Friday, September 21, 2018

'त्‍या' चित्रपटाने बदललं अनुराग कश्‍यपचं नशीब






ब्लॅक फ्रायडे, गँग्स ऑफ वासेपुर, देवी डी यासारखे वेगळ्‍या विषयावरील चित्रपट आणणारे दिग्‍दर्शक अनुराग कश्यप यांचा आज ४६ वा वाढदिवस. अनुराग यांचा जन्म १० सप्‍टेंबर १९७२ ला उत्तर प्रदेशच्‍या गोरखपूर जिल्‍ह्‍यात झाला होता. अनुराग कश्यपचे वडिल इलेक्ट्रिसिटी बोर्डमध्‍ये चीफ इंजीनिअर होते. त्‍यांची बदली होत असल्‍यामुळे अनुरागचा अनेक मोठ्‍या शहरांशी संपर्क आला. डेहराडूनच्‍या ग्रीन स्कूल आणि ग्वालियरच्‍या सिंधिया स्कूलमध्‍ये त्‍याने शिक्षण घेतले. त्‍यानंतर त्‍याने दिल्‍लीच्‍या हंसराज कॉलेजमध्‍ये झूलॉजी (प्राणीशास्‍त्र) मध्‍ये पदवीचे शिक्षण घेण्‍यासाठी प्रवेश घेतला. 

इंग्लिश बोलायला येत नव्‍हतं
इंग्‍लिश येत नसल्‍यामुळे अनुराग सिंधिया स्कूलमध्‍ये आपल्‍या वर्गमित्रांपासून दूर राहायचा. आणि बराच वेळ लायब्ररीत हिंदी पुस्‍तके वाचण्‍यासाठी घालवायचा. कॉलेजच्‍या दिवसांत त्‍याने इंग्रजी पुस्‍तके वाचण्‍यास सुरूवात केली. 
अनुराग कश्यपने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, त्‍यांचे बालपणी लैंगिक शोषण झाले होते. त्‍यांचे जवळपास ११ वर्षे शोषण होत राहिलं. ज्‍या व्‍यक्‍तीने शोषण केलं, तो तरुण २२ वर्षांचा होता. याप्रकरणी अनुराग कश्यप म्‍हणाला होता, 'मी खूप वर्षांनंतर त्‍या तरुणाला भेटलो होतो. त्‍याला, ती गोष्‍ट चुकीची वाटत नव्‍हती. परंतु, आता त्‍याला पश्‍चाताप झाला होता.' 
dinsta
म्‍हणून शिक्षणाकडे लक्ष लागले नाही...
अनुराग कश्यपने एका मुलाखतीत म्‍हटले होते की, तरुणींमुळे त्‍याचं शिक्षणात लक्ष लागत नव्‍हतं. तरुणींना आकर्षित करण्‍यासाठी तो वेगवेगळे हेअरस्टाईल करायचा आणि रंगबिरंगी कपडे घालायचा. फक्‍त इतकचं नाही तर कुठल्‍या तरी ब्रँडचे सेकंड हॅण्‍ड बूट खरेदी करण्‍यासाठी कुठून ना कुठून तरी पैसे गोळा करायचा.  
अनुरागला दिग्‍दर्शक व्‍हायचे नव्‍हते. तो यूपीएससीची तयारी करत होता. अनुराग कश्यप १९९३ मध्‍ये एका चित्रपट महोत्‍सवात इटालियन चित्रपट 'बायसायकिल थिफ्स' पहायला गेला होता. त्‍यानंतर त्‍यांनी चित्रपट दिग्‍दर्शनात उतरण्‍याचा निर्णय घेतला. या निर्णयावर अनुराग म्‍हणाला होता की, 'इटालियन चित्रपटाचा क्लायमॅक्स त्‍याच्‍या रिअल लाईफसारखा होता.' 
dinsta
नाटकांत काम करण्‍याचा दिला होता सल्‍ला
दरम्‍यान, दिल्लीत 'जन नाट्य मंच'शी संबंधित असलेला मित्र सुनीत सिन्हाने अनुरागला नाटकांत काम करण्‍याचा सल्‍ला दिला होता. त्‍यानंतर त्‍याला स्‍ट्रीट प्ले करण्‍याची संधी मिळाली. प्रसिध्‍द हबीब तनवीर ग्रुपमध्‍ये सहभागी होण्‍यासाठी त्‍याला बरेच पापड लाटावे लागले. त्‍यासाठी त्‍याने श्रीराम सेंटरवर नाटकाचे तिकिट देखील विकले होते. 
तो १९९३ मध्‍ये दिल्‍लीतून मुंबईत आला, त्‍यावेळी त्‍याच्‍या खिशात केवळ ५-६ हजार रुपये होते. सुरूवातीला त्‍याला रस्‍त्‍यावरही झोपावे लागले होते तर कधी कामाच्‍या शोधात भटकावेही लागले होते. नंतर त्‍याला पृथ्वी थिएटर्समध्‍ये नोकरी लागली.  
दिग्‍दर्शनात पदार्पण 
दिग्‍दर्शक म्‍हणून अनुराग 'पांच' या चित्रपटापासून सुरूवात केली. हा चित्रपट रिलीज होऊ शकला नाही. अनुरागला खरी ओळख मिळाली ती 'सत्या' चित्रपटामुळे.  त्‍यानंतर २००४ मध्‍ये त्‍याने 'ब्लॅक फ्रायडे' आणला. बरेच वाद झाल्‍यानंतर शेवटी हा चित्रपट रिलीज झाला. २०१२ मध्‍ये अनुरागच्‍या गँग्‍ज ऑफ वासेपूरला चांगलं यश मिळालं. त्‍यानंतर त्‍याने अनेक चित्रपट केले. 'गुलाल', बॉम्बे टॉकीज, 'अग्ली', 'रमन राघव 2.0' यासारखे हिट चित्रपट दिले. 
dinsta
dinsta
अनुरागने दोन विवाह केले होते. त्‍याचा पहिला विवाह त्‍याची मैत्रीण आरती बजाज हिच्‍याशी झाला होता. दोघांचा संसार ६ वर्षे टिकला. २००९ मध्‍ये त्‍यांनी घटस्‍फोट केला. घटस्‍फोटानंतर २०११ मध्‍ये त्‍याने कल्कि कोचलीनशी विवाह केला. कल्कि कोचलीनने २०१५ मध्‍ये घटस्‍फोट घेतला. 
Related image
२१ सप्‍टेंबरला रिलीज होणार 'मनमर्जियां'
अनुराग कश्यप यांचा आगामी चित्रपट 'मनमर्जियां' लवकरच रिलीज होणार आहे. तापसी पन्नू, विक्की कौशल आणि अभिषेक बच्चन यांचा ‘मनमर्जियां’ २१ सप्‍टेंबरला रिलीज होणार आहे. 

