Thursday, April 4, 2019

काही न करता 'हा' इमरान रातोरात बनला स्‍टार

बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्‍हाला माहितीच आहे. पण, पाकिस्‍तानचा इमरान हाशमी तुम्‍हाला माहिती नसणार. काही वर्षांपूर्वी इमरान हाशमीचा डुप्‍लीकेटचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. हा व्‍यक्‍ती हुबेहुब इमरान खानसारखा दिसतो. त्‍या व्‍यक्‍तीचे नाव मजदाक जान असे आहे. मजदाक हा इमरानचा डुप्‍लिकेट आहे. तो पाकिस्‍तानमध्‍ये राहतो. 

कोण असली, कोण नकली, ओळखणं कठीण!


बॉलिवूडचा सीरियल किसर इमरान हाशमी तुम्‍हाला माहितीच आहे. पण, पाकिस्‍तानचा इमरान हाशमी तुम्‍हाला माहिती नसणार. काही वर्षांपूर्वी इमरान हाशमीचा डुप्‍लीकेटचे फोटोज सोशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. हा व्‍यक्‍ती हुबेहुब इमरान खानसारखा दिसतो. त्‍या व्‍यक्‍तीचे नाव मजदाक जान असे आहे. मजदाक हा इमरानचा डुप्‍लिकेट आहे. तो पाकिस्‍तानमध्‍ये राहतो. 

विशेष म्‍हणजे तो जेव्‍हा सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्‍हा लोक त्‍याच्‍याभोवती सेल्‍फी घेण्‍यासाठी गराडा करतात. मजदाक सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्‍ह राहतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटमुळे तो प्रसिध्‍दीझोतात आला आहे. 
मजदाकला यायचयं अभिनय क्षेत्रात  
मजदाकला ॲक्‍टिंगची आवड आहे. तो लवकरच मॉडलिंग सुरू करणार असल्‍याचं समजतं. मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले, आपल्‍या चेहर्‍यामुळेच तो स्‍टार बनला आहे. जेव्‍हा लोक माझ्‍याकडे येऊन सेल्‍फी घेतात. माझ्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, तेव्‍हा मला चांगलं वाटतं. मला प्रसिध्‍दी मिळाली. यासाठी मला काहीच कराव लागलं नाही. मी खूप खूश आहे.' 
हुबेहुब चेहर्‍यामुळे रातोरात बनला स्टार
मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले होते, काही न करता केवळ चेहर्‍यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. मजदाक म्‍हणाला होता, "मला काहीच करावं लागलं नाही. मी इमरान खानचा डुप्‍लीकेट असल्‍यामुळे पाकिस्तानमध्‍ये मी स्टार बनलो आहे."
अशी आहे अभिनेता इमरान खानची फॅमिली...
इमरानचे वडील अनवर हाशमी तर आई माहेरा हाशमी आहे.इमरानने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवीचे शि२ण घेतले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, दिग्‍दर्शक मोहित सूरी आणि अभिनेत्री स्माइली सूरी (कलयुग) इमरानचे कझिन आहेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा लागतात. इमरानने २००६ मध्‍ये परवीनशी विवाह केला होता. दोघांचा एक मुलगा अयान आहे. 

(Photo : mazdak.jaan insta) 





[X] Close
[X]
[X]

विशेष म्‍हणजे तो जेव्‍हा सार्वजनिक ठिकाणी येतो तेव्‍हा लोक त्‍याच्‍याभोवती सेल्‍फी घेण्‍यासाठी गराडा करतात. मजदाक सोशल मीडियावर नेहमीच ॲक्टिव्‍ह राहतो. त्‍यामुळे त्‍याच्‍या सोशल मीडिया अकाऊंटमुळे तो प्रसिध्‍दीझोतात आला आहे. 
मजदाकला यायचयं अभिनय क्षेत्रात  
मजदाकला ॲक्‍टिंगची आवड आहे. तो लवकरच मॉडलिंग सुरू करणार असल्‍याचं समजतं. मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले, आपल्‍या चेहर्‍यामुळेच तो स्‍टार बनला आहे. जेव्‍हा लोक माझ्‍याकडे येऊन सेल्‍फी घेतात. माझ्‍याशी बोलण्‍याचा प्रयत्‍न करतात, तेव्‍हा मला चांगलं वाटतं. मला प्रसिध्‍दी मिळाली. यासाठी मला काहीच कराव लागलं नाही. मी खूप खूश आहे.' 
हुबेहुब चेहर्‍यामुळे रातोरात बनला स्टार
मजदाकने एका मुलाखतीत म्‍हटले होते, काही न करता केवळ चेहर्‍यामुळे तो रातोरात स्टार बनला आहे. मजदाक म्‍हणाला होता, "मला काहीच करावं लागलं नाही. मी इमरान खानचा डुप्‍लीकेट असल्‍यामुळे पाकिस्तानमध्‍ये मी स्टार बनलो आहे."
अशी आहे अभिनेता इमरान खानची फॅमिली...
इमरानचे वडील अनवर हाशमी तर आई माहेरा हाशमी आहे.इमरानने मुंबईतील सिडेनहॅम कॉलेजमधून पदवीचे शि२ण घेतले आहे. अभिनेत्री पूजा भट्ट, दिग्‍दर्शक मोहित सूरी आणि अभिनेत्री स्माइली सूरी (कलयुग) इमरानचे कझिन आहेत. चित्रपट निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट इमरानचे मामा लागतात. इमरानने २००६ मध्‍ये परवीनशी विवाह केला होता. दोघांचा एक मुलगा अयान आहे. 

