Thursday, April 4, 2019

डेब्यू चित्रपटासाठी जया प्रदा यांना मिळाले होते १० रु. मानधन

बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदाचा आज ५७ वा वाढदिवस. जया यांचा जन्म ३ एप्रिल, १९६२ रोजी आंध्र प्रदेशात झाला. जया यांचे खरे नाव ललिता राणी असे होते. जया यांचे वडील क्रिशना राव तेलुगू चित्रपटाचे फायनान्‍सर होते. 
Image result for jaya prada old photo
या भाषेतील चित्रपटांमध्‍ये केला अभिनय
जया यंनी तेलुगू, हिंदी, तमिळ, कन्‍नड, मल्‍याळम, बंगाली आणि मराठीमध्‍ये काम केले आहे. दाक्षिणात्‍य चित्रपटात नाव कमावल्‍यानंतर जया बॉलिवूडकडे वळल्‍या. हिंदी चित्रपटामध्‍ये जयाने १९७९ मध्‍ये आलेला 'सरगम'मधून आपली नवी प्रतिमा निर्माण केली. या चित्रपटात त्‍यांनी मूक डान्‍सरची भूमिका साकारली होती. 
dinsta
मिळाले होते १० रुपये मानधन 
जया प्रदा यांनी १९७४ मध्‍ये तेलुगू चित्रपट ''भूमि कोसम''मधून चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये डेब्यू केले होते. 
dinsta
जया प्रदा यांना डेब्यू चित्रपटात संधी मिळण्‍यामागे एक अनोखा किस्सा आहे. जया प्रदा ज्‍यावेळी १३ वर्षांची होत्‍या, त्‍यावेळी तिने शाळेच्‍या वार्षिक समारंभात डान्‍स परफॉर्मन्‍स दिला होता. त्‍यावेळी प्रेक्षकांमध्‍ये बसलेल्‍या एका चित्रपट दिग्‍दर्शकाने आपला तेलुगू चित्रपट ''भूमि कोसम''मध्‍ये ३ मिनिटाचा डान्‍स नंबर ऑफर केला होता. ही ऑफर मिळाल्‍यानंतर जया प्रदा निराश होत्‍या. ''भूमि कोसम''मध्‍ये काम करण्‍यासाठी जया प्रदाला मेकर्सनी केवळ १० रुपये मानधन दिले होते. 
dinsta
हिंदी बोलता न आल्‍याने अडचण 
'सरगम' हा दाक्षिणात्‍य चित्रपट 'श्री श्री मुआ'चा रीमेक होता. 'श्री श्री मुआ' चित्रपटातही जया यांनी सेम तिच भूमिका साकारली होती. परंतु, हिंदी व्‍यवस्‍थित न बोलता आलल्‍याने जया यांना बॉलिवूडमध्‍ये करिअर करताना सुरुवातीला बर्‍याच अडचणींचा समाना करावा लागला होता. 
dinsta
पहिल्‍यांदा या चित्रपटात बोलली हिंदी
१९८२ मध्‍ये रिलीज झालेला चित्रपट 'कामचोर'मध्‍ये जया पहिल्‍यांदा ऑनस्क्रीन फ्लूएंट हिंदी भाषा बोलल्‍या. या चित्रपटामध्‍ये जयासोबत राकेश रोशन मुख्‍य भूमिकेत होते. पुढे अमिताभ बच्चन यांच्‍यासोबत सुपरहिट चित्रपट 'शराबी'मध्‍ये त्‍यांच्‍या भूमिकेचे खूप कौतूक झाले होते. या चित्रपटातील त्‍यांच्‍या डान्‍स बहारदार परफॉर्मन्‍सचे खूप कौतुकही झाले होते. 