जेव्‍हा आशाताई म्‍हणाल्‍या, 'दीदी तुझे सूर कच्‍चे'







हिंदी सिनेमा जगतात आशा भोसले यांनी आपल्‍या जादुई आवाजात एकापेक्षा एक गाणी गायली. त्‍यांची सदाबहार गाणी आजही रसिकांच्‍या ओठांवर रूळतात. आशा यांनी आतापर्यंत हिंदी आणि इतर भाषेत जवळपास १६ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. जगभरात आशाजींचे फॅन्‍स आहेत. मराठी, बंगाली, गुजराती, पंजाबी, तमिळ, भोजपुरी, मल्‍याळम, इंग्रजी आणि रशियन भाषेतील गाण्‍यांचा समावेश आहे. आशा भोसले यांनी आपल्‍या करिअरमधलं पहिलं गाणं १९४८ मध्‍ये गायलं होतं. चित्रपट होता 'चुनरिया'. आशा शास्‍त्रीय संगीतशिवाय गझल, पॉप म्‍युझिक सारखी गाणीही गायली आहेत. 
त्‍याआधी आशाजींनी १९४३ मध्‍ये १० वर्षांची असताना मराठी चित्रपट 'माझा बाळ' मधील 'चला चला नव बाळा...' हे गाणं गायलं होतं. 
Image result for आशा भोसले
एकापेक्षा एक गाणी 
हिंदी सिनेसृष्‍टीत आपल्‍या सुरिली आवाजाने मंत्रमुग्‍ध करणार्‍या आशाजींनी  'झुमका गिरा रे', 'रात अकेली है', 'आजा आजा', 'दम मारो दम', 'दिल चीज क्या है' यासारखी सदाबहार गाणी गायली. नव्‍वदच्‍या दशकात 'बाजीगर', 'रंगीला', 'ताल' यासारख्‍या चित्रपटांत ए. आर. रहमान आणि अनु मलिक यांच्‍यासोबतही काम केलं. 
Image result for आशा भोसले
त्‍याआधी 'तिसरी मंजिल' चित्रपटादरम्‍यान, आरडी बर्मन यांनी आशा भोसले यांच्‍याशी गाण्‍यासाठी संपर्क केला होता. त्‍यावेळी आशा भोसले यांचं वैवाहिक जीवन संपुष्‍टात आलं होतं. आशा भोसले यांनी पंचमदासोबत अनेक गाणी गायली. 
Image result for young asha bhosle
जेव्‍हा आशा लतादीदींनी म्‍हणाल्‍या... तुझे सूर कच्‍चे 
आशा भोसलेंनी नुकत्‍याच एका सिंगिंग रिॲलिटी शोमध्‍ये प्रमुख पाहुण्‍या उपस्‍थिती लावली होती. त्‍यावेळी त्‍यांनी लतादीदींबद्‍दलच्‍या काही आठवणी शेअर केल्‍या होत्‍या. आशाजी म्‍हणाल्‍या, 'मी आणि दीदी जेव्‍हा रेकॉर्डिंग करायला जात होतो, तेव्‍हा खूपच सिंपल कॉटनची साडी नेसून, हातात काचेच्‍या बांगड्‍या घालून जायचो. आमचं संपूर्ण लक्ष फक्‍त गाण्‍याकडे असायचं.' यावेळी आणखी एक प्रसंग त्‍यांनी सांगितला. आशाजी म्‍हणाल्‍या, '१० वर्षांपूर्वी माझ्‍या दीदीने एक गाणे गायले होते. त्‍यावेळी मी दीदीला म्‍हणाले की, दीदी तुझा आवाज ठिक वाटत नाहीये आणि तुझे सूर कच्‍च वाटत आहेत. त्‍यावेळी दीद म्‍हणाल्‍या, अच्‍छा, असयं? तुला जास्‍त माहिती आहे...' दुसर्‍या दिवशी लतादीदी सकाळी-सकाळी तानपुरा घेऊन रियाज करायला बसल्‍या आणि त्‍यानंतर तेच गाणं मला पुन्‍हा गाऊन दाखवलं. त्‍यांचा हा रियाज म्‍हणजे संगीताप्रती असलेलं समर्पण आहे.' 
Image result for young asha bhosle
Related image
प्रत्‍येक गाणार्‍यासाठी रियाज खूपच आवश्‍यक असल्‍याचेही आशाजींनी यावेळी सांतिगलं. 
विविध पुरस्‍कारांनी सन्‍मान 
आशा भोसलेंना आतापर्यंत फिल्मफेअर पुरस्‍काराने सर्वोत्‍कृष्‍ट फिमेल प्लेबॅक सिंगर म्‍हणून सन्‍मानित करण्‍यात आले आहे. २ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांनीही गौरवण्‍यात आले आहे. त्‍यांना २००८ मध्‍ये तत्‍कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्‍या हस्‍ते 'पद्म विभूषण'ने सन्‍मानित करण्‍यात आलं होतं.
Related image

प्रेग्‍नेंट असताना आशा भोसलेंना पतीने काढले बाहेर






सुरांची मल्‍लिका आशा भोसले यांचं नाव ऐकताच ओठांवर येतात ती त्‍यांची गाणी. आज आशा भोसले यांचा वाढदिवस, त्‍यांनी आतापर्यंत १२ हजारहून अधिक गाणी गायली आहेत. तब्‍बल २० विविध भाषा असणार्‍या १ हजार हून अधिक चित्रपटात त्‍यांनी काम केलं आहे. त्‍यांच्‍या वाढदिवसाच्‍या औचित्‍याने आयुष्‍याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊयात. 