'सिंघम'च्‍या जयकांत शिकरेने १२ वर्षांनी लहान तरुणीशी केले होते लग्‍न

'सिंघम' फेम जयकांत शिकरे अथांतच दाक्षिणात्‍य अभिनेता प्रकाश राज ५४ वर्षांचे झाले आहेत. प्रकाश राज यांचा जन्‍म २६ मार्च, १९६५ रोजी झाला. निर्माते नेहमी प्रकाश राज यांच्‍यावर आरोप करतात की, ते कधीही वेळेवर शूटला येत नाही. प्रकाश राज यांच्‍याविषयी अशा अनेक इंटरेस्‍टिंग गोष्‍टी आहेत, ज्‍या तुम्‍ही कदाचित वाचल्‍या नसतील. वाढदिवसानिमित्त प्रकाश राज यांच्‍या आयुष्‍याविषयी थोडक्‍यात जाणून घेऊया.


प्रकाश राज यांनी एका मुलाखतीत म्‍हटले होत की, ते कोणताही चित्रपट साईन करण्‍यापूर्वी स्‍पष्‍ट करतात की, कोणत्‍या वेळेत ते शूटसाठी सेटवर येणार आहेत. प्रकाश यांनी म्‍हटले होते की, 'मी रात्री जवळपास ३ वाजता झोपतो आणि सकाळी ९ वाजता उठतो. मी कुणासाठी माझी लाईफस्टाईल चेंज करू शकत नाही. जर मी तुम्‍हाला आवडत असेन तर तुम्‍ही मला चित्रपटात साईन करा अथवा कोणताही प्रॉब्‍लेम नाही.' 
तेलगु चित्रपट इंडस्ट्रीने ६ वेळा केले बॅन 
असे म्‍हटले जाते की, चित्रपट इंडस्‍ट्रीत प्रकाश राज यांच्‍या असभ्‍य वर्तणुकीमुळे तेलगु फिल्म प्रोड्यूसर्सनी प्रकाश राज यांना काम करण्‍यास ६ वेळा बंदी घातली होती. यावर प्रकाश राज म्‍हणाले होते, 'मी माझे नियम-कायदे पाळतो.' परंतु, याविषयी असेही वृत्त आले होते की, दाक्षिणात्‍य चित्रपट इंडस्‍ट्रीत आणि मीडियामध्‍ये आलेल्‍या वृत्तानुसार, काही चित्रपट निर्मात्‍यांनी मिळून प्रकाश राज यांच्‍याविरोधात हे षड्‍यंत्र रचले होते. 
एका चित्रपटासाठी २ कोटी रुपये
प्रकाश राज एका चित्रपटासाठी जवळपास २ कोटी रुपयांचे मानधन घेतात. प्रकाश राज यांना आजपर्यंत आपल्‍या कामासाठी मॅनेजरची गरज भासली नाही. त्‍यांच्‍या माहितीनुसार, ते आपले मानधन स्‍वत: ठरवतात. ते म्‍हणतात, 'इंडस्ट्रीमध्‍ये मी असा एकमेव अभिनेता आहे, ज्‍याला आजपर्यंत मॅनेजरची आवश्‍यकता वाटली नाही. मी फोन कॉल्‍स घेण्‍यापासून चित्रपटाच्‍या सिलेक्शन, स्टोरी आणि मानधनापर्यंत सर्वकाही स्‍वत: निर्णय घेतो. इतकेच नाही तर मी माझ्‍या कमाईचा २० टक्‍के भाग चॅरिटीला देतो.'
३०० रु. होती कमाई
प्रकाश राज यांनी सुरुवातीला थिएटरमध्‍ये काम केले. याशिवाय, ते स्ट्रीट प्लेदेखील करत होते. त्‍यांना स्टेज शो करण्‍यासाठी महिने ३०० रु. मिळत होते. यानंतर त्‍यांनी टीव्‍ही मालिकांमध्‍ये काम केले. हळूहळू ते चित्रपटाकडे वळले. त्‍यांनी कन्नड, तमिळ, मराठी, मल्‍याळम आणि हिंदी चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. बहुतांशी चित्रपटात त्‍यांनी खलनायकाची भूमिका केली आहे. अभिनयाकरिता त्‍यांना राष्‍ट्रीय पुरस्‍कारदेखील मिळाला आहे. त्‍यांनी चित्रपट दिग्‍दर्शनदेखील केले आहे. त्‍यांनी चित्रपटांकरिता आपले नाव प्रकाश राय असे बदलून प्रकाश राज असे ठेवले. 
१२ वर्षांनी लहान तरुणीशी केला विवाह 
कोरिओग्राफर पोनी वर्मा प्रकाश राज यांची दुसरी पत्नी आहे. प्रकाश यांनी ऑगस्‍ट, २०१० मध्‍ये पोनीशी विवाह केला होता. त्‍यावेळी पोनी प्रकाश यांच्‍यापेक्षा १२ वर्षांनी लहान होती. प्रकाश यांचे पहिले लग्‍न १९९४ मध्‍ये अभिनेत्री ललिता कुमारी यांच्‍याशी झाला होता. २००९ मध्‍ये दोघांनी घटस्‍फोट घेतला. दोघांच्‍या दोन मुली मेघना आणि पूजा आहेत. प्रकाश राज ५० व्‍या वर्षी पुन्‍हा बाबा बनले. ३ फेब्रुवारी, २०१६ रोजी पोनी वर्माने मुलाला जन्म दिला. मुलाचे नाव वेदांत आहे. 

सर्वांत बोल्ड किस सीन देणारा इमरान हाशमी

बॉलिवूडचा 'सीरिअल किसर' म्‍हणून ओळखला जाणार्‍या 'इमरान हाशमी'चा २४ मार्चला वाढदिवस. इमरान हाशमी म्‍हटलं की, आठवतयं ते बोल्‍ड सीन्‍स. इमरानने बॉलिवूडमध्‍ये २००३ ला पाय रोवले. विक्रम भट्ट यांचा चित्रपट 'फुटपाथ'मधून त्‍याने आपल्‍या बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. पण, खरी ओळख मिळाली ती २००८मध्‍ये आलेला चित्रपट 'जन्नत'. जन्‍नत त्‍यावेळी सुपरहिट झाला होता.  