हा चित्रपट हायएस्ट ग्रॉसर
जया यांनी श्रीदेवी आणि जीतेंद्र स्टारर चित्रपट 'तोहफा'मध्‍ये सुंदर अभिनय केला होता. १९८४ मध्‍ये जया यांचा हा चित्रपट हायएस्ट ग्रॉसिंग मूव्‍ही ठरला होता. याशिवाय, जया यांनी 'गंगा जमुना सरस्वति', 'आज का अर्जुन', 'मां', 'मकसद', 'मवाली' आणि 'औलाद' यासारख्‍या चित्रपटात दमदार अभिनय केला. १९८६ मध्‍ये जया यांनी निर्माते श्रीकांत नाहाता यांच्‍यासोबत विवाह केला. श्रीकांत विवाहीत होत आणि त्‍यांना मुलेही होती. तरीही जया यांनी त्‍यांच्‍याशी लग्‍न केले. 
राजकारणात पदार्पण 
एका रिपोर्टने दिलेल्‍या माहितीनुसार, जया १९९४ मध्‍ये ३२ वर्षांच्‍या असताना राजकारणात उतरल्‍या. सुरुवातीला त्‍यांनी टीडीपी जॉईन केली. नंतर त्‍या समाजवादीमध्‍ये गेल्‍या. त्‍यांनी दोन वेळा रामपूर मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. त्‍या दोन वेळा खासदार झाल्‍या. आता त्‍या भाजपकडून रामपूरमधूनच यंदाची लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.

Wednesday, February 13, 2019

सर्वोत्तम अदाकारा मधुबाला



दिलीपकुमार, राज कपूर आणि देव आनंद हे सुपरस्‍टार होण्‍यापूर्वी १५ वर्षे आधी अशोककुमार हे सुपरस्‍टार होते. या सुपरस्‍टारबद्‍दल कुणालाही आकर्षण वाटावे असे अशोककुमार यांचे व्‍यक्‍तिमत्त्‍व होते. मधुबालाही त्‍याला अपवाद नव्‍हती. तिच्‍यासारखी सुंदर, मनमोहक अदानी घायाळ करणारी अदाकारा, आपल्‍या मादक अदानी आणि मदमस्‍त नयनांनी, सुंदर हास्याने प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मधुबाला. व्‍हॅलेंटाईन्‍स डे ला म्‍हणजेच १४ फेब्रुवारी, १९३३ चा तिचा जन्‍म. 

असे म्‍हटले जाते की, महलचा सुटाबुटातील अशोककुमार मधुबालालाही भावला. मधुबालाने अशोककुमारला प्रेमपत्र आणि लाल गुलाब देऊन प्रेम व्‍यक्‍त केले होते. अशोककुमार हे नलिनी जयवंतच्‍या प्रेमात होते. त्‍यामुळे मधुबाला यांचे पत्र बालिशपणा म्‍हणून त्‍यांनी सोडून दिले होते.

अशोकुमार आणि नलिनी यांचे 'संग्राम' आणि 'समाधी' हे दोन चित्रपट तुफान गाजले होते. 'समाधी'मधील 'गोरे गोरे बाँके छोरे,' 'कभी मेरी गली आया करो' हे दोन गाणी प्रचंड लोकप्रिय झाले होते. त्‍यांनी 'शेरू,' 'नौबहार,' 'सलोनी,' 'जलपरी,' 'नाझ' आणि 'मिस्‍टर एक्‍स' या चित्रपटांत एकत्र काम केले. परंतु, दोघेही खर्‍या खुर्‍या आयुष्‍यात प्रेमात होते. याआधीच अशोककुमार यांचे लग्‍न झाले होते. नलिनी-अशोककुमार दोघे लग्‍नही करणार होते. परंतु, त्‍यांचे लग्‍न होऊ शकले नाही.

अशोकुमार आणि मधुबाला   

'महल' हा चित्रपट सुपरडुपर हिट झाल्‍यानंतर अशोकुमार आणि मधुबाला यांचे तीन चित्रपट हिट झाले. १९५० साली 'निशाणा' हा चित्रपट आला. त्‍यानंतर तब्‍बल सात वर्षांनी 'एक साल' हा चित्रपट आला. या चित्रपटातील ओ. पी. नय्‍यरच्‍या संगीताने धूम माजवली.


या चित्रपटातील 'आईये मेहरबाँ, बैठीए जानेजा, शौकसे लिजिए जी इश्‍क के इम्‍तेहान' हे सुंदर रोमँटिक गाणे मधुबालाने आपल्‍या आयुष्‍यातील सर्वोत्तम नृत्‍य आणि अदाकारी पेश केली आहे. तिच्‍या या अदानी प्रेक्षकांना घायाळ केले.

