खान 
'बिग बॅास'ची एक्स कंटेस्टेंट सारा खानने बिकिनीतील हॅाट फोटोज सोशल मीडियावर पोस्‍ट केले होते. या फोटोजमुळे ती खूप चर्चेत आली.  
dinsta
आयरा खान 
आयरा खानने आंघोळ करतानाचे फोटोज आणि व्‍हिडिओज पोस्ट केले होते. त्‍यानंतर तिने लगेच हा व्‍हिडिओ डिलीट केला होता. तसेच आयराने आयराने बाथटबमधील एक फोटो शेअर केला. त्‍यामुळे सोशल नेटवर्किंगसाईटवर धुमाकूळ उडाला. 
करिश्मा तन्ना 
'नच बलिए' आणि 'बिग बॅास' यासारख्‍या छोट्‍या पडद्‍यावरील शो मध्‍ये फेमस झालेली करिश्मा तन्नाने अनेक वर्षांपूर्वी एका मॅगझीनसाठी टॅापलेस फोटो शूट केलं होतं. 
शमा सिंकदर 
टीव्‍ही शो 'ये मेरी लाईफ है' मध्‍ये सिम्‍पल भूमिका साकारणारी शमा सिंकदरने टॅापलेस फोटोशूट केला होता. हे फोटोज व्‍हायरल झाल्‍यानंतर ती चांगलीच चर्चेत आली होती. 
dinsta
करिश्मा शर्मा 
'ये हैं मोहब्बतें' या टीव्‍ही शोची अभिनेत्री करिश्मा शर्मानेदेखील हॉट फोटोजमुळे ट्रेंडिंगमध्‍ये होती. 
बानी जे 
'बिग बॅास' फेम बानी जे हिनेदेखील टॅापलेस फोटोशूट केला होता. 
dinsta
रूप दुर्गापाल 
'बालिका बहू' फेम अभिनेत्री रूप दुर्गापालने देखील बोल्ड फोटोज शेअर केले होते. 
निया शर्मा
छोट्‍या पडद्‍यावरील सर्वाधिक चर्चेत असणारी अभिनेत्री निया शर्मा. ती आपल्‍या फॅशन, मेकअप- ड्रेस आणि बोल्‍ड फोटोजमुळे नेहमीच चर्चेत असते.   
निया शर्मा
लिज हर्ली
ब्रिटिश अभिनेत्री लिज हर्लीने काही दिवसांपूर्वी बिकिनी फोटोशूट केले आहे. लिज एक मॉडल देखील आहे. ती स्‍वत:च्‍या बिकिनी डिझाईन करते. 
Photos: ये ब्रिटिश एक्ट्रेस खुद करती हैं अपनी बिकिनी डिजाइन
अंजुम फकीह 
टीव्‍ही मालिका 'कुंडली भाग्य'ची अभिनेत्री अंजुमने बिकिनीतले फोटो पोस्‍ट केले होते. 
dinsta
हिना खान 
बिग बॉसची एक्‍स कंटेस्‍टेंट हिना खानने एका टास्क अंतर्गत बिकिनी घातली होती.
https://goo.gl/BSt7oh

Thursday, June 28, 2018

फॅशनिस्‍टा सई ताम्‍हणकरचे 'हे' लुक्स तुम्‍हाला नक्‍कीच आवडतील

सई ताम्‍हणकरचे 'हे' लुक्स नक्‍कीच आवडतील 

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन 
सई ताम्हणकर नुकतीच आपल्या 'लव्ह सोनिया' सिनेमाच्या प्रिमीयरसाठी लंडनला गेली होती. मृणाल ठाकुर, रिचा चड्ढा, राजकुमार राव, फ्रिडा पिंटो आणि डेमी मोअर स्टारर या सिनेमात सईची महत्त्‍वाची भूमिका आहे.
 ... https://goo.gl/PgCYqW

Friday, June 8, 2018

अंधारातून नवा प्रकाश शोधणारा 'अ ब क'

'अ ब क' या चित्रपटाची कथा मुलींच्‍या शिक्षणाभोवती फिरते. ‘सामाजिक समस्या सोडवण्यासाठी ‘अ ब क’सारख्या वेगळ्या विषयांवरील चित्रपटांची आज गरज आहे. मुलामुलींमध्ये भेदभाव न करता मुलींनाही दर्जेदार शिक्षण दिले पाहिजे,’ अशी भावना रामकुमार यांनी व्‍यक्‍त केली. 

चिमुकल्या पावलांनी शिक्षणाची हरवलेली वाट शोधणारा 'अ ब क' चिंतन करायला लावणारा आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्‍या विषयाला अनुसरून शिक्षणावर भाष्‍य करणारा हा चित्रपट आहे. 'मुलगी वाचवा, मुलगी शिकवा' हा विषय धरून समाजातील जी काही परिस्‍थिती आहे, त्‍याचं वास्‍तव चित्र मांडण्‍याचा प्रयत्‍न यात केला गेला आहे. 
बड्‍या कलाकारांची एन्‍ट्री
सुनील शेट्‍टी, तमन्‍ना ही मराठी माणसे आहेत. तमन्‍नाचा जन्‍म मुंबईत झाला आहे. त्‍यामुळे तिला बर्‍यापैकी मराठी बोलता येतं. शिवाय, तमन्‍ना आणि सुनील शेट्‍टीला मराठी सिनेमात काम करायचं होतं आणि 'अ ब क' या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून त्‍यांची ही आकांक्षा पूर्ण झाली. तमन्‍नाला स्‍क्रिप्‍ट दाखवल्‍यानंतर तिने आपणास हा सिनेमा करण्‍यास आवडेल, अशी प्रतिक्रिया दिली. आणि तिने या चित्रपटातून मराठी सिनेसृष्‍टीत पाऊल ठेवलं. मराठी सिनेमा असला तरी तमन्‍नाची या सिनेमात हिंदी भूमिका आहे. तर प्रत्‍येकाच्‍या न्‍यायासाठी, मदतीसाठी धावून येणार्‍या आप्‍पा नावाच्‍या व्‍यक्‍तीची भूमिका सुनिलने साकारली आहे. (सुनिल शेट्टीला चित्रपटसृष्टीत प्रेमाने आप्पा म्हणतात )  चित्रपटातील एका गाण्‍यात भोजपुरी सुपरस्‍टार रविकिशन आहे. त्‍याचबरोबर सनी पवार, तन्वी सिन्हा हे दिग्गज कलावंतांच्‍याही भूमिका आहेत. 