इमरानने 'सीरिअल किसर' म्‍हणून इंडस्‍ट्रीत वेगळी ओळख निर्माण केली. 'मर्डर' चित्रपटातील त्‍याची भूमिका आजही लक्षात आहे. त्‍यामुळेच 'किसिंग हिरो' म्‍हणून त्‍याला ओळखले जावू लागले.
त्‍याच्‍या चित्रपटांपैकी सर्वांत बोल्‍ड किसिंग सीन असणारे चित्रपट असे-
मर्डर
चित्रपट 'मर्डर' २००४ मध्‍ये आल्‍यानंतर इमरानने पहिल्‍यांदाच ऑनस्‍क्रिन हॉट किसिंग सीन दिले होते. इमरानची अभिनेत्री म्‍हणून मल्लिका शेरावतने त्‍याच्‍यासोबत स्‍क्रिन शेअर केले होते. मल्‍लिकानेही रोमँटिक किसिंग सीनसोबतच अनेक हॉट सीन्‍स दिले होते. 
Image result for emraan hashmi film murder
आशिक बनाया आपने
या चित्रपटात इमरान हाशमीने तनुश्री दत्तासोबत बोल्ड सीन देऊन मोठ्‍या पडद्‍यावर धुमाकूळ घातला. 
Image result for emraan hashmi film  Zeher
गँगस्टर
'गँगस्टर'मध्‍ये इमरान हाशमी आणि कंगना राणावतची हॉट जोडी दिसली होती. त्‍यात इमरान आणि कंगनाने हॉट किसिंग सीन दिले होते. 
मर्डर २
'मर्डर' चित्रपटात मल्लिका शेरावतने इमरानसोबत इंटिमेट सीन दिले होते. यानंतर आलेला चित्रपट 'मर्डर-२'मध्‍ये इमरानसोबत श्रीलकंन अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने अनेक बोल्‍ड सीन दिले. 
राज-३
२०१२ मध्‍ये आलेला 'राज-३' या चित्रपटात इमरान हाशमी आणि ईशा गुप्ताने सर्वांत लॉन्‍ग किसिंग सीन दिले होते. हा सीन २० मिनिटांचा होता. या सीनने बॉलिवूडमधील सर्व किसिंग सीनचे रेकॉर्ड मोडले होते. 
जन्‍नत - २
वन्‍स अपॉन टाईम इन मुंबई 
Milan Luthria’s gangster period film, ‘Once Upon A Time in Mumbai’, where Emraan Hashmi essayed the role of Shoiab Khan – built on the real-life don Dawood Ibrahim. Hashmi’s character was praised immensely by critics and lapped up by fans. The film acted as a milestone in Emraan Hashmi’s film career, earning him a Filmfare nomination for the Best Supporting Actor. - Spice Team
जहर 
Related image
द डर्टी पिक्‍चर 
Image result for emraan hashmi film the dirty picture
जन्‍नत 
The 2008 crime romance by Kunal Deshmukh re-shot Emraan Hashmi into prominence. Ever since ‘Jannat’ hit the theatres, there’s hardly been any instance where Hashmi has had to look back. Starring across Sonal Chauhan, Emraan’s performance was largely liked by critics and the film turned out to be a huge worldwide success. - Spice Team