आशा भोसले यांचा जन्म ८ सप्‍टेंबर १९३३ ला झाला. त्‍यांना बालपणापासून गाण्‍याची आवड होती. १० वर्षांची असताना त्‍यांनी गाणं गाण्‍यास सुरूवात केली. पुढे त्‍यांच्‍या जादूई आवाजाने प्रेक्षक मनावर रुंजी घातली.  
आशा भोसले स्वर साम्राज्ञी लता मंगेशकर यांच्‍या लहान बहिण आहेत. त्‍यांचे वडिल दीनानाथ मंगेशकर प्रसिध्‍द शास्‍त्रीय गायक होते. वडिलांच्‍या निधनानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी लता मंगेशकर यांच्‍यावर आली. बहिणीला साथ देण्‍यासाठी आशा भोसले यांनी गाणी गाण्‍यास सुरुवात केली. लहान असताना लतादीदींना पाहून आशाजी रियाज करायच्‍या. एकदा लता मंगेशकर शाळेला जात होत्‍या. त्‍यावेळी आशा देखील शाळेला जाण्‍यासाठी तयार झाल्‍या. त्‍यावेळी फक्‍त लतादीदीच शाळेला जायच्‍या. लतादीदीं आशाजींना सोबत घेऊन शाळेत गेल्‍या. शिक्षक दोघींना पाहून ओरडले. तसेच एका फीमध्‍ये दोन मुलांचं शिक्षण होत नसल्‍याचं ते म्‍हणाले. शिक्षकांनी ओरडल्‍यानंतर आशा-लता दोघीही रडत घरी परतल्‍या. दीनानाथ मंगेशकर यांना ज्‍यावेळी हे समजलं की, आपल्‍या मुली शाळेसाठी रडल्‍या आहेत, त्‍यांना खूप वाईट वाटलं. त्‍यामुळे अशा शाळेत न पाठवण्‍याचा निर्णय त्‍यांनी घेतला; जिथे, शिक्षकच मुलांना रडवतात. 
आशा भोसले यांचं खासगी आयुष्‍य 
आशा भोसले यांच्‍या आवाजात गोडवा असूनही त्‍यांचे खासगी आयुष्‍य कटू गोष्‍टींनी भरलेलं होतं. त्‍यावेळी लता मंगेशकर यांना त्‍यांच्‍या गाण्‍यांमुळे बरीच प्रसिध्‍दी मिळाली होती. त्‍यांचं काम सांभाळण्‍यासाठी त्‍यांचे पर्सनल सेक्रेटरी गणपतराव भोसले होते. ते लतादीदींचं काम सांभाळत असत. गणपतराव यांच्‍याशी आशा भोसले यांना प्रेम झालं. परंतु, मंगेशकर कुटुंबीय त्‍यांच्‍या लग्‍नासाठी तयार नव्‍हते. दोघांनी घरातून पळून जाऊन लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. त्‍यावेळी आशा भोसले १६ वर्षाच्‍या होत्‍या आणि गणपतराव ३१ वर्षांचे. दोघांनी लग्‍न केलं. परंतु, त्‍यांचं नातं फार काळ टिकलं नाही. गणपतराव यांच्‍या फॅमिलीने आशा भोसलेंना स्‍वीकारलं नव्‍हतं. ते आशाजींना मारहाणही करण्‍याचा प्रयत्‍न करत करायचे. शेवटी एके दिवशी गणपतराव यांनी आशा भोसले यांना घराबाहेर काढलं. त्‍यावेळी आशा भोसले प्रेग्नेंट होत्‍या. ही माहिती खुद्‍द आशा भोसले यांनी एका मुलाखतीत दिली होती.
सासरमधून बाहेर काढल्‍यानंतर त्‍या आपल्‍या दोन मुले हेमंत आणि वर्षा यांच्‍यासोबत पुन्‍हा माहेरी परतल्‍या होत्‍या