रामकुमार शेडगे दिग्‍दर्शित 'अ ब क' हा चित्रपट आज ८ जून रोजी रिलीज होतोय. मराठी चित्रपटाला ग्‍लोबल करण्‍याचा प्रयत्‍न या चित्रपटातून करण्‍यात आला आहे. मराठी चित्रपटात अभिनेता सुनील शेट्‍टी, 'बाहुबली' फेम तमन्‍ना भाटिया आणि इतर बड्‍या कलाकारांना घेऊन हा चित्रपट रिलीज होत आहे. मराठी सिनेमातही ग्‍लॅमर आहे, हे या सिनेमातून दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. तमन्‍ना भाटियाचा या चित्रपटातून मराठी सिनेसृष्‍टीत डेब्‍यू करत आहे. अ ब क सिनेमा काय आहे? हा चित्रपट कसा साकारला? याबद्‍दल 'अ ब क' या चित्रपटाचे दिग्‍दर्शक रामकुमार शेडगे यांच्‍याशी 'पुढारी ऑनलाईन'ने खास संवाद साधला. 
आधी सिनेमाचं नाव ठेवलं होतं...
आधी या सिनेमाचं नाव 'क ख ग' असं ठेवलं होतं. शिक्षणाची सुरूवात 'अ ब क' पासून सुरू होते. म्‍हणून या सिनेमाचं नाव 'अ ब क' असं फायनल करण्‍यात आलं. कल्‍पना चावला, प्रतिभाताई पाटील हे दिग्‍गज महिला शिकल्‍या म्‍हणून त्‍या मोठ्‍या ठरल्‍या. आयुष्‍यात शिक्षणाला खूप महत्त्‍व आहे. विशेषत: मुलींच्‍या शिक्षणाचा विषय महत्त्‍वाचा आहे. 
या चित्रपटासाठी अमृता देवेंद्र फडणवीस यांनी पार्श्वगायन केले आहे. स्‍त्री वर्गाला प्रेरणा देणारं हे गाणं आहे. हे गाणं अश्‍विनी शेंडे यांनी लिहिले आहे.
चित्रपटाची कथा दोन चिमुकल्‍या भावा-बहिणींची आहे. शून्‍यातून विश्‍व निर्माण करणारा, चिमुकल्‍या बहिणीला शाळा शिकवणारा, १० वर्षांचा मुलगा बहिणीच्‍या शिक्षणासाठी कष्‍टातून आयुष्‍य कसा उभा करतो? याचं चित्रण चित्रपटात दाखवण्‍यात आलं आहे.  
...आणि चित्रपट दिग्‍दर्शित करण्‍याचा निर्णय घेतला 
मराठी चित्रपटांचे विषय दर्जेदार असूनही असे चित्रपट मागे पडले आहेत. या गोष्‍टीचा आज विचार करण्‍याची गरज आहे. आबा गायकवाड यांनी या चित्रपटाची कथा लिहिली आहे. स्‍क्रिप्‍ट वाचल्‍यानंतर मी भारावून गेलो. त्‍यानंतर हा चित्रपट दिग्‍दर्शित करण्‍याचा निर्णय घेतल्‍याचे रामकुमार म्‍हणाले.
प्रत्‍येक पालकाने हा सिनेमा पाहावा
हा सिनेमा प्रत्‍येक आई-वडिलांनी आपल्‍या मुलांबरोबर पाहावा. १० वर्षांचा मुलगा हा सहा वर्षांच्‍या मुलीला असं शिक्षण शिकवतो. आयुष्‍य कसं उभं करतो, हे चित्रपटातून दाखवण्‍यात आलं आहे. अ ब क हा सिनेमा समाजातील मुलींच्‍या शिक्षणातील वास्‍तव मांडणारे आहे, असे रामकुमार म्‍हणाले.  
                              
चित्रपटाचे वैशिष्‍ट्‍य
चित्रपटाचे वैशिष्‍ट्‍य पंतप्रधान म्‍हणजे नरेंद्र मोदी यांचाही आवाज या चित्रपटाला लाभला आहे. चित्रपटातील हिरो नरेंद्र मोदी यांची 'मन की बात' ऐकून कसा प्रेरित होतो, हे त्‍यात दाखवण्‍यात आलं आहे. 
चित्रपटाचे शूटिंग येथे झाले...
सातार्‍यामध्‍ये चित्रपटाचे काही शूटिंग झालं. याशिवाय, पुणे आणि मुंबईतही शूटिंग झालं. 
सुनीलला आवडतो कोल्‍हापुरी 'तांबडा-पांढरा रस्‍सा'
सुनील शेट्‍टीला महाराष्‍ट्रीयन पदार्थ आवडतात. खासकरून कोल्‍हापुरचा तांबडा-पांढरा रस्‍सा आवडतो. त्‍याचबरोबर मिसळपाव, दिवाळीतील कारंज्‍या, लाडू हे फराळदेखील आवडतात, असे रामकुमार शेडगे म्‍हणाले. 


