Thursday, June 3, 2021

अशोक, लक्ष्या, महेश आणि सचिन : 'चौकट राजा'ची मैत्री



अशोक सराफ वाढदिवस विशेष 

मराठी चित्रपटसृष्टीत मैत्रीचा संदर्भ आला की, अशोक शराफ, सचिन पिळगावकर, महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या कलाकारांची नावे समोर येतात. नव्वदच्या दशकात या कलाकारांची मैत्री चित्रपटाच्या माध्यमातून आपण पाहिलीच आहे. लक्ष्या, सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, या त्रिकूटालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. 'अशी ही बनवाबनवी,' 'भूताचा भाऊ', 'आयत्या घरात घरोबा' अशा अनेक चित्रपटात या त्रिकूटाची धम्माल पाहायला मिळाली. ‘अशी ही बनवाबनवी’ वर प्रेक्षक अक्षरश: फिदा झाले. या चित्रपटाला प्रेक्षकांनी डोक्‍यावर घेतले. लक्ष्मीकांत बेर्डेबरोबरची त्यांची जोडी प्रचंड गाजली आणि या जोडगोळीने 'अशी ही बनवाबनवी', 'धूमधडाका' यासारख्या चित्रपटांमार्फत धमाल उडवून दिली. 

धुमधडाका 

कधी अशोक-लक्ष्मीकांत-महेश तर कधी अशोक-लक्ष्मीकांत-सचिन पिळगावकर अशा मैत्रीचा त्रिकोण अनेक चित्रपटांमध्ये दिसला. धुमधडाका चित्रपटामध्ये अशोक, महेश आणि लक्ष्याची अफलातून जोडी जमली. धुमधडाका चित्रपटामध्ये निवेदिता, सुरेखा आणि प्रेमाकिरण त्याचबरोबर शरद तळवलकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. महेश आणि अशोक यांची घट्ट मैत्री यामध्ये दाखवण्यात आली आहे. अशोक आपला प्रिय मित्र महेशसाठी त्याचा श्रीमंत उद्योजक बाप बनून शरद तळवलकरांच्याकडे जातो. तेथे महेशची प्रेयसी अर्थातच निवेदिता जोशी आणि अप्रत्यक्षपणे त्याला त्याची प्रेयसी सुरेखा भेटते. महेशच्या वृध्द बापाची भूमिका साकारून वख्या विखी वूखू हा डायलॉग प्रचंड गाजला. 

या चित्रपटाची आणखी एक खासियत अशी की, या चित्रपटासाठी लक्ष्याने केवळ १ रुपया मानधन घेतला होता. महेश कोठारे आपला पहिलाच चित्रपट दिग्दर्शन करत होते. चित्रपटासाठी त्यांच्याकडे फारसे पैसेही नव्हते. त्यांनी धुमधडाका चित्रपटातील पात्रासाठी लक्ष्याशी बोलल्यानंतर खिशातून एक रुपया काढून लक्ष्याला दिला. लक्ष्याला भूमिका मिळाली आणि महेश कोठारेंना लक्ष्या मिळाला. 

गंमत जंमत

'गंमत जंमत'मध्ये अशोक-सचिन पिळगावकर आणि वर्षा उसगावकरने धुमाकूळ घातला. अशोक यांनी फाल्गून आणि सचिन यांनी गौतमची भूमिका साकारलेली आहे. एखा उद्योजकाची कन्या कल्पना (वर्षा उसगावकर) हिला पैशांसाठी किडनॅप केलं जातं. पण, तिला पळवून आणणं या दोघांना महागात पडतं. कल्पना ही एक स्मार्ट, बिनधास्त आणि धीट मुलगी असते. तिला 'पळवून आणण्यात आलेय' हे कळल्यावर रडण्या-घाबरण्याऐवजी तिला खूप गंमत वाटते आणि असले काहीतरी सनसनाटी 'थ्रील' तिला हवेच होते असे ती सांगते. भरीस भर म्हणजे त्यांनी मागितलेल्या रकमेतील काही वाटा तिला हवा असेही, ती त्यांना सुनावते. यानंतर अशोक आणि सचिन यांना तिला सांभा‍ळण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. या विनोदी चित्रपटातील एकापेक्षा एक गाण्यापैकी अशोक आणि अभिनेत्री चारुशिला साबळेंवर चित्रीत करण्यात आलेले अश्विनी ये ना हे गाणे रसिकांच्या ओठी आजही कायम आहे.  

अशी ही बनवा बनवी

२३ सप्टेंबर, १९८८ रोजी हा चित्रपट रुपेरी पडद्यावर आला होता. लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर आणि सिध्दार्थ (शंतनू) यांच्या चौकट जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतले. हा चित्रपट ‘बीवी और मकान’ या हृषिकेश मुखर्जी यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचा रिमेक आहे. अनेक उपद्व्यापानंतर शेवटी घरमालकाने घरातून हाकलून दिल्यावर नवीन जागा भाड्याने मिळवण्यासाठी चार मित्रांना काय काय प्रताप करावे लागले, याची मजेदार गोष्ट म्हणजे 'अशी ही बनवाबनवी'. या चित्रपटातील सर्व कलाकार हे उत्तम विनोदी अभिनेते असल्याने हा चित्रपट खूप विनोदी ठरला. याच चित्रपटातील हृदयी वसंत फुलताना, ही दुनिया मायाजाल, अशी ही बनवाबनवी, कुणीतरी येणार येणार गं अशी सुंदर गाणीहीही लोकप्रिय ठरली.  

आयत्या घरात घरोबा 

आयत्या घरात घरोबा चित्रपट आजदेखील टीव्हीवर दाखवला तरी चाहते आवर्जुन हा चित्रपट पाहतात. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे, राजेश्वरी सचदेव यांच्या मुख्य भूमिका होत्या. रस्त्यावरील एक साधा माणूस उद्योजक सचिन पिळगावकरचा गोपू काका होऊन मोठ्या बंगल्यात प्रवेश करतो. तेथे गोपू काका होऊन सर्वांना कामाला लावतो. पण, शेवटी आपलं मूळ आयुष्य जसं आहे, तसं जगण्याचा संदेश ते देतात. हा चित्रपट त्या काळी प्रचंड गाजला होता.  

आम्ही सातपुते

आम्ही सातपुते या अलिकडच्या चित्रपटात अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनी अनुक्रमे सासरा आणि जावयाची भूमिका साकारली आहे. सुप्रिया पिळगावकर, स्वप्निल जोशी, अतुल परचुरे यांच्याही यामध्ये महत्त्वाच्या भूमिका होत्या. 


