बॅलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात अधिक क्यूट जोडींपैकी एक आहे. त्यांची लव्ह स्टोरी खूपच खास आहे. तुम्हाला माहिती आहे का? अजय देवगनला काजोल आवडत नव्हती. त्यांच्या आयुष्यातील अशी काही, इंटरेस्टिंग माहिती जाणून घ्यायची आहे? मग वाचा पुढील माहिती.
अभिनेता अजय देवगनचा आज वाढदिवस. काजोलचे बॉलिवूडमधील करिअर बहरले होते, त्यावेळी काजोलला अजय देवगनशी प्रेम झाले आणि दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
अजय-काजोलची लव्हस्टोरी
काजोलची लव्ह स्टोरी एका चित्रपटाच्या कथेसारखीच आहे. असे म्हटले जाते की, काजोलच्या आधी अजय देवगनचे करिश्मा कपूरशी अफेअर होते. करिश्मा कपूर त्यावेळची टॉपची अभिनेत्री होती. अजय देवगन आणि करिश्मा कपूरने पहिल्यांदा एकत्र 'जिगर' या चित्रपटात काम केले होते. कामाच्यावेळी दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अजय देवगनने करिश्मासाठी त्यावेळी त्याची गर्लफ्रेंड रवीना टंडनशी ब्रेकअप घेतला होता. अजय देवगन-करिश्मा रिअल लाईफमध्ये टाईम स्पेंड करत होते, त्यावेळी दोघांनी एकत्र 'जिगर', 'धनवान', 'सरगम', सुहाग' यासारखे चित्रपट एकत्र केले. याचदरम्यान, अजय देवगनने काजोलसोबत 'हलचल' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले.
सुरुवातीला अजय देवगन-काजोल यांच्यात केवळ मैत्री होती. काजोल ज्यावेळी पहिल्यांदा अजयला भेटली, त्यावेळी अजय चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवर एकटा बसला होता. अजयला एका किनारी एकटे बसायला आवडत असे. तो अधिक बोलायचा नाही. अजय देवगनला सुरुवातीला काजोल आवडायची नाही. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत अजय देवगनने आपल्या लव्ह स्टोरीचा खुलासा केला होता. अजय म्हणाला होता, ''हलचल'च्या शूटिंगवेळी पहिल्यांदाच काजोलशी माझी भेट झाली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ती खूप बोलणारी, गर्विष्ठ मुलगी होती. आमच्या दोघांचा स्वभाव एकदम वेगळा होता. परंतु, आमच्या दोघांतील काही विचार, गोष्टींमुळे आम्ही जवळ आलो.''
'हलचल' चित्रपटाच्यावेळी अजय देवगन आणि काजोल यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यावेळी अजय देवगन करिश्मा कपूरला तर काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती. काजोल आणि कार्तिक यांचे नाते टिकण्याची शक्यता नव्हती. त्यामुळेच काजोल अजय देवगनच्या जवळ आली. काजोलच्या एन्ट्रीने अजय देवगन आणि करिश्मा कपूरच्या लव्ह स्टोरीचा एंड झाला. अजय आणि काजोलने महाराष्ट्रीयन पध्दतीने १९९९ मध्ये लग्न केले.
बॉलिवूडचा प्रवास
'जख्म' आणि 'द लेजेंड ऑफ भगत सिंह', दृश्यम, 'सिंघम' यासारखे हिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगणचा आज ४८ वा वाढदिवस. अजय देवगणने अगदी कमी वयात अभिनय सुरू केलं होतं. 'फूल और कांटे' हा त्याचा पहिला चित्रपट होता, असे म्हटले जाते. पण, त्याचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' नसून त्याआधी तो एका चित्रपट दिसला होता. चाईल्ड आर्टिस्ट म्हणून अजयने मिथून चक्रवर्ती यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटात काम केलं होतं. त्याने मिथून यांची बालपणीची भूमिका साकारली होती.
चाईल्ड आर्टिस्टची भूमिका
चित्रपट 'प्यारी बहना'मध्ये अजयने 'मास्टर छोटू'ची भूमिका साकारली होती. मिथून चक्रवर्ती यांच्या लहानपणीची भूमिका अजयने केली होती. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये अजय देवगणने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत.
अजयचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला. अजयने मुंबईतील मीठी बाई कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. अजयचे वडिल वीरू देवगण इंडस्ट्रीमध्ये प्रसिध्द स्टंटमॅन होते. तर आई वीणा देवगण यांनी त्यावेळी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती.