खासदार संभाजीराजे यांनी दिले रायगड चढण्‍याचे 'फिटनेस चॅलेंज'!

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठोड यांनी  फिटनेसचे महत्त्‍व वाढवण्‍यासाठी 'हम फिट तो इंडिया फिट' ही मोहीम सोशल मीडियावर सुरू केलीय. सुरूवातीला राज्‍यवर्धन सिंह राठोड यांनी अभिनेता ऋतिक रोशन, क्रिकेटर विराट कोहली आणि बॅडमिंटपटू सायना नेहवाल यांना फिटनेस चॅलेंज दिलं होतं. या सेलिब्रिटींनी राठोड यांचं हे चॅलेंज स्‍वीकारून पूर्ण करून दाखवलं. विराट कोहलीनेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फिटनेस चॅलेंज दिलं आहे. या मोहिमेत अनेकजण सहभागी होत आहेत. 

आता खासदार संभाजीराजे यांनीही फिटनेस चॅलेंज दिलं असून रायगड किल्‍ल्‍यावर शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍यासाठी उपस्‍थित राहण्‍याचे आवाहन केले आहे. फिटनेस चॅलेंजसाठी छत्रपती संभाजीराजे यांनी ट्‍विटरवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय क्रीडा मंत्री राज्‍यवर्धन सिंह राठोड, केंद्रीय गृह राज्यमंत्री किरण रिजिजू, अभिनेता आमिर खान, अजय देवगण, अक्षयकुमार आणि रितेश देशमुख यांना शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍यासाठी आमंत्रित केले आहे. 

६ जून १६७४ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची घटना आहे. शिवराज्‍याभिषेक दिन हा राष्‍ट्रीय उत्‍सव म्‍हणून साजरा व्‍हावा, यासाठी छ. संभाजीराजे प्रयत्‍नशील आहेत. रायगडावरील मेघडंबरीत संभाजीराजेंनी छत्रपती शिवाजी महाराजांची सिंहासनाधिष्‍ठित मूर्तीची प्रतिष्‍ठापना केली होती. गेल्‍या काही वर्षांपासून दुर्गराज रायगडावर खासदार संभाजीराजे यांच्‍या मार्गदर्शनाखाली ६ जूनला शिवराज्‍याभिषेक दिन उत्‍साहाने साजरा केला जातो. 

या सोहळ्‍याला राज्‍यासह देशाच्या कानाकोपर्‍यातून शिवभक्‍त मोठ्‍या संख्‍येने उपस्‍थिती लावतात. गेल्‍या काही वर्षांपासून या उत्‍सवाला लोकोत्‍सवाचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. 

शिवराज्‍याभिषेकाच्‍या पूर्वसंध्‍येला खा. संभाजीराजे स्‍वत: रायगडावर पायी चालत जातात. हजारोंच्‍या संख्‍येने शिवभक्‍त संभाजीराजे यांच्‍याबरोबर रायगडची चढाई करतात. संभाजीराजे यंदाच्‍या वर्षी ५ जूनला दुपारी ३ वाजता रायगडचा किल्‍ला चढण्‍यास सुरूवात करणार आहेत. हा दुर्गराज रायगड चढून जाणे सहजसोपे नाही. गड चढताना आपल्‍या शारिरीक क्षमतेचा कस लागतो. त्‍यामुळेच खा. संभाजीराजे यांनी यावर्षी नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राज्‍यवर्धन सिंह राठोड, किरण रिजिजू, अभिनेता आमिर खान, अजय देवगण, अक्षयकुमार आणि रितेश देशमुख यांना माझ्‍यासोबत शिवराज्‍याभिषेक सोहळ्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला रायगड चढा, असे आवाहन केले आहे. 

'स्‍वच्‍छ रायगड'ची मोहीम अशी फत्ते झाली


महाराष्ट्राचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक किल्ले रायगडच्या संवर्धनासाठी लाखो शिवभक्‍त आज रायगडावर उपस्‍थित आहेत. शिवभक्‍तांना शिवराज्‍याभिषेकचा ऐतिहासिक सोहळा 'याची देही, याची डोळा' पाहायला मिळाला. या सोहळ्‍याची तयारी कित्‍येक दिवस आधी सुरू होती. त्‍यातीलच एक भाग म्‍हणजे दुर्गराज रागयडची स्‍वच्‍छता. किल्‍ले रायगडसह तटबंदी, कड्‍याखालील कचरा काढण्‍याचे अत्‍यंत अवघड असे काम कोल्‍हापुरातील काही संस्‍थांनी पार पाडले. किल्‍ल्‍याच्‍या बाजूस असणार्‍या दरीत; जिथे आपण चालत जावू शकत नाही किंवा उभारूही शकत नाही, अशा बिकट मार्गावर उतरून, जीव धोक्‍यात घालून गिर्यारोहकांनी तीनशे-चारशे फूट दरीत उतरून कचरा गोळा केला. साधारणत: दोन दिवसांत १ टन कचरा गोळा करण्‍यात आला. त्‍यात थर्माकोलच्‍या प्‍लेट्‍स, प्‍लॅस्‍टिक पिशव्‍या, पाण्‍याच्‍या प्‍लास्‍टिक बाटल्‍या, कोल्‍ड्रींकच्‍या रिकाम्‍या बाटल्‍यांचा समावेश होता. ही स्‍वच्‍छता मोहीम कशी फत्ते करण्‍यात आली, याविषयी समिट ॲडव्‍हेंचर्स, हिल रायडर्स ॲण्‍ड हायकर्स ग्रुप, कोल्‍हापूर माऊंटनेअरिंग ॲण्‍ड ॲडव्‍हेंचर्स फौंडेशन या संस्‍थामध्‍ये कार्यरत असलेले विनोद कांबोज यांच्‍याशी 'पुढारी ऑनलाईन'ने विशेष बातचीत केली. 

खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्‍या नेतृत्‍वाखाली रायगडाची स्‍वच्‍छता करण्‍याचा हा उपक्रम होता. 'स्‍वच्‍छ रायगड' या लोगोखाली शिवराज्‍याभिषेक सोहळा संपन्‍न करण्‍याचे खासदार संभाजीराजे यांच्‍या भेटीत ठरले होते. रायगडचा परिसर पाहता किल्‍ल्‍याच्‍या कड्‍याखाली पडलेला जो कचरा आहे, तो बाहेर काढणे खूपच कठिण होतं. बरीच वर्षे साचलेला हा कचरा होता. गिर्यारोहणाच्‍या मदतीने ही स्‍वच्‍छता मोहीम फत्ते करण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. 
मोहिमेचे नियोजन 
२५, २६, २७ मे हे तीन दिवस स्‍वच्‍छ रायगड मोहिमेसाठी निश्‍चित करण्‍यात आले होते. विनोद कांबोज यांचे सहकारी, इतर टीम आणि गिर्यारोहक २६ मे रोजी दुपारी रायगडावर पोहोचले. त्‍यानंतर गिर्यारोहकांना दरीत उतरून कशा पध्‍दतीने कचरा काढता येईल? याचे नियोजन करण्‍यात आले. नियोजनानुसार, २६ मे आणि २७ मे या दोन दिवशी सकाळी ६ वाजल्‍यापासून ते संध्‍याकाळी ७ वाजेपर्यंत स्‍वच्‍छता मोहिमेचे काम हाती घेण्‍यात आले. 

विनोद कांबोज म्‍हणाले, 'जिथे कड्‍याच्‍या खाली कचरा टाकण्‍यात आला आहे, अशी स्‍थळे शोधण्‍यात आली. रायगडला जावून पाहणी करण्‍यात आली. रोपवे पासून रायगडला वर चढायला सुरूवात करतो तेथेपर्यंत आणि भवानी कड्‍यापासून काळेश्‍वरी बुरूजापर्यंत जो परिसर आहे, तो पाहण्‍यात आला. आणि नंतर लक्षात आले की, एमटीडीसीची मागील बाजू म्‍हणजे रोपवेतून वर येतानाची डावी बाजूच्‍या कड्‍याखाली मोठ्‍या प्रमाणात कचरा साचलेला दिसला. त्‍याचप्रमाणे जिल्‍हा परिषदेची मागील बाजूसही खूप कचरा साचला होता. महादरवाजावरून पायर्‍या उतरताना त्‍याची उजवी बाजू तसेच चित दरवाजापासून महादरवाजापर्यंतच्‍या डाव्‍या बाजूला कड्‍यांवर कचरा अडकून होता. ही ठिकाणे पाहून याठिकाणी किती टीम लागतील, गिर्यारोहणाचे साहित्‍य किती लागणार? याचा अंदाज घेऊन त्‍यापद्‍धतीने नियोजन करण्‍यात आले.'
२५ जणांची टीम स्‍वच्‍छतेसाठी रायगडावर 
१५ जण कोल्‍हापूरमधील होते. दोघेजण सातार्‍यातून आले होते. ६-७ जण मुंबईतून आले. अशी साधारणत: २५ जणांची टीम रायगडला पोहोचली होती. त्‍यात महिबूब मुजावर, मलय मुजावर, अमीर नदाफ, कृष्णा ताम्हणकर, महेश शिंदे, आकाश ऐतवडे, सोहील मुजावर, विनोद कांबोज, सूरज ढोली, जयदीप जाधव, पी. जी. जाधव, पार्थ चव्हाण, प्रणव महामुने, आशिष सोमवंशी, अनिकेत जुगदार, सुमेध पवार, धीरज चव्हाण, सुहास बेळेकर, अमोल आळवेकर, मानसिंग मांगोरे पाटील यांचा या माोहिमेत सहभाग होता.