Wednesday, June 2, 2021

'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...' अमिताभ यांच्या अग्निपथ चित्रपटाला ३१ वर्षे पूर्ण


 



बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचे प्रसिद्ध नाव विजय दीनानाथ चौहान या संवादाने चित्रपट अग्निपथ हिट ठरला. आज १६ फेब्रुवारी रोजी अग्नपथला ३१ वर्षे पूर्ण झाली. विशेष म्हणजे या चित्रपटातील बिग बींनी साकरलेली विजय ही भूमिका इतकी गाजली की, पुढे 'पूरा नाम विजय दीनानाथ चौहान...'हा संवाद गाजलाचं, शिवाय तब्बल २० चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'विजय' असे आहे. तर अमित हे सर्वाधिक वेळा वापरले गेलेले नाव आहे. अमिताभ यांच्‍या अग्‍निपथरबरोबरचं डॉन, जंजीर या गाजलेल्‍या चित्रपटांचे रिमेक बनवण्‍यात आलेले आहेत. 

अग्निपथ १६ फेब्रुवारी, १९९० रोजी रिलीज झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन मुकुल आनंद यांनी केले होते. अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत तर मिथुन चक्रवर्ती, माधवी (अभिनेत्री),  नीलम, डॅनी डेन्जोंगपा, आलोक नाथ, रोहिणी हट्टंगड़ी, टिन्नू आनंद, विक्रम गोखले, अर्चना पूरन सिंह, शरत सक्सेना, गोगा कपूर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका यामध्ये होत्या.

Image result for agneepath amitabh bachchan

चित्रपटाचे निर्माते यश जोहरने होते. चित्रपटाचे नाव अग्निपथ कवितेतून घेण्यात आले होते. हे नाव हिंदीचे प्रसिद्ध कवी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतून घेण्यात आले होते. अग्निपत म्हणावा तसा चालला नाही. तिकिट खिडकीवर अयशस्वी  ठरलेल्या या चित्रपटातील अमिताभ बच्चन यांच्या अभिनयावर टीका झाली. परंतु, मिथुन चक्रवर्तीच्या अभिनयाला समीक्षक आणि प्रेक्षक दोघांकडून दाद मिळाली होती. असे असले तरी अमिताभ बच्चन यांच्या करिअरच्या दृष्टीने हा चित्रपट मैलाचा दगड ठरला होता. दमदार संवाद आणि उत्तम अदाकारीमुळे अग्निपथ १९९० मधील सर्वात चौथा कमाई करणारा चित्रपट ठरला होता. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चित्रपटाची कहाणी खूप उत्तम होती, असे असतानाही हा चित्रपट आपला बजेटदेखील या चित्रपटाच्या माध्यमातून काढू शकला नाही. आणि बॉक्स ऑफिस पर अयशस्वी ठरला. 

बिग बींना मिळाला होता पहिला राष्ट्रीय पुरस्कार 

अग्निपथसाठी अमिताभ बच्चन यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ३८ व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात सर्नोत्कृष्ट अभिनेता म्हणून सन्मानित करण्यात आले होते. 

२०१२ मध्ये आला अग्निपथचा रिमेक 

मूळचा चित्रपट अग्निपथ रिलीज झाल्यानंतर २२ वर्षांनंतर २०१२ मध्ये रिमेक आला. या चित्रपटामध्ये संजय दत्त, ऋतिक रोशन, ऋषी कपूर, प्रियांका चोप्रा यांच्या भूमिका होत्या. हा रिमेक मूळच्या अग्निपथच्या तुलनेत कमर्शियली हिट ठरला होता. 

बॉलिवूडमध्ये ५२ वर्षे पूर्ण 

अमिताभ यांना बॉलिवूड इंडस्ट्रीत ५२ वर्षे पूर्ण झाली आहेत. बिग बींनी आपल्या जुन्या आठवणी शेअर करत थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांनी ट्विट करून म्हटले की, आजच्याच दिवशी (१५ फेब्रुवारी) त्यांनी चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले होते. 

टेन्‍शन लेने का नहीं...लॉकडाऊन काळात नकारात्मक गोष्टींना असे ठेवा दूर

501,110 Depression Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock

कोरोना आपल्‍या  आयुष्‍यात आला आणि सगळं जगणंच बदलून गेलं आहे. एक वर्ष झालं. आपण या कोरोनारुपी विषाणूविरोधात युद्‍ध लढतोय. काही महिन्‍यांपूर्वी आपण हे युद्‍ध जिंकलचं, असा विश्‍वास आपल्‍याला आलं. मात्र त्‍याने पुन्‍हा एकदा जोरकसपणे हल्‍ला केलाय. मागील हल्‍ल्‍यापेक्षा तो कितीतरी पटीने मोठा आहे. हे आपण अनुभवतोच आहे. कारण पुन्‍हा एकादा लॉकडाऊन लागलं. त्यात सगळं बंद. करायचं काय? काही कंपन्यांनी, व्यापाऱ्यांनी, मोठ्या दुकानदारांनी तर थेट नोकरदारांना सुट्ट्या दिल्या. म्हणजे त्यांना असं करण्याशिवाय पर्यायचं नव्हता. पण, ज्यांना या सुट्ट्या मिळाल्या आहेत. ही लादलेली सुटी निश्‍चितच सुखावणारी नसते. कारण ही सक्‍तीची विश्रांती हजारो विचार घेवून येते. रिकामे मन सैतानाचे घर... ही म्‍हण का पडली, याचा अनुभव काही काळ रिकामे बसल्‍यानंतरच जाणवंत. भविष्‍यातील नाना चिंतांनी मन सैरभैर होतं. तेव्‍हा आपल्‍या लक्षात येतं की मन रिकामं असलं की पहिल्‍यांदा येतात ते नकारात्‍मक विचार. त्‍यामुळेच आता लॉकडाउन काळात हे विचारांवर कशी मात कारायची, या प्रश्‍नाचे उत्तर हे कोरोनाला हरविण्‍याइतकचं अवघड वाटू लागते. 

एक नकारात्‍मक  अनुभव-

''आवरली का कामं सगळी,'' असं मी विचारल्यानंतर आमच्या शेजारच्या ताई आज सकाळी सकाळी सांगू लागल्या, ''आता काय काम आहे, दिवसभर तर घरीचं असणार. त्यामुळे निवांत सुरू आहे. त्या एका मोठ्या दागिने सराफ दुकानात नोकरीला आहेत. मी विचारलं, दुकानं वगैरे बंद आता. मग, कसं करणार कामाचं. त्या म्हणाल्या, जितके दिवस लॉकडाऊन, तितक्या दिवसांचा पगार कट होणार. आता प्रश्नही असा पडलाय की, १ तारखेला घराचं भाडं कसं भागवायचं. सकाळी सकाळी ही व्यथा कानावर पडली. त्यात त्या भाड्याच्या घरात राहणाऱ्या. नवरा, त्या आणि एक लहान मुलगी. ताईंनी सांगितलेल्या गोष्टी विचार करायला भाग पाडणारी होती. ताईंचा नवरा म्हणे, लॉकडाऊन लागल्यापासून काहीचं बोलेना. शांत शांत आहे. व्यवस्थित जेवतही नाही. आत त्यांना अशी भीती वाटत आहे की, आपला नवरा नैराश्यात जातो की काय?  