काजोलला पहिल्‍या भेटीत अजय वाटला होता खडूस

बॅलिवूडचा 'सिंघम' अजय देवगन आणि काजोल यांची जोडी बॉलिवूडमधील सर्वात अधिक क्‍यूट जोडींपैकी एक आहे. त्‍यांची लव्‍ह स्टोरी खूपच खास आहे. तुम्‍हाला माहिती आहे का? अजय देवगनला काजोल आवडत नव्‍हती. त्‍यांच्‍या आयुष्‍यातील अशी काही, इंटरेस्‍टिंग माहिती जाणून घ्‍यायची आहे? मग वाचा पुढील माहिती. 
अभिनेता अजय देवगनचा आज वाढदिवस. काजोलचे बॉलिवूडमधील करिअर बहरले होते, त्‍यावेळी काजोलला अजय देवगनशी प्रेम झाले आणि दोघांनी लग्‍न करण्‍याचा निर्णय घेतला. 
अजय-काजोलची लव्‍हस्‍टोरी 
काजोलची लव्‍ह स्टोरी एका चित्रपटाच्‍या कथेसारखीच आहे. असे म्‍हटले जाते की, काजोलच्‍या आधी अजय देवगनचे करिश्मा कपूरशी अफेअर होते. करिश्मा कपूर त्‍यावेळची टॉपची अभिनेत्री होती. अजय देवगन आणि करिश्मा कपूरने पहिल्‍यांदा एकत्र 'जिगर' या चित्रपटात काम केले होते. कामाच्‍यावेळी दोघांच्‍या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. अजय देवगनने करिश्मासाठी त्‍यावेळी त्‍याची गर्लफ्रेंड रवीना टंडनशी ब्रेकअप घेतला होता. अजय देवगन-करिश्मा रिअल लाईफमध्‍ये टाईम स्पेंड करत होते, त्‍यावेळी दोघांनी एकत्र 'जिगर', 'धनवान', 'सरगम', सुहाग' यासारखे चित्रपट एकत्र केले. याचदरम्‍यान, अजय देवगनने काजोलसोबत 'हलचल' चित्रपटाचे शूटिंग सुरू केले. 
सुरुवातीला अजय देवगन-काजोल यांच्‍यात केवळ मैत्री होती. काजोल ज्‍यावेळी पहिल्‍यांदा अजयला भेटली, त्‍यावेळी अजय चित्रपटाच्‍या शूटिंगच्या सेटवर एकटा बसला होता. अजयला एका किनारी एकटे बसायला आवडत असे. तो अधिक बोलायचा नाही. अजय देवगनला सुरुवातीला काजोल आवडायची नाही. एका मासिकाला दिलेल्‍या मुलाखतीत अजय देवगनने आपल्‍या लव्‍ह स्‍टोरीचा खुलासा केला होता. अजय म्‍हणाला होता,  ''हलचल'च्‍या शूटिंगवेळी पहिल्यांदाच काजोलशी माझी भेट झाली. प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर ती खूप बोलणारी, गर्विष्‍ठ मुलगी होती. आमच्‍या दोघांचा स्‍वभाव एकदम वेगळा होता. परंतु, आमच्‍या दोघांतील काही विचार, गोष्‍टींमुळे आम्‍ही जवळ आलो.'' 
'हलचल' चित्रपटाच्‍यावेळी अजय देवगन आणि काजोल यांच्‍यात चांगली मैत्री झाली. त्‍यावेळी अजय देवगन करिश्मा कपूरला तर काजोल तिचा मित्र कार्तिक मेहताला डेट करत होती. काजोल आणि कार्तिक यांचे नाते टिकण्‍याची शक्‍यता नव्‍हती. त्‍यामुळेच काजोल अजय देवगनच्‍या जवळ आली. काजोलच्‍या एन्‍ट्रीने अजय देवगन आणि करिश्मा कपूरच्‍या लव्‍ह स्टोरीचा एंड झाला. अजय आणि काजोलने महाराष्‍ट्रीयन पध्‍दतीने १९९९ मध्‍ये लग्‍न केले. 
बॉलिवूडचा प्रवास 
'जख्म' आणि 'द लेजेंड ऑफ भगत सिंह', दृश्यम,  'सिंघम' यासारखे हिट चित्रपट देणारा अभिनेता अजय देवगणचा आज ४८ वा वाढदिवस. अजय देवगणने अगदी कमी वयात अभिनय सुरू केलं होतं. 'फूल और कांटे' हा त्‍याचा पहिला चित्रपट होता, असे म्‍हटले जाते. पण, त्‍याचा पहिला चित्रपट 'फूल और कांटे' नसून त्‍याआधी तो एका चित्रपट दिसला होता. चाईल्‍ड आर्टिस्‍ट म्‍हणून अजयने मिथून चक्रवर्ती यांची मुख्‍य भूमिका असलेल्‍या चित्रपटात काम केलं होतं. त्‍याने मिथून यांची बालपणीची भूमिका साकारली होती. 
चाईल्‍ड आर्टिस्‍टची भूमिका 
चित्रपट 'प्‍यारी बहना'मध्‍ये अजयने 'मास्‍टर छोटू'ची भूमिका साकारली होती. मिथून चक्रवर्ती यांच्‍या लहानपणीची भूमिका अजयने केली होती. आतापर्यंत बॉलिवूडमध्‍ये अजय देवगणने एकापेक्षा एक चित्रपट दिले आहेत. 
अजयचा जन्‍म २ एप्रिल १९६९ रोजी झाला. अजयने मुंबईतील मीठी बाई कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले. अजयचे वडिल वीरू देवगण इंडस्ट्रीमध्‍ये प्रसिध्‍द स्टंटमॅन होते. तर आई वीणा देवगण यांनी त्‍यावेळी अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. 
दिवसात १०० सिगरेट ओढायचा अजय 
अजयने एका मुलाखतीत सांगितले होते की, तो एकेकाळी एका दिवसांत १०० सिगरेट ओढत होता. पण, नंतर त्‍याने स्‍वत:च त्‍याच्‍या या सवयीवर नियंत्रण आणले.
स्‍वत:च्‍या मुलीला घाबरतो अजय
अजय आणि इलियाना डी-क्रूज टीव्‍ही शो 'यार मेरा सुपरस्टार' मध्‍ये सहभागी झाले होते. शोमध्‍ये अजयला अनेक प्रश्‍न विचारण्‍यात आले होते. अँकरने अजयला विचारले होते की, 'तुझा सर्वांत मोठा क्रिटिक कोण आहे?' यावर अजय म्‍हणाला, 'माझी मुलगी. माझ्‍या मुलीला चित्रपट दाखवतानादेखील मला भीती वाटते. कारण ती चित्रपट पाहिल्‍यानंतर कपडे फाडते. इतकेच नाही तर मी तिला गाणे म्‍हणून दाखवले तरी ती म्‍हणते, काय आहे हे? बेसूर आहे. तुम्‍ही म्‍हातारे झालात. यानंतर मी गप्‍प बसतो. तुम्‍ही मुलांशी भांडू शकत नाही. मुलांकडून तुम्‍ही शिकायला हवं.'
बेस्ट परफॉर्मन्‍स 
अजयने सर्वांत बेस्ट परफॉर्मन्‍स संजय लीला भन्‍साळी यांचा चित्रपट 'हम दिल दे चुके सनम'मध्ये दिला होता. यात ऐश्वर्या राय बच्चनने नंदिनीची भूमिका केली होती. आणि तिचा पती म्‍हणून अजय देवगणने भूमिका साकारली होती. 