'त्‍यांचा' मिस वर्ल्डपर्यंतचा प्रवास थक्‍क करणारा





एखाद्या सौंदर्यवतीच्‍या डोक्‍यावर तिच्या सौंदर्यासाठी चढवला जाणारा सौंदर्यवतीचा मुकूट पाहणं म्‍हणजे अविस्‍मरणीयच क्षण असतो. काळ कोणताही असो, तरुणींचं सौंदर्य नेहमीच आकर्षित करणारं आणि प्रभाव पाडणारं असतं. त्‍याचं व्‍यक्‍तिमत्त्‍वही अनेकदा छाप पाडून जातं. सौंदर्याबरोबरच हुशार, तत्‍काळ निर्णय घेण्‍याची क्षमता आणि कलेमध्‍ये प्रावीण्‍य असणार्‍या तरुणींची नेहमीच स्‍तुती केली जाते. सार्वजनिकपणे तरुणींचं टॅलेंट दिसण्‍यासाठी काळानुरूप, मिस वर्ल्ड आणि मिस युनिव्‍हर्स यासारख्‍या स्‍पर्धादेखील अस्‍तित्त्‍वात आल्‍या. जागतिकीकरणाच्या युगात सौंदर्याच्या स्‍पर्धा या वैश्‍विक स्‍तरावर पोहोचल्‍या. मिस वर्ल्ड या स्‍पर्धेचेच घ्‍या. जगभरातील तमाम देशांतील सौंदर्यवती मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी होतात. परंतु, जिंकते तिच जी सौंदर्याबरोबर आपलं टॅलेंट जगासमोर मांडते.
सौंदर्याचे मोजमाप करायला न कुठले माप असते ना परिमाण. परंतु, माणसांनी सौंदर्याचे विश्‍लेषण करण्‍यासाठी स्‍पर्धा ठेवल्‍या. सौंदर्य आणि स्‍किल या दोन्‍ही कसोट्‍या पार करून अनेक तरुणींनी मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं आहे. सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं म्‍हणजे केवळ आपलं सौंदर्य दाखवणं, इतकचं असत नाही तर तरुणींमधले सुप्‍त गुण, त्‍यांची कला, स्‍किल या गोष्‍टीही पाहिल्‍या जातात.
मिस वर्ल्ड या सौंदर्य स्‍पर्धेत सहभागी होणार्‍या शंभरहून अधिक देशांतील सौंदर्यवतींबरोबर स्‍पर्धा करुन ही कठीण स्‍पर्धा पार पाडणे, तितके सोपे राहिलेले नाही. 
मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशन
विश्‍वसुंदरी निवडणारी मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनची स्‍थापना २९ जुलै १९५१ मध्ये झाली होती. पहिली स्‍पर्धा कॅलिफोर्नियाच्‍या पॅसिफिक मिल्‍सने १९५२ मध्‍ये घेतली होती. १९६६ च्‍या आधी केवळ परदेशातच सौंदर्य स्‍पर्धा आयोजित केल्‍या जात होत्या. पाश्‍चात्‍य देशातील तरुणी त्‍यात सहभागी व्‍हायच्‍या. आता जगभरातील कानाकोपर्‍यातून तरुणी सहभागी होतात. त्‍यात भारतानेही जगाच्‍या नकाशावर आपली वेगळी प्रतिमा निर्माण केलीय. रिटा फारिया, ऐश्‍वर्या राय, डायना हेडन, युक्‍ता मुखी, प्रियांका चोप्रा आणि मानुषी छिल्‍लर या भारताच्‍या सौंदर्यवतींनी जगभरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. 
भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया 
भारताची पहिली मिस वर्ल्ड रिटा फारिया. १९६६ मध्‍ये पहिल्‍यांदा भारताचं प्रतिनिधीत्‍व करत रिटा फारियाने विश्‍वसुंदर स्‍पर्धेत आपली उपस्‍थिती लावली होती. मिस वर्ल्डचं मुकूट परिधान करून भारतच नाही तर जागतिक स्‍तरावर भारताची नवी ओळख तिनं करून दिली. सावळ्‍या रंगाची १९ वर्षीय रिटा फारिया त्‍यावेळी मुंबईच्‍या जे. जे. कॉलेजमध्‍ये मेडिकलची विद्यार्थिनी होती. रिटा एक डॉक्टर (फिजीशियन) देखील आहे. तिचा जन्म मुंबईत १९४५ ला झाला. मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेणं, तिच्‍यासाठी स्‍वप्‍नासारखं होतं. परंतु, तिची मोठी बहीण फिलोमिनाच्‍या आग्रहास्‍तव रिटा सौंदर्य स्‍पर्धेत उतरली. रिटाची मिस इंडिया स्‍पर्धेसाठी निवड झाली. त्‍यावेळी तिने आईची जुनी साडी आणि जुने सी सँडेल घालून रॅम्‍प वॉक केलं होतं. मिस इंडिया स्‍पर्धा तिने जिंकली. काही कालावधीनंतर ती लंडनच्‍या रॉयल अल्‍बर्ट हॉलमध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. तिथेही तिने आपली चुणूक दाखवून मिस वर्ल्डचं मुकूट आपल्‍या नावे केलं. 
Image result for miss world reita faria
सौंदर्याची हकदार ऐश्‍वर्या राय
ऐश्वर्या रायला मिस वर्ल्डचं मुकूट १९९४ मध्ये मिळालं. मिस वर्ल्ड जमैकाची रहिवासी असणारी लिसा हन्नाने घातलं होतं. ऐश्‍वर्याने आंतरराष्‍ट्रीय कॉन्‍ट्रॅक्‍ट अंतर्गत एक वर्षापर्यंत मॉडेलिंग, चित्रपटात काम करू शकत नव्‍हती. विशेष म्‍हणजे याकाळात तिच्‍याकडे २४ चित्रपटांचे प्रस्‍ताव आले होते. त्‍यानंतर ऐश्‍वर्या चित्रपटात आली. मणीरत्‍नम यांचा 'इरुवर' या तामीळ चित्रपटातून तिने सिनेजगतात पाऊल ठेवलं. तिचे एकामागोमाग एक तीन चित्रपट फ्‍लॉप ठरले. परंतु, ऐश्‍वर्याने हार मानली नाही. १९९९ मध्‍ये अभिनेता अक्षय खन्‍नासोबत तिने 'आ अब लौट चले' चित्रपट केला. हा चित्रपट सुपरहीट ठरला. त्‍यानंतर एकापेक्षा एक चित्रपट तिला मिळत गेले. संजय लीला भन्‍साळी यांचा 'हम दिल दे चुके सनम' चित्रपट केला. त्‍यात अजय देवगण आणि सलमान खान यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. या चित्रपटाच्‍या माध्‍यमातून बॉलिवूडमध्‍ये तिने यशाचं शिखर गाठलं. सुभाष घई यांचा 'ताल' आणि भन्‍साळी यांच्‍या 'देवदास'ने ऐश्‍वर्याच्‍या अभिनयात चारचाँद लावले. ऐश्वर्या दुसरी इंडियन मॉडल आहे. ऐश्वर्या राय बच्चनला २०१४ च्‍या 'मिस वर्ल्ड पीजेंट' दरम्‍यान 'सक्सेसफूल मिस वर्ल्ड'ने गौरवण्‍यात आलं होतं. डिसेंबर २०१४ मध्‍ये मिस वर्ल्ड स्‍पर्धेत ऐश्‍वर्याला चीफ गेस्ट म्‍हणूनही आमंत्रित करण्‍यात आलं होतं. 
