Tuesday, December 10, 2019

तपस्विनी सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी

Image result for subbulakshmi

'त्यांची' सुंदर बोटे तानपूऱ्यासोबत तारांवर थिरकायची. डोळे बंद करून त्या तानपुऱ्याच्या झंकारित तारांसोबत गायकीच्या विश्वात रमायच्या. त्यानंतर, त्या आपल्या मागे बसलेल्या व्यक्तीकडे तानपुऱ्याचा स्वर सोपवायच्या आणि आपलं गायन सुरू करायच्या. दुपारच्या कडक ऊनातदेखील गायकीचा रियाज त्या करायच्या. त्यांनी रियाज केला नाही, असा एकदेखील दिवस गेला नाही. संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध करणाऱ्या महान व्यक्ती म्हणजे सुब्बुलक्ष्मी. ११ डिसेंबरला त्यांचा स्मृतीदिन. सुब्बुलक्ष्मी यांच्‍याबद्‍दल थोडक्‍यात जाणून घेऊया. 

केसांच्या मधून पाडलेली भांग, कपाळावर लावलेली गोल मोठी टिकली, त्याखाली लावलेला टिळा, नाकात दोन्हीकडे घातलेली नथणी, कानात घातलेली छोटी फुले (दागिना), स्मितहास्य असं सुब्बुलक्ष्मी यांच्या चेहऱ्यावरचं तेज. त्यांच्या या सौंदर्याबरोबरच त्यांच्या गायकीतील सुरेल सौंदर्याने संगीतप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवले. 'मदुरै षण्मुखवडिवु सुब्बुलक्ष्मी' अर्थातच एम. एस. सुब्बुलक्ष्मी प्रसिध्‍द गायिका. कुंजम्मा या नावाने त्यांना बालपणी लाडाने बोलवत असत. त्यांची आई अक्कमलाई या प्रसिध्‍द व्हायोलिन वादक होत्या. संगीताचं बाळकडू त्‍यांना त्‍यांच्‍या आईकडूनच मिळालं.

किशोरी अमोनकर त्यांना 'आठवा सुर' आणि लता मंगेशकर त्यांना 'तपस्विनी' म्हणायच्या. बडे गुलाम अली खान त्यांना 'सुरस्‍वरालक्ष्‍मी सुब्‍बुलक्ष्‍मी' म्हणत होते. सरोजिनी नायडू त्यांना 'भारताची स्‍वरकोकिळा' म्हणायच्या. १९४७ मध्ये आलेला चित्रपट 'मीरा'मधून त्या राष्‍ट्रीय पातळीवर चमकल्या. एकदा नेहरू सुब्बुलक्ष्मी यांच्याविषयी म्हणाले होते, 'सुरांची मलिकासमोर मी कोण आहे, केवळ एक पंतप्रधान.'



देशातीलच नव्‍हे तर आंतरराष्‍ट्रीय पातळीवरची ख्‍यातनाम गायिका. गायिकाच नाही तर त्या संगीतकार देखील होत्‍या. व्‍यकंटेश स्तोत्रामुळे त्‍या प्रसिध्‍दीच्‍या झोतात आल्‍या. त्‍यांचे गाजलेले गाणे म्‍हणजे विष्णुसहस्रनाम. त्‍यांचं भक्‍ती संगीत भारतातल्‍या घराघरांत पोहोचलेलं. संपन्‍न घराण्‍यातल्‍या त्‍या गायिका. श्रीनिवास अय्यंगर, मुसिरी सुब्रमण्यम अय्यर व सेम्मानगुडी श्रीनिवास अय्यर यांच्याकडे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे सांगीतिक शिक्षण झाले.

वयाच्‍या दहाव्‍या वर्षी त्यांची पहिली मैफिल झाली. पुढे जवळजवळ ७५ वर्षे त्‍यांनी मैफिली केल्‍या. त्‍याचं वैशिष्‍ट्‍ये असं की, साधारणपणे, १९८४-८५च्‍या नंतर त्‍यांनी जाहीर कार्यक्रम मोफत केले. त्‍या-त्‍या संस्‍थेसाठी म्‍हणून त्‍या बिदागी (मानधन) घ्‍यायच्‍या नाहीत. कोट्‍यवधीं रुपयांची मदत त्‍यांनी अनेक संस्‍थांना केली. त्‍यातल्‍या प्रमुख संस्‍था म्‍हणजे, पुण्‍यातील महात्‍मा गांधी ट्रस्‍ट, गांधी स्‍मारक निधी, कस्‍तुरभा स्‍मारक निधी, अशा राष्‍ट्रीय पातळीवरच्‍या संस्‍थांसाठी त्‍यांनी मैफिली केल्‍या. अनेक सार्वजनिक संस्‍थेसाठी त्‍यांनी कार्यक्रम केले. अनेक संस्‍थांना त्‍यांनी मदत केली. तिरुपती बालाजी, चेन्‍नईचा गांधी मेमोरिअल मंडप, हिंदी प्रचार सभा, रामनाथ स्‍वामी मंदिर, अमेरिकेतल्‍या हिंदू मंदिरांसाठी मदत, शाळा आणि महाविद्‍यालये आणि अनेक संगीत संस्‍थांना मदत त्‍यांनी केली होती.

अनेक थोर गायकांशी त्‍यांचे निकट संबंध होते. बडे गुलाम अली खाँ हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांचा उल्‍लेख करताना 'सुस्‍वरलक्ष्‍मी शुभलक्ष्‍मी' असे करायचे. विलायत खाँ हेदेखील त्‍यांना खूप मानायचे. त्‍यानंतर पंडित रविशंकर, पंडित जसराज, अमजद अली खान यासारखे अनेक मोठे कलावंत त्‍यांचा आदर करायचे. परमेश्‍वरी साधना आणि ईश्‍वरभक्‍ती ही त्‍यांच्‍या गाण्‍यांची वैशिष्‍ट्‍ये.