'महल' चित्रपटाच्‍यावेळी अशोककुमार ३८ वर्षांचे होते. तर मधुबाला १६ वर्षांची होती. एकेकाळची 'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणी हिचा नायक म्‍हणून अशोककुमार यांनी काम केले होते. याच देविका राणी यांनी बेबी मुमताज यांचे नाव मधुबाला असे केले होते.

किशोरकुमार आणि मधुबाला

'किस्‍मत' हा १९४२ ला आलेल्‍या चित्रपटाने अशोककुमार यांना प्रचंड प्रसिध्‍दी मिळवून दिली. याच चित्रपटाच्‍या शूटिंगवेळी बेबी मुमताज (मधुबाला) 'बॉम्‍बे टॉकिज'मध्‍ये यायची. त्‍यावेळी ती ९ वर्षांची होती. अशोककुमार यांचा लहान भाऊ किशोरकुमार आणि हास्‍य अभिनेता मुमताज अलीचा मुलगा मेहमूद त्‍यावेळी बॉम्‍बे टॉकिजमध्‍ये खेळत असायची. मधुबाला आणि किशोरकुमार हे भातुकलीचा खेळ खेळणारे खर्‍याखुर्‍या जीवनात पती-पत्‍नी बनले. आणि मधुबालाचे प्रेम नाकारणारे अशोककुमार मोठे दीर बनले.

किशोरकुमार आणि मधुबाला यांनी लग्‍न केले होते. त्‍यांच्‍या लग्‍नाने अशोककुमार यांची आई प्रचंड संतापली. सून म्‍हणून मधुबाला त्‍यांना मान्‍य नव्‍हती. परंतु, अशोककुमार यांनी आपल्या आईची समजूत घातली आणि मधुबालाला सन्‍मानाने सून म्‍हणून घरात घ्‍यायला लावले.

अशोककुमार यांनी ३०४ चित्रपटांमध्‍ये काम भूमिका केल्‍या. हिमांशू यांचा मृत्‍यू झाल्‍यानंतर 'बॉम्‍बे टॉकिज' ही चित्रपटनिर्मिती संस्‍था कर्जात बुडाली. अशोककुमार यांनी बॉम्‍बे टॉकिजला कर्जातून बाहेर काढले. असे म्‍हटले जाते की, त्‍यावेळचे ३५ लाख रुपयांचे बॉम्‍बे टॉकिजचे कर्ज अशोककुमार यांनी फेडले.

नलिनी जयवंत आणि अशोककुमार यांचे नाते फार काळ टिकले नाही. नलिनी आणि अशोककुमार चेंबूरच्‍या युनियन पार्क कॉलनीमध्‍ये समोरासमोरच्‍या बंगल्‍यात राहत असे. मृत्‍यूपर्यंत ते तेथेच राहिले होते.     

खुबसुरत मधुबालाला चित्रपटात अशी मिळाली संधी




तिच्‍या नटखट अदा, सुंदर हास्‍याने भुरळ घालणारी ती मधुबाला. मधुबालाला चार बहिणी. मधुबाला तिसर्‍या क्रमांकाची. मोठी बहिण कनीज फातिमा, दुसरी बलसारा, तिसरी मधुबाला, धाकटी चंचल आणि पाचव्‍या क्रमांकाची शहिदा.

मधुबालाचे वडील अताऊल्‍ला खाँ. ते जुन्‍या दिल्‍लीत राहायचे. तेव्‍हा ते इंम्‍पिरिअल टोबॅको कंपनीमध्‍ये नोकरीला होते. परंतु, तंबाखूच्‍या कारखान्‍यात काम केल्‍यामुळे त्‍यांना त्रास झला. त्‍यामुळे त्‍यांची नोकरी सुटली. मधुचं खरं नाव मुमताज जहाँ बेगम-देहलवी. तिचं बालपणापासूनच आकर्षक व्‍यक्‍तिमत्त्‍व. तिचं हासणं म्‍हणजे सुमधूर, सूरमय.

असे म्‍हटले जाते की, घरातल्‍या घरात बसून ती सोहराब मोदींच्‍या 'पुकार'मधले सीन करायची. हे तिच्‍या वडिलांनी पाहिलं आणि चित्रपटसृष्‍टीत तिचे नशीब आजमावण्‍यासाठी तिला मुंबईला घेऊन आले. ते मुंबईत स्‍टुडिओमध्‍ये मधुला काम मिळण्‍यासाठी चकरा मारायचे.