Related image
डायना हेडन
ऐश्‍वर्यानंतर १९९७ मध्‍ये हैदराबादच्‍या डायना हेडनने मिस वर्ल्डचं मुकूट परिधान केलं. सावळ्‍या रंगाची डायनाचं व्‍यक्‍तिमत्त्‍व आकर्षक होतं. डायना 'बिग बॉस-२'मध्‍ये तसेच अनेक चित्रपटांतही भूमिका केल्‍या आहेत. तिचं चित्रपट करिअर म्‍हणावं फुललं नाही. 
Related image
युक्ता मुखी
लंडनमध्‍ये ४ डिसेंबर, १९९९ मध्ये युक्‍ताने ४९ वी मिस वर्ल्ड स्‍पर्धा जिंकली. ९३ देशांच्‍या सौंदर्यवतींना मागे टाकत या मुकूटावर आपलं नाव कोरलं. युक्‍ता मुखीला सहजासहजी हा किताब मिळाला नव्‍हता. तिच्‍या वडिलांना सौंदर्य स्‍पर्धेत भाग घेणं पसंद नव्‍हते. युक्‍ताने डॉक्‍टर बनावे, अशी त्‍यांची इच्‍छा होती. परंतु, युक्‍ताने आपल्‍या वडिलांना जिंकून दाखवेन, असा विश्‍वास दिला. युक्ताने २००२ मध्‍ये आलेला चित्रपट 'प्यासा' मधून बॉलिवूड डेब्‍यू केलं होतं. त्‍यात आफताब शिवदासानीची मुख्‍य भूमिका होती. हा चित्रपट फ्‍लॉप ठरला. त्‍यानंतर २००५ मध्‍ये युक्‍ताने 'मेमसाब' आणि 'लव्‍ह इन जपान' चित्रपट केले. या चित्रपटांची जादू बॉक्‍स ऑफिसवर म्‍हणावी तशी चालली नाही. 
Image result for miss world yukta mukhi
प्रियांका चोप्रा
सन २००० मध्‍ये प्रियांकाने मिस वल्‍ड स्‍पर्धा जिंकली. प्रियांकाच जन्‍म जमशेदपूरमध्‍ये झाला. नंतर ते बरेलीत आले. नंतर प्रियांका आई मधू चोप्रा यांच्‍यासोबत मुंबईत आली, आणि मिस इंडिया स्‍पर्धेत उतरली. टॅलेंट आणि सौंदर्याच्‍या जोरावर प्रियांकाने मिस इंडियाचा किताब पटकावला. त्‍यावेळी प्रियांका १८ वर्षांची होती. त्‍यानंतर मिस वर्ल्डच्‍या तयारीसाठी प्रियांकाने मुंबईच्‍या जयहिंद कॉलेजमध्‍ये प्रवेश घेतला होता. तिने मिस वर्ल्ड स्‍पर्धेत सहभागी झाली स्‍पर्धा जिंकलीही. लंडनच्‍या मिलेनियम डोममध्‍ये प्रियांकाला युक्‍ता मुखीने मुकूट घातला होता. मिस वर्ल्ड बनल्‍यानंतर 'द हीरो'तून प्रियांकाने  बॉलिवूडमध्‍ये पदार्पण केलं. एकानंतर एक सुपरहिट चित्रपट देऊन ती बी-टाऊनची लोकप्रिय अभिनेत्री बनली. 
Related image
भल्‍याभल्‍यांना मागे टाकले मानुषीने
मानुषी छिल्लरने १७ वर्षांनंतर मिस वर्ल्ड २०१७ चा मुकूट आपल्‍या नावे केला. आधी प्रियांकाने २००० मध्‍ये हा मुकूट परिधान केला. मानुषीने चीनच्‍या सान्या शहर एरीनामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या मिस वर्ल्ड स्‍पर्धेत भाग घेतला. जगभरातील विविध देशांतील १०८ सौंदर्यवतींना मागे टाकून मानुषीने ही स्‍पर्धा जिंकली. मानुषीने आपलं शिक्षण दिल्‍लीच्‍या सेंट थॉमस स्‍कूलमध्‍ये पूर्ण केलं. नंतर सोनीपतच्‍या गव्‍हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्‍ये तिने प्रवश घेतला. ती एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करत आहे. मिस वर्ल्ड होण्‍यासाठी तिने शिक्षणातून एक वर्षाचा ब्रेक घेतला होता. त्‍याआधी २०१६ मध्‍ये तिने कॉलेज प्रिन्‍सेसचा किताब पटकावला होता. तिला तेथे ब्‍युटी विथ ब्रेन असं म्‍हटलं जायचं. २०१६ मध्‍ये ती मिस हरियाणा देखील झाली होती. जून २०१७ मध्‍ये मुंबईत झालेली फेमिना मिस इंडियाच्‍या स्‍पर्धेत मानुषीने ३० सौंदर्यवतींना मागे टाकले. 
Related image
आज छोट्‍या-छोट्‍या शहरांतही सौंदर्यस्‍पर्धा भरवल्‍या जात आहेत. अनेक तरुणींना आपलं सौंदर्य, आपले गुण, टॅलेंट दाखवण्‍यासाठी हे एक हक्‍काचं व्‍यासपीठ मिळालय. याचं व्‍यासपीठावरून त्‍यांना जगात ओळख निर्माण करण्‍याची संधी मिळते. कुणीही ओळखत नसलेल्‍या त्‍या तरुणींना सौंदर्य स्‍पर्धांच्‍या माध्‍यामातून एका रात्रीत जग ओळखू लागतं. 
ग्‍लॅमर आणि करिअर 
सौंदर्यस्‍पर्धेतून जगभर ओळख निर्माण होते. आता या स्‍पर्धा केवळ सौंदर्यस्‍पर्धा राहिल्‍या नसून त्‍याकडे ग्‍लॅमर म्‍हणून पाहिले जाते. स्‍पर्धा जिंकल्‍यानंतर अनेक चित्रपटांचे प्रस्‍ताव त्‍यांच्‍याकडे येऊ लागतात. या स्‍पर्धांकडे एक करिअर म्‍हणूनही पाहिले जाते. अशा स्‍पर्धांमुळे करिअरच्‍या अनेक संधी निर्माण होताहेत. काळानुसार आता सौंदर्याच्या व्‍याख्या बदलल्या आहेत. जागतिक पातळीवर एकाद्या स्‍त्रीच्या सौंदर्याचा गौरव होतो तेव्‍हा तो तिचा एकटीचा गौरव होत नाही तर  स्‍त्री जातीचाही तो गौरव होत असतो.