गिर्यारोहणाचे सिसेंडर्स, हेल्‍मेट, रोप्‍स, ज्‍युमर असं सगळं साहित्‍य घेऊन सर्वजणांनी रायगडावर आगेकूच केली. कचरा गोळा करण्‍यासाठी शंभर बॅग्‍ज सोबत घेतल्‍या होत्‍या. तसेच प्‍लास्‍टिक बॉटल्‍स उचलण्‍यासाठी लोखंडी पंजांचा वापर करण्‍यात आला. २५ तारखेला ही टीम रायगडला पोहोचली. संध्‍याकाळी सर्व साहित्‍य रागयडवर आणण्‍यात आले. २६ मे रोजी सकाळी ६.३० वाजता प्रत्‍यक्षात काम करण्‍यास सुरूवात केली. सुरूवातीला एमटीडीसीची मागची बाजू आणि जिल्‍हा परिषदेची मागची बाजू असे दोन टप्‍पे निवडण्‍यात आले. पहिल्‍या अर्ध्या दिवसातच एमटीडीसीच्‍या मागच्‍या बाजूला साधारण ४० ते ४५ पोती कचरा उचलण्‍यात आला. रोप-वेचा आधार घेऊन गिर्यारोक कड्‍याच्‍या खाली उतरले. कचर्‍याने भरलेली ४० पोती होती, रोपच्‍या आधाराने वर उचलण्‍यात आली. दुपारनंतर जिल्‍हा परिषदेची जी मागील बाजू होती, तेथून जवळजवळ ४०-५० पोती कचरा एकत्र करण्‍यात आला. पहिल्‍या दिवशी साधारण ९० ते ९५ पोती कचरा गोळा करण्‍यात आला. त्‍यात पाण्‍याच्‍या प्‍लास्‍टिकच्‍या बाटल्‍या, प्‍लास्‍टिक पिशव्‍या, कागदे, थर्मोकॉलच्‍या प्‍लेट्‍स, दारूच्‍या बाटल्‍या होत्‍या. 
गिर्यारोहकांनी जीव धोक्‍यात घातला 
दुसर्‍या दिवशी म्‍हणजेच २७ मे रोजी किल्‍ल्‍याच्‍या महाद्‍वारच्‍या खालच्‍या बाजूला एक टीम आणि एमटीडीसीच्‍या मागच्‍या बाजूला दुसरी टीम कार्यरत होती. तटबंदीवरून ३०० ते ३०० फूट खाली उतरून हा कचरा काढायचे होते. विशेष म्‍हणजे, एमटीडीसीचा जी मागील बाजू होती, ती वाट खूपच बिकट होती. तेथून खाली दीड हजार फूट खोल दरी होती. डोंगरातून बाहेर आलेला जो भाग होता, तो साधारणत: ३०० ते ३५० फूट खोल होता. अशी कठिण वाट असतानाही गिर्यारोहक रोपच्‍या सहाय्‍याने आपला जीव धोक्‍यात घालून दरीत उतरले. रोप फिक्‍स करून गिर्यारोहक अमोल आळवेकर रॅपल करत खाली उतरले. हे अतिशय अवघड काम होते. माऊंटनेअरिंग टेक्‍निक वापरून कचरा या डोंगराळ भागातून एकत्र करण्‍यात आला. यादिवशी सकाळी साडेसहा वाजल्‍यापासून हे काम सुरू होते, असे कांबोज यांनी सांगितले. 

स्‍वच्‍छतेबाबत रायगडच्‍या रहिवाशांशी चर्चा
किल्‍ले रायगडाच्‍या जवळ असणारे छोटेखानी हॉटेल्‍स, चहाच्‍या टपर्‍या, खाऊच्‍या गाड्‍या त्‍यांच्‍या मागील बाजूस प्रचंड मोठ्‍या प्रमाणात कचरा साचलेला पाहायला मिळाला. जेथे पर्यटकांना सोईसुविधा मिळतात, त्‍याठिकाणच्‍या परिसरात कचरा पाहायला मिळाला. यासंदर्भात पर्यटक, स्‍थानिक लोकांशीही चर्चा करण्‍यात आली. हॉटेल्‍स, खाऊच्‍या गाड्‍या असणारे व्‍यावसायिकांनीही हा कचरा उघड्‍यावर न टाकता तो एकत्र करा, कचर्‍याची विल्‍हेवाट लावण्‍याविषयीचे आवाहन करण्‍यात आले. 

या मोहिमेत कोल्‍हापुरातील समिट ॲडव्‍हेन्‍चर्स, हिल रायडर्स ॲण्‍ड हायकर्स ग्रुप, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, माऊंटनेअरिंग ॲण्‍ड ॲडव्‍हेंन्‍चर्स फौंडेशन यांचे गिर्यारोहक सहभागी झाले होते. त्‍याचबरोबर मुंबईतून काही गिर्यारोहक सहभागी झाले होते. कोल्‍हापुरातून विनोद कांबोज, अमोल आळवेकर, सुहास बेलेकर असे १४ ते १५ सहकारी कोल्‍हापुरातून तर मुंबईतून महिबूब मुजावर यांच्‍यासोबत ७ ते ८ सहकारी या टीममध्‍ये होते. 
शिवाजी विद्‍यापीठाची मदत 
गिर्यारोहणाचे अत्‍यंत चांगले साहित्‍य शिवाजी विद्‍यापीठाकडून उपलब्‍ध झाले. स्‍पोर्ट्‍स डिपार्टमेंटचे डॉ. प्रकाश गायकवाड यांची मोलाची मदत मिळाली. समिट ॲडव्‍हेंचर्स, हिल रायडर्स ॲण्‍ड हायकर्स ग्रुप, ३२ एमएस मुंबई, कोल्‍हापूर माऊंटनेअरिंग ॲण्‍ड ॲडव्‍हेंचर्स फौंडेशनचे या सर्व संस्‍थांच्‍या माध्‍यमातून ही मोहीम यशस्‍वी झाल्‍याचे विनोद कांबोज म्‍हणाले.