... तर 'बाजीराव मस्‍तानी' अजयच्‍या नावे असता
अजय देवगणला संजय लीला भन्‍साळी यांचा चित्रपट 'बाजीराव मस्तानी'साठी विचारण्‍यात आले होते. पण, अजयने हा चित्रपट नाकारला. 
अभिनेता आणि दिग्‍दर्शकही
अजयने आतापर्यंत एकच चित्रपट दिग्‍दर्शित केला आहे. त्‍या चित्रपटाचे नाव होते - 'यू मी और हम'. हा चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर चालला नाही. त्‍यामुळे अजयला मोठ्‍या नुकसानीला सामोरे जावे लागले होते. तसेच अजयचा आणखी एक चित्रपट 'राजू चाचा'देखील फ्‍लॉप ठरला. हा चित्रपट अजयचा भाऊ अनिल देवगनने दिग्‍दर्शित केला होता. 
इतके कोटी मानधन 
अजय एका चित्रपटासाठी जवळपास २२ ते २५ कोटी रुपये मानधन घेतो. शाहरूख खान आणि सलमान खान नंतर इतकं मानधन घेणारा अजय हायएस्‍ट पेड ॲक्‍टर आहे. 
अजयला 'जख्म' आणि 'द लेजेंड ऑफ भगत सिंह' चित्रपटांसाठी राष्‍ट्रीय पुरस्‍कारांनी सन्‍मानित करण्‍यात आले आहे. तर तीन फिल्‍मफेअर चित्रपटांनी गौरवण्‍यात आले आहे. 
अजय देवगन
काजोलला पहिल्‍या भेटीत वाटला होता खडूस 
एका टॉक शोमध्‍ये काजोलने आपल्‍या वैयक्‍तिक आयुष्‍यातील काही गोष्‍टी सांगितल्‍या होत्‍या. अशा अनेक गोष्‍टींचा खुलासा काजोलने केला, हे ऐकून तुम्‍हालाही आश्‍चर्य वाटेल. काजोलने अजय देवगनच्‍या (तिचा पती) झालेल्‍या पहिल्‍या भेटीबद्‍दल सांगितले होते. काजोल म्‍हणाली होती, 'मी सुरुवातीला अजयला खडूस आणि विचित्र समजत होते.'  
काजोल म्‍हणाली होती, 'ज्‍यावेळी मी पहिल्‍यांदा अजयला भेटले, त्‍यावेळी तो कॉफी पित होता आणि प्रत्‍येकाकडे पाहत होता. ते खूपच विचित्र वाटत होतं. असं कुठल्‍या तरी व्‍यक्‍तीला पाहणे, माझ्‍यासाठी विचित्र होतं. नंतर आम्‍ही एकमेकांशी बोललो, त्‍यावेळी समजलं की, अजय एक समजदार व्‍यक्‍ती आहे आणि तो खूप कमी बोलतो. पहिल्‍या भेटीत तो मला खूप खडूस वाटला होता. आमच्‍या प्रेमाची सुरूवात मैत्रीने झाली. जर मी माझी तक्रार सांगितली तर तो खूप समजदारीने उत्तर देतो. आमच्‍या लग्‍नात आम्‍ही खूप कमी लोकांना आमंत्रित केलं होतं.'
आता अजय देवगणचा आगामी चित्रपट 'तानाजी' येतोय. 'तानाजी'ची प्रतीक्षा त्‍याच्‍या फॅन्‍सना लागून राहिली आहे. 

अजयने रिजेक्‍ट केलेले 'हे' ५ चित्रपट ठरले ब्‍लॉकबस्‍टर

बॉलिवूडचा 'सिंघम' अजय देवगनचा २ एप्रिलला वाढदिवस आहे. ॲक्शन हिरो ते कॉमिक किंग असा प्रवास असणार्‍या अजयने अगदी कमी वयात चित्रपट इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. एक काळ असा होता की, अजय देवगनच्‍या नावाने चित्रपट हिट ठरत असत. आजदेखील चाहत्‍यांना अजय देवगनच्‍या नव्‍या चित्रपटांची उत्‍सुकता लागून राहिलेली असते. असे अनेक चित्रपट आहेत, जे अजय देवगनने रिजेक्ट केले होते आणि नंतर त्‍या चित्रपटाने रेकॉर्डतोड कमाई केली होती. 

अजय देवगनने १९९१ मध्‍ये चित्रपट 'फूल और कांटे'मधून चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये पाऊल ठेवले होते. ॲक्शन ते कॉमेडीपर्यंतच्‍या प्रवासात अजयच्‍या प्रत्‍येक भूमिका परफेक्‍ट ठरल्‍या. अजयने काही चित्रपट नाकारले होते. ते चित्रपट पुढे ब्‍लॉकस्‍टर ठरले. ते चित्रपट कोणते आहेत, पाहुया. 
'करण-अर्जुन' 
Image result for karan arjun
सलमान खान आणि शाहरुख खानचा 'करण-अर्जुन' हा चित्रपट आजही सुपरहिट आहे. या चित्रपटात सलमान खानच्‍या जागी अजयला भूमिका ऑफर झाली होती. परंतु, त्‍याने या भूमिकेसाठी नकार दिला. 
 'डर' 
Image result for darr movie
शाहरुख खान, सनी देओल आणि जूही चावला स्टारर चित्रपट 'डर' हिट ठरला होता. या चित्रपटामुळे शाहरुख खान रातोरात स्टार बनला होता. जर या चित्रपटातील भूमिका अजय देवगनने स्‍वीकारली असती तर शाहरुखच्‍या जागी अजय दिसला असता. शाहरुख खानच्‍या आधी अजयला ही भूमिका ऑफर झाली होती. परंतु, दुसर्‍या चित्रपटाच्‍या शूटिंगमध्‍ये बिझी असल्‍याने अजयने हा चित्रपट स्‍वीकारला नाही. 
'बाजीराव मस्तानी'
Image result for bajirao mastani
रणवीर सिंह ज्‍या भूमिकेमुळे फेमस झाला, ती भूमिका अजय देवगनला मिळाली होती. अजयला चित्रपटाची स्क्रिप्टदेखील पसंत होती. परंतु, डेट्सच्‍या कारणांमुळे अजय हा चित्रपट करू शकला नाही. नंतर ही भूमिका रणवीर सिंहला ऑफर करण्‍यात आली. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
'कुछ कुछ होता है' 
Related image
'कुछ कुछ होता है' शाहरुखचा हिट चित्रपट आहे. काजोल, शाहरुख आणि राणी मुखर्जी स्‍टारर चित्रपटात अजय देवगनला ऑफर देण्‍यात आली होती. परंतु, हा चित्रपट अजयने नाकारला. 
'पद्मावत' 
Image result for padmavat
गेल्‍यावर्षी रिलीज झालेला संजय लीला भन्‍साळी यांच्‍या 'पद्मावत'मध्‍ये अजयला भुमिका मिळाली होती. ही भूमिका होती अलाउद्दीन खिलजीची. परंतु, अजयने ही भूमिका नाकारल्‍याने रणवीर सिंहला ऑफर देण्‍यात आली. या चित्रपटातील रणवीरच्‍या अभिनयाचे खूप कौतुकही झाले होते. इतर प्रोजेक्‍टमुळे बिझी असल्‍याने अजय खिलजीची भूमिका करू शकला नाही. 