महात्‍मा गांधी, नेहरू गांधी, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्‍याशी त्‍यांचे चांगले संबंध होते. महात्‍मा गांधी यांचं आवडतं भजन 'हरि तुम हरि' हे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी गायलं होतं, असे म्‍हटले जाते. नेहरू त्‍यांना आपली मुलगी मानायचे. पंडित नेहरू सुब्‍बुलक्ष्‍मींना म्‍हणायचे, 'तू माझी पहिली मुलगी आहेस आणि इंदू दुसरी.' (इंदिरा गांधी)

इंदिरा गांधी आणि सुब्‍बुलक्ष्‍मी एका कार्यक्रमात शेजारी-शेजारी बसल्‍या होत्‍या. राजीव गांधी त्‍यावेळी ४ वर्षांचे होते. त्‍यावेळी कार्यक्रमात राजीव खूपच दंगा करत असल्‍यामुळे सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी इंदिराजींच्‍या हातातून राजीव यांना घेतले. त्‍यांना थोपटलं आणि शांत केलं, अशी आठवण सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी राजीव गांधी यांची हत्‍या झाल्‍यानंतर एका ठिकाणी बोलून दाखवली होती. नेहरू-गांधी परिवाराशी सुब्‍बुलक्ष्‍मी यांचे संबंध होते.

असं म्‍हटलं जातं की, त्‍यांचे गाणं-स्‍तोत्र ऐकल्‍याशिवाय लोक कामाला सुरुवात करायचे नाहीत. त्‍यांनी जी गाणी गायली त्‍यात व्‍यकंटेशस्‍तोत्र तर आहेच. शिवाय, त्‍याच्‍यापलीकडे मीरा, तुलसीदास, कबीर, सूरदास आणि तुकारामांचे अभंग (मराठी) अशा थोर संतांच्‍या रचनाही त्‍यांनी गायल्‍या. लोकांच्‍या मनावर अधिराज्‍य गाजवणार्‍या गानसम्राज्ञी सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी बंगाली रवींद्र संगीत देखील त्‍यांनी गायले आहे.



अखेरच्‍या काळात त्‍यांनी बिदागी (मानधन) घेऊन त्‍यांनी एकही मैफिल केली नाही. २०० पेक्षा अधिक मैफिली त्‍यांनी सार्वजनिक कार्यासाठी आणि ३ कोटी रुपयांहून अधिक देणग्‍या त्‍यांनी विविध कामांसाठी दिल्‍या. त्‍यांचे पती ‘कल्‍की’ नावाचे साप्‍ताहिक चालवायचे. सुब्‍बुलक्ष्‍मी आणि त्‍यांचे पती यांनी मिळून ‘सावित्री’ हा चित्रपट काढला होता (१९४१). त्‍यात सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी नारदाची भूमिका केली. तर सावित्रीची भूमिका मराठमोळी अभिनेत्री शांता आपटे यांनी साकारली होती. 

दक्षिणेतील लोकप्रिय साप्‍ताहिक कल्‍की नंतरच्‍या काळात तोट्‍यात आलं. आर्थिकदृष्‍ट्‍या तोट्‍यात आल्‍यामुळे त्‍यांनी साप्‍ताहिक बंद केलं. चेन्‍नईत त्‍यांचा 'कल्‍की गार्डन्‍स' नावाचं एक बंगला होता. आर्थिकदृष्‍ट्‍या अडचणीत आल्‍यामुळे त्‍यांनी तो बंगला विकला आणि साध्‍या घरात राहायला गेल्‍या. बंगला विकून त्‍यांनी कामगारांची देणी भागवली. 

'संत मीरा' नावाचा चित्रपट सुब्‍बुलक्ष्‍मी यांनी काढला. तो दाखवण्‍यासाठी सुब्‍बुलक्ष्‍मी या दिल्‍लीत पं. नेहरूंच्‍या निवासस्‍थानी गेल्‍या होत्‍या. त्‍या सिनेमाचं स्‍क्रिनिंग नेहरूंसाठी ठेवण्‍यात आलं होतं, असं म्‍हटलं जातं. 'मीरा' या चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर त्यांनी अभिनय क्षेत्राला पूर्णविराम देऊन आपलं संपूर्ण लक्ष संगीतावर केंद्रित केलं. त्यांनी चित्रपटांतही अभिनयही केला. त्यांच्या चित्रपटांत सेवासदनम, शाकुंतलम या तमिळ, आणि मीरा/मीराबाई या तमिळ/हिंदी चित्रपटाचा समावेश आहे. त्रिवेंद्रम येथील मंदिराच्या श्रीरंगम गोपुर बांधणीच्या खर्चासाठी सुब्बलक्ष्मी यांनी मुंबईत मैफिल केली होती.


सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील काही हिंदी/संस्कृत गीते -

चाकर राखो जी (हिंदी), पग घुंगरु बाँध मीरा नाचे रे, भज गोविंदम, मधुराक्षतम्‌, मोरे आँगना में (हिंदी), मोरे तो गिरिधर गोपाल (हिंदी), श्रीवेंकटाचलपते तव सुप्रभातम्‌, विष्णुसहस्रनाम, वृंदावन कुंज भवन (हिंदी), हनुमान चालिसा, हरि तुम हरो (हिंदी).