जिथे लोक राहायला येतात, जिथे पर्यटन वाढलं आहे, ज्‍याठिकाणी पर्यटकांना सोईसुविधा मिळतात; त्‍याचठिकाणी कचरा जास्‍त पाहायला मिळतो. किल्‍ले रायगड पर्यटनाच्‍या दृष्‍टिने अत्‍यंत महत्त्‍वाचा आहे. येथे पर्यटकांचीही संख्‍या वाढत आहे.  पर्यटकांनी आपली जबाबदारी म्‍हणून स्‍वच्‍छतेकडे लक्ष द्‍यायला हवे. रायगडावर जाताना तिथला परिसर अस्‍वच्‍छ होणार नाही, याची काळजी घ्‍यायला हवी. तरच गड-किल्‍ल्‍यांचे संवर्धन आणि संरक्षण खर्‍या अर्थाने होईल.

Monday, May 14, 2018

देवळातल्‍या 'देवी'ची संवेदनशील कथा

'नाना परीट,' 'पांगरी' या शॉर्ट फिल्ममुळे अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात वाहव्‍वा मिळवलेला कोल्‍हापूरचा तरुण दिग्दर्शक नीरज नारकर आणि त्‍याचा भाऊ निखिल नारकर सातासमुद्रापार पोहोचलेले आहेत. एका छोट्‍या गावातील संवेदनशील कथा शॉर्टफिल्‍मच्‍या माध्‍यमातून जगभरात दाखवली जाणार आहे. निखिल नारकर आणि नीरज नारकर यांची 'देवी' ही शॉर्टफिल्‍मची निवड आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सवात झाली आहे. २० मे रोजी या शॉर्टफिल्‍मचे स्‍क्रिनिंग टोरँटो, कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवात होणार आहे. सातासमुद्रापार पोहोचलेली 'देवी' ही शॉर्टफिल्‍म कशी साकारली? याबाबत 'देवी'चा निर्माता निखिल नारकरशी 'पुढारी ऑनलाईन'ने विशेष बातचीत केली.  


कोल्‍हापूरचे दोन तरुण निखिल नारकर आणि नीरज नारकर हे सख्‍खे भाऊ. नीरजला लहानपणापासूनच कथा, गोष्‍टी लिहिण्‍याचा छंद आहे. तो सुरूवातीपासूनच सुंदर कथा लिहितो. नीरजने 'देवी'ची कथा स्‍वत:च्‍या कल्‍पनेतून साकारली. निमशहरी, किंवा ग्रामीण जीवन जवळून बघितल्‍याने तेथे कोणत्‍या समस्‍या असू शकतात, तिथलं वास्‍तव जीवन नारकर बंधुंनी अनुभवलय. 'देवी'ची कथाही त्‍यातूनच साकारली गेली. याचं संपूर्ण श्रेय नीरजला जातं. 

देवीची संकल्‍पना नीरज नारकरची
देवीची कथा, संकल्‍पना ही नीरज नारकरची होती. 'देवी'चा निर्माता या नात्‍याने निखिल नारकरने या शॉर्टफिल्‍मला वैचारिक दिशा देण्याची जबाबदारी घेतली. पांगरी, नाना परीट यासारख्‍या शॉर्टफिल्‍मसमध्‍ये देखील निखिलची महत्त्‍वाची भूमिका होती.  


देवीची कथा वास्‍तव प्रसंगावर आधारित आहे. पण, ते प्रसंग जसंच्‍या तसं आहे. असं नाही. पण, आम्‍ही जे अनुभवलं, पाहिलं आहे, ते शॉर्टफिल्‍मच्‍या माध्‍यमातून समोर आणण्‍याचा आम्‍ही प्रयत्‍न केला आहे, असे निखिलने सांगितले. छोट्‍या गावात एखाद्‍या दंगलीनंतर काय काय घडू शकतं आणि लोकांच्‍या आयुष्‍यात काय उलथापालथ होऊ शकतं, हे दाखवण्‍याचा प्रयत्‍न नीरजने केला आहे. नीरज नारकर सध्‍या जर्मनीत काम करतो. काम करून जे काही पैसे साठवले जातात, त्‍या पैशांतून शॉटफिल्‍म बनवली आहे. कुठलीही स्‍पॉन्‍सरशीप मिळवलेली नाही, असेही निखिल म्‍हणाला. 

नीरज हा निखिलपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे. दोघांनाही लहानपणासून जे ज्ञान मिळालं, जे वाचलं आणि घरातलं जे वातावरण होतं, त्‍यातून समाजाकडे बघण्‍याचा एक दृष्‍टिकोण मिळाला. हा दृष्‍टिकोण अंमलात आणायचा असेल तर कलेसारखं दुसरं माध्‍यम नाही, असं निखिल म्‍हणाला. 


कथा लिहून ती साकारेपर्यंतचा ८ महिन्‍यांचा कालावधी लागला. एक दोन ड्राफ्‍ट तयार गेले आणि त्‍यानंतर फायनल कथेचा ड्राफ्‍ट तयार केला गेला. कलाकार कुठले असावेत, सिनेमॅटोग्राफर, एडिटर, साऊंड डिझायनर कोण असावं, हे ठरवलं गेलं. मग, शूटिंगला सुरूवात झाली. संकलन करण्‍यासाठी दोन ते तीन महिन्‍यांचा कालावधी लागला. 