म्‍हैसूरचा मुलगा असा बनला भारताचा 'मायकल जॅक्‍सन'

आज मल्टीटॅलेंटेड प्रभुदेवा आपला ४६ वा वाढदिवस साजरा करत आहे. प्रभु देवाला भारताचा 'मायकल जॅक्सन' म्‍हटले जाते. दोन वेळा बेस्ट कोरिओग्राफरचा राष्‍ट्रीय पुरस्‍कार मिळवणारा प्रभुदेवाचे बॉलिवूडसह तमिळ, तेलगू, मल्‍याळम आणि कन्नड इंडस्ट्रीमध्‍ये मोठे योगदान आहे. प्रभु देवा कोरिओग्राफरच नाही तर अभिनेता आणि दिग्‍दर्शकही आहे. 
प्रभु देवाचा जन्‍म कर्नाटकामध्‍ये म्‍हैसूर येथे झाला. प्रभुदेवाने अभिनयाची सुरुवात मणिरत्‍नम यांचा १९८८ मध्‍ये आलेला चित्रपट 'अग्‍निनतचतिरम'मधून एक डान्‍सर म्‍हणून केली. तर २००९ मध्‍ये दिग्‍दर्शक म्‍हणून 'वॉन्टेड' या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर 'राउडी राठोड', 'ॲक्शन जॅक्सन', 'दबंग-३' यांसारखे चित्रपट त्‍याने आणले. विशेष म्‍हणजे, प्रभुदेवाला आपल्‍या वडिलांकडून डान्‍स शिकण्‍याची प्रेरणा मिळाली. प्रभु देवाचे पूर्ण नाव प्रभुदेवा सुंदरम असे आहे. प्रभू देवाचे वडील 'मुरुग सुंदर' हे दाक्षिणात्‍य प्रसिध्‍द कोरिओग्राफर होते.
वडिलांनी केले होते कौतुक 
प्रभु देवाचे वडील मुगूर सुंदर यांनी केवळ एकदा त्‍याच्‍या डान्‍सचे कौतुक केले होते. प्रभु देवा यांचा तेलुगु दिग्‍दर्शित पहिला चित्रपट नुव्‍वोस्‍तन्‍ते नेनोडदंता होता. यामध्‍ये प्रभु देवा यांचे काम पाहिल्‍यानंतर त्‍याच्‍या वडिलांनी त्‍याचे कौतुक केले होते.  

dinsta
अशी मिळाली ओळख 
प्रभु देवाने १०० हून अधिक चित्रपटांमध्‍ये कोरिओग्राफर म्‍हणून काम केले आहे. आतापर्यंत १३ चित्रपटांचे दिग्‍दर्शन केले आहे. तर ४ चित्रपटांची निर्मिती केली आहे. त्‍याने आतापर्यंत विविध ५ भाषांमधील चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. याचबरोबर, भारताची पहिला ३ डी चित्रपट एबीसीडीमध्‍ये त्‍याने मुख्‍य भूमिका साकारली होती. त्‍याचबराबेर, २०१२ मध्‍ये आयपीएल ओपनिंग सेरेमनीमध्‍ये त्‍यांने अमिताभ बच्‍चन, सलमान खान, प्रियांका चोप्रासोबत स्‍टेज डान्‍स शेअर केला होता.  
dinsta
प्रभुदेवा यांना १९९३ मध्‍ये आलेला चित्रपट जेंटलमॅनमधून ओळख मिळाली. चित्रपट 'जेंटलमॅन'मधील एक गाणे चिकू बुकू रइले यामुळे प्रभुदेवा यांना ओळख मिळाली. 
कोरिओग्राफ केले बॉलिवूडचे हे चित्रपट
dinsta
कोरिओग्राफर प्रभु देवा यांनी ९० च्‍या दशकात आपल्‍या करिअरची सुरुवात केली होती. प्रभु देवा यांनी दिग्‍गज कलाकारांसोबत काम केले आहे.
'या' कारणामुळे झाला घटस्‍फोट 
त्‍याचबरोबर, प्रभुदेवाच्‍या वैयक्‍तिक आयुष्‍याविषयी बोलायचे झाले तर तो दक्षिणात्‍य चित्रपटाची प्रसिध्‍द अभिनेत्री नयनतारासोबत लिव्‍ह इन रिलेशनशीपमध्‍ये राहत होता. या कारणामुळे प्रभुदेवाचे लग्‍न मोडले. प्रभुदेवाचे लग्‍न लता यांच्‍याशी झाले होते. त्‍यांच्‍या पत्नीला नयनताराविषयी समजले. त्‍यावेळी त्‍या नाराज झाल्‍या. २०१० मध्‍ये त्‍यांनी फॅमिली कोर्टामध्‍ये याचिका दाखल केली. २०११ मध्‍ये प्रभुदेवाचा घटस्‍फोट घेतला. प्रभु देवा आणि लता यांना ३ मुले आहेत. त्‍यापैकी त्‍यांच्‍या मोठ्‍या मुलाचे कॅन्‍सरमुळे २००८ मध्‍ये निधन झाले होते. 
आगामी चित्रपट 
दबंग ३ च्‍या सेटवरून पहिला फोटो व्‍हायरल 
सलमान खान १ एप्रिलपासून 'दबंग-३'चे शूटिंग सुरू केले आहे. सलमान आपला भाऊ अरबाज खानसोबत इंदौर पोहोचला. तेथे मंडलेश्वर आणि माहेश्वर शूटिंग लोकेशनला पोहोचला. हा चित्रपट प्रभुदेवा दिग्‍दर्शित करत आहे. सलमानच्‍या दबंग ३ च्‍या सेटवरून एक फोटो व्‍हायरल झाला आहे. यहा फोटोमध्‍ये चुलबूल पांडेचा लूक समोर आला आहे. विशेष म्‍हणजे, सलमान प्रभु देवासोबत दिसत आहे. फोटोमध्‍ये दोघे आहिल्या फोर्टच्‍या समोर दिसत आहे. सलमानने इन्‍स्‍टाग्रामवरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्‍याने लिहिले आहे - Day 1. 