असेच असंख्य अनुभव अनेक जणांना येत असतील. खासकरून लॉकडाऊनच्या काळात लोकांना खूप काही समस्यांना सामोरं जावं लागतंय. आजारपणासाठी लागणारा पैसा, बँकेची घेतलेली कर्जे फेडण्यासाठी पैसा आणायचा कुठून? हातावरची पोटं असणाऱ्यांनी काय करायचं? दिवसभर राबराबल्यांनंतर ज्यांच्या घरात संध्याकाळी चूल पेटते, त्यांनी काय करायचं? काहींच्या अक्षरश: तर नोकऱ्या गेल्या आहेत. त्यांनी आपलं पोट कसं भरायचं? अशा असंख्य प्रश्नांनी अनेकांच्या मनात घर केलंय. काय करावं, कुठे जावं, पुढे कसं होणार, काहीचं कळेना. परवा कुणीतरी म्हणालं, उदास उदास वाटतयं. नैराश्यही येतंय. मुलं-बाळं तोंडाकडे पाहतात म्हणून त्यांच्यासमोर काही बोलताही येत नाही आणि रडताही येत नाही. 

मध्यंतरी लॉकडाऊन पुन्‍हा लागू झाल्यानंतर एका तरुण दुकानदाराने दुकानासाठी घेतलेले कर्ज कसं फेडायचं म्हणून आत्महत्या केली. जेव्हा पुढे काही मार्गचं उरत नाही, तेव्हा मानसिक हतबलतेतून टोकाचे पाऊल उचलले जाते. 

नैराश्याची लक्षणे- 

एका जागी बसून राहणे 

अन्न, जेवण न जाणे

मन विचलित होणे

सतत मनात प्रश्न घोंगावत राहणे

एकाग्रता कमी होणे

नकारार्थी गोष्टींचा विचार करणे 

किंवा असं झालं तर, तसं झालं तर अशा नाकारार्थी गोष्टी बोलून दाखवणे 

झोप न येणे

या गोष्टी आपल्यावर परिणाम करणाऱ्या आहेत. या बाबी आपल्या मानसिक आरोग्यावर प्रभाव टाकणाऱ्या आहेत. 

2,207 Negative Thoughts Photos - Free & Royalty-Free Stock Photos from  Dreamstime

पण, लॉकडाऊन काळात खचून न जाता मन कणखर करणं खूपचं आवश्यक आहे. आजची स्थिती नक्कीच बदलेल. अशावेळी हातपाय गाळून चालणार नाही. असंख्य नकारात्मक गोष्टींना मनात आणि मेंदूत जागा न देता ते बाहेर फेकून द्यायला हवेत. निगेटिव्ह गोष्टी अजिबात मनात आणू नयेत. किंबहुना, त्या कमी कशा करता येतील, याकडे आपण लक्ष द्यायचं आहे. नकारात्मक गोष्टींचं रुपांतर सकारात्मकमध्ये करण्यासाठी आपण काही गोष्टी करायच्या आहेत. 

नकारात्मतेतून सकारात्मकतेकडे - 

मानसिक तणावातून मुक्तता मिळवण्यासाठी मन एकाग्र होणं गरजेचं आहे. 

मेडिटेशन करणं.

Shilpa Shetty launches a special meditation program | Indian Television Dot  Com

योगासने, सूर्यनमस्कार घालणे, 

चालणे, व्यायाम करणे.

चांगले व ताजे अन्न, फलाहार घेणे.

खूप पाणी प्या. 

कारण, मन आणि शरीर तंदुरुस्त राहायला हवं.

निगेटिव्ह गोष्टींकडे दुर्लक्ष करा.

7 Positive Thinking Books You Should Read

घरात नकारार्थी गोष्टींवर चर्चा करू नये.

जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोण सकारात्मक ठेवा. 

आपल्या जवळचे, मित्र मंडळी, शिक्षक यांच्याकडून एखाद्या प्रश्नावर सल्ला घ्या. 

जवळच्या व्यक्तीकडे मनमोकळे करा.

उदासीनता, निराश वाटू लागल्यास लगेच दुसऱ्या कामात व्यस्त राहा किंवा दुसऱ्यांच्या कामात मदत करा 

आपले छंद जोपासा.

ᐈ A women stock photography, Royalty Free happy woman images | download on  Depositphotos®

गाणी जरूर ऐका. 

एखादे वाद्य वाजवता येत असेल त्यात सातत्य ठेवा. 

मोकळ्या वेळेत पुस्तके वाचा , विनोदांच्या पुस्तकांचा समावेश असेल तरीही उत्तम.

आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वत: ला तयार करा. 

आनंदी आणि फ्रेश राहण्याचा प्रयत्न करा. 

चिडचिड करू नका, शांत राहण्याचा प्रयत्न करा.  

चेहऱ्यावर हास्य आणा. 

Deep#Deepika Padukone #love#babyy#smile#my queen#bollywood shared by  KDeepika Padukone ♥

टीव्हीवर चित्रपट पाहा.

स्वयंपाकाची आवड असेल तर एखादा नवा पदार्थ तयार करण्यासाठी घ्या.

सद्य उद्भवलेली परिस्थिती नक्कीचं बदलेल, त्यामुळे घाबरून जाऊ नका.

फारचं त्रास होतं असेल आपल्या फॅमिली डॉक्टरशी बोलून घ्या. 

Paint a Mountain Sunset (for Beginners) : 10 Steps (with Pictures) -  Instructables

कोरोनाविरोधातील महायुद्‍ध जिंकायचं असेल तर तेवढेच कणखर मनाने आणि जिद्‍दीने त्‍याचा मुकाबला करायला हवा. कोणतेही लढाई जिंकण्‍यासाठी शस्‍त्रांबरोबर मनही शस्‍त्रांएवढेच मजबूत अणि शक्‍तीशाली असावे. आपल्‍याच सर्वप्रथम मनच कणखर करायचं आहे. 

या सर्व गोष्टींच्या ऊहापोहनंतर कवी कुसुमाग्रजांची एक कविता आठवली.

''मोडून पडला  संसार  तरी  मोडला  नाही  कणा,
पाठीवरती हात ठेवून फक्त  लढ  म्हणा...''

55,293 Positive Thinking Photos - Free & Royalty-Free Stock Photos from  Dreamstime

चला, प्रतिज्ञा करूया - 

संकटांना सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. 

प्रत्येक आव्हान पेलण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. 

''थिंक पॉझिटिव्ह...बी पॉझिटिव्ह...गेट पॉझिटिव्ह'' 

आज ऊन जरा जास्तचं आहे...तर मग 'थंडगार' उन्हाळ्यासाठी 'या' खास टिप्स तुमच्यासाठी!

 



 

आज ऊन जरा जास्तचं आहे...कधी संपतोय हा उन्हाळा कुणास ठाऊक? नुसता जीव नकोसा झालाय, या गर्मीनं...घामाच्या धारा लागल्या आहेत... वाऱ्याची एक झुळूकदेखील येत नाहीये...घरातील पंख्याचा वारासुध्दा गार येईना. गरम गरम वाफांनी नुसता घालमेल झालंय. इतका थकवा आलाय ना की, काही कामचं करायला नको वाटतंय, जाऊन पाण्याखाली बसावं असं वाटतयं...असाचं अनुभव तुम्हालाही या कडक उन्हाळ्यात येतोय ना! आम्हाला पण येतोय. मग, काय करायचं आता. ऊन तर आपण कमी करू शकत नाही. पण, उन्हाळ्यातदेखील फ्रेश राहण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलोय. 

This Summer is Unusual,' Says IMD With no Heatwave Forecasts

ऐन उन्हाळ्यात, फिट राहण्यासाठी आणि गरमीचे चटके कमी करण्यासाठी काय उपाय आहेत? आपली प्रतिकारशक्ती टिकून राहावी, आजारी पडू नये, यासाठी आपण घरच्या घरी काय उपाय करावेत? यासाठी अगदी सोपे उपाय आम्ही तुम्हाला देत आहोत. 

उन्हाळ्यात जे कामासाठी बाहेर फिरतात वा फिल्ड वर्कवर असतात; त्यांना विशेषत: अधिक काळजी घ्यायला हवी. काही जणांना तर उन्हातून आल्यानंतर डोकं दुखायला लागतं. तसेच अनेकांना ऊन सहन होत नाही. अशावेळी उष्णता वाढणे, डोळे रखरखणे, जेवण कमी जाणे, अधिक झोप येणे, मळमळ आणि चक्कर येणे,  थकवा, अशक्तपणा येणे यासारखे प्रकार होतात. या पुढील टिप्स वापरून तुम्ही उन्हाळ्यातदेखील फिट आणि फ्रेश राहू शकता. 

Did You Know About These Common Summer Diseases?

सैलसर कपडे घालणे - उन्हाळ्यात घट्ट कपडे वापरू नये. घट्ट कपडे वापरल्यास घाम येऊन अंगावर रॅशेस येतात. सुती कपडे वापरणे कधीही चांगले. त्यामुळे अंगातील घाम शोषला जातो. मऊ आणि सुती कपड्यांमुळे उष्णतेचा दाह अधिक होत नाही. 

12 Best Summer Health Care Tips In Marathi - उन्हाळ्याच्या दिवसांत अशी घ्या  आपल्या आरोग्याची काळजी - Marathi Health Blog

अनावश्यक उन्हात जाणे टाळणे - अनावश्यक उन्हात जाणे टाळावे. काही महत्त्वाचे काम असेल तरचं दिवसा बाहेर पडावे. 

जपा डोळ्यांचं सौंदर्य |

उन्हापासून संरक्षण - उन्हात बाहेर पडल्यानंतर टोपी घालावी. स्कार्फ बांधावे, छत्रीही उत्तम पर्याय आहे. यामुळे उन्हापासून संरक्षण होईल. काही जणांना घाम येऊन अंगावर ॲलर्जी होते, जसे की पुरळ येणे, लाल चट्टे उठणे. उन्हापासून बचावासाठी या गोष्टा केल्यास असे प्रकार होणार नाहीत. 

Live Chennai: Aware of 'Kathiri Veyil' Dates – Commencing from May 4 to May  28, 2014!,Kathiri Veyil Dates,Agni Natchathiram dates,Agni Kathiri  Veyil,Agni Natchathiram dates in 2014,Agni Natchathiram dates 2014,2014  Agni Natchathiram dates

डोळ्यांचे संरक्षण - बाहेर जाताना सनग्लासेस, गॉगल वापरणे. त्याचबरोबर, दिवसांतून तीन ते चार वेळा डोळ्यांवर गार पाणी मारणे. डोळ्यांना गारवा मिळण्यासाठी हे रोज करणे आवश्यक आहे. काकडीचे गोल काप कापून ते डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना गारवा तर मिळतोच शिवाय काळी वर्तुऴे निघून जाण्यास मदत होते. 

उन्ह्याळात डोळ्यांची 'अशी' काळजी घ्या - पोलीसनामा (Policenama)

त्वचेची काळजी - रखरखत्या उन्हात सन्सक्रीम वापरणे खूप महत्त्वाचे आहे. काहींना उन्हात गेल्यानंतर टॅनिंग होते किंवा चेहरा काळवंडतो. अशा वेळी बाहेर पडताना सनस्क्रीम लावणे गरजेचे आहे. टॅनिग घालवण्यासाठी दही, लिंबू, बेसन पीठ, हळद, कोरफड, दूध, मसूर डाळीचं पीठ तसेच स्क्रबरही वापरता येते. त्याचबरोबर, मुलतान माती, चंदन पावडरचा मास्कचाही उपयोग करता येतो. दिवसांतून तीन-चार वेळा चेहरा धुतल्यास धूळ, पिंग्मिंटेशन, पुरळपासून सुटका होण्यास मदत होते.  

खीरा है गर्मी के मौसम के लिए उपयोगी – Business Sandesh

थकवा घालवण्यासाठी - तापमानाचा पारा वाढला की, घामाच्या धारा लागतात. अशक्तपणाही जाणवतो. कधी-कधी इतका थकवा येतो की, काम करण्यासाठी अंगात त्राण राहत नाही. यासाठी पूर्ण झोप आणि योग्य, सकस आहार घेणं महत्त्वाचं आहे.  

Cucumber Desi खीरा ककड़ी देसी | Rasoidas.comअपने डाइट में चुकंदर को शामिल कर इन बिमारियों से छुटकारा पा सकतें है -  Apani Rasoi | DailyHunt

योग्य आहार - उन्हाळ्यात उष्णता वाढवणारे पदार्थ कमी खावेत. जसे की चिकन, अंडी, पपई वगैरे. शाकाहारी पदार्थांवर भर द्यावा. पचायला जड असणारे पदार्थ टाळावेत. द्रव्ययुक्त पदार्थ लिंबू सरबत, कोकम, आवळा सरबत, ज्यूस प्यावे. फळे खावीत. पाण्याचे प्रमाण अधिक असलेली फळे कलिंगड वगैरे खावीत. काकडी, बीट, टोमॅटो यावर भर द्यावा. दही, ताक, मठ्ठा, नाचण्याची आंबील प्यावी. भरपूर पाणी प्यावे. परंतु, अतिथंड पाणी पिणे टाळावे. मातीच्या माठातले पाणी पिणे कधीही चांगले. 

काकडी करेल कूssल!; 'या' ५ रेसिपी उन्हाळ्यात देतील थंडावा - Marathi News |  Cucumber recipes to make this summer cool | Latest health News at Lokmat.com

पुरेशी झोप - उन्हाळ्यात आपल्या दिनचर्येत बदल करावा. पुरेशी झोप घ्यावी. गर्मी होते म्हणून रात्री उशीरापर्यंत झोप लागत नाही. पुन्हा सकाळी कामावर जाताना किंवा लवकर उठताना त्रास होतो. शिवाय झोप न झाल्यास दिवसभर कंटाळा येतो. त्यामुळे रात्री लवकर झोपून सकाळी लवकर उठावे. 

Get a Good Night's Sleep. Tips for the Right Pillow Selection.

व्यायाम - सकाळी उठून किमान अर्धा तास चालावे. बैठे काम करणाऱ्यांनी तर चालणे महत्त्वाचं आहे. घरात असो किंवा कामाच्या ठिकाणी-सलग १ तास १ तास एका जागी बसू नये. मधून मधून उठावे. थोडं चालावं. सकाळच्या वेळेला सूर्यनमस्कार घालावे, योगासने करावीत अथवा ॲरोबिक्स केलं तरी चालेल. 

How to create an exercise routine you'll actually stick to - CNET

प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी - प्रतीकारशक्तीसाठी घरगुती काढाही करता येतो. सी व्हिटॅमीन असणारी फळे खावीत. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे. तुळशीच्या पानांच रस, आवळ्याचा रस तसेच वनौषधी काढा घेऊन तुम्ही प्रतीकारशक्ती वाढवू शकता. उन्हाळ्यात प्रतिकारशक्ती वाढावी आणि आजारी पडू नये म्हणून दिवसांतून दोन वेळा आंघोळ करणेही गरजेचं आहे. थंड पाण्याने आंघोळ केल्यास उष्णतेचा दाह कमी होतोचं शिवाय फ्रेश देखील वाटते. 

100 Quotes About Happiness to Lift Your Mood

रखरखत्या कडक उन्हाळ्यात थंडगार होण्यासाठीच्या या टिप्स तुम्हाला नक्कीचं उपयोगी पडतील. 

'मी आता मरणार आहे...' चेहऱ्यावर हास्य घेऊन गेलेला इरफान खान

 

जिंदगी का चाक हो ...
याँ कुंमहार का 
जब नचाता है 
तो रचित भी होता है
और घटित भी 

या काव्य पंक्तीप्रमाणे इरफान खानच्या आयुष्यात काहीसं घडलं होतं. मोठ्या अपेक्षा, जगण्याची आस आणि मी पुन्हा ठीक होऊन लवकरचं परत येईन, ही भाबडी आशा घेऊन इरफान रुग्णालयात उपचार घेत राहिला. एक अभिनेता म्हणून मोठ्या पडद्यावर सहजरित्या अभिनय साकारणाऱ्या इरफानचा आज स्मृतिदिन. (२९ एप्रिल २०२० रोजी त्याने जगाचा निरोप घेतला.) मी स्वत: कसा आहे, याचं स्पष्टीकरण तो कधीचं इतरांना द्यायचा नाही. एखाद्याचा अभिनय आवडला तर तो त्याला मनापासून दादही द्यायचा. कुठल्याही गोष्टीला चेष्टेवारीत न नेता त्याचा गंभीरपणे विचार करण्याची ताकद त्याच्याकडे होती. अनेक मुलाखतींच्या मंचावर त्याच्यातील हे गुण समोर आले होते. त्याची पत्नी सुतापाने त्याच्याविषयी सांगितलेली एक चांगली गोष्ट म्हणजे, तो कधीचं खोटं बोलायचा नाही. आयुष्यातील वेदनादायी प्रवास करताना यापेक्षा मोठं दु:ख काय असू शकतं. न्युरो इंडोक्राईनसारखा दुर्मिळ आजार पदरी पडल्यानंतर आपण जगू की मरू, असा विचार क्षणभर त्याच्या मनात आला असेल. पण, मन घट्ट करून आपण, यातून लवकरचं बाहेर पडू, असा विश्वास व्यक्त करून त्याला आपले कुटुंब, आप्तेष्ट आणि चाहत्यांच्या चेहऱ्यावर आशेच्या किरणांचा आनंद पाहायचा होता. मृत्यू जसा जवळ येतो, तसं त्याला कळतं की, आपण आता जगणार नाही. असं म्हणतात की, परमेश्वर हे सर्व घडवून आणत असतो. कदाचित इरफानलाही हे आधीचं समजलं असावं.  



त्या दीर्घ कालावधीतील मरण यातना भोगताना त्याला अनेक संकटं आणि आव्हानांचा सामना करावा लागला. कुटुंबाचा विचार करताना आता आपण आपल्या कुटुंबातील मंडळींसाठी आयुष्यभर पुरणार नाही, असा विचार कदाचित त्याच्या डोक्यात आला असावा. डॉक्टर तर सर्व प्रयत्न करताहेत...त्यांना त्यांचं काम करू द्यावं...माझं जगणं किंवा मरणं आता सर्वस्वी परमेश्वराच्या हातात आहे, असंही कदाचित त्याला वाटलं असावं. 

अखेरच्या क्षणांमध्ये मात्र डोळ्यापुढे कायमचा अंधार दिसत आहे. पण इरफान आपल्या मुलाला जवळ बोलावून शेवटचं मन मोकळं करतो. शेवटच्या क्षणांतही चेहऱ्यावर हास्य घेऊन मी आता मरणार आहे, असं म्हणण्याचं धाडस केवळ इरफानचं करू शकतो. 

'यच्चिन्तितं तदिह दूरतरं प्रयाति यच्चेतसापि न कृतं तदिहाभ्युपैति'

(आपण ज्याची इच्छा करत असतो, ती गोष्ट अगदी लांब पळून जाते आणि जे आपण मनातसुध्दा आणलं नसेल ते समोर येऊन ठेपतं.)  

इरफानबाबतही असचं घडलं. जगण्याची आस असताना आयुष्य मात्र दूर पळून जातयं, असं त्याला दिसत होतं. मी लवकर बरा होईन, अशी भाबडी आशा घेऊन इरफान दवाखान्यात गेला होता. पण, तिथं मृत्यूची चादर त्याच्यासाठी तयार होती. इरफानला जगण्याची इच्छा होती. त्याने वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून जगण्याची आस बोलून दाखवली होती. त्याला मृत्यू आला खरा, पण त्याच्य़ा जगण्याच्या इच्छेपुढे मृत्यूही ओशाळला. स्वप्नांच्या झुल्यावर झुलताना झुल्याची साखळी कधी निसटली ते त्यालाही कळलच नाही. शेवटी हे अचानक कसं आणि का घडलं? हे प्रश्न अनुत्तरीतचं राहिले. 

 

तामिळनाडू : कोईमतूरमध्ये महिला 'राज', 'कमळ' फुलताना अभिनेते कमल हासन यांचा पराभव

May be an image of 1 person 

दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेते कमल हासन यांना कोईमतूर दक्षिण विधानसभेतून पराभव स्वीकारावा लागला. त्यांना टक्कर द्यायला काँग्रेसचे एस. जयकुमार आणि भाजपच्या वनाथी श्रीनिवासन रणांगणात उतरले होते. वनाथी भाजप महिला युनिटच्या राष्ट्रीय अध्यक्षा आहेत. पण, कमल हासन हे दक्षिणेचा लोकप्रिय चेहरा असूनही भाजपने या जागेवर कमळ फुलवलं. कमल हासन यांच्या पक्षाच्या अजेंड्यांचा आणि ध्येयधोरणांचा येथील लोकमनावर फारसा परिणाम झाला नाही. अखेर वनाथी यांनी हासन यांना पराभूत करून पहिल्यांदाचं ही जागा भाजपला मिळवून दिली.  

Tamil Nadu Assembly elections | Polite rivals - The Hindu

                          वनाथी श्रीनिवासन

अभिनयातून राजकारणात प्रवेश केल्यापासून असंख्य तामिळ जनतेचे लक्ष त्यांच्याकडे होते. हासन यांच्या अभिनयाचा पगडा लोकांच्या मनावर होता आणि तो आजही आहे. तसं पाहिलं तर तामिळनाडूच्या राजकारणाला चित्रपटसृष्टीतून आलेल्या कलाकारांचा इतिहास आहे. तामिळनाडूतील राजकारण गेली अनेक दशके चित्रपट अभिनेते, अभिनेत्रींभोवती फिरत आहे. रामस्वामीनायकर, एम. जी रामचंद्रन, एम. करुणानिधी, अण्णा द्रमुकच्या जयललिता हे सर्व नेते चित्रपटातूनचं राजकारणात आले. किंबहुना हे एक समीकरणचं झालं होतं. पण, कमल यांच्या पिछाडीवर जाण्याने या समीकरणाला सध्या ब्रेक लागल्याचं दिसून येतं. 

'दक्षिण भारताचे मॅंचेस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोईमतूरमधील स्थान आपल्याला सहज मिळवता येईल, असे समजून निवडणुकीच्या रिंगणात हासन उतरले होते. परंतु, भाजप उमेदवार वनाथी श्रीनिवासन यांनी त्यांना थोड्या फरकांच्या मतांनी पराभूत केले. वनाथी श्रीनिवासन यांना ५२ हजार ६२७ मते मिळाली. तर कमल हासन यांना ५१ हजार ८७ मते मिळाली. एकीकडे कमल हासन यांना आपल्या स्टारडमच्या आधारे राजकारणाच्य़ा पिचवर चांगल्या स्कोरचा विश्वास होता. पण, जनतेने कौल वनाथी यांना दिला. यामागील एक कारण म्हणजे, कोईमतूरमध्ये वनाथी यांचं दीघर्काळ काम होय.

भ्रष्टाचाराचा मुद्दा

मक्‍कल नीधि मय्‍यम (MNM) पक्षाच्य़ा अजेंड्यात कमल हासन यांनी भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळला. पक्षाच्या अजेंड्यात भ्रष्टाचाराचा मुद्दा हाताळून निवडणूक लढवली. त्यांचा दावा होता की, जर त्यांचा पक्ष सत्तेत आला तर तामिळनाडूच्या राजकारणातील भ्रष्टाचाराचा अंत होईल. त्यांनी हीदेखील आश्वासने दिले की, पक्ष सत्तेत आल्यानंतर गृहिणींना घराच्या कामकाजासाठी पैसे, सर्व घरांना हाय स्पीड इंटरनेट सेवा आणि शेतकरी कृषी आधारित उद्योगांच्या माध्यमातून उद्योजक बनतील. दारिद्र्य रेषेखालील लोकांना समृद्धी रेषेत आणले जाईल. 

कार्यकर्त्य़ांना प्रोत्साहन देणारे पत्र आणि विश्वास 

निवडणूक हे शेवट नाही आणि लोकांची कामे कधी संपत नाही. त्यांनी निवडणुकीच्या मतमोजणीच्या आधी आपल्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिले होते. त्यांच्यातील धैर्य, आत्मविश्वासाठी प्रोत्साहन दिले. ते आपल्या पत्रात म्हणाले होते, आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे की, निवडणूक हा शेवटचा पयार्य नाही. आपल्या सर्वांना माहिती आहे की, लोकांच्या कामांचा शेवट कुठेचं नाही. कारण, कामे कधीचं संपत नाही. लोकांची कामे अविरतपणे सुरू राहतात. आम्हाला विश्वास आहे की, या निवडणुकीत लोकांचा विश्वास म्हत्त्वाचा आहे. प्रिय लोक आमची शक्ती आहे. लोकांचं कल्याणचं सवोर्तोपरी महत्त्वाचं आहे. यश असो वा अपयश उत्सव साजरे करू नका. आपल्याला विजय न मिळाल्यास निराश होऊ नका. आपले चांगले कार्य नेहमी अविरतपणे सुरू ठेवा. त्रस्त झालेल्यांना मदत करण्यासाठी आपण शक्य तितके प्रयत्न करायला हवे. मला दररोजच्या घडामोडींवरून दिसतं की, ‘चांगले कार्य केल्यानंतर स्वतःचे समाधान होणे आणि त्याचा अभिमान वाटणे, हेच विचार अत्यंत महत्त्वाचे ठरत आहेत. कमल हासन यांनी पत्रात पुढे म्हटले होते की, लोकांसाठी आम्ही लोकांसह मैदानावर उभे राहू.

तामिळनाडूचा इतिहास साक्षीदार 

चित्रपटातील त्यांचे अभिनय कौशल्य, अफट यश सर्वश्रृत आहे. त्यामुळे अनेकांना वाटत होतं की, हा अभिनेता राजकारणातील नेता बनेल. तामिळनाडूचा इतिहास हा आहे की, कोणताही मोठा सुपरस्टार तेथील सत्तेचा 'किंग'देखील ठरू शकतो. पण, कुठल्याही पातळीवर राजकीय समीकरणं बदलायला वेळ लागत नाही. गरीब लोकांचे जीवनमान उंचावणे, शेतकऱ्यांना उद्योजक बनवणे, घरांमध्ये इंटरनेट सेवा देणे यांसारख्या असंख्य लोकहितांची ध्येयधोरणे कदाचित लोकांना बोलघेवडेही वाटली असावीत.  

चाहत्यांचा भ्रमनिरास 

या अभिनेत्याला राजकारणातील नेता म्हणून बघण्याची चाहत्यांची इच्छा पूर्ण झाली नाही. अन्य अभिनेते, राजकारणातील धुरंदरांच्या इतकाच तोलामोलाचा, मोठा पडदा गाजवलेला महानायक कमल हासन राजकीय रणांगण गाजवू शकला नाही, य़ाची खंत मात्र त्याच्या चाहत्यांना लागून राहिली आहे.  

कोईमतूर दक्षिणमधील मतदार

येथे मुस्लिम मतदारांची संख्याही अधिक आहे. एकूण मतदारांची संख्या २ लाख ५१ हजार ३८९ आहे. यामध्ये पुरुष मतदार १ लाख २५ हजार ४१६ आहे. महिला मतदारांची संख्या १ लाख २५ हजार ९५० आणि ट्रांसजेंडर २३ आहेत. संपूणर् तामिळनाडूमध्ये एकूण ३ हजार ९९८ उमेदवार उभे होते. त्यासाठी ६.२९ कोटी मतदारांनी मतदान केले. एकूण मतदारांपैकी ७१.८१ टक्के मतदारांनी मतदानात सहभाग घेतला.

तामिळनाडूच्या राजकारणातील धुरंदर स्टॅलिन 

ई. पलानीसामी यांच्या नेतृत्वातील अण्णा द्रमुक यांच्या शासनावर धमाकेदार विजय मिळवत एम के स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुकने स्पष्ट बहुमत मिळवलं. अण्णाद्रमुकचा सुफडासाफ करत स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री होण्यास सज्ज झाले आहेत.  

गुन्हेगारी विश्वातील नाट्यमय घडामोडींची साक्षीदार 'डॅडी'ची दगडी चाळ

No photo description available.

 मुंबई जागतिक स्तरावरील एक महत्त्वाचं शहर. येथील ब्रिटिशकालीन वास्तू पर्यटकांना आजही भूरळ घालतात. येथील लोकवस्तीचा आढावा घेतल्यास दाटीवाटीने राहणाऱ्या घरांची एक चाळ संस्कृती आपल्या नजरेस पडते. चाळ म्हणजे मध्यमवर्गीयांच राहण्याचं एक हक्काचं ठिकाण. येथेच पु. लं. ची बटाट्याची चाळ असो वा अनेक महाराष्ट्रातील संस्कृतीचा कार्यक्रम असो, या चाळींना महत्त्व आलं. मुंबईतील अनेक चाळींपैकी एक महत्त्वाची चाळ म्हणजे कधीकाळीचा गुन्हेगारी जगताचा डॉन अरुण गवळीची 'दगडी चाळ'... 

'मुंबईमधील दगडी चाळ पाडणार' अशी बातमी जेव्हा प्रसिध्द झाली, तेव्हा या लक्षणीय चाळीचं एक वेगळचं आकर्षण झालं होतं. आता दगडी चाळ पाडणार म्हटल्यावर ही चाळ पुन्हा प्रकाशझोतात आली आहे. ही चाळ पाडून तेथे म्हाडा ४० मजली दोन टॉवर उभारणार आहे. गँगस्टर अरुण गवळीचं मुंबईतील निवास्थान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या दगडी चाळीचा पुनर्विकास केला जाणार आहे. यामधील आठ इमारती अरुण गवळीच्या मालकीच्या आहेत. गुन्हेगारी विश्वातील अनेक नाट्यमय घडामोडींची साक्षीदार असलेली दगडी चाळ नेमकी काय आहे? याचा घेतलेला हा मागोवा. 

मुंबईत झाकोळल्या गेलेल्या अनेक चाळी आहेत. पण, अशा काही चाळी आहेत, ज्या मराठी आणि हिंदी चित्रपटाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आल्या. त्यापैकी एक आहे दगडी चाळ. आताच्या पिढीला दगडी चाळ ही चित्रपटांमधून समजली. 'डॅडी' अर्थातचं अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी आणि दगडी चाळ हे बनलेलं समीकरण चित्रपटांमधून दाखवलं गेलं. अरुण गवळीमुळे दगडी चाळ प्रसिध्द झाली... 

मुंबईत जिथे जिथे मिल (गिरणी) उभी राहायची, त्याच्या आजूबाजूलाचं कामगारांची चाळ उभी राहायची. तेथून कामगार एकत्र कामाला जायचे. अरुण गवळी त्यापैकी एक होता. तो खटाव मिलमध्ये कामाला होता आणि तो ज्या चाळीत राहायचा, ती 'खटाव मिलवाल्यांची चाळ' म्हणून ओळखली जायची. ती पुढे 'दगडी चाळ' म्हणून प्रसिध्द झाली.   

दगडी चाळ नेमकी काय आहे? 

मुंबईतील कामगारांच्या चाळींसमोर एक मोठे प्रवेशद्वार असायचे. या प्रवेशद्वारामुळे चाळीतील लोक सुरक्षित राहायचे. प्रत्येक चाळीच्या गेटवर प्रत्येक मिलचं नाव लिहिलेलं असायचं. दगडी चाळीचं गेट हे दगडांबासून बनवलेलं आणि प्रश्स्त होतं, त्यावरून 'दगडी चाळ' हे नामकरण झालं. या चाळीसमोर एक सिमेंटची चाळ होती. दुसऱ्या बाजूला 'लाल विटांची चाळ' ओळखली जायची. लाल विटांच्या चाळीत रमा नाईक राहायचा. (रमा नाईक स्मगलिंगच्या धंद्यात होता.) खटाव मिल उभी राहिल्यानंतर तेथील कामगार भायखळाच्या आजूबाजूला ज्या चाळी होत्या, तेथे राहायचे.

साधारणपणे १९८० -८१ नंतर मुंबईचं आणि गुन्हेगारी विश्वाचं चित्र बदलत गेलं. त्याआधी करीमलाला असेल, हाजीमस्तान असेल, युसूफ पटेल असेल आपापसांत त्यांच्यामध्ये स्मगलिंगवरून वाद व्हायचे. त्यावेळी दगडी चाळ एवढी प्रसिध्द नव्हती. 

May be an image of 1 person

पिढ्यानपिढ्या कामगार चाळीत राहायचे. सात रस्ता या भागात गिरणी कामगार राहायचे. तेथे युनायटेड मिल आणि अन्य मिल्स होत्या. येथील कामगारांची आसपासच्या चाळीत वस्ती असायची. मिलमधील आंदोलने, यावेळी सर्व मिलमधील कामगार एकत्र यायचे.  

खटाव मिल जेव्हा बंद झाली, तेव्हा खटाव मिलच्या मालकाने काही गुन्हेगार माणसं आणली. तेव्हा मालकाकडून आमच्यावर अन्याय होतो, या भावनेने कामगारांचा संताप उफाळायचा. यातून उभा राहिला तो अरुण गवळी. आपल्यावर अन्याय होतो, मग गिरणी मालकाला मारलं पाहिजे, यातून गुन्हेगारी टोळीयुध्द सुरू झालं. यामध्ये अरुण गवळी, रामा नाईक खेचले गेले. रामा नाईक आधीपासूनचं गुन्हेगारी विश्वात होता. अरुण गवळीने स्वत:ची एक गँग उभी केली. (रमा नाईक हा स्मगलिंग आणि बाबू रेशीम हा दारूचा अड्डा चालवायचा.)

Arun Gawali (Daddy) - The Don

मुंबईत ज्यावेळी गिरण्या मोठ्या प्रमाणात सुरू होत्या. त्यावेळी पगारवाढीसाठी असेल, एखाद्यावर अन्याय झाला असेल, तेव्हा गिरण्यांचे संप व्हायचे. संप फोडण्यासाठी गिरणी मालक ज्या लोकांना आणायचा, ते लोक मारामाऱ्या करायला चाळीत घुसायचे. सोडा वॉटरच्या बॉटल्स, दगडे घेऊन चाळीवर हल्ला चढवायचे. पण, चाळीचा मुख्य दरवाजा बंद केल्यानंतर आतील कामगार, माणसं सुरक्षित राहायची. अनेक चाळींपैकी महत्त्वाच्या दगडी चाळीचा मुख्य दरवाजा इतर चाळींपेक्षा प्रशस्त होता. त्यामुळे त्यावेळी अरुण गवळीने कुठलेही गुन्हे केल्यानंतर किंवा त्याच्या साथीदारांना लपण्यासाठी ही दगडी चाळ सुरक्षित ठरली. अनेक गुप्त दरवाजे, खोल्या काढल्या गेल्या. अनेक खोल्या नव्याने बांधल्या गेल्या. या ठिकाणी लपून बसण्यासाठीची ही सुरक्षित जागा ठरली. 

अरुण गवळी - कामगार, आमदार आणि अंडरवर्ल्ड डॉन चाळीतचं!

गिरणी कामगार ते अंडरवर्ल्ड डॉन आणि आमदारापर्यंतचा अरुण गवळीचा प्रवास या चाळीतचं झाला. या चाळीतूनचं डॉनची सूत्रे हालत होती. अनेक मारामाऱ्या, खून, खंडणीची प्रकरणे या चाळीतून घडली. अनेक नाट्यमय चकमकी चाळीत घडल्या. त्यामुळे दगडी चाळीची दहशत पसरली. (मुंबईमध्ये अनेक नामवंत इमारती आहेत, पण दगडी चाळ विशेष प्रसिध्द झाली.)

याचं चाळीमध्ये वैशिष्ट्यपूर्ण चकमकी झाल्या. त्यामुळे संपूर्ण अंडरवर्ल्ड हादरलं. तेथून जे अंडरवर्ल्डचं बस्तान होतं, ते हळूहळू कमी झालं. पण, तरीही दगडी चाळ ही 'दगडी चाळचं' राहिली. रोजचं गँगवॉर, पोलिसांशी होणारी चकमक हे आजही आठवून लोकांना आजही अंगावर शहारे येतात. इथे राहणारे लोक या घडामोडींचे साक्षीदार आहेत.  

Mumbai: Special court rejects Arun Gawli's plea; says can't review own order

जेव्हा एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळस्कर साळसकर अरुण गवळीला अटक करायला दगडी चाळीत घुसले, तेव्हा तेथे घडलेल्या प्रसंगामुळे दगडी चाळ अधिक प्रकाशझोतात आली. अरूण गवळी म्हटलं की 'दगडी चाळ आणि दगडी चाळ म्हटलं की अरुण गवळी' हे समीकरण ठरलं. विजय साळस्करांची एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख होती. गँगस्टर अमर नाईकला मारल्यानंतर गुन्हेगारांमध्ये साळसकरांची प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 

विजय साळसकर यांनी गवळीला अटक केल्यानंतर काही गँगस्टर दगडी चाळीत लपून बसण्यासाठी जाऊ लागले. तेव्हा दगडी चाळ कुप्रसिध्द झाली. त्याआधी 'खटाव मिल वाल्यांची चाळ' म्हणून 'दगडी चाळ' ओळखली जायची. खटाव नावाच्या मिलच्या मालकाची ही गिरणी होती. गिरण्यांचा संप झाल्यानंतर खटाव मिल मालकाचा खून झाला. खून करणारी जी मुले होती, त्या मुलांचा गुन्हेगारी विश्वाशी संबंध नव्हता. पण, ही मुले दगडी चाळीतील होती. मिल बंद झाल्यानंतर मुले बेरोजगार होती, अनेकांच्या घरात खाण्याचे वांदे होते. त्यामुळे येथील जनजीवनचं विस्कळीत झालं होतं. १९८२ चा गिरणी संप झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळे वळण लागले. त्याच्या अनेक केंद्रबिंदूपैकी एक केंद्रबिंदू होती 'दगडी चाळ'. त्यामुळे गुन्हेगारी जगताला मोठं वलय प्राप्त झालं, असं दुर्दैवाने म्हणावं लागेल. 

अरुण गवळीला सर्वात सुरक्षित ठिकाण ही चाळ होती. तो आमदार झाला तो या दगडी चाळीतचं! त्याच्या विरोधात त्यावेळी निवडणुकीला उभा राहिलेल्यांना प्रचंड दहशत निर्माण झाली होती. 

या चाळीतील नवरात्रौत्सवही मुंबईकरांना परिचित आहे. चाळीतील मंदिरामागे अरुण गवळीचं मोठं ऑफिसही होतं. नवरात्रौत्सवाचे पूजा तो मोठ्या थटात करायचा.   

दगडी चाळीचं चित्रपटसृष्टीलाही आकर्षण 

पूर्वी चित्रपटसृष्टीमध्ये गुन्हेगारी विश्वाचे चित्रण दाखवायला बहुतांशी मुंबईतील स्टुडिओमध्ये सेट उभारले जायचे. पण, ९० च्या दशकांनंतर काही दिग्दर्शकांनी सेट प्रत्यक्ष लावण्याऐवजी 'दगडी चाळी'मध्ये जाऊन शूटिंग करायला सुरुवात केली. (ते ही गुन्हेगारी विश्वाचा बोलबाला असताना रिस्क घेऊन दिग्दर्शक तिथे चित्रीकरणासाठी जायचे.) 

विविध दिग्दर्शकांनी आपल्याकॅमेरामॅनच्या साथीने या दगडी चाळीच वेगळ्या पध्दतीने चित्रीकरण केले आणि मोठ्या पडद्यावर दाखवले. त्यामुळे प्रेक्षकांनाही 'दगडी चाळ' काय आहे, हे कळलं. अनेक गुन्हेगारी विश्वावरील सिनेमांचे शूटिंग हे दगडी चाळीत केलं गेलं. त्यामुळे दगडी चाळीला विशेष महत्त्व आलं. 

Daddy' controversy: Producer says Arjun Rampal cheated him of 2 cr

अरुण गवळीवर अनेक हिंदी आणि मराठी चित्रपट आले. या चित्रपटांमध्ये मकरंद देशपांडे, अर्जुन रामपाल अशा कलाकारांनी गवळीची भूमिका साकारली. 'दगडी चाळ', 'डॅडी', 'शूट आऊट ॲट लोखंडवाला', 'एक थी बेगम' अशा सिनेमा आणि वेब सीरीजमधून अरुण गवळीची व्यक्तीरेखा साकारणारे कलाकार छोट्या-मोठ्या भूमिकेत सतत डोकावताना प्रेक्षकांना पहायला मिळतात. 

अरुण गवळीच्या मुलीचं अभिनेत्याशी लग्न 

गँगस्टर अरूण गवळी यांची मुलगी योगिता गवळी आणि अभिनेता अक्षय वाघमारे यांनी लग्न केले. योगिता ही सिनेनिर्माती असून तिने दगडी चाळ या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच ती एक स्वयंसेवी संस्थाही चालवते. शिवाय ती नगरसेविकाही होती. तर अक्षय वाघमारे ('यूथ' फेम) हा आघाडीचा अभिनेता मूळचा पुण्याचा आहे.

मुंबईत मोठमोठ्या वास्तू या जतन केल्या जातात. आलेल्या पिढीला आणि तेथून लहानाच्या मोठ्या झालेल्या पिढीला, ज्यांनी दगडी चाळ पाहिली आहे, त्यांच्यासाठी ही एक केवळ आठवण म्हणून राहील. दगडी चाळीच्या जागी गगनचुंबी इमारत उभी राहिलही; पण त्याची आठवण आता ही केवळ सिनेमाच्या इतिहासामध्ये मर्यादित राहील.  

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...