अखेर मधुला एका चित्रपटात काम करायला मिळाले. बॉम्‍बे टॉकिजने १९४२ ला बसंत (मुमताज शांती, उल्‍हास) मध्‍ये बालतारका म्‍हणून काम मिळालं. महिन्‍याला शंभर रुपये पगारही मिळाला. 'बसंत' हा चित्रपट अमिया चक्रवर्ती यांनी दिग्‍दर्शित केला होता. त्‍यात 'मेरे छोटे से मन की छोटी सी दुनिया रे' हे गाणे मधुवर चित्रित करण्‍यात आलं होतं.

'बॉम्‍बे टॉकिज'ची मालकीण देविका राणीला मधुचं काम आवडलं. संस्‍थेच्‍या ज्‍वारभाटासाठी त्‍यांनी मधुला बोलावले. त्‍याचबराबेर, राजकपूरसोबत 'नीलकमल'मध्‍ये मधुला मुख्‍य नायिका म्‍हणून काम द्‍यायचं असं त्‍यांनी ठरवलं होतं.

'ज्‍वारभाटा'मध्‍ये दिलीपकुमार (त्‍यांचा पहिला सिनेमा) व मृदूला यांच्‍या मुख्‍य भूमिका होत्‍या. तर बालकलाकार म्‍हणून मधु दिसणार होती. परंतु, काही कारणांमुळे देविका राणी यांनी मधुला घेतले नाही. मात्र, सेटवरच दिलीपकुमार यांची मधुशी ओळख झाली. केदार शर्मा यांच्‍या 'नीलकमल'मध्‍ये राजकपूर नायक म्‍हणून दिसणार होते. केदार यांच्‍या पत्‍नी कमला चॅटर्जी या नायिकेची भूमिका साकारणार होत्‍या. आणि त्‍यांच्‍या लहानपणीची भूमिका मधुबाला साकारणार होती. तिचे अकाली निधन झाले. त्‍यामुळे हा चित्रपट थांबला. परंतु, मधुच्‍या वडिलांनी केदार यांच्‍या मागे लागून हा चित्रपट करावरास लाला. आणि या चित्रपटात मधुला नायिका म्‍हणून घेण्‍याची विनंती केली. केदार यांनी ती मान्‍य केली.

केदार यांचा 'नीलकमल' चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील राज कपूर आणि मधु यांचा दमदार अभिनयाने दिग्‍दर्शक मोहन सिन्‍हांना मोहून टाकले. मोहन यांनी 'चितोड विजय' आणि 'दिल की रानी'मध्‍ये त्‍या दोघांनाही संधी दिली. केदार यांनी मधुला 'नेकी और बंदी' चित्रपटात पुन्‍हा संधी दिली. यामध्‍ये केदार स्‍वत: नायक बनले. परंतु, हा चित्रपट चालला नाही.

पुढे १९५१ मध्‍ये मधु आणि दिलीपकुमार 'तराना'मध्‍ये एकत्र आले. मधुबालाला दिलीपकुमार आवडायचे. बी. आर. चोप्रा यांच्‍या 'नया दौर'मध्‍ये सुरुवातीला मधुबालाला घेणार होते. चित्रपटाचे एक शूटिंग सुरू होते. तेथे मधुला जाण्‍यास तिच्‍या वडिलांनी मज्‍जाव केला. त्‍यामुळे मधुने चोप्रा यांना आपला नकार कळवला आणि 'नया दौर'साठी वैजयंती मालाची निवड करण्‍यात आली.