पुरस्कार -

पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्‍न पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत कलानिधी, संगीत कलाशिखरमणी पुरस्कार, कालिदास सन्मान, रॅमन मॅगसेसे पुरस्कार.

११ डिसेंबर २००४ रोजी त्‍यांचं चेन्नई येथे निधन झालं. 

Monday, November 25, 2019

हेमा यांच्याबद्दल 'या' गोष्टी माहिती आहेत का?




एक नृत्यांगना, सौंदर्यवती, सुंदर अदाकारा....तिच्या सुंदर नयनांनी हिंदी चित्रपटसृष्टीतल अख्खं जग व्यापलं....ती हेमा. 'हेमा' या नावाचा अर्थ 'सुंदर स्त्री' असा होतो, हे कुठेतरी वाचनात आलं होतं. असो. अर्थाप्रमाणे हेमा खरंच 'सुंदर' आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडतील.  
 मोहक चेहरा आणि नृत्‍य करताना रंगमंचावरचा डौलदार आणि आत्‍मविश्‍वासपूर्ण वावर यामुळे चित्रपटनिर्मात्‍यांचं लक्ष हेमाकडे वळलं. तिला पहिली ऑफर मिळाली, तेव्‍हा हेमा १४ वर्षांच्‍या होत्‍या.  हेमा यांना स्‍टार बनवण्‍यात त्यांची आई जया यांचा मोलाचा वाटा आहे. * हेमाचं प्रतिरुप बनलेल्‍या दोन्‍ही कन्‍या सुसंस्‍कृतता आणि कलेचा वारसा पुढे नेत आहेत. ओडीसी नृत्‍यात त्‍यांनी कौशल्‍य संपादन केलं आहे. 
Image result for hema malini mother
* संपूर्ण कुटूंब. धमेंद्र, हेमा मालिनी, ईशा आणि आहना. 
Related image
* १९६९ मध्‍ये हिंदी चित्रपटांच्‍या क्षितिजावर एक तेज:पुंज चांदणी उगवली. 
* 'सपनों का सौदागर'मध्‍ये हेमाजी राज कपूर यांच्‍यासोबत. ही मुलगी एक दिवस हिंदी चित्रपटांची मोठी स्‍टार असेल अशी भविष्‍यवाणी करणार्‍या राज कपूर यांचा विश्‍वास हेमाजींनी सार्थ करून दाखवला. 
Image result for hema film sapno ka saudagar
* दागिने, झगमगीत नक्षीदार कपडे परिधान करून हेमाजींनी 'शराफत' चित्रपटात तवायफची भूमिका केली होती. 
* 'चॉकलेट हिरो' देव आनंद आणि हेमा मालिनी यांनी अनेक चित्रपट केले. धमेंद्रनंतर हेमाने देव आनंद यांच्‍यासोबत सर्वाधिक चित्रपट केले. 
Image result for hema malini and dev anand
* 'तुम हसी मैं जवाँ'...चित्रपटातील हेमा आणि धमेंद्र. 
Related image
* 'लाल पत्‍थर'मधली भूमिका ही हेमाजींची वेगळी प्रतिमा दर्शवणारी होती. कपटी, स्‍वार्थी, मत्‍सर स्‍त्रीची भूमिका तिने या चित्रपटात साकारली होती. या भूमिकेनंतर हमेचं खूप कौतुक झालं होतं. 
* मोठ्‍या पडद्‍यावरचं तिचं पहिलं सर्पनृत्‍य दिसलं ते म्‍हणजे 'बाबुल की गलियां' चित्रपटात.  
* 'पराया धन'मध्‍ये प्रसिध्‍द अभिनेते राकेश रोशनसोबत अभिनय केला. त्‍यातील तिची साहसी भूमिका वाखाण्‍याजोगे आहे.  
Image result for hema film paraya dhan
* 'तेरे मेरे सपने'मध्‍ये नृत्‍यकलेचा भरपूर आनंद घेता आला असे हेमाजी सांगतात. 
* 'राजाजानी'मध्‍ये वेस्‍टर्न ड्रेसमधील हेमा. 
Image result for hema malini film raja jani
* तिची मनमोहक अदा दिसली ती म्‍हणजे 'गोरा और काला' या चित्रपटात.
* 'दो ठग' चित्रपटातील तिचे नृत्‍य लोकप्रिय ठरले. 
* मेरे नसीब में तू हैं के नहीं...! नसीब मधली नाईटक्‍लब सिंगर! फ्‍लोअर टच ब्‍लॅक रंगाचा वन पीस गाऊन आणि फरचा स्‍टोल अडकवून नाईट क्‍लबमध्‍ये सिंगर म्‍हणून नसीब चित्रपटातील हेमाजींची एक अदा. 
Image result for hema film naseeb
* चित्रपट 'खूशबू'मधील एक प्रसंग 
Image result for hema film khushboo

हेमा-धर्मेंद्र यांची लव्हस्टोरी एकदा वाचाच!