राधिका आपटेची 'बातही कुछ और'




मुंबई : पुढारी ऑनलाईन 
राधिका आपटे आज ३३ वा वढदिवस. राधिकाचा जन्‍म ७ सप्‍टेंबर,  १९८५ मध्‍ये तामिळनाडूच्‍या वेल्लोर शहरात  झाला होता. बालपण पुण्‍यात गेलं. राधिकाचे वडिल डॉ. चारुदत्त आपटे तामिळनाडूमध्‍यन्यूरोसर्जन होते. 

चित्रपट करण्‍यापूर्वी ती नाटकांत काम करत होती. २००५ मध्‍ये आलेला चित्रपट वाह! लाईफ हो तो ऐसी! यातून तिने बॉलिवूडमध्‍ये एंट्री केली. त्‍यानंतर राधिकाने हिंदी चित्रपट त्‍याचबरोबर तमिळ, तेलुगू, मल्‍याळम, बंगाली आणि मराठी चित्रपटांत काम केलं आहे. 
dinsta
तिने २०१३ मध्‍ये ब्रिटिश संगीतकार Benedict Taylor शी विवाह केला. 
dinsta
राम गोपाल वर्माच्‍या 'रक्‍त चरित्र'मधून राधिकाचं चित्रपटसृष्‍टीतलं करिअर फुललं. राधिकाने बॉलिवूड चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांतही काम केलं आहे.  राधिकाचा २०११ मध्‍ये आलेला चित्रपट 'आय एम' आणि 'शोर इन द सिटी'ची बॉक्‍स ऑफिसवर फारशी जादू चालली नाही. २०१२ आणि २०१४ या कालावधीत राधिकाने धोनी (तमिल / तेलुगू), तुकाराम, लय भारी (मराठी) या चित्रपटांत काम केलं. चित्रपट 'बदलापुर'मधून राधिकाने पुन्‍हा दमदार आगमन केलं होतं. राधिकाने एका वर्षात ८ चित्रपट करून रेकॉर्ड केलं होतं. तिने 'पार्च्ड' या चित्रपटात न्‍यूड सीन दिल्‍यानंतर राधिकाची चांगलीच चर्चा रंगली होत. राधिकाने शॉर्ट फिल्‍म्‍स केल्‍या आहेत. परंतु, 'पॅडमॅन' आणि 'मांझी'मुळे राधिकाला अभिनयाची चुणूक दाखवता आली.
dinsta
नेटफ्लिक्सच्‍या वेब सीरीजमध्‍ये 'सेक्रेड गेम्स' दिसलेली राधिका आपटे आता घौउल या सस्‍पेन्‍स थ्रीलरमध्‍ये दिसली. याआधी राधिका रजनीकांत आणि अक्षय कुमारसोबत दिसली होती. नेटफ्लिक्सची सर्वांत लोकप्रिय सीरीज सेक्रेड गेम्स आणि घोउलमुळे राधिकाने यशाची उंची अधिक गाठली. सेक्रेड गेम्‍सचं पहिलं सीजन रिलीज झाल्‍यानंतर ही सीरीज वादात सापडली होती. 
dinsta
घौउल चित्रपटात ती एका मुस्‍लिम मुलीची भूमिका साकारत आहे. त्‍या मुलीचे वडिल देशद्रोही असल्‍याने ती त्‍यांना पोलिसांच्‍या स्‍वाधीन करते. राधिकाची पोस्‍टींग एका अंडरग्राऊंड तुरुंगात केली जाते. तुरुंगात ५ कैदी आणि १२ स्‍टाफ मेंबर्स असतात. तेथून पुढची कहाणी पाहण्‍यासाठी तुम्‍हाला घोउल पाहावा लागेल. घोउलमध्‍ये राधिका बरोबर मानव कौल, विक्रमादित्‍य मोटवाणी यांच्‍या भूमिका आहेत. घोउल वेगवेगळ्‍या भागात असून प्रत्‍येक भागाला वेगळे नावही देण्‍यात आले आहे. 
dinsta
राधिका लवकरच 'अंधाधुंन' चित्रपटात झळकणार आहे. 

चित्रपट बनवण्‍यापूर्वी मिठाई विकायचे करण जोहरचे वडील






दिग्‍दर्शक करण जोहरचे वडील आणि निर्माते यश जोहर हे चित्रपट बनवण्‍यापूर्वी मिठाईचे दुकान चालवायचे. त्‍यांच्‍या आईने आपले दागिने विकून त्‍यांना मुंबईला पाठवले होते. आज त्‍यांचा जन्‍मदिवस. त्‍यांच्‍या जन्मदिनी जाणून घेऊयात काही खास गोष्‍टी. 