त्‍यावेळी 'चलती का नाम गाडी' आणि 'हाफ टिकट' या चित्रपटांमुळे मधु ही किशोरकुमार यांच्‍या सहवाहात आली होती. त्‍या सुमारास मधु लोकप्रिय बनली होती. मधुने १९६० मध्‍ये किशोरकुमार यांच्‍याशी लग्‍न केले.
किशोरकुमार यांचा भाऊ अशोककुमार. अशोककुमार यांच्‍यासोबत मधुबालाने 'महल' आणि 'हावडा ब्रीज' हे चित्रपट केले. ते तुफान गाजले. 'पराई आग' या चित्रपटाच्‍या सेटवर पहिल्‍यांदा मधुबालाने कमाल अमरोहींना पाहिले. तेव्‍हा ते संगीतकार गुलाम मोहम्‍मदशी बोलत उभे होते. कमालजींची उर्दूमिश्रित काव्‍यभाषा ऐकून मधुबाला प्रभावीत झाली होती. ती आपल्‍याकडे बघत आहे, हे समजल्‍यावर आदाब अर्ज हे असे कमाल म्‍हणाले.

महल हा चित्रपट कमाल यांनी दिग्‍दर्शित केला. मधुबालाच त्‍याची नायिका म्‍हणून त्‍यांना हवी होती. परंतु, काही जणांना ते मान्‍य नव्‍हते. त्‍यामुळे स्‍क्रिन टेस्‍ट घ्‍याचे ठरवले. आणि मधुने दिलेल्‍या शूटनंतर सुरैय्‍याऐवजी मधुला घेण्‍यात आले. सुरैय्‍या त्‍यावेळी ४ हजार रुपये घेत होती. परंतु, मदुला ७ हजार रुपये द्‍यावे लागले होते.

नियतीने मधुबालाला खरे प्रेम मिळवून दिले नाही. 'आयेगा आनेवाला' अशी साद घालत तिने जगाचा निरोप घेतला.  

Tuesday, November 27, 2018

हेमा मालिनींशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी बदललं होतं नाव


बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनी यांची लव्‍ह स्‍टोरीचे किस्‍से आपण ऐकला असाल. कदाचित तुम्‍हाला माहिती नसेल की, हेमा मालिनी यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी आपलं नाव बदललं होतं. धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. या दोघांची लव्‍ह स्‍टोरी इंटरेस्‍टिंग आहे. 

dinsta
अभिनेता धर्मेंद्र चित्रपटात येण्‍यापूर्वी त्‍यांचं लग्‍न प्रकाश कौर यांच्‍याशी झालं होतं. धर्मेंद्र १९५८ मध्‍ये चित्रपटात आले. त्‍यांचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे.' तर हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता...'सपनों का सौदागर'. हा चित्रपट १९६८ मध्‍ये झाला होता. १९७० मध्‍ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पहिल्‍यांदाच मोठ्‍या पडद्‍यावर दिसले होते. शराफत आणि तुम हसीन मैं जवां या चित्रपटांनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाल्‍याचे वृत्त येऊ लागले होते. 
dinsta
आपल्‍या पहिल्‍या चित्रपटाबद्‍दल (सपनों का सौदागर) हेमाजी म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'माझा पहिला चित्रपट चालला नाही, तरीही तो रिलीज झाल्‍यानंतर मला बरेच चित्रपट मिळाले, हे एक आश्‍चर्यचं होतं. तो का चालला नाही, मला आजवर कळलेलं नाही. सुदैवाने त्‍याच्‍यानंतर मला मिळालेले बहुतेक चित्रपट चांगले चालले. सपनों का सौदागरच्‍या अपयशाचा शोक कुणालाच नव्‍हता. चित्रपट पूर्ण झाला आणि थिएटरमध्‍ये लागला, हेच माझ्‍यादृष्‍टीने खूप मोठं होतं. मद्रासमधल्‍या माझ्‍या तमिळ चित्रपटाचा जो दु:खद अनुभव आला होता, त्‍यानंतर हिंदीतला पहिला चित्रपट सुरळीत रिलीज झाला, हीच ईश्‍वराची मोठी कृपा.'
dinsta
१९७० नंतर एका मागोमाग एक हेमा आणि धर्मेंद्र एकत्र चित्रपटांत काम करू लागले. दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. धर्मेंद्र विवाहीत होते. परंतु, दुसरं लग्‍न करणं धर्माविरुध्‍द होतं. हेमा मालिनी दाक्षिणात्‍य कुटुंबातील होत्‍या. चित्रपट 'शोले'पर्यंत (१९७५) हेमा-धर्मेंद्र यांच्‍यातील प्रेम वाढत गेलं. 
धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करवून घेतलं. त्‍याचशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी  १९७९ मध्‍ये लग्‍न केलं. 
hema Malini and dharmendra साठी इमेज परिणाम
अनेक चित्रपट केले एकत्र
धर्मेंद्र - हेमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'नया जमाना,' 'सीता और गीता,' 'राजा जानी,' 'पायल,' 'प्रतिज्ञा,' 'बर्न‍िंग ट्रेन,' 'दिल का हीरा,' 'अलीबाबा और ४० चोर,' 'आसपास,' 'रजिया सुल्‍तान' या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 
 