बॉलिवूड अभिनेता धर्मेंद्र आणि 'ड्रीमगर्ल' हेमा मालिनी यांची लव्‍ह स्‍टोरीचे किस्‍से आपण ऐकला असाल. हेमा मालिनी यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्मेंद्र यांनी आपलं नाव बदललं होतं. तुम्‍हाला ही गोष्ट माहिती आहे का? धर्मेंद्र हे हेमा मालिनी यांच्‍यापेक्षा १३ वर्षांनी मोठे आहेत. या दोघांची लव्‍ह स्‍टोरी इंटरेस्‍टिंग आहे. एकदा वाचायला हरकत नाही. 
अभिनेता धर्मेंद्र चित्रपटात येण्‍यापूर्वी त्‍यांचं लग्‍न प्रकाश कौर यांच्‍याशी झालं होतं. धर्मेंद्र १९५८ मध्‍ये चित्रपटात आले. त्‍यांचा पहिला चित्रपट 'दिल भी तेरा हम भी तेरे.' तर हेमा मालिनी यांचा पहिला चित्रपट होता...'सपनों का सौदागर'. हा चित्रपट १९६८ मध्‍ये झाला होता. १९७० मध्‍ये धर्मेंद्र आणि हेमा मालिनी पहिल्‍यांदाच एकत्र दिसले होते. 'शराफत' आणि 'तुम हसीन मैं जवां' या चित्रपटांनंतर दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाल्‍याचे वृत्त येऊ लागले होते. 
Image result for dharmendra and hema malini
पहिला चित्रपट फ्लॉप...तरीही ऑफर 
आपल्‍या पहिल्‍या चित्रपटाबद्‍दल (सपनों का सौदागर) हेमाजी म्‍हणाल्‍या होत्‍या की, 'माझा पहिला चित्रपट चालला नाही, तरीही तो रिलीज झाल्‍यानंतर मला बरेच चित्रपट मिळाले, हे एक आश्‍चर्यचं होतं. तो का चालला नाही, मला आजवर कळलेलं नाही. सुदैवाने त्‍याच्‍यानंतर मला मिळालेले बहुतेक चित्रपट चांगले चालले. सपनों का सौदागरच्‍या अपयशाचा शोक कुणालाच नव्‍हता. चित्रपट पूर्ण झाला आणि थिएटरमध्‍ये लागला, हेच माझ्‍यादृष्‍टीने खूप मोठं होतं. मद्रासमधल्‍या माझ्‍या तमिळ चित्रपटाचा जो दु:खद अनुभव आला होता, त्‍यानंतर हिंदीतला पहिला चित्रपट सुरळीत रिलीज झाला, हीच ईश्‍वराची मोठी कृपा.'
Image result for dharmendra and hema malini
१९७० नंतर एका मागोमाग एक हेमा आणि धर्मेंद्र एकत्र चित्रपटांत काम करू लागले. दोघांच्‍यात जवळीक निर्माण झाली. धर्मेंद्र विवाहीत होते. परंतु, दुसरं लग्‍न करणं धर्माविरुध्‍द होतं. हेमा मालिनी दाक्षिणात्‍य कुटुंबातील होत्‍या. चित्रपट 'शोले'पर्यंत (१९७५) हेमा-धर्मेंद्र यांच्‍यातील प्रेम वाढत गेलं. 
...आणि नाव बदललं
धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍याशी लग्‍न करण्‍यासाठी धर्म बदलला आणि दिलावर खान असं स्‍वत:चं नाव करवून घेतलं. त्‍याचशिवाय, लग्‍नानंतर देखील पहिली पत्‍नी प्रकाश आणि मुलांना मी सोडू शकत नाही. माझा परिवार स्‍वीकारावा लागेल, अशी अट धर्मेंद्र यांनी हेमा यांच्‍यासमोर ठेवली होती. हेमा यांनी ती अट स्‍वीकारली आणि दोघांनी  १९७९ मध्‍ये लग्‍न केलं. 
Related image

अनेक चित्रपटांत एकत्र काम
धर्मेंद्र - हेमा यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहे. 'नया जमाना,' 'सीता और गीता,' 'राजा जानी,' 'पायल,' 'प्रतिज्ञा,' 'बर्न‍िंग ट्रेन,' 'दिल का हीरा,' 'अलीबाबा और ४० चोर,' 'आसपास,' 'रजिया सुल्‍तान' या महत्त्‍वाच्‍या चित्रपटांचा समावेश आहे. 

दोन सूनांमधील संबंधाची कहाणी 'फायर' ते 'शीर कोरमा'



बॉलिवूडमध्‍ये समलैंगिकतेवर आधारीत 'हे' १२ चित्रपट
 


भारतात आधी समलैंगिक संबध हा गुन्हा मानला जात असे. तरी बॉलिवूडमधील काही चित्रपटांत या मुद्‍दयावर बिनधास्त भाष्य केले आहे. समाजातील समलैंगिकांचे भावनाविश्व उलगडणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर आले. काळानुसार, बॉलिवूडमध्‍ये समलैंगिकता विषय गंभीरपणे मांडण्‍यात आले. 'बॉम्बे टॉकीज', 'मार्गरिटा विद अ स्ट्रॉ', 'कपूर एंड सन्‍स'मध्‍ये संवेदनशीलपणे हा विषय सादर करण्‍यात आला होता. ‘कपूर ॲन्‍ड सन्‍स’मध्‍ये ज्‍याप्रकारे फवाद खानची भूमिका दाखवण्‍यात आली, त्‍याच्‍या अभिनयाचे खूप कौतुकही झाले. 