देवीची कथा देवळात घडली
कोल्‍हापुरातल्‍या गिरगावात देवीचं शूटिंग झालं. 'देवी' ही १३ मिनिटांची शॉर्टफिल्‍म आहे. शॉर्टफिल्‍मच्‍या टायटलवर बरीच चर्चा झाली. गावातला एक म्‍हातारा पुजारी, त्‍याचा एक नातू आणि एक मुलगी यांच्‍या जीवनात एका घटनेमुळे काय होतं. ही घटना मंदिरात घडते. या शॉर्टफिल्‍ममध्‍ये पुजारीची मध्‍यवर्ती भूमिका आहे. वैचारिकदृष्‍ट्‍या आपल्‍या समाजात, आयुष्‍यात देवांचं काय स्‍थान आहे, हा कथेचा मूळ गाभा आहे. ही घटना घडते देवीच्‍या देवळात म्‍हणून 'देवी' हे नाव शॉर्टफिल्‍मला दिलं गेलं.


आर्थिक अडचण
शॉर्टफिल्‍म तयार करण्‍यासाठी सर्वांत मोठी आर्थिक समस्‍या उद्‍भवली. तंत्रज्ञ मंडळींना एकत्र आणून काम करणं, त्‍यांची वेळ जमवून शूटिंग सुरू करणं मुश्‍किल होतं. पण, या सर्वांवर मात करत निखिल आणि नीरज बंधुंनी वाटचाल सुरूच ठेवली.  सिनेमॅटोग्राफर सुमन साहू आणि साऊंड डिझायनर शिषिर चौसाळकर हे तंत्रज्ञ हिंदी सिनेसृष्‍टीत काम करणारे आहेत. त्‍यांनीही वेळात वेळ काढून या फिल्‍मसाठी काम केल्‍याच निखिल म्‍हणाला.  

पावसाचा व्‍यत्‍यय 
'देवी'च शूटिंग रात्रीच्‍यावेळी सुरू असताना पावसाला सुरूवात झाली. जेव्‍हा जेव्‍हा पाऊस थांबेल, तेव्‍हा-तेव्‍हा शूटिंग करावं लागलं. गावातल्‍या काही लोकांच्‍या घरातून वीजेचे कनेक्‍शन घेऊन रात्रीच शूटिंग पार पाडलं. संध्‍याकाळी सात वाजल्‍यापासून मध्‍यरात्री दोन अडीचपर्यंत शूटिंग सुरू असायचं. यासाठी  गिरगावकरांनी मोलाची मदत केली, असेही निखिल म्‍हणाला. 


मग कलाकारांची निवडीचा विषय होता. अत्‍यंत छोट्‍या मुलाची जी गोष्‍ट आहे, ती संवेदनशील कथा आहे. 
केवळ सामाजिक संदेश देणारी कथा नाही. तर मला असं वाटतं की, आज लोकांना एक चांगला सिनेमा बघण्‍याची सवय लागली आहे. लोकांना काहीतरी नवीन हवं असतं. अशावेळी जे कलावंत मनापासून काम करत असतात. आपल्‍या समाजाशी जोडून घेणार्‍या कथा सांगत असतात, ते लोकांना मनापासून पाहायला आवडतात. अगदी स्‍थानिक पातळीवरची कथा असते, पण, ते जागतिक दर्जाचं असतं. एक चांगली कलाकृती म्‍हणून पाहायला देवीची कथा आवडेल. 

आपल्‍याकडे फिल्‍म फेस्‍टिवल होतात. त्‍यात लघुपट दाखवले जातात. लोक ते उत्‍साहाने पाहतात. असा आमचा अनुभव आहे. हे लघुपट बघावेत. काही लोकांनी असे लघुपट पाहायला आवडतात, अशी इच्‍छा बोलून दाखवली. 
कॅनडा टोरँटो येथे होणार्‍या आंतरराष्ट्रीय आशियाई चित्रपट महोत्सवासाठी ही शॉर्टफिल्‍म पाठवण्‍यात आली. आणि 'देवी' सिलेक्‍ट झाला. टोरँटोमधला हा महत्त्‍वाचा फिल्‍म फेस्‍टिवल मानला जातो. कारण, दक्षिण आशियाई देशातले बहुतांशी दिग्‍दर्शक, निर्माते फिचर फिल्‍म्‍स, शॉर्टफिल्‍म्‍स, कलाकृती या फिल्‍म फेस्‍टिव्‍हलसाठी पाठवत असतात. देवीचं स्‍क्रिनिंग २० मे ला होणार आहे. भारतातही काही फिल्‍म फेस्‍टिव्‍हलला ही शॉर्टफिल्‍म पाठवण्‍यात आलीय. तिथे 'देवी' सिलेक्‍ट होईल, अशी आशा निखिलने बोलून दाखवली. 


अत्‍यंत आनंदाचा क्षण 
याच चित्रपट महोत्‍सवात २०१६ मध्ये 'नाना परीट,' 'पांगरी'चे स्‍क्रिनिंग करण्‍यात आलं होतं. या दोन्‍ही शॉर्टफिल्‍म्‍सना आंतरराष्‍ट्रीय चित्रपट महोत्‍सव - बंगलोर आणि मुंबईमध्‍ये (२०१५) दोन पुरस्‍कारही मिळाले होते. त्‍यामुळे टोरँटोत देवीचं सिलेक्‍शन होईल, असं वाटत होत. ज्‍यावेळी समजलं की, 'देवी' सिलेक्‍ट झाली, त्‍यावेळी तो क्षण आनंदाने भरलेला होता. अपेक्षापूर्ती झाल्‍यानं आनंदापेक्षा समाधान मोठं होतं. कारण, आपल्‍या गिरगावामध्‍ये शूट झालेली ही फिल्‍म कॅनडामध्‍ये पोहोचतेय. आपल्‍या लोकांची कलाककृती, कष्‍ट जगासमोर आलं, याच एक विलक्षण समाधान होतं, अशी प्रतिक्रिया निखिलने दिली.  