'ड्रीमगर्ल'चे 'ते' सर्वांत मोठे फॅन








आज १६ ऑक्‍टोबर ड्रीमगर्ल हेमा मालिनी यांचा ७० वा वाढदिवस. हेमा मालिनी यांचे चाहते जगभरात आहेत. परंतु, त्‍यांचा डाय हार्ट फॅन असणारे एक दिग्‍गज व्‍यक्‍ती होते, ते म्‍हणजे भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी. दुर्देवाने अटलजी आपल्‍यात नाहीत. परंतु, खुद्‍द हेमाजींनी हा खुलासा एका कार्यक्रमात केला होता. कवीमनाचे, साहित्‍यिक, राजकीय नेते अटलबिहारी वाजपेयीजी आपले डाय हार्ड फॅन असल्‍याचं त्‍यांनी म्‍हटलं होतं. 

'सीता और गीता' हा आपला चित्रपट अटलजींनी २५ वेळा पाहिला आहे. त्‍यामुळे जेव्‍हा अटलजींना मी पहिल्‍यांदा भेटले तेव्‍हा ते लाजले होते, असेही हेमा मालिनी म्‍हणाल्‍या होत्‍या. अटलबिहारी वाजपेयी आपले प्रशंसक असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या होत्‍या. अटलजींना 'सीता और गीता' हा चित्रपट इतका आवडला होता की, त्‍यांनी हा चित्रपट २५ वेळा पाहिला आहे. जेव्‍हा अटलजींना पहिल्‍यांदाच भेटले तेव्‍हा ते लाजले होते, असे त्‍या कार्यक्रमात म्‍हणाल्‍या.
Hema Malini film seeta aur geeta साठी इमेज परिणाम
'मी राजकारणात विशेषत: भाजपमध्‍ये येण्‍याचे श्रेय अभिनेते विनोद खन्‍ना यांना जाते. १९९९मध्‍ये गुरुदासपुरमधून लोकसभेची निवडणूक लढवत होते आणि विनोद यांनी आपणास प्रचारासाठी बोलवले होते. प्रचारादरम्‍यानचे भाषण ऐकून लालकृष्‍ण अडवाणी यांनी बिहारमध्‍ये प्रचार करण्‍याचे आमंत्रण दिले होते. यानंतर भाजपच्‍या प्रचारासाठी मी जात होते आणि २००३ मध्‍ये त्‍यांनी राज्‍यसभा सदस्‍यत्‍व देऊन माझ्‍यावर जबाबदारी सोपवली होती,' असेही हेमा म्‍हणाल्‍या होत्‍या. 
Atal Bihari Vajpayee साठी इमेज परिणाम
हेमा यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची एक आठवणही सांगितली होती. 'जेव्‍हा मी पदाधिकार्‍यांना सांगितले की, मी भाषणात अटलजींचा नेहमीच उल्‍लेख करते. मात्र, त्‍यांना कधीही भेटलेले नाही. यानंतर त्‍यांना भेटण्‍याचा योग आला. मी पदाधिकार्‍यांना विचारलं की, अटलजी व्‍यवस्‍थित का बोलत नाहीयेत? तेव्‍हा ते माझे प्रशंसक असल्‍याचे समजले. १९७२ मध्‍ये आलेला माझा 'सीता और गीता' हा चित्रपट त्‍यांनी २५ वेळा पाहिल्‍याचे त्‍यांनी सांगितले,' असे हेमामालिनी म्‍हणाल्‍या होत्‍या.