बॉलिवूड अशा चित्रपटांमध्ये अनेक दिग्दर्शकांनी समलैंगिक संबंध मोठ्या पडद्‍यावर सादर केले आहेत. जाणून घेऊया या चित्रपटांविषयी...
Image result for film sheer khurma swara
शीर कोरमा
बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर आणि दिव्या दत्ता यांच्या मुख्य भूमिका असणारा 'शीर कोरमा' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटाची कहाणी समलैंगिकतेवर आधारित आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन फराज आरिफ अन्सारी करत आहेत. 
Image result for film ek ladki ko dekha toh aisa laga
एक लडकी को देखा तो ऐसा लगा
याआधी सोनम कपूरचा चित्रपट 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा'मध्‍ये समलैंगिकता विषय मांडण्‍यात आला होता. सोनम, राजकुमार राव, रेजिना, अनिल कपूर यांच्‍या चित्रपटात महत्त्‍वाच्‍या भूमिका होत्या. यामध्ये सोनम आणि रेजिना लेस्बियन दाखवण्‍यात आले होते. राजकुमार राव एक लेखकच्‍या भूमिकेत तर सोनम स्वीटीच्‍या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. स्वीटी बालपणापासूनच प्रेम आणि लग्‍नाचे स्‍वप्‍न पाहते. यादरम्‍यान, स्‍वीटीची भेट शाहिल म्‍हणजेच राजकुमार रावशी होते. हे दोघे प्रेमात आहेत, असे स्वीटीच्‍या कुटुंबीयांना वाटते. परंतु, स्‍वीटीचे रहस्‍य वेगळे आहे. ती लेस्‍बियन आहे, असे चित्रपटात दाखवण्‍यात आले आहे.  
Image result for film fire
फायर
अभिनेत्री शबाना आजमी आणि नंदिता दास यांचा ‘फायर’ हा चित्रपट १९९६ मध्‍ये रिलीज झाला होता. दीपा मेहता यांच्‍या या चित्रपटात एकाच घरातील दोन सूना आणि त्यांच्यातील संबंध याची कहाणी दाखवण्‍यात आली आहे. या चित्रपटाबाबत वादही निर्माण झाला होता. 
Samir Soni, Fashion
फॅशन 
चित्रपट ‘फॅशन’मध्‍ये समीर सोनीने एका गे ची भूमिका साकारली होती. समाज त्‍या व्‍यक्‍तीला कशा प्रकारे नाकारतो आणि अशा परिस्‍थितीत एक गे व्‍यक्‍ती कशाप्रकारे डिप्रेशनमध्‍ये जातो, याची कहाणी दाखवण्‍यात आलीय. 
Image result for film dostana priyanka and john
दोस्ताना
जॉन अब्राहम आणि अभिषेक बच्चन यांचा चित्रपट ‘दोस्ताना’मध्‍ये दोन मित्र भाड्‍याने घर घेण्‍यासाठी ‘गे’ होण्‍याचे नाटक करतात, याची कथा दाखवण्‍यात आलीय. हा चित्रपट २००७ मध्‍ये आला होता. 
Image result for film my brother nikhil
माय ब्रदर निखिल
दिग्‍दर्शक ओनिर यांचा चित्रपट ‘माय ब्रदर निखिल’ सन २००५ मध्‍ये आला होता. या चित्रपटात दोन तरुणांमधील समलैंगिक संबंध दाखवण्‍यात आले आहे. हा चित्रपट समलैंगिक रिलेशनशिवाय एचआयव्‍ही एड्सवरही आधारित आहे.
Image result for film kapoor and sons fawad khan
कपूर ॲण्‍ड सन्‍स
प्रसिध्‍द अभिनेता फवाद खान या चित्रपटात गेची भूमिका केली होती. कशाप्रकारे समलैंगिक लोकांचे आयुष्‍य चढ-उताराने भरलेले असते, हे या चित्रपटात दाखवण्‍यात आलं आहे.  
Image result for film girlfriend
गर्लफ्रेंड
सन २००४ मध्‍ये आलेल्‍या 'गर्लफ्रेंड' या चित्रपटाबाबत मोठा वाद निर्माण झाला होता. चित्रपटात लेस्बियन रिलेशन दाखवण्‍यात आलं होतं. चित्रपटात ईशा कोपिकर आणि अमृता अरोराने मुख्‍य भूमिका साकारली होती.  
Image result for film bombay talkies rani mukherjee randeep huda,
बॉम्बे टॉकीज
चित्रपट ‘बॉम्बे टॉकीज’मध्‍ये वेगवेगळ्‍या कथा दाखवण्‍यात आल्‍या होत्‍या. पहिल्‍या कथेत तीन कॅरेक्टर होते. राणी मुखर्जी, रणदीप हुड्डा आणि साकिब सलीम यांच्‍या भूमिका होत्‍या. नव्‍या पिढीचे लोक एका गे अथवा लेस्बियनला कशा प्रकारे स्‍वीकार करतात, हे  चित्रपटात दाखवण्‍यात आले आहे. 
अलीगढ
मनोज वाजपेयी आणि राजकुमार राव स्टारर ‘अलीगढ’ २०१६ मध्‍ये आला होता. अलीगढ मुस्लिम युनिव्‍हर्सिटीचे प्रो. रामचंद्र यांच्‍या आयुष्‍यावर आधारित हा चित्रपट होता. या चित्रपटाबाबत वादही निर्माण झाला होता. चित्रपटाची कहाणी रिअल स्‍टोरीवर आधारित होती. 
Image result for film kal ho na ho
कल हो न हो 
करण जोहरच्या ‘कल हो ना हो’मध्ये सैफ अली खानच्या मोलकरणीला शाहरुख आणि सैफने साकारलेल्या भूमिकांमध्ये समलिंगी संबंध असल्याचे वाटत असते. अर्थात या भूमिका गमतीदार पद्धतीने मांडण्यात आल्या होत्या.
‘डोन्ट नो वाय…ना जाने क्यों’ 
२०१०मध्ये संजय शर्माने दिग्दर्शित केलेल्या ‘डोन्ट नो वाय…ना जाने क्यों’ ही फिल्म एका समलैंगिक मॉडेलच्या जीवनावर आधारित होती. यामध्ये करिअरसाठी एका मॉडेलला आपल्या नैतिकतेशी सौदा करण्यासाठी असहाय्य व्हावे लागते, याची कथा दाखवण्‍यात आली आहे. 
Image result for film page 3
‘पेज ३’
मधुर भंडाकरने ‘पेज ३’ आणि ‘फॅशन’ या चित्रपटांमध्ये समलैंगिकतेचा मुद्दा हाताळला होता.