दिवसात १०० सिगरेट ओढायचा अजय
अजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो एकेकाळी एका दिवसांत १०० सिगरेट ओढत होता. पण, नंतर त्याने स्वत:च त्याच्या या सवयीवर नियंत्रण आणले.
स्वत:च्या मुलीला घाबरतो अजय
अजय आणि इलियाना डी-क्रूज टीव्ही शो 'यार मेरा सुपरस्टार' मध्ये सहभागी झाले होते. शोमध्ये अजयला अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. अँकरने अजयला विचारले होते की, 'तुझा सर्वांत मोठा क्रिटिक कोण आहे?' यावर अजय म्हणाला, 'माझी मुलगी. माझ्या मुलीला चित्रपट दाखवतानादेखील मला भीती वाटते. कारण ती चित्रपट पाहिल्यानंतर कपडे फाडते. इतकेच नाही तर मी तिला गाणे म्हणून दाखवले तरी ती म्हणते, काय आहे हे? बेसूर आहे. तुम्ही म्हातारे झालात. यानंतर मी गप्प बसतो. तुम्ही मुलांशी भांडू शकत नाही. मुलांकडून तुम्ही शिकायला हवं.'
बेस्ट परफॉर्मन्स
अजयने सर्वांत बेस्ट परफॉर्मन्स संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'हम दिल दे चुके सनम'मध्ये दिला होता. यात ऐश्वर्या राय बच्चनने नंदिनीची भूमिका केली होती. आणि तिचा पती म्हणून अजय देवगणने भूमिका साकारली होती.
... तर 'बाजीराव मस्तानी' अजयच्या नावे असता
अजय देवगणला संजय लीला भन्साळी यांचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'साठी विचारण्यात आले होते. पण, अजयने हा चित्रपट नाकारला.
अभिनेता आणि दिग्दर्शकही
अजयने आतापर्यंत एकच चित्रपट दिग्दर्शित केला आहे. त्या चित्रपटाचे नाव होते - 'यू मी और हम'. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. त्यामुळे अजयला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. तसेच अजयचा आणखी एक चित्रपट 'राजू चाचा'देखील फ्लॉप ठरला. हा चित्रपट अजयचा भाऊ अनिल देवगनने दिग्दर्शित केला होता.
इतके कोटी मानधन
अजय एका चित्रपटासाठी जवळपास २२ ते २५ कोटी रुपये मानधन घेतो. शाहरूख खान आणि सलमान खान नंतर इतकं मानधन घेणारा अजय हायएस्ट पेड ॲक्टर आहे.
अजयला 'जख्म' आणि 'द लेजेंड ऑफ भगत सिंह' चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर तीन फिल्मफेअर चित्रपटांनी गौरवण्यात आले आहे.
काजोलला पहिल्या भेटीत वाटला होता खडूस
एका टॉक शोमध्ये काजोलने आपल्या वैयक्तिक आयुष्यातील काही गोष्टी सांगितल्या होत्या. अशा अनेक गोष्टींचा खुलासा काजोलने केला, हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. काजोलने अजय देवगनच्या (तिचा पती) झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले होते. काजोल म्हणाली होती, 'मी सुरुवातीला अजयला खडूस आणि विचित्र समजत होते.'
काजोल म्हणाली होती, 'ज्यावेळी मी पहिल्यांदा अजयला भेटले, त्यावेळी तो कॉफी पित होता आणि प्रत्येकाकडे पाहत होता. ते खूपच विचित्र वाटत होतं. असं कुठल्या तरी व्यक्तीला पाहणे, माझ्यासाठी विचित्र होतं. नंतर आम्ही एकमेकांशी बोललो, त्यावेळी समजलं की, अजय एक समजदार व्यक्ती आहे आणि तो खूप कमी बोलतो. पहिल्या भेटीत तो मला खूप खडूस वाटला होता. आमच्या प्रेमाची सुरूवात मैत्रीने झाली. जर मी माझी तक्रार सांगितली तर तो खूप समजदारीने उत्तर देतो. आमच्या लग्नात आम्ही खूप कमी लोकांना आमंत्रित केलं होतं.'
आता अजय देवगणचा आगामी चित्रपट 'तानाजी' येतोय. 'तानाजी'ची प्रतीक्षा त्याच्या फॅन्सना लागून राहिली आहे.