कलाकारांची निवड अशी झाली 
याच चित्रपटामध्‍ये अभिनेता किरण खेबुडकर यांनी पुजारीची भूमिका केलीय. किरण खेबुडकर यांच्‍याशी नारकर यांची जुनी ओळख होती. परंतु, ओळख आहे म्‍हणून त्‍यांनी ही भूमिका खेबुडकर यांच्‍याडे दिली असं नाही तर ते उत्‍कृष्‍ट कलाकार आहेत. शिवाय, 'देवी'च्‍या कथेला साजेशी असणारी पुजार्‍याची भूमिका अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने खेबुडकरच करू शकतील, म्‍हणून त्‍यांची निवड करण्‍यात आली. खेबुडकर यांनीही उत्‍कृष्‍टपणे ती भूमिका कॅमेर्‍यासमोर मांडली. दुसरे म्‍हणजे, अभिनेते स्वप्निल राजशेखर यांची कन्या अभिनेत्री कृष्णा भूतकर. मुलीच्‍या भूमिकेसाठी अनेक कलाकारांना भेटलो, अभिनेत्रींची भेट घेतल्‍याचे निखिलने आठवण सांगितली. शेवटी कृष्‍णाशी बोलल्‍यानंतर 'देवी'तल्‍या मुलीची भूमिका कृष्‍णाच करू शकेल, असे नारकर बंधुंना वाटलं. कारण, 'देवी'त मुलीच्‍या भूमिकेसाठी (कृष्‍णा भूतकर) डायलॉग्‍ज नाहीत. केवळ हावभाव करून ती भूमिका सादर करायची होती. हे कृष्‍णा भूतकरने ओळखलं. यात तिची छोटी भूमिका आहे. परंतु, प्रभावीपणे तिच्या भूमिकेचं सादरीकरण करण्‍यात आल्‍याचं निखिल म्‍हणाला.

'देवी' आपण कुणाला म्‍हणावं?, एका मुलीवर शारिरीक अत्‍याचार झाल्‍यानंतर देवीचा काय रोल आहे. हे त्‍या मुलीने आपल्‍या डोळ्‍यांतून सांगावं आणि हावभावातून ते कळावं, अशी ती कथा आहे. 

अथर्व गुरव याने बालकलाकाराची भूमिका साकारलीय. नारकर यांच्‍या आधीच्‍या शॉर्टफिल्‍ममध्‍येदेखील त्‍याने काम केलं. अथर्व हा पांगरी गावात राहतो. त्‍याला चित्रपटात काम करायची आवड आहे. त्‍याने आमच्‍या एका डॉक्‍युमेंट्रीमध्‍येही काम केलयं. साहित्‍य ॲकॅडमीसाठी ही डॉक्‍युमेंट्री तयार करण्‍यात आली होती. म्‍हणून 'देवी'साठी अथर्वची निवड करण्‍यात आली. 

मुली, महिलांकडं बघताना माणूस म्‍हणून पाहा 
आपल्‍या समाजात मुली, स्‍त्रियांना माणूस म्‍हणून कधी समजून घेतलं जात नाही. स्‍त्रियांकडं माणूस म्‍हणून बघा, असा संदेश देणारी ही कथा आहे. देवीच्‍या कथेत पुजार्‍याची भूमिका महत्त्‍वाची आहे. पुजार्‍याचा जो काही विश्‍वास आहे, त्‍या विश्‍वासाला कसा तडा जातो. माणुसकीच दर्शन त्‍याला घडतं, याबद्‍दलची कथा 'देवी'त दाखवण्‍यात आलीय. 

'देवी' आणि तिचा पुजारी यांच्या भावनिक नात्याचा विषय नीरजने त्‍यात मांडलाय. बलात्कार पीडित एक मुलगी मंदिरात आणल्‍यानंतर तेथील एक वृध्‍द पुजारी आणि त्याचा वयात येणारा मुलगा जग्गू यांचे त्या मुलीशी कशा पध्‍दतीने वर्तन करतात, या आशयाभोवती ही कथा फिरते. नाजूक आणि संवेदनशील कथा मांडणार्‍या नीरज नारकरची देवी कथाही अत्‍यंत संवेदनशील मांडण्‍यात आलीय. 


शॉर्टफिल्‍मचं जे प्रिमीयर आहे, व्‍हिडिओच्‍या सुरूवातीला एका दगडावर देवीचे चित्र रेखाटलेले दिसते. हे चित्र कोल्‍हापुरातल्‍याच दिनकर कुंभार या आर्टिस्‍टने रेखाटलयं.    

आगामी प्रोजेक्‍ट 
नीरजने एक कथा लिहिली होती. त्‍या कथेची निवड झाली होती. सन डान्‍स ॲकॅडमी नावाची अमेरिकेत संस्‍था आहे. ज्‍यांची कथा त्‍या संस्‍थेला आवडते, अशा भारतातल्‍या सहा लोकांना बोलावले जाते. त्‍यात नीरजची निवड झाली होती. आता त्‍यावर लवकरच काम सुरू होईल, असे निखिल म्‍हणाला.  आपली जी काही कला आहे, ती जागतिक दर्जाची कला व्‍हावी आणि त्‍यादृष्‍टीने प्रयत्‍न करावेत, असं नीरज आणि निखिलला लहानपणापासून वाटतं होतं. त्‍याचदृष्‍टीने त्‍यांची वाटचाल सुरू आहे. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...