स्मिता पाटीलचं चर्चेत राहिलं खासगी आयुष्य


स्मिता पाटील



आज (१७ ऑक्‍टोबर) अभिनेत्री स्मिता पाटील यांचा जन्मदिवस. स्मिता यांचा जन्म  १९५५ मध्‍ये पुण्‍यात झाला होता. त्‍यांच्‍या करिअरमध्‍ये चित्रपटांबद्‍दल जितकी चर्चा झाली, तितकं त्‍यांचं वैयक्‍तिक आयुष्‍यही चर्चेत राहिलं होतं. 
Image result for smita patil umbartha film
इंडस्‍ट्रीत असताना स्‍मिता यांचं अभिनेते राज बब्बर यांच्‍याशी अफेअर होतं. राज यांचा विवाह नादिरा जहीर यांच्‍याशी झाला होता. राज बब्‍बर विवाहीत असतानाही स्‍मिता आणि राज यांच्‍यात नातं निर्माण झालं. राज बब्‍बर यांच्‍याप्रमाणेच नादिरा यांनी देखील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामातून पदवी घेतली होती.
Image result for smita patil umbartha film
सेटवर झालं प्रेम 
असं म्‍हटलं जातं की, 'भीगी पलकें' चित्रपटादरम्‍यान, राज बब्बर आणि स्मिता पाटील प्रेमात अडकले होते. राज बब्बर त्‍यावेळी स्मितासाठी काहीही करायला तयार होते. ८० दशकात दोघेही एकत्र राहू लागले. काही काळानंतर राज आणि स्मिता यांनी लग्‍न केलं. नादिराचा संसार मोडल्‍याचा आरोपही स्‍मिता यांच्‍यावर झाला. परंतु, स्‍मिता यांना त्‍या गोष्‍टीचा काही फरक पडला नाही. 
Related image
स्मिता पाटील आई झाल्‍या. प्रतीक बब्बरचा जन्म झाला. पहिल्‍याच मुलाच्‍या जन्‍मानंतर स्‍मिता आजारी राहायच्‍या. वयाच्‍या ३१ व्‍या वर्षी १३ डिसेंबर १९८६ ला त्‍यांचं निधन झालं. 
राज बब्बर यांची तीन अपत्‍ये 
राज यांना तीन अपत्‍ये. पहिल्‍या पत्‍नीपासून जूही आणि आर्य ही दोन अपत्‍ये तर स्‍मिता यांचा प्रतीक बब्बर हा मुलगा. स्मिता यांच्‍या निधनानंतर राज बब्बर पुन्‍हा आपल्‍या पहिली पत्नी नादिराकडे परतले. 
Related image
स्मिता यांचं निधन झाल्‍यानंतर त्‍यांचं पार्थिव सुहासिनीप्रमाणे सजवण्‍यात आलं होतं, मेकअप करण्‍यात आला होता. त्‍यांच्‍या पार्थिवाला मेकअप करणारे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंतने एका मुलाखतीत सांगितलं होतं, 'स्मिता यांनी मृत्‍यूनंतर ही इच्छा जाहीर केली होती की, आपल्‍या मृत्‍यूनंतर एखाद्‍या सुहासिनीप्रमाणे आपल्‍याला तयार करण्‍यात यावं.' 
Image result for smita patil and raj babbar
Related image

Sunday, November 24, 2019

स्मिता पाटीलची चित्रपटात येण्यामागची कहाणी


स्मिता पाटील : जन्मदिनानिमित्त


स्‍मिता पाटील ही जागतिक कीर्तीची अभिनेत्री खर्‍या अर्थाने महाराष्‍ट्राची अस्‍मिता. शाळेत असताना स्‍मिताने नाटकात छोट्‍या-मोठ्‍या भूमिका केल्‍या होत्‍या. आई-वडिलांमुळे तिने राष्‍ट्र सेवा दलात काम केले. नंतर तिने थिएटर ॲकॅडमीच्या 'बीज' या नाटकात तसेच, वसंत बापट यांच्‍या 'भारत दर्शन' या सांस्‍कृतिक कार्यक्रमातही भाग घेतला होता. भारत दर्शनचे बर्‍याच ठिकाणी प्रयोग झाले. सई परांजपे यांच्‍या 'वासनाकांड' या नाटकासाठी स्‍मिताने काम केलं होतं. पण, त्‍याचा अवघा एकच प्रयोग झाला. पुण्‍याला भावे हायस्‍कूलमध्‍ये शिकणारी स्‍मिता पुढे मुंबईला आली. मुंबईच्‍या एलफिन्‍स्‍टन कॉलेजमध्‍ये एफवायबीए करत असताना एक दिवस अचानक ती वृत्तनिवेदिका म्‍हणून मुंबई दूरदर्शनच्‍या पडद्‍यावर झळकली. दूरदर्शनच्‍या छोट्‍या पडद्‍याने स्‍मिताला अलगद रुपेरी पडद्‍यावर आणलं. 