ओमपुरी यांचे ९ फेमस डायलॉग्‍ज


'मुल्‍क सेल्‍फ सफिशिएंट नहीं हो गया है... हां कुछ लोग सेल्‍फ-सफिशिएंट जरूर हो गए हैं...बिजली, पानी, घर, दवा, कानून, शिक्षा...कौन सी चीज है जो आम आदमी को नसीब हो गई है? ६० परसेंट लोग अभी भी गरीबी की रेखा से नीचे हैं, और वो सिर्फ गरीब ही बदनसीब भी हैं, ४० बरस हो गए हैं, हाफ ए सेंचुरी...आखिर कब तक इंतजार करें?' 

'माचिस' चित्रपटातील हे संवाद गुलजार यांनी लिहिले होते आणि ओम पुरी यांनी या संवादाला आपला आवाज दिला. केवळ माचिस चित्रपटच नाही तर 'अर्ध-सत्‍य,' 'आक्रोश,' 'चक्रव्‍यूह' असे चित्रपट ओम पुरी यांच्‍या आवाजाने सजले आहेत. 
ओम पुरी यांचे प्रसिध्‍द संवाद
- इस देश में पॉलिटिक्‍स ही सबसे बडा हत्‍यारा है
चित्रपट : देव  
- मुल्‍क सेल्‍फ-सफिशिएंट नहीं हुआ है, हां, कुछ लोग जरूर सेल्‍फ सफिशिएंट हो गए हैं.
चित्रपट : माचिस 
- संसार में शक्‍ति का संतुलन बहुत जरूरी है, आग को पानी का डर बना रहना चाहिए
चित्रपट : मकबूल
- मजहब इंसानो के लिए बनता है, मजहब के लिए इंसान नहीं बनते
चित्रपट : ओह माय गॉड 
- कभी-कभी फैसले सहीं होते है, लकिन उन्‍हें बताने का वक्‍त हाथ से निकल जाता है
चित्रपट : क्‍यो हो गया न 
- अगर अपने आप पर भरोसा हो तो दोस्‍ती और भी कामयाब बना देती है...और, अपने पर शक हो तो बर्बाद भी कर सकती है 
चित्रपट : लंडन ड्रीम्‍स 
- परंपराओं की लकीरें जब धुंधली पड जाती हैं...तो नई लकीरें खींचने से परहेज नहीं करना चाहिए  
चित्रपट : बाबूल
- होता है, अक्‍सर होता, इश्‍क में अक्‍सर ऐसा होता है, चोट कहीं लगती है जाकर, जख्‍म कहीं पर होता है
चित्रपट : मिर्ज्या 
- बुढापे को मौत का नहीं...अकेलेपन का डर होता है 
चित्रपट : इलाका 
ओम पुरी यांचं ६ जानेवारी, २०१७ ला निधन झालं. ते आज आपल्‍यात नाहीत. परंतु, त्‍यांचा अभिनय, त्‍यांचे चित्रपट कायमचे लक्षात राहिले आहेत.  

इंडस्‍ट्रीत श्रीदेवी यांचं शोषण? स्‍मिता पाटील यांनी केलेले खुलासे


काही दिवसांपूर्वी राज बब्‍बर यांचा मुलगा प्रतीक बब्‍बरने आपली आई स्‍मिता पाटील यांचा एक कोट इन्‍स्‍टाग्रामवर शेअर केला होता. या कोटमध्‍ये लिहिलं होतं की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं शोषण होत आहे?' प्रतीकने शेअर केलेल्‍या फोटोला पाहून समजलं की, फोटोतील कोट स्‍मिता यांच्‍या एका मुलाखतीतला आहे. 

काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत स्‍मिताजी भारतीय सिनेमातील बदल याविषयावर बोलल्‍या होत्‍या. त्‍यावेळी दाक्षिणात्‍य सिनेसृष्‍टीसह श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्‍यावर त्‍यांनी प्रश्‍न उपस्‍थित केले होते. 
स्‍मिता यांनी मुलाखतीत म्‍हटले होते, 'इंकलाबमध्‍ये एक स्‍विमिंग पूल गाणं आहे. मला चिंता होते की, महिला हे सर्व पाहतात. त्‍यांना नक्‍कीच लाज वाटत असणार की, आजकालच्‍या अदाकारा अशा प्रकारे अंगप्रदर्शन करतात. मला वाटतं की, यावर महिला प्रेक्षकांनी आवाज उठवायला हवा. दिल्‍लीमध्‍ये सहेली समूहाने मल्‍याळम चित्रपटांतील अश्‍लील दृश्‍यांविरोधात आंदोलन केले होते. आणि त्‍यावर प्रतिबंध घालण्‍यास ते यशस्‍वी झाले होते.' 
त्‍यानंतर स्‍मिता यांनी श्रीदेवी यांच्‍याबद्‍दल बोलताना म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'श्रीदेवी माझी चांगली मैत्रीण आहे. मला प्रत्‍यक्षात त्‍यांच्‍याशी बोलण्‍याची इच्‍छा आहे. त्‍यांना मला विचारायचे आहे की, 'त्‍यांना महिती आहे का की, कशा प्रकारे त्‍यांचं इंडस्‍ट्रीत शोषण होत आहे?' 
'चक्र'दरम्‍यान, मला समजलं नाही की, त्‍या बाथ सीनचा अर्थ काय आहे? हे समजण्‍यासाठी मला चार वर्षे लागली. त्‍यावेळी मी हा सीन करण्‍यास तयार झाले होते. नंतर मला या गोष्‍टीचं खूप दु:ख झालं. परंतु, साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्रींना असा विाचर करण्‍याची संधीदेखील मिळत नाही. त्‍यांच्‍या अवती-भोवतीचे लोक त्‍यांना मानसिकरित्‍या तसा विचार करू देत नाहीत. लहानपणापासूनच त्‍यांना अभिनेत्री बनण्‍यासाठी तयार केले जाते. त्‍या सेटवर जातात आणि सर्वकाही आपल्‍या आई-वडिलांच्‍या म्‍हणण्‍यानुसार करतात. त्‍यांचं फक्‍त एकच उद्‍देश असतो की, पैसे कमवणे आणि लग्‍न करणे. त्‍यांना शेवटपर्यंत हे समजत नाही की, इंडस्‍ट्रीत त्‍यांचं कशा प्रकारे शोषण होत आहे,' असे त्‍या म्‍हणाल्‍या. 
त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, या साऊथ इंडस्‍ट्रीच्‍या अभिनेत्री केवळ सेक्‍स -ऑब्‍जेक्‍टस समोर ठेवून काम करतात. त्‍यांना शोषणाबद्‍दल काही वाटत नाही. याच अभिनेत्रींना मोठ्‍या पडद्‍यावर कशा प्रकारे सादर केले जाते आणि त्‍यामुळे प्रेक्षकांवर काय प्रभाव पडेल, याचा विचार केला जात नाही. आता पाहा की, 'तोहफा,' 'मवाली' हिट ठरले. प्रत्‍यक्षात मात्र, ते निराशाजनक आहेत. चित्रपट एक मजबूत माध्‍यम आहे. या माध्‍यमातून खूप काही करता येऊ शकतो. श्रीदेवी एक शानदार अभिनेत्री आहे परंतु, पाहा की ती स्‍वत: काय करत आहे? मी 'जाग उठा इन्‍सान' पाहिला. त्‍यातील त्‍यांचा अभिनय आणि नृत्‍याने मला प्रभावित केलं होतं. मला वाटतं की, त्‍यांनी काही चांगले चित्रपट करायला हवेत. 'सदमा'मध्‍ये देखील त्‍यांचा अभिनय उत्‍कृष्‍ट होता. परंतु, त्‍यानंतर त्‍यांनी 'तोहफा' आणि 'मक्‍सद' यासारखे चित्रपट केले. 
'मला वाटतं की, अभिनेत्रींनी आपण काय करायचं आहे, हे ठरवायला हवं. मी अनेक वर्षांपर्यंत स्‍वत:ला रेखा, हेमा समजले. या भ्रमात मी अनेक चुकीचे चित्रपट साईन केले. परंतु, आता मी स्‍पष्‍ट आहे. जर मी एक अभिनेत्री म्‍हणून यशस्‍वी असेल तर मी यशस्‍वी झाले आहे. मला बॉक्‍स ऑफिसची चिंता नाही, जेथे अभिनेत्री काहीही करतात,' असेही त्‍या म्‍हणाल्‍या.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...