यश जोहर यांचा जन्म ६ सप्‍टेंबर १९२९ रोजी लाहोरमध्‍ये झाला होता. त्‍यांच्‍या चित्रपटांचे वैशिष्‍ट्‍ये म्‍हणजे भव्य सेट आणि परदेशी लोकेशन्‍स होते. यश जोहर यांनी 'कल हो ना हो', 'कुछ कुछ होता है' यसारखे सुपरहिट चित्रपट प्रोड्‍युस केली आहेत. 
यश जोहर यांचे कुटुंबीय दिल्लीत आले. येथे यश जोहर यांच्‍या वडिलांनी 'नानकिंग स्वीट्स' नावाने मिठाईचे दुकान सुरू केले. यश हे ९ भाऊ-बहिणींमध्‍ये सर्वांत जास्‍त शिकलेले होते. दुकानाचे सर्व आर्थिक व्‍यवहार सांभाळण्‍यासाठी यश यांच्‍या वडिलांनी त्‍यांना मिठाईच्‍या दुकानात बसवलं. परंतु, त्‍यांना हे काम करणं अजिबात आवडत नव्‍हतं. 
यश जोहर यांच्‍या आईने त्‍यांना साथ दिली. मिठाईचे दुकान सांभाळण्‍यासाठी तुझा जन्‍म नाही, असे म्‍हणत यश यांच्‍या आईने त्‍यांना मुंबईला पाठवले. त्‍यावेळी आईने आपले दागिने विकून यश यांना मुंबईला पाठवण्‍याची सोय केली. परंतु, यश यांच्‍या आईने दागिने विकल्‍याची घरात कुणाला माहिती नव्‍हती. दागिन्‍यांचा संशय सुरक्षारक्षकावर घेण्‍यात आला आणि त्‍याला मारहाणही झाली होती.
यश मुंबईत पोहोचल्‍यानंतर त्‍यांना सुरूवातीला बराचं संघर्ष करावा लागला. ते येथील एका वृत्तपत्रात फोटोग्राफरची नोकरी शोधण्‍यासाठी प्रयत्‍न करत होते. परंतु, त्‍यांना नोकरी मिळत नव्‍हती. दरम्‍यान, दिग्‍दर्शक के. आसिफ 'मुगल-ए-आजम'चे शूटिंग करत होते. त्‍यावेळी यश यांनी मधुबाला यांचा फोटो काढला होता. मधुबाला यांच्‍याबद्‍दल म्‍हटलं जायचं की, त्‍या आपला फोटो कुणाला काढू देत नाहीत. यश जोहर यांना इंग्‍लिश बोलायला येत होतं. त्‍यामुळे प्रभावित होऊन मधुबाला यांनी आपला फोटो काढण्‍यास त्‍यांना परवानगी दिली होती. त्‍याचबरोबर मधुबाला यांनी यश जोहर यांना आपल्‍या सोबत नेऊन गार्डनही दाखवलं. या फोटोमुळे यश यांना नोकरीही मिळाली. 
यश जोहर पूजाअर्चा करायचे. सकाळी-सकाळी आंघोळ करून ३ मिनिटे ते प्रार्थना करत होते. त्‍यांच्‍या घरी छोटं मंदिर होतं. त्‍यामुळेच कदाचित, त्‍यांच्‍या चित्रपटातही याची छाप पाहायला मिळते.
त्‍यांनी १९५५ मध्‍ये आपल्‍या चित्रपट करिअरला सुरूवात केली. सुरुवातीला सहाय्‍यक दिग्‍दर्शक म्‍हणून त्‍यांनी काम केलं. यश जोहर यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांची निर्मिती केली. त्‍यांनी धर्मा प्रॉडक्शनची स्थापना १९७६ मध्‍ये केली होती. या प्रॉडक्‍शनच्‍या बॅनरखाली त्‍यांनी 'दोस्ताना' चित्रपट बनवला. १९८४ मध्‍ये त्‍यांनी दिलीप कुमार यांना घेऊन 'दुनिया' चित्रपट बनवला. त्‍यांनी आपला मुलगा करण जोहरला 'कुछ कुछ होता है' या चित्रपटाच्‍या दिग्‍दर्शनाची जबाबदारी सोपवली. पुढे हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. 
यश जोहर यांचं निधन २६ जून २००४ ला रात्री मुंबईतील लीलावती रुग्‍णालयात झालं होतं. वयाच्‍या ७५ व्‍या वर्षी त्‍यांचं निधन झालं होतं. 

Tuesday, September 4, 2018

अनेक पिढ्यांना 'दिवाना' करणारा ऋषी


‘बॉबी’मधला तो ऋषी कपूर पाहिला की, अंगात स्‍वेटर घातलेला २१ वर्षांचा तो तरुण आठवतो. भारतीय मनोरंजन जगताला ऋषी कपूरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. चित्रपटातील एकापेक्षा एक गाणी, जी त्‍याने सुंदर अभिनेत्रींसोबत चित्रीत झाली होती. त्‍यांची त्‍या-त्‍या चित्रपटातील अभिनेत्रीसोबत असलेली केमिस्‍ट्रीही प्रेक्षकांच्‍या पसंतीस कायमस्‍वरूपी उतरली. 

एकेकाळी प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता राज कपूरने ‘बॉबी’ या चित्रपटातून नव्हाळीतल्या प्रेमाचा विषय हाताळला. 'बॉबी'मध्‍ये ऋषी कपूर आणि डिंपल कापडिया यांचा ऐन तारुण्‍यातील प्रेम पडद्‍यावर दाखवण्‍यात आलं. बॉबी पाहिल्‍यानंतर ऋषीचा अभिनयासाठीच जन्‍म झाला असावा, असं वाटतं. प्रेमातील अनेक प्रसंग ऋषी कपूर यांनी अजरामर करून ठेवले आहेत. त्याचा काळ आणि त्याच्या नंतरच्या काळानेही ऋषीच्या प्रेमासारखं आपलं प्रेम पाहिजे म्‍हणून प्रेमात पडणारी पिढी त्याकाळी निर्माण झाली होती, आणि त्याच्या प्रेमाखातरच मग ऋषीच्या स्‍वेटरचा जमानाही अस्‍तित्‍वात आला म्‍हणून त्याचं उत्‍कृष्‍ट अभिनेता म्‍हणून त्‍याचं कौतुक होत राहतं.
राज कपूर यांनी शंकर-जयकिशनऐवजी संगीतकार लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांना घेऊन 'बॉबी'साठी काम केलं तर ऋषी कपूरच्‍या गाण्‍यांना मुकेश यांना गायला न सांगता शैलेंद्र सिंग यांना गायला सांगितले. विशेष म्‍हणजे, 'बॉबी'तली गाणी सुपरडूपर हिट ठरली म्‍हणून काळ लोटला तरी ऋषी कपूरची गाणी आजही अनेकांच्या ओठावर रूळातात.