Image result for smita patil umbartha film
फिल्‍म इन्‍सिटट्‍यूटच्‍या अरुण खोपकर यांची डिप्‍लोमा फिल्‍म 'तीव्र मध्‍यम,' श्‍याम बेनेगल यांचा लहान मुलांचा चित्रपट 'चरणदास चोर,' 'मधली राणी,' 'राजा शिवछत्रपती' मधील सईबाई असं करता करता स्‍मिता श्‍याम बेनेगल यांच्‍या 'निशान्‍त'पर्यंत पोहोचली. श्‍याम बेनेगल यांच्‍या 'मंथन'मधल्‍या भूमिकेसाठी स्‍मिताला 'फिल्‍म  वर्ल्ड'चं आणि 'बेंगाल फिल्‍म जर्नालिस्‍ट असोसिएशन'चं 'बेस्‍ट ॲक्‍ट्रेस ॲवॉर्ड' आणि 'फिल्‍मफेअरचं बेस्‍ट ॲक्‍ट्रेस-स्‍पेशल ॲवॉर्ड' मिळाला. 'निशान्‍त,' 'मंथन,' 'भूमिका' हे तिन्‍ही चित्रपट निरनिराळ्‍या आंतरराष्‍ट्रीय महोत्‍सवात दाखवले गेल्‍यामुळे करिअरच्‍या सुरुवातीलाच, एक अभिनेत्री म्‍हणून स्‍मिताला आंतरराष्‍ट्रीय ख्‍याती मिळाली. 
Image result for smita patil umbartha film
जब्‍बार पटेल यांच्‍या 'सामना'मध्‍ये स्‍मिताने एक छोटीशी भूमिका केली होती. 'या टोपीखाली दडयलं काय' या गाण्‍यात 'आप्‍पा' असं म्‍हणत धावणारी मुलगी स्‍मिताच होती. तिने जब्‍बार पटेल यांचा 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' हा मराठी चित्रपट केला. पुढे 'उंबरठा' हाच हिंदीमध्‍ये 'सुबह' या नावाने आला. दोन्‍ही मराठी, हिंदी चित्रपटात तिनेच काम केलं. या दोन्‍ही चित्रपटांतील सुलभा महाजन ही व्‍यक्‍तिरेखा रंगवताना स्‍मिताच्‍या डोळ्‍यासमोर तिची आई होती. स्‍मिताने मोजकेच मराठी चित्रपट केले. या चित्रपटांतील त्‍यांची भूमिका लक्षात राहण्‍यासारख्‍या आहेत. 'सामना,' 'जैत रे जैत' आणि 'उंबरठा' तसेच तिने रामदास फुटाणे यांच्‍या सर्वसाक्षी आणि चंद्रकांत जोशी यांच्‍या सूत्रधार या चित्रपटात काम केलं होतं. 
Image result for smita patil umbartha film
तिने 'ॲलेक पद्‍मसीं'च्‍या 'रिक्‍वेस्‍ट कॉन्‍सर्ट' या नाटकांत काम केलं. मूळ 'रिक्‍वेस्‍ट कॉन्‍सर्ट' या जर्मन नाटकाचं ते मराठी रुपांतर होतं. त्‍यात एकही संवाद नव्‍हता. आणि पूर्ण वेळ एकटी स्‍मिताच रंगमंचावर असायची. पूर्ण ताकदीने त्‍यांनी ही भूमिका रंगवली होती. 
'उंबरठा'साठी स्‍मिताला 'ऑल इंडिया क्रिटिक्‍स असोसिएशन'चं 'बेस्‍ट ॲक्‍ट्रेस ॲवॉर्ड' मिळाला होता. 'जैत रे जैत'साठी महाराष्‍ट्र राज्‍य सरकारचं उत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कार मिळाला होता. 'जर्नालिस्‍ट असोसिएशन'चं 'बेस्‍ट ॲक्‍ट्रेस'चं 'दिशारी ॲवॉर्ड' मिळालं होतं. तर सईद मिर्झाच्‍या 'अल्‍बर्ट पिंटो को गुस्‍सा क्‍यों आता है' या चित्रपटातल्‍या छोट्‍याश्‍याच पण, महत्त्‍वपूर्ण भूमिकेसाठी कोलकाताच्‍या रविंद्र सदनचं उत्‍कृष्‍ट सहाय्‍यक अभिनेत्रीचा पुरस्‍कार मिळाला होता. श्‍याम बेनेगल यांच्‍या भूमिका चित्रपटातील स्‍मिताची भूमिका हंसा वाडकर या अभिनेत्रीच्‍या जीवनाशी मिळती-जुळती होती. या भूमिकेसाठी स्‍मिताने खूप मेहनत घेतली होती. या चित्रपटासाठी तिला उत्‍कृष्‍ट अभिनेत्रीचा पुरस्‍कार मिळाला होता. 
Image result for smita patil umbartha film
व्‍यावसायिक चित्रपटांमध्‍ये 'भीगी पलके,' 'शक्‍ती,' 'बाजार,' 'अर्थ,' 'मंडी,' 'दर्द का रिश्‍ता,' 'आज की आवाज,' 'पेट,' 'प्‍यार और पाप,' 'दिलवाला,' 'अमृत,' 'आखिर क्‍यों,' 'अंगारे,' 'नजराना,' 'आवाम,' 'वारिस,' 'ठिकाना' यासारख्‍या चित्रपटांमध्‍ये स्‍मिताने उत्‍कृष्‍ट अभिनय केला. तर 'अर्धसत्‍य,' 'सद्‍गी,' 'तरंग,' 'गिध,' 'सुबह,' 'मिर्च मसाला' यांसारखे ऑफबीट चित्रपटसुध्‍दा आपल्‍या अभिनयाने अजरामर करून ठेवले. 
Image result for smita patil umbartha film
अन्य भाषेतील चित्रपट 
स्‍मिताने 'अनुग्रहम' हा तेलगू, 'भवानी भवाई' हा गुजराती, 'अकालेर,' 'देवशिशू' आणि 'अश्‍वमेधेर घोडा' हे बंगाली चित्रपट केले. 'अन्‍वेषणे,' 'कोडुरा' या चित्रपटात आणि 'चिदंबरम' या मल्‍याळम चित्रपटातही तिने काम केले होते. 
Image result for smita patil umbartha film
मराठी चित्रपट
'सामना,' 'राजा शिवछत्रपती,' 'जैत रे जैत,' 'सर्वसाक्षी,' 'उंबरठा,' 'सूत्रधार' इ.  
Image result for smita patil umbartha film
'या' सुपरस्‍टारसोबत अधिक चित्रपट
स्‍मिताने राजेश खन्‍ना आणि अमिताभ बच्‍चन या दोन्‍ही सुपरस्‍टार्ससोबत काम केले. राजेश खन्‍नासोबत 'नजराना,' 'आखिर क्‍यों' आणि 'अमृत' असे तीन चित्रपट केले. तर अमिताभ यांच्‍यासोबत त्‍यांनी 'शक्‍ती' आणि 'नमक हलाल' असे दोन चित्रपट केले. 
Image result for smita patil umbartha film
पद्‍मश्री पुरस्‍काराने सन्‍मानित 
२६ जानेवारी, १९८५ रोजी भारत सरकारने 'पद्‍मश्री' देऊन स्‍मिताचा गौरव केला. एवढा सन्‍मान, पैसा, प्रसिध्‍दी, ग्‍लॅमर मिळूनही स्‍मिताने माणुसकी कधी विसरली नाही. तिने 'वूमेन्‍स सेंटर'तर्फे दु:खी, कष्‍टी, पीडित महिलांसाठी खूप काम केले. 