तीन अफेअर्स, स्टा‍रडम आणि रहस्‍यमय मृत्‍यू : कहाणी परवीन बाबीची

परवीन बाबी (४ एप्रिल १९४९ - २० जानेवारी २००५) ही हिंदी चित्रपटसृष्‍टीतील एक सदाबहार अभिनेत्री होती. आपल्या ग्लॅमरस आणि बोल्‍ड अंदाजासाठी प्रसिद्ध असलेल्या परवीन बाबीने हिंदी सिनेइंडस्‍ट्रीला एकापेक्षा एक चित्रपट दिले. अमर अकबर ॲन्थोनी, दीवार, नमक हलाल, शान यांसारखे सुपरहिट चित्रपट तिच्‍याच नावे आहेत. यामध्ये तिने साकारलेल्‍या भूमिका आजही वाखाणण्‍याजोगे आहेत. परवीन आणि अमिताभ बच्चनसोबतची तिची जोडी लोकप्रिय होती. ४ एप्रिलला परवीन बाबीचा जन्‍मदिवस. कधी लिव्‍ह ईन रिलेशनशीप तर कधी विवाहित व्‍यक्‍तीसोबत रिलेशनशीपला घेऊन ती चर्चेत होती. अफेअर्सनंतरदेखील ती सिंगलच राहिली. दुर्देवाने अखेरच्‍या क्षणी तिच्‍याजवळ कोणीही नव्‍हते. बॉलिवूड इंडस्‍ट्रीमध्‍ये एकापेक्षा एक हिट चित्रपट देणार्‍या या अभिनेत्रीबद्‍दल जाणून घेऊया. 