हिंदी चित्रपटसृष्टीला पडलेलं एक सुंदर स्‍वप्‍न म्‍हणजे राज कपूर. प्रत्येक भूमिकेला त्यांनी जिवंतपणाचा ओलावा दिला. त्‍यांच्‍याच मुलांपैकी एक ऋषी कपूर. ऋषी कपूरसारखं स्‍पिरीट इतरांकडे म्‍हणावं तसं नव्‍हतं. 'बॉबी'ला मिळालेल्‍या यशानंतर एकामागोमाग एक चित्रपट ऋषीने दिले. ऋषीने डिंपल कापडियाबरोरच पद्मिनी कोल्हापुरे, जया प्रदा, श्रीदेवी, मीनाक्षी शेषाद्री, दिव्‍या भारती, रेखा, माधुरी दीक्षित, जुही चावला या अभिनेत्रींसोबत अनेक चित्रपटांत काम केले. 
ऋषीने 'मेरा नाम जोकर'मधून एक बालकलाकार मधून सिनेजगतात पाऊल ठेवलं. या चित्रपटासाठी त्‍यांना डेब्यू चाईल्ड अभिनेत्‍याचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळाला. परंतु, एक अभिनेता म्‍हणून 'बॉबी' हा पहिला चित्रपट केला. या चित्रपटासाठी त्‍यांना उत्‍कृष्‍ट अभिनेत्‍याचा पुरस्‍कार मिळाला. 
सिनेजगतातल्‍या २५ वर्षांच्‍या करकिर्दीत स्वेटर्स घालून, अभिनेत्रींभोवती पिंगा घालण्‍याशिवाय आणि गाणी गाण्यापलीकडे आपण काहीच केले नसल्‍याने त्‍यांनी खुद्‍द कबूल केले आहे. 
... तेव्‍हा खचला ऋषी 
राज कपूर यांनी आर. के. फिल्म्सची कंपनी स्थापन करून चेंबूरमध्ये आर. के. स्टुडिओ उभारला. अनेक चित्रपटांचे शूटिंग या स्‍टुडिओत झाले होते. 'बॉबी' चित्रपटाचे चित्रीकरणही तेथेच झाले होते. ‘श्री. ४२०’चं शूटिंगदेखील तिथलंचं. ‘प्यार हुआ, इकरार हुआ’ हे गाणं आठवतयं? ‘श्री. ४२०’ मधील या रोमँटिक गाण्‍यात ऋषी केवळ दोन वर्षांचे होते. त्‍यावेळचा शूटिंगचा एक किस्‍सा सांगितला जातो. दोन वर्षांच्‍या ऋषीला भर मुसळधार पावसातून रडत चालायचे होते. परफेक्‍ट सीनसाठी रिटेकवर रिटेक होतात. शूटिंग लांबते. त्‍यामुळे चिंब भिजलेला ऋषी वैतागतो आणि पावसात न जाण्‍याचा हट्‍ट धरतो. तेव्हा ‘तू पपा सांगतील, त्याप्रमाणे केलंस, तर मी तुला चॉकलेट देईन’, असे आमिष अभिनेत्री नर्गिस ऋषीला दाखवले होते. तेव्हापासून ऋषीचं आर. के. स्टुडिओशी वेगळं नातं आहे. म्हणूनच आर. के. स्‍टुडिओला आग लागली, तेव्हा ऋषी पुरता खचला होता. 

ऋषीची खास आठवण 
ऋषी आणि नीतू यांच्या विवाहानंतरच्या जंगी पार्ट्या आर. के. स्‍टुडिओतच झाल्‍या होत्‍या. त्यामुळे ऋषीला आर. के. स्‍टुडिओची लाईफटाईम आठवण राहणारी आहे. 
ऋषीचं 'त्‍या' तरुणीशी अफेअर  
अभिनेत्री नीतू सिंह यांच्‍याशी लग्‍न होण्‍यापूर्वी ऋषीने यास्मीन नावाच्‍या तरुणीला डेट केल्‍याचे म्‍हटले जाते. परंतु, आपण नीतूला कधी धोका दिला नाही, असे खुद्‍द ऋषीने एका मुलाखतीत म्‍हटलं होतं. जेव्‍हा बॉबी चित्रपट आला होता, त्‍यावेळी ऋषी २१ वर्षांचा होता. बॉबी रिलीज झाला, त्‍यावेळी ऋषीचा ब्रेकअप झाल्‍याचे त्‍याने सांगितले होते. 
रोमॅटिंक ऋषीच्‍या गंभीर भूमिका 
गेल्या काही वर्षांमध्‍ये ‘दो दूनी चार’, ‘अग्निपथ’, कपूर ॲण्‍ड सन्‍स, राजमा चावल, बेशरम, स्‍टुडंट ऑफ द ईअर, पटियाला हाऊस, १०२ नॉट आऊट, ‘मुल्क’ अशा चित्रपटांतून वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिरेखा ऋषीने रंगवल्‍या. प्रत्‍येक भूमिकेला परफेक्‍ट असणारा ऋषीने रोमँटिकचं नव्‍हे तर गंभीर भूमिकाही साकारल्‍या. 'मुल्‍क' या चित्रपटातील त्‍याची एका मुस्‍लिम व्‍यक्‍तीची रेखाटलेली भूमिका वाखाण्‍याजोगे आहे. 'मुल्‍क'मधील त्‍याची अत्‍यंत सुंदर भूमिका आहे, त्‍यात तापसी पन्‍नूचीदेखील महत्त्‍वाची भूमिका होती. 
या चित्रपटांतून साकारल्‍या वेगळ्‍या भूमिका
मेरा नाम जोकर, नगीना, दिवाना, हिना, चांदनी, प्रेम रोग, लैला मजनू, बंजारा, बोल राधा बोल, साजन का घर, कर्ज, प्रेम ग्रंथ, दामिनी, नसीब अपना अपना, अजुबा, दरार, अमर अकबर ॲन्‍थोनी, बडे घर की बेटी, घराना, ये वादा राहा, हम किसीसे कम नहीं, लव्‍ह आज कल, प्‍यार के काबिल, नमस्‍ते लंडन, रफू चक्‍कर, दो प्रेमीं, गुरुदेव, हम दोनों यासारख्‍या चित्रपटांतून ऋषी कपूरने वेगवेगळ्‍या भूमिका पार पाडल्‍या.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...