...अखेर स्‍मिता पाटीलने दिला होता रोमँटिक सीन




'नमक हलाल' चित्रपटातील एका गाण्‍याच्‍या शूटिंगनंतर सुंदर अभिनेत्री स्‍मिता पाटीलला अश्रू अनावर झाले होते. या चित्रपटातील एक गाणे पावसात शूट करायचे होते. 'आज रपट जाए तो' असे बोल असणार्‍या या गाण्‍यात स्‍मिता यांना महानायक अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबत रोमँटिक सीन द्‍यायचे होते. हे सीन दिल्‍यानंतर स्‍मिता पाटील रात्रभर रडल्‍या होत्‍या. 
१९८२ मध्‍ये रिलीज झालेला 'नमक हलाल' चित्रपटात अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबत स्‍मिता पाटील यांची मुख्‍य भूमिका होती. पावसात भिजत 'आज रपट जाए तो' या गाण्‍याचे शूटिंग करायचे होते. शूटिंग करत असताना स्‍मिता यांना अस्वस्थ वाटत होते. कारण, पावसामध्ये स्मिता पाटीलला अमिताभ यांच्यासोबत अशी दृश्ये देणे सोपे नव्हते. चित्रपटसृष्टीत अभिनेत्रींसाठी हे सहज असले तरी, स्मितासाठी हे कठीणच होतं.
Image result for namak halal
...अखेर स्मिताने मान्य केलं
अभिनेत्री स्‍मिता पाटील त्‍यावेळी साध्‍या भूमिका साकारत असत. 'नमक हलाल' हा चित्रपट व्‍यावसायिक होता. गाण्‍यात रोमँटिक सीन शूट करण्‍यास त्‍या तयार नव्‍हत्‍या. त्‍यावेळी अमिताभ यांनी स्‍मिता यांना समजावलं होतं. त्‍यांनी स्‍मिता यांच्‍याशी बराच वेळ बोलून त्‍यांची समजूत काढली होती. 
गाण्याचं शूटिंग  झाल्‍यानंतर रडली स्‍मिता
अमिताभ यांनी समजावल्‍यानंतरदेखील स्‍मिता रात्रभर रडल्‍या होत्‍या. माझ्‍याकडून काहीतरी चूक झाली आहे, असं तिला वाटत होतं. हीच गोष्‍ट मनात धरून ती रडत राहिली. 
Related image
...असं पूर्ण झालं चित्रपटाचं शूटिंग 
स्‍मिता पाटील दुसर्‍या दिवशी सेटवर पोहोचली. त्‍यावेळी अमिताभ यांना लक्षात आले की, स्‍मिता रडली आहे. परंतु, त्यावेळी स्‍मिताने व्‍यावसायिक चित्रपट करायचं ठरवलं. 'नमक हलाल'नंतर स्‍मिताने अमिताभ यांच्यासोबत 'शक्‍ती' चित्रपट केला होता.  
Related image
स्‍मिताला पडलेलं ते स्वप्न 
एका मुलाखतीत बिग बी अमिताभ बच्‍चन म्‍हणाले होते की, 'कुली चित्रपटाच्‍या सेटवरच्‍या माझा अपघाताचा पूर्वाभास स्मिताजींना झाला होता. अपघाताच्‍या आधी एका रात्री मला स्मिता पाटील यांचा फोन आला होता. त्‍यांनी माझ्‍या तब्‍येतीबद्‍दल विचारले. मी म्‍हणालो, माझी तब्‍येत ठिक आहे. त्‍यावेळी फोनवर स्‍मिता घाबरलेल्‍या होत्‍या. त्‍यांनी मला सांगितलं की, मी एक भयानक स्‍वप्‍न पाहिलयं, जे तुमच्‍याबद्‍दल होतं. म्‍हणून मी तब्‍येत विचारण्‍यासाठी फोन केला. एका दिवसानंतर कुली चित्रपटाच्‍या सेटवर माझा अपघात झाला.' 
Image result for namak halal aaj rapat jaye to

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...