dinsta
अभिनयातील करिअरमध्‍ये यशाच्‍या शिखरावर असताना तिने १९८३ साली परवीनने अचानक सिनेजगत सोडण्याचा निर्णय घेतला. एका रिपोर्टने दिलेल्‍या माहितीनुसार, यादरम्यान तिची मानसिक स्थिती काहीशी बिघडल्याच्या चर्चा सुरू होत्या. 
Related image
७० च्‍या दशकातील एक प्रसिध्‍द अभिनेत्री परवीन बाबीने आपल्‍या करिअरमध्‍ये अनेक हिट चित्रपट दिले. तिने चित्रपटांमध्‍ये ग्लॅमरस कपडे घालण्‍याची प्रथा सुरू केली, असे म्‍हटले तरी वावगे ठरणार नाही. त्‍याआधी अभिनेत्री स्लीवलेस ब्लाउजसोबत साडी आणि घट्‍ट सूट घातलेले दिसत असत. परवीनची प्रतिमा सिनेइंडस्ट्रीत बोल्ड ॲक्ट्रेस अशी होती. १९७६ ते ८० च्‍या दशकात ती इंडस्ट्रीमध्‍ये सर्वात महागड्‍या अभिनेत्रींमध्‍ये दुसर्‍या क्रमांकावर होती. 
Image result for parveen babi
अशी मिळाली चित्रपटात संधी  
४ एप्रिल, १९४९ रोजी सौराष्ट्रच्‍या जूनागढ येथे जन्मलेल्‍या परवीन बाबीने अहमदाबादमधील सेंट झेवियर्स कॉलेजमधून इंग्रजीतून साहित्य बीए केले होते. त्‍या १० वर्षांच्‍या होत्‍या, त्‍यावेळी परवीन यांच्‍या वडिलांचे निधन झाले. ती मॉडलिंगमध्‍ये करिअर करण्‍याच्‍या शोधात होती. असे म्‍हटले जाते की, बीआर इशारा यांना आपल्‍या चित्रपटासाठी नवा चेहरा हवा होता. एक दिवस त्‍यांची नजर परवीन बाबीवर पडली. त्‍यावेळी परवीन सिगरेट ओढताना दिसली होती. मिनी स्कर्ट घालून हातात सिगरेट घेतलेल्‍या बॉबीचा अंदाज बी. आर. इशारा यांना आवडला होता. त्‍यानंतर इशारा यांनी आपल्‍या चित्रपटासाठी परवीनचीच निवड केली. 
dinsta
पाश्चात्य राहणीमान असणार्‍या परवीन बाबीला चित्रपट दिग्‍दर्शक बीआर इशारा यांनी पहिल्‍यांदा क्रिकेटर सलीम दुर्रानीसोबत चित्रपट 'चरित्र'मध्‍ये (१९७३) संधी दिली. हा चित्रपट फ्‍लॉप झाला. परंतु, परवीन बाबीची जादू कायम राहीली. तिचे अनेक चित्रपट फ्‍लॉप ठरले. पण, नंतरच्‍या काळात मात्र, अनेक चित्रपट हिट ठरले. १९७४ मध्‍ये 'मजबूर' चित्रपटामुळे ती प्रसिध्‍दीझोतात आली. 'मजबूर'मध्‍ये तिने  महानायक अमिताभ बच्‍चन यांच्‍यासाबेत काम केले होते. जवळपास पन्‍नास चित्रपटांमध्‍ये तिने काम केले.  
Image result for parveen babi
आयुष्‍यात पसरला अंधार 
सिल्वर स्क्रीनवर तिचे आयुष्‍य जितके चमकदार दिसत होते, तितका तिच्‍या आयुष्‍यात अंधारात पसरला होता. १९९० च्या दशकात ती एकटी पडत गेली. अखेर २००५ साली स्वत:च्या घरी तिचा मृत्यू झाला.
dinsta
लवलाईफमुळे चर्चेत 
परवीन आपल्‍या लव लाईफमुळे नेहमी चर्चेत राहिली. असे म्‍हटले जाते की, तिचे अफेअर महेश भट्ट यांच्‍याशिवाय, डॅनी आणि कबीर बेदीशीही होते. कबीर आणि डॅनी आणि परवीनने एकत्र १९७६ मध्‍ये 'बुलेट'मध्‍ये काम केले होते. 
Image result for parveen babi
ऋषिकेश मुखर्जी यांचा चित्रपट 'रंग बिरंगी' आणि इस्माइल श्रॉफ यांच्‍या 'दिल आखिर दिल है' यासारख्‍या चित्रपटामध्‍ये तिने काम करणे सुरू केले होते. परंतु, या सर्वांवर अचानक ब्रेक लागला होता. 
dinsta
एका प्रसिध्‍द मासिकाला दिलेल्‍या मुलाखतीत महेश भट्ट यांनी आपल्‍या आणि परवीनच्‍या नात्‍याविषयी अनेक राज सांगितले होते. त्‍याआधी तिचे अफेअर कबीर बेदीसोबत होते. परंतु, त्‍यांचे रिलेशनशीप फार काळ टिकले नाही. दोघांचा ब्रेकअप झाला. त्‍यानंतर महेश आणि परवीन एकत्र आले. परवीनसोबत महेश भट्ट यांनी आपल्‍या रिलेशनशीपवर 'अर्थ' हा चित्रपट बनवला.
Image result for parveen babi
असे सांगितले जाते की, १९७९ मध्‍ये महेश भट्ट यांना अशी एक गोष्‍ट समोर आली की, ज्‍यामुळे त्‍यांना धक्‍काच बसला. एक दिवस महेश ज्‍यावेळी घरी परतले त्‍यावेळी त्‍यांनी पाहिले की, परवीन चित्रपटातील कपडे घालून घराच्‍या एका कोपर्‍यात बसली होती. महेश यांना पाहताच परवीनने त्‍यांना गप्‍प राहण्‍याचा इशारा केला. त्‍यानंतर परवीन म्‍हणाली, ‘बोलू नको, खोलीमध्‍ये कुणीतरी आहे. तो मला मारण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.' परवीनची स्‍थिती पाहून महेश यांना धक्‍का बसला. याआधी त्‍यांनी परवीनचे हे रुप कधीच पाहिले नव्‍हते.
dinsta
या घटनेनंतर परवीनची स्‍थिती आणखी बिघडत गेली. डॉक्टरांनी सांगितले की तिला सिजोफ्रेनिया नामक मानसिक आजार आहे. त्‍यावेळी परवीन अनेक चित्रपट करत होती. दिग्‍दर्शकांना चित्रपट ठप्‍प होण्‍याची भीती होती. महेश भट्ट यांनी चांगल्‍या डॉक्‍टरांकडून तिच्‍यावर उपचार सुरू केले. परंतु, त्‍या उपचाराचा काहीही उपयोग होऊ शकला नाही. 
Image result for parveen babi
तिने आपला को-स्टार अमिताभ बच्चन यांच्‍यवरही आरोप केले. परवीनला वाटत होते की, अमिताभनी आपल्‍या मागे गुंड पाठवले आहेत. अशी स्‍थिती पाहून परवीन यांना एका खोलीत बंद करण्‍यात आले. तिला मीडिया आणि पब्लिकच्‍या नजरेपासून दूर ठेवण्‍यात आले. मध्‍यंतरीच्‍या काळात महेश भट्‍टही तिच्‍यापासून दूर गेले. तिच्‍याजवळ कोणीही नव्‍हते. ती एकटी पडत गेली.  
Image result for parveen babi
ब्लॉकबस्टर चित्रपट
परवीन बॉबीने 'नमक हलाल', 'दीवार', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान' 'खुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग' यासारखे ब्लॉकबस्टर चित्रपट केले. तिचा शेवटचा चित्रपट १९८८ मध्‍ये आलेला 'आकर्षण' होता. १९७६ ते १९८० च्‍या दरम्‍यान, अभिनेत्री रीना रॉयनंतर परवीन बॉबी सर्वात अधिक चित्रपटाचे मानधन घेणारी अभिनेत्री होती.
जगाचा निरोप
२२ जानेवारी २००५ ला परवीनने नेहमीप्रमाणेच दूध आणि वृत्तपत्र घेण्‍यासाठी घराचा दरवाजा उघडला नाही. त्‍यावेळी पोलिसांनी याची माहिती देण्‍यात आली. यानंतर परवीनचा मृतदेह पोलिसांनी ताब्‍यात घेतला. एक काळ आपल्या अभिनयाने रूपेरी पडदा व्यापणार्‍या परवीन बाबीने जगाचा निरोप घेतला होता. 

R. Madhavan | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो...

Maddy Is Back Aap Jaisa Koi movie | जेव्हा आर माधवन पहिल्यांदा कोल्हापुरात येतो... अभिनेता आर माधवन - फातिमा सना शेख यांचा चित्रपट 